ईशान्य भारत ...

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
28 Feb 2012 - 7:48 pm

कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....??
आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....??

कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..??
चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..??
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..??
अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...??

भारतीयच परंतु प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयीपासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा हा आवाज आहे .

मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्रिस्तीकरण यात हि राज्ये भरडली जात आहेत. हा भाग उर्वरित भारतापासून कायमच वंचित राहिला आहे. हि लोक ज्या पद्धतीने जीवन जगतात, त्यांना तसेच जगू द्या हि इंग्रजांची मानसिकता स्वातंत्र्यानंतरही तशीच चालू राहिली.या भागाच्या समस्या ज्या वेगाने सुटायला हव्या होत्या ते न झाल्यामुळे आता असंतोषाचा उद्रेक होत आहे.

चीन, बांगलादेश, पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्र पुरवठ्यामुळे नागा, मिझो, उल्फा या नक्षलवादी संघटना उच्छाद मांडत आहेत. जनतेला वेठीस धरत आहेत. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी तर अतिशय चिंताजनक आहे. एकट्या आसाममध्ये १२६ पैकी ४६ आमदार घुसखोरांचे प्रतिनिधित्व करतात, यावरून त्यांचे प्रमाण लक्षात येईल. आता तर बांगलादेशी मुख्यमंत्री होतो कि काय अशी परिस्थिती आहे. सीमेवर कुंपण घालण्याची आवश्याजाता असताना तसेच घुसखोरांचे मतदानाचे अधिकार काढून घेण्याची अपेक्षा असताना सरकारकडून मात्र घोर निराशा झाली आहे.

मणिपूर राज्यात तर संपूर्ण युवा पिढी अमली पदार्थाच्या आहार गेली आहे. बहुतांश तरुण नशेखोर असल्याने अनेकांचे संसार उद्धस्थ झाले आहेत. यामुळेच आज घटस्फोट, हिंसाचार, नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होत आहे.

तरीही या लोकांच्या असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे भारत त्यांना आपल मानायला तयार नाही. उच्च शिक्षणासाठी वेगळ्या राज्यात गेलेल्या युवकांचे अनुभव अतिशय वाईट आहेत. चेहऱ्याची ठेवण, राहणीमान यामुळे त्यांना चीनी-जपानी-नेपाळी अस हिणवल जातंय. मुलीना तर वेश्या म्हणून संबोधल जातंय. आणि या सगळ्याचा फायदा चीन उठवतंय.

चीनचे अतिक्रमण मानगुटीवर बसले असताना केंद्र सरकारची उदासीनता त्यांना हतबल करीत आहे. अरुणाचल प्रदेशचा ४०% हिस्सा चीनच्या ताब्यात असून उर्वरित ६०% भागावर देखील ते दावा सांगत आहे हीच खरी शोकांकीता आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातोय पण त्याचा दुरुपयोगच जास्त होत आहे. समाजसेवी संस्थांनी अथक प्रयत्न चालविले असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत.

माणसाच्या सहनशिलतेला शेवटी मर्यादा असतेच. निवडणुकीवर बहिष्कार घालणे, सैनिकांविरुद्ध आंदोलन करणे अशा विविध मार्गांनी ते आपला आवाज पोहचविण्याचा प्रयत्न करतात. पण निद्रिस्त झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार...??

कदाचित उद्या हे सर्व समजेल पण त्यावेळी भारताच्या नकाशावरील उजव्या बाजूचे पंख छाटलेले असतील.

ढाळू नकोस अश्रू, पुसणार नाही कोणी
आक्रोश तुझ्या जगण्याचा, बघणार नाही कोणी....

धरू नकोस अपेक्षा, आपल म्हणणार नाही कोणी,
जपानी-नेपाळी अस हिणवल्याशिवाय, गप्प बसणार नाही कोणी...

आणू नकोस आसवे, भावना जाणणार नाही कोणी,
आपला परमार्थ इथे, सोडणार नाही कोणी....

