एकी १

लीलाधर's picture
लीलाधर in जे न देखे रवी...
28 Dec 2011 - 9:06 am

एकी १ आईने केला केक,
दुरकी २ बाबांना केला फोन !

तीरकी ३ ताईने दीला पेन,
चौकी ४ आमचा बाळू हुशार !

पाची ५ मिळून करू नाच,
साही ६ आमचा नाच पहा !

साती ७ आमची न्यारी बात,
आठी ८ घडेल का आई बाबांची भेट?

नौवे ९ मिळून सारे गाऊ,
दाही १० बाळूला आवडते माऊ !

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Dec 2011 - 9:50 am | प्रचेतस

वा वा चान चान.
सुंदर कविता

गवि's picture

28 Dec 2011 - 9:53 am | गवि

आधी सांग ...

करुण रस का बरे???

गवि's picture

28 Dec 2011 - 9:57 am | गवि

बाकी ठीकठाक रे पणः

आठी आठ
घडेल का आई बाबांची भेट?

..........

काय हे..? पुलंच्या "असामी"तल्या

समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता.
XXरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला..

याची आठवण झाली.

लीलाधर's picture

28 Dec 2011 - 9:59 am | लीलाधर

अ‍ॅक्च्युली मला असे दाखवायचे आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात फारच कमी वेळ आई बाबांना आपल्या मुलांना द्यायला मिळतो. त्यामुळे मला त्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे सांगायचे आहे.

मदनबाण's picture

28 Dec 2011 - 10:13 am | मदनबाण

नौवे ९ मिळून सारे गाऊ,
दाही १० बाळूला आवडते माऊ !

मस्त कविता... :)

फिझा's picture

28 Dec 2011 - 10:32 am | फिझा

अमच्य लहान्पणि आजि एक गाणे म्हणायचि .....ते असेच अहे ,,,पण याहुन वेगळे आहे ,,,पोस्ट करु आम्हि कहि वेळाने !!!!

लीलाधर's picture

28 Dec 2011 - 10:40 am | लीलाधर

तुमच्या आजीच्या गाण्याच्या (प्रतिक्षेत) असलेला चचा :) आम्हालाही आवडेल आजीचे गाणे वाचायला.

michmadhura's picture

28 Dec 2011 - 10:45 am | michmadhura

वन टू थ्री फोर च्या इंग्रजाळलेल्या जमान्यात हे एकी१ दुरकी २ आवडले.

लीलाधर's picture

28 Dec 2011 - 10:47 am | लीलाधर

धन्यवाद

प्रभाकर पेठकर's picture

28 Dec 2011 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

बाकी बालगीत छान आहे. पण...

१ - केक
२ -फोन
३ - पेन
४ - हुशार
५ - नाच
६- पहा
७ - बात
८ - भेट
९ - गाऊ
१० - माऊ

शेवटचे १० बरोबर 'माऊ' जुळत नाही.

मग त्याठीकाणी काय जुळले असते असे तुम्हाला वाटते?

प्रभाकर पेठकर's picture

28 Dec 2011 - 11:16 am | प्रभाकर पेठकर

आपण 'चतुर' आहात, आपण 'चाणक्य' आहात, आपणच 'कवी' आहात. मी काय सुचविणार?

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 11:38 am | ५० फक्त

त्ये दहाला एक चहा बसतंय का बघा ओ जरा, काय हल्ली ल्हान ल्हान पोरं बी च्या पितात, (काही इतर्ही बरंच काही पितात )

दिपक's picture

28 Dec 2011 - 12:58 pm | दिपक

"ते एक गच्ची बसतय का बघा हो."
भाईंच्या रावसाहेबांची आठवण झाली. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2011 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा

आपण 'चतुर' आहात, >>> हे कौतुक झालं ;-)
आपण 'चाणक्य' आहात, >>> हा टोमणा आहे :-D
आपणच 'कवी' आहात. >>> आणी हि शिवि,किंवा शिवाशिवी :-p
मी काय सुचविणार?..... (तुझं तुच बघ काय ते..!) असं ध्वनित होतय यातनं...कळलं काय रे चच्चा ;-) अता तरी.... सुधर लवकर

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 3:20 pm | ५० फक्त

अ आ, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकच आयडी एकाच वेळी चतुर चाणक्य आणि कवि असु शकत नाही... स्पष्ट सांगा की ,

हे बघा ओ चचा, एकतर तुम्ही चतुर चाणक्य असाल, किंवा चाणक्य कवि असाल किंवा चतुर कवि असाल, पण तिन्ही एकत्र छे शक्यच नाही,

निश's picture

28 Dec 2011 - 11:45 am | निश

मस्त मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

लेका कसली मुक्तक कविता रे ही ?

आपल्याला कवितेतले काय कळत नाय, पण ही कविता / बडबडगीत म्हणजे कै च्या कै वाटते आहे. शब्दाला शब्द जोडून रेल्वेचे डबे बांधल्यासारखे.

एकी १ मास्तरला मारली फेक,
दुरकी २ मास्तरने हाणले दोन !

तीरकी ३ शेजारची बाळी खूपच हसिन,
चौकी ४ बाळीचा भाउ दांडगट फार !

पाची ५ रोज हैदोस वाच,
साही ६ शेजारच्या मुलीकडे चोरुन पहा !

साती ७ पानात आमच्या कोल्हापुरी कात,
आठी ८ अभ्यासाची लागली वाट

नौवे ९ रोज रोज शिणेमाला जाउ,
दाही १० परिक्षेत येतो मग बागूलबुवा !

