रांगोळ्या

पैसा's picture
पैसा in कलादालन
18 Feb 2012 - 11:07 pm

amit

हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो?

यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली.

नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली. ती लोकांना खूप आवडली. मग अशा मोठ्या रांगोळ्या काढणं हा दरवर्षीचा उद्योग झाला. म्हापसा, वास्को इथल्या प्रदर्शनात ते रांगोळ्या काढायला लागले.

pic1

pic2

pic3

mandakini

shilp

sachin

hakikat

amit1

gabbar

kid

काही प्रदर्शनातून बक्षीसे मिळत असत तर काहीत फक्त शाबासक्या. मग हळूहळू दोघेही माणगावकर बंधू नोकरीनिमित्त पणजी इथे राहू लागले. कला अकादमीचे सदस्य झाले. जेव्हा आंतर्राष्ट्रीय फिल्म फिस्टिव्हल्सची सुरुवात झाली तेव्हा याना उद्घाटनाच्या ठिकाणी कला अकादमीत रांगोळी काढायला बोलावलं गेलं. उद्घाटकाची छबी रांगोळीतून चितारायची पद्धत या दोघानी सुरू केली.

yash

ben

अनेकदा अशा प्रमु़ख पाहुण्याकडून शाबासकी मिळते, पण नेहमीच सगळं सुरळीत होत नाही. ज्याना रांगोळी काढायची संधी मिळत नाही , त्यांनी प्रमुख पाहुण्याला रांगोळी न दाखवणे, कधी पाहुणे यायच्या आधीच गर्दी झाली, आणि पायानी रांगोळी पुसली गेली अशा सबबी सांगून रांगोळी पुसून टाकणे असेही प्रकार केले, पण नरेश आणि गणेश यानी नाउमेद न होता आपलं काम चालूच ठेवलं.

fardeen

Vahida

या दोघांनी काढलेल्या सुरुवातीच्या रांगोळ्या सुंदर होत्याच, पण नंतर नंतर कमालीचं परफेक्शन येत गेलं. हल्लीच लता दीदी एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तेव्हा या दोघांनी काढलेली ही रांगोळी.

lata

मा. दीनानाथांचं चित्र दीदींना इतकं आवडलं की त्यानी हातात असलेली गुलाबाची फुलं त्या चित्राच्या पायथ्याशी ठेवली. मग आपल्या चांदीच्या घंटेसारख्या मंजूळ स्वरात या दोघांना शाबासकी दिली.

lata2

ती रांगोळी कशी आणि केवढी होती याची कल्पना यावी म्हणून हे.

lata3

तरी यातले बरेचसे फोटो मोबाईलवर किंवा जुन्या कार्डावरच्या फोटोवरून डिजिटल कॅमेर्‍याने काढलेले आहेत, त्यामुळे या रांगोळ्यांची प्रत्यक्ष कल्पना येणं जरा कठीण आहे.

आणखी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अनिल काकोडकरांची ही रांगोळी.

anil

आपल्या हातात केवढी जादू आहे याचा अजिबात गर्व नसलेले हे दोघे भाऊ, त्यातला नरेश माझ्या ऑफिसात काम करतो. त्यांच्या या कलाकृती सर्वात आधी प्रत्यक्ष पहायला मिळतात हे मी माझं नशीबच समजते.

अमिताभ बच्चन यांच्या एका वाढदिवसाला प्रतीक्षा बंगल्यात एका कॉमन मैत्रिणीने या दोघाना रांगोळी काढण्यासाठी नेलं. तिथे सगळ्यात पहिल्या फोटोतली रांगोळी या दोघांनी काढली. अमिताभ यानी रांगोळीच्या भोवती काही संरक्षण, काच यांची व्यवस्था करून ती रांगोळी जपून ठेवली, ती निदान काही दिवस तरी सुरक्षित राहिली असेल. पण एरवी अत्यंत क्षणभंगूर अशी ही रांगोळीची कला या दोघांना नक्की कोणती प्रेरणा देते देवजाणे!

कलासंस्कृतीरेखाटन

प्रतिक्रिया

कुंदन's picture

18 Feb 2012 - 11:13 pm | कुंदन

लैच भारी आहेत रांगोळ्या.
अशा कलाकारांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद पैसा ताई!