अमित सतीश उंडे, सांगली
-----------------------------------------------------------------------------------------येथील मजकूर संपादित.

धोरणसंस्कृतीसाहित्यिकविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 7:58 pm | प्रचेतस

कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....??
आक्रोश मिपाचा ह्या धाग्यांमुळे....कोणी जाणून घेता का....??

चांगल लिहिलेय, पण अजुन जरा डिटेलवार येऊ द्या.

अन्या दातार's picture

28 Feb 2012 - 9:38 pm | अन्या दातार

कॉलिंग चिगो
कॉलिंग विश्वास कल्याणकर

रणजित चितळे's picture

29 Feb 2012 - 10:53 am | रणजित चितळे

फारच कमी माहिती. दिली आहे.

वनवासी आश्रम खूप काम करते त्या भागात. मिशनरी स्कुल्स ब-याच व पूर्वीपासून असल्या कारणाने धर्म परिवर्तन होत गेले. त्याला आता टोहो फोडून काही उपयोग नाही.

ह्या ईशान्य भारतवासींनी हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री मध्ये छान पाय रोवला आहे.

विश्वास कल्याणकर's picture

7 Mar 2012 - 12:14 pm | विश्वास कल्याणकर

मणीपुर चा युवक अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे हे तितकेसे खरे नाही. इथे मैती हा समाज सुसंस्कृत व वैष्णवी आहे. तुम्हाला अरुणाचली युवक असे म्हणावयाचे असावे. तिथल्या बाबतीत हे बर्‍याच अंशी खरे आहे. त्याला कारण म्हणजे केंन्द्राकडुन करोडो रुपयाची मिळणारी स्पेशल ग्रांट. हे पैसे तेथील॑ राजकारणी मंडळी आपसात वाटुन घेतात व मतदारांना देखील त्यात सामील करतात. त्यामुळे अरुणाचली तरुणाजवळ असा बिना मेहनतीचा पैसा खेळत असतो. तो जिथे जायचा तिथे ज्जातो. मणीपुर्चे तसे नाही त्यांची समस्या वेगळी आहे. तिथे पर्वतीय प्रदेशात राहणारे नागा व कुकी हे ख्ह्रिस्ती झाले आहेत. मैती मात्र अजुनही आपली अस्मिता जपुन आहेत. पण सतत अन्यायामुळे ते उग्रवादाकडे वळले आहेत. त्यांना नेपाळ सारखे स्वतंत्र हिंदु राष्ट्र म्हणुन जगायचे आहे त्यासाठी ते भारत विरोधी आहेत. पुर्वी ते राजाचे सामंत म्हणुन जगले त्यामुळे आज त्यांना एकटे पडल्यासारखे वाटते. त्यांना मुळ प्रवाहात आणणे व त्यांचे गैरसमज हळु हळु दुर करणे हे महत्वाचे आहे. हे कार्य संघ , कल्याणाश्रम आदी करीत आहेत व त्यात यश येतांना दिसत. आहे. आसाम मध्ये ख्रिस्ती झालेले बांधव पुन्हा हिंदु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अरुणाचल चा ४०% भाग चीन ने घेतला हे देखील बरोबर नाही असे मला वाटते. चीन आपला हक्क अरुणाचल वर सांगतात हा एक राजकीय भाग आहे. पण तिबेट च्या नागरीकांचे चीन काय हाल करीत आहेत ते अरुणाचलींना माहीत आहे त्यामुळे ते भारताबरोबरच आहेत. यात शंका घेण्याचे कारण नाही.

मी तुमचे लिखाण/कामाचा प्रत्यक्ष अनुभव याविषयी वाचले आहे. मी वरील लिखाण विविध मासिक/पेपर यांचा अभ्यास करून केले आहे. कदाचित त्यामुळे या त्रुटी असतील. परत लिहिताना नक्कीच सुधारणा करेन.