हे एका महाविद्यालयीन युवकाचे मुक्तक कसे वाटते ? ;)

परायक

श्री. पराशेट, प्रेरणेबद्दल धन्यवाद ( सदर प्रेरणा ही वांगम यीन आहे, कोण म्हणुन विचारु नये क्रुप या हीवि नंती)

एकी १ बंड्याला मारली फेक,
दुरकी २ बाळ्याने दिले मेंदिचे कोन !

तीरकी ३ उद्यापासुन द्यावी बाळ्याला लाईन,
चौकी ४ बाळ्याची आई चौकस फार !

पाची ५ दाखवायचा होतोय रोजचा जाच,
साही ६ बाळ्याला सांगेन लग्नाचं पहा !

साती ७ काल बाळ्यानं गल्लीत धरला हात ,
आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट,

नौवे ९ या वर्षी हनिमुनला जाउ
दाही १० चार वर्षानी पोराचं नाव शाळेत लिहा!

हे एका लग्नाळु म्हंजे सभ्य भाशेत चि१००कां युवतीचे (का घोडनवरीचे) मुक्तक कसे वाटते ?

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 3:34 pm | मी-सौरभ

एकी १, सासर्‍याची लेक,
दुरकी २, तिचा आला फोन !

तीरकी ३, मागे माझा ATM पिन
चौकी ४, खरेदी करे फार !

पाची ५ , डोक्यावर माझ्या नाच
साही ६, म्हणे स्वतःच स्वतः पहा!

साती ७, लावतो कुकर मध्ये भात
आठी ८, घासून ठेवतो ताट !

नौवे ९, पाठ झाली मऊ
दाही १०, हाल माझे पहा !

एका कनिष्ठ भगिनी योग असलेल्या नवर्‍याचे मनोगत

स्पा's picture

28 Dec 2011 - 12:47 pm | स्पा

आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट,

म्हन्जि काय?

स्पावड्या..

मला वाटते आपल्या एरियात साधारण शीळफाट्यावर मारणे असतं ना त्यासारखाच अर्थ आहे.

चूभूदेघे.

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 12:59 pm | वपाडाव

स्पावडु, मला असं वाटते की तिने एकाच दिवशी बर्‍याच जणांच्या मिटिंगा फिक्स केल्या असाव्यात....
अन त्यात तिने बंड्यासाठी कात्रजचा घाट निवडला असावा.....
बाकी, सारसबाग, संभाजीबागही इतरांना दिलेली असेल पण ती इथे यमकात घुसवता येत नसल्या कारणाने उल्लेखिलेली नाही.....

- (कधीच बाळ्या/बंड्या/पिंट्या न झालेला) वप्या

स्पा's picture

28 Dec 2011 - 2:03 pm | स्पा

आच्छा अस हाय काय.. मला उगाच घाटदार वळणांची आठवण झाली
आणि मी बंड्याला उगाच लकी वेग्रे समजत होतो :D

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

छानच आहे, आणि काही शब्द करुण रस देखील निर्माण करत आहेत.

एकी १ प्रतिसादाला मारली फेक,
दुरकी २ मालकाचा आला फोन!

तीरकी ३ चावडीवरती मारली पीन,
चौकी ४ अवांतराचा गोंधळ फार !

पाची ५ डूआयडींचा होतोय जाच,
साही ६ जे होतय ते गुमान पहा !

साती ७ म्हातारीच्या हातचा दूध-भात ,
आठी ८ एकोळींनी लावलीये वाट,

नौवे ९ स्वाक्षरीपेक्षा प्रतिसाद मऊ
दाही १० शक्यतो लॉगईन न करताच मिपा पहा!

हे एका थकलेल्या संपादकाचे मुक्तक / 'थकलेल्या संपादकाची कहाणी' कसे वाटते आहे ?

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 1:11 pm | ५० फक्त

मस्त ओ पराशेट,

धन्यवाद धन्यवाद.

मध्ये कुणीतरी मिपाच्या विडंबनांच्या परिस्थीतीबद्दल काळजी करणारा धागा काढला होता ना, त्यांची काळजी मिटली असावी.

प्यारे१'s picture

28 Dec 2011 - 1:50 pm | प्यारे१

____/\____

काय ती प्रतिभा!
आहाहा.
अगदी बहरच आलाय की.
बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 2:12 pm | वपाडाव

बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.

तुंबलेले बोळे असं म्हणायचंय का तुम्हाला?

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 3:33 pm | मी-सौरभ

प्रकाटाआ

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 2:13 pm | मी-सौरभ

२ च्या पाढ्यावर कविता करुन टाका कुणीतरी

२ एके २
सौरभने टाकले प्रतिसाद २.

पैसा's picture

28 Dec 2011 - 7:02 pm | पैसा

या बालगीताने बर्‍याच कवीना प्रेरणा पुरवली, त्यामुळे ही कविता अत्यंत यशस्वी म्हणायला हवी!

प्रीत-मोहर's picture

28 Dec 2011 - 7:12 pm | प्रीत-मोहर

हौ ना.. परासारखे कविता न वाचणारे लोक्स ही कविता लिवु लागलेत ...

हाहाहा

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 8:02 pm | मी-सौरभ

या बालगीताने बर्‍याच कवीना प्रेरणा पुरवली

हे
गीताने बर्‍याच जणांना प्रेरणा पुरवली असे वाचले ;)

शिव!! शिव!! शिव!!