निवेदिता-ताई's picture

19 Feb 2012 - 11:19 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते

अन्या दातार's picture

18 Feb 2012 - 11:33 pm | अन्या दातार

सुंदर कलाकृती. तोफेच्या बाजूला असलेल्या सैनिकाच्या चेहर्‍यावरचे भावही काय सुंदर टिपलेत. खरंच दोघांच्या चिकाटीला, कलेला प्रणाम! :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2012 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम...अतिशय प्रेरक कला आहे हतात यांच्या..त्यामुळे
फक्त सलाम..सलाम..आणी सलामच...

जयवी's picture

19 Feb 2012 - 12:29 am | जयवी

अ प्र ति म......!!
त्रिवार मुजरा ह्या कलाकारांना......!!
अगदी फोटो काढल्यासारख्या आहेत ह्या रांगोळ्या......!!
कमाल !!!!!!

विश्वास बसत नाही या रांगोळ्या आहेत यावर.
बोटात जादू आहे अगदी!

स्मिता.'s picture

19 Feb 2012 - 5:51 am | स्मिता.

पैसाताई, या कलाकारांची आणि त्यांच्या जादुई कलेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
रांगोळ्यांबद्दल तर काय बोलावे. तुम्ही सांगितलेलं असूनही त्या रांगोळ्या असून चित्र नाहित यावर विश्वास बसत नव्हता. खरंच माणगावकर बंधूंकडे दैवी देणगी आहे. त्यांच्या पुढच्या कलासाधनेकरता मनःपूर्वक शुभेच्छा :)

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2012 - 7:16 am | नगरीनिरंजन

अप्रतिम!!!
दुसरा शब्दच नाही!

दीपा माने's picture

19 Feb 2012 - 10:59 am | दीपा माने

अप्रतिम! दोन नंबरच्या रांगोळीतले चित्र 'नॅशनल जिओग्राफी ' ह्या जगप्रसिध्द मासिकाच्या खुप वर्षांपुर्ची आलेल्या एका मासिकाचे मुखपृष्ठ आहे. चित्रातल्या अफगाणी युवतीच्या रोखुन बघणार्‍या घार्‍या डोळ्यांतील भाव,कुहतुलपणा आणि एकाचवेळी प्रगटलेला बेडरपणा फोटोग्राफरने अचुक टिपलेत. त्यामुळे हे मुखपृष्ठ ह्या मासिकाच्या अति नावाजलेल्या मुखपृष्ठांपैकीतील एक आहे. रांगोळीकारांनीही ह्या चित्राला योग्य न्याय दिलाय. पैसा, एवढी सुंदर कला आपल्या मिपावर सादर केल्याबद्दल आपले आभार आणि रांगोळीकार माणगाव्कर बंधुद्वयांचे हार्दीक अभिनंदन.

तुषार काळभोर's picture

19 Feb 2012 - 12:15 pm | तुषार काळभोर

अभिनव, सचिन, गब्बर, कारगिल आणि दीदी.... या रांगोळ्यांचं कौतुक करणंही अशक्य आहे...अप्रतिम!!!!

रामदास's picture

19 Feb 2012 - 2:48 pm | रामदास

ह्या मुलीचा फोटो दोनदा आला होता. अफगाणीस्तानातील युध्द बरीच वर्षे चालले होते. या युध्दादरम्यान झालेल्या फरकांचा आढावा घेण्यासाठी या मुलीचा पुन्हा एकदा शोध घेण्यात आला .त्यावेळी पुन्हा एकदा ही मुलगी प्रकाशात आली होती.

तुषार काळभोर's picture

19 Feb 2012 - 3:03 pm | तुषार काळभोर

सौजन्यः अर्थातच नॅशनल जिओग्राफिक मासिक

दीपा माने's picture

23 Feb 2012 - 12:30 pm | दीपा माने

रामदास, तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यावेळी तिचे लग्न होऊन ती मुलांची आई झाली होती. जेव्हा मुळ फोटोग्राफर अफगाणीस्तानला तिला भेटायला/शोधायला गेले तेव्हा त्यांना ती शादीसुदा आहे आणि तिथल्या रीतींनुसार पुन्हा फोटोसाठी उभी रहील की नाही याची शंकाच होती पण तिच्या नवर्‍याच्या परवानगीने तिने घराबाहेर येऊन स्वतःचा फोटो काढु दिला होता. तो फोटोही ह्या 'नॅशनल जिअ‍ॅग्राफिक ' मासिकाने तिच्यावरील मुखपृष्टा संबंधीच्या लेखात छापला होता.

दीपा माने's picture

23 Feb 2012 - 11:57 am | दीपा माने

होय, हेच ते मुखपृष्ट आहे ज्याचा मी प्रतिसादात उल्लेख केला होता.

दीपा माने's picture

23 Feb 2012 - 12:32 pm | दीपा माने

हेच ते मुखपृष्ट ज्याचा मी माझ्या प्रतिसादात उल्लेख केला होता. आठवणीने 'नॅशनल जिअ‍ॅग्राफीक' मासिकाचे हे मुखपृष्ट दाखवल्याबद्दल आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2012 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणगावकर बंधुंच्या अप्रतिम कारागिरीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्स.
सर्वच रांगोळ्या जबरा आहेत.

-दिलीप बिरुटे

जेनी...'s picture

19 Feb 2012 - 11:25 am | जेनी...

झक्कास्स ....

झकास एकदम .....:)

काय जबरी रांगोळी काढली आहे.. काही शब्दच उरणार नाहीत..

- पिंगू

जाई.'s picture

19 Feb 2012 - 3:15 pm | जाई.

अतिशय सुंदर

५० फक्त's picture

19 Feb 2012 - 4:13 pm | ५० फक्त

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम पैसातै, खुप खुप धन्यवाद या ओळखीबद्दल.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2012 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय जबर्‍यादस्त आहे राव हे.
लै आवडल्या गेल्या आहे.

देव पण एकेकाच्या हातात काय जादू देतो ना....

प्रीत-मोहर's picture

20 Feb 2012 - 12:14 pm | प्रीत-मोहर

अगदी हेच म्हणते

ब्येष्टच :)

Pearl's picture

19 Feb 2012 - 5:52 pm | Pearl

खूपच सुंदर.. खरचं बोटांमध्ये जादू आहे.
मस्त रांगोळ्या. बर्‍याचशा रांगोळ्या स्नॅप्स्/पोर्ट्रेट वाटताहेत.
अभिनव बिन्द्रा, गब्बर, लेणी आणि डॉ. काकोडकर विशेष आवडले.

मृगनयनी's picture

19 Feb 2012 - 9:13 pm | मृगनयनी

पैसा ताई..... अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्र ...अप्रतिम...... अक्षरशः जिवन्त माणसं वाटताहेत!!!!... स्पेशली ती अफगणिस्तानातली काही वर्षांपूर्वीची मुलगी आणि आत्ताची स्त्री!!!!
कसले डोळे चितारलेत तिचे!!!...... जबराट्ट!!!!!!!!!!

सूड's picture

19 Feb 2012 - 10:37 pm | सूड

अप्रतिम रांगोळ्या !!

अनिल आपटे's picture

20 Feb 2012 - 11:15 am | अनिल आपटे

प्रत्याकाशाहून प्रतिमा सुंदर
अनिल आपटे

पैसा ताई, तुमचे खुप खुप आभार आणि त्या नरेशना सांगा आपल्या मिपा परिवारातर्फे पुढ्च्या वाट्चालीसाठी हार्दिक शुभेच्छा

प्यारे१'s picture

20 Feb 2012 - 12:30 pm | प्यारे१

सुंदर रांगोळ्या...!
अप्रतिमच.

अवांतरः देवानं हातात कला दिली म्हटलं की कलाकाराची साधना, त्यानं घेतलेले कष्ट, त्यामागचा ध्यास सगळंच्या सगळं गेलं का गाढवाच्या ..... मध्ये?
वा, वा छान छान म्हटलं की झालंच म्हणा!
हीच बाब इतर कलावंत, संगीतकार, परमार्थातले संत साधक, शिवाजी महारा जांसारखे युगपुरुष सगळ्यांच्या बाबतीत.... जयजयकारापुरतं नका हो सीमित ठेऊ या सगळ्यांना.

पियुशा's picture

20 Feb 2012 - 12:33 pm | पियुशा

केवळ अप्रतिम !!!!!!!
:)

स्वातीविशु's picture

20 Feb 2012 - 12:56 pm | स्वातीविशु

पैसाताई अतिशय अप्रतिम रांगोळ्या मिपावर प्रकाशित केल्याबद्द्ल खुप आभार. जिवंत माणसेच आहेत व ती आता बोलू लागतील असे वाट्ले. प्राचीन शिल्पाची रांगोळी खुप आवड्ली. :-)

माणगावकर बंधूंना पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा.

प्रभो's picture

20 Feb 2012 - 1:04 pm | प्रभो

भारी!!

नंदन's picture

20 Feb 2012 - 1:23 pm | नंदन

अप्रतिम!

उदय के'सागर's picture

20 Feb 2012 - 1:49 pm | उदय के'सागर

कितीही प्रयत्न केला तरी विश्वासच बसत नाही.... ह्या रांगोळ्या.... अशक्य....केवळ अशक्य....
एखादी कला(कलाकार) एवढी अप्रतीम असावी कि त्याच्या स्तुती साठी शब्द ही तोकडे पडावे....
व्वा...ज्योती ताई हे इथे शेअर केल्याबद्दल आपले फार फार धन्यवाद!!!!!!!!!!!!

नावातकायआहे's picture

20 Feb 2012 - 5:01 pm | नावातकायआहे

क्लास अपार्ट!
सुंदर!
इथे शेअर केल्याबद्दल आपले धन्यवाद!!

मेघवेडा's picture

20 Feb 2012 - 5:20 pm | मेघवेडा

निव्वळ थक्क झालो आहे. यांच्या हाती जाद, कला वगैरे आहेच पण किती मेहनत, केवढी चिकाटी नि केवढे श्रम घेतले असतील या पर्फेक्शनकरिता! हॅट्स ऑफ बॉस.

गवि's picture

20 Feb 2012 - 5:25 pm | गवि

हातात देव आहे यांच्या..

अद्भुत कलाकारी..

मात्र पुन्हा तेच वाईट वाटतं.. दोनपाच दिवसात याचा केर काढला जाणार ही भावना..

यकु's picture

20 Feb 2012 - 5:39 pm | यकु

16, TITE STREET,
CHELSEA. S.W.

My dear Sir

Art is useless because its aim is simply to create a mood. It is not meant to instruct, or to influence action in any way. It is superbly sterile, and the note of its pleasure is sterility. If the contemplation of a work of art is followed by activity of any kind, the work is either of a very second-rate order, or the spectator has failed to realise the complete artistic impression.

A work of art is useless as a flower is useless. A flower blossoms for its own joy. We gain a moment of joy by looking at it. That is all that is to be said about our relations to flowers. Of course man may sell the flower, and so make it useful to him, but this has nothing to do with the flower. It is not part of its essence. It is accidental. It is a misuse. All this is I fear very obscure. But the subject is a long one.

Truly yours,

Oscar Wilde

नि३सोलपुरकर's picture

20 Feb 2012 - 5:32 pm | नि३सोलपुरकर

पैसाताई ,
खुप आभार....
सुंदर रांगोळ्या..माझा मामा ही अशा रांगोळ्या काढायचा पण पुरेशा प्रोत्साहनाअभावी तो आता शबनम बॅगवर पोर्ट्रेट करतो आहे...उदरभणासाठी.
माणगावकर बंधूंना पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा

अमोल केळकर's picture

20 Feb 2012 - 5:47 pm | अमोल केळकर

मस्तच :)

अमोल केळकर

वपाडाव's picture

20 Feb 2012 - 6:31 pm | वपाडाव

धन्यवाद पैसातै...

मोहनराव's picture

20 Feb 2012 - 7:01 pm | मोहनराव

अप्रतिम!

अन्नू's picture

20 Feb 2012 - 8:09 pm | अन्नू

कॉलेजच्या दिवसांची आठवण ताजी केलीत. आंम्ही कॉलेजच्या रांगोळी स्पर्धेत असल्याच रांगोळ्यांवर नंबर काढायचो. :)

प्राजु's picture

21 Feb 2012 - 12:23 am | प्राजु

बा.................................................परे!!!
काय सॉल्लिड आहे !
धन्य धन्य!!
पैसा ताई..... मनापासून आभार इथे ओळख करुन दिल्याबद्दल.

चित्रा's picture

21 Feb 2012 - 4:12 am | चित्रा

रांगोळ्या सुरेख आहेत. डोळे, प्रकाशाच्या छटा, फार सुरेख जमले आहेत सर्वच चित्रांत.

प्रचेतस's picture

21 Feb 2012 - 8:32 am | प्रचेतस

निव्वळ अप्रतिम.

sneharani's picture

21 Feb 2012 - 10:39 am | sneharani

अप्रतिम्!अप्रतिम!! अप्रतिम!!अतिशय सुंदर आहेत रांगोळ्या!
:)

जागु's picture

21 Feb 2012 - 10:47 am | जागु

जबरदस्त.

झकासराव's picture

21 Feb 2012 - 11:03 am | झकासराव

झबरदस्त कलाकार आहेत हे दोघे.
त्याना वंदन. :)

ही कला शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

कॉमन मॅन's picture

21 Feb 2012 - 11:37 am | कॉमन मॅन

सुंदरच..!

मदनबाण's picture

21 Feb 2012 - 2:10 pm | मदनबाण

सुरेख... :)

किसन शिंदे's picture

21 Feb 2012 - 5:21 pm | किसन शिंदे

अप्रतिम!!

याच्याशिवाय दुसरा शब्दच नाही.

शिल्पा ब's picture

23 Feb 2012 - 1:03 pm | शिल्पा ब

अप्रतिम. रांगोळीच्या सहाय्याने इतकं भावदर्शन सोपी गोष्ट नाही. सुंदर...

एक रसिक जीवनयात्री's picture

23 Feb 2012 - 5:31 pm | एक रसिक जीवनयात्री

लय भारी!!झक्कास्स्!!!या शिवाय शब्दच नाही...मानगावकर बन्धून्च्या कलेला सलाम व शुभेछा नक्की कलवा,ही विनन्ती.लिहिल्याबद्दल तुम्हास धन्यवाद !

श्रीयुत संतोष जोशी's picture

25 Feb 2012 - 8:04 am | श्रीयुत संतोष जोशी

आहे. त्यांच्या कलेला सलाम.
ठाण्यामधे श्री.त्रिंबक जोशी आहेत ते ही अशीच सुंदर रांगोळी पोर्ट्रेट काढतात.

चिगो's picture

26 Feb 2012 - 1:44 pm | चिगो

सगळ्याच रांगोळ्या अतिसुंदर आहेत.. पण खजुराहो शिल्प, गब्बर, लतादिदी म्हणजे कहर आहेत...
सलाम सलाम.. त्रिवार सलाम..
धन्यवाद पैसाताई..

कान्होबा's picture

23 Mar 2012 - 12:50 pm | कान्होबा

अप्रतिम .सुंदर. विलोभनीय
पैसाताई या कलाकारांबद्दल माहिती दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यावाद.
त्यांचा मोबाईल नंबर आपण देऊ शकाल का?कारण मी सुद्धा २-३ वर्षापासुन रांगोळी काढायला सुरवात केली आहे.अजुन शिकतो आहे.त्याचबरोबर प्रदर्शनातहि काढण्याचा प्रयत्ना करतो.
यातील अभिनव,खजुराहो,सचिन, तोफखाना,गब्बर,लहान मुलगा,लतादिदि विषेश आवड्ले.

वपाडाव's picture

23 Mar 2012 - 1:33 pm | वपाडाव

.

वपाडाव's picture

23 Mar 2012 - 1:38 pm | वपाडाव

.

सांजसंध्या's picture

23 Mar 2012 - 7:49 pm | सांजसंध्या

क्षणभंगुर रचनाच.. पण अक्षरशः जादू आहे . या दोघांच्याही कलेला माझा सा. नमस्कार..
ओरिसात एक असेच कलाकार आहेत ना ? वाळूची शिल्पं बनवणारे