एकी १
लेखनविषय:
काव्यरस
एकी १ आईने केला केक,
दुरकी २ बाबांना केला फोन !
तीरकी ३ ताईने दीला पेन,
चौकी ४ आमचा बाळू हुशार !
पाची ५ मिळून करू नाच,
साही ६ आमचा नाच पहा !
साती ७ आमची न्यारी बात,
आठी ८ घडेल का आई बाबांची भेट?
नौवे ९ मिळून सारे गाऊ,
दाही १० बाळूला आवडते माऊ !
वाचने
4898
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
वा वा चान चान.
सुंदर कविता
आधी सांग ...
करुण रस का बरे???
बाकी ठीकठाक रे पणः
आठी आठ
घडेल का आई बाबांची भेट?
..........
काय हे..? पुलंच्या "असामी"तल्या
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता.
XXरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला..
याची आठवण झाली.
अॅक्च्युली मला असे दाखवायचे आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात फारच कमी वेळ आई बाबांना आपल्या मुलांना द्यायला मिळतो. त्यामुळे मला त्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे सांगायचे आहे.
नौवे ९ मिळून सारे गाऊ,
दाही १० बाळूला आवडते माऊ !
मस्त कविता... :)
अमच्य लहान्पणि आजि एक गाणे म्हणायचि .....ते असेच अहे ,,,पण याहुन वेगळे आहे ,,,पोस्ट करु आम्हि कहि वेळाने !!!!
In reply to आजीचे गाणे!! by फिझा
तुमच्या आजीच्या गाण्याच्या (प्रतिक्षेत) असलेला चचा :) आम्हालाही आवडेल आजीचे गाणे वाचायला.
वन टू थ्री फोर च्या इंग्रजाळलेल्या जमान्यात हे एकी१ दुरकी २ आवडले.
बाकी बालगीत छान आहे. पण...
१ - केक
२ -फोन
३ - पेन
४ - हुशार
५ - नाच
६- पहा
७ - बात
८ - भेट
९ - गाऊ
१० - माऊ
शेवटचे १० बरोबर 'माऊ' जुळत नाही.
In reply to छान बालगीत. by प्रभाकर पेठकर
मग त्याठीकाणी काय जुळले असते असे तुम्हाला वाटते?
In reply to शेवटचे १० बरोबर 'माऊ' जुळत नाही by लीलाधर
आपण 'चतुर' आहात, आपण 'चाणक्य' आहात, आपणच 'कवी' आहात. मी काय सुचविणार?
In reply to आपण कवी.. by प्रभाकर पेठकर
त्ये दहाला एक चहा बसतंय का बघा ओ जरा, काय हल्ली ल्हान ल्हान पोरं बी च्या पितात, (काही इतर्ही बरंच काही पितात )
In reply to त्ये दहाला एक चहा बसतंय का by ५० फक्त
"ते एक गच्ची बसतय का बघा हो."
भाईंच्या रावसाहेबांची आठवण झाली. :-)
In reply to आपण कवी.. by प्रभाकर पेठकर
आपण 'चतुर' आहात, >>> हे कौतुक झालं ;-)
आपण 'चाणक्य' आहात, >>> हा टोमणा आहे :-D
आपणच 'कवी' आहात. >>> आणी हि शिवि,किंवा शिवाशिवी :-p
मी काय सुचविणार?..... (तुझं तुच बघ काय ते..!) असं ध्वनित होतय यातनं...कळलं काय रे चच्चा ;-) अता तरी.... सुधर लवकर
In reply to चच्चा..औषध कोणतं ते कळलं का..? by अत्रुप्त आत्मा
अ आ, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकच आयडी एकाच वेळी चतुर चाणक्य आणि कवि असु शकत नाही... स्पष्ट सांगा की ,
हे बघा ओ चचा, एकतर तुम्ही चतुर चाणक्य असाल, किंवा चाणक्य कवि असाल किंवा चतुर कवि असाल, पण तिन्ही एकत्र छे शक्यच नाही,
मस्त मस्त
लेका कसली मुक्तक कविता रे ही ?
आपल्याला कवितेतले काय कळत नाय, पण ही कविता / बडबडगीत म्हणजे कै च्या कै वाटते आहे. शब्दाला शब्द जोडून रेल्वेचे डबे बांधल्यासारखे.
एकी १ मास्तरला मारली फेक,
दुरकी २ मास्तरने हाणले दोन !
तीरकी ३ शेजारची बाळी खूपच हसिन,
चौकी ४ बाळीचा भाउ दांडगट फार !
पाची ५ रोज हैदोस वाच,
साही ६ शेजारच्या मुलीकडे चोरुन पहा !
साती ७ पानात आमच्या कोल्हापुरी कात,
आठी ८ अभ्यासाची लागली वाट
नौवे ९ रोज रोज शिणेमाला जाउ,
दाही १० परिक्षेत येतो मग बागूलबुवा !
हे एका महाविद्यालयीन युवकाचे मुक्तक कसे वाटते ? ;)
परायक
श्री. पराशेट, प्रेरणेबद्दल धन्यवाद ( सदर प्रेरणा ही वांगम यीन आहे, कोण म्हणुन विचारु नये क्रुप या हीवि नंती)
एकी १ बंड्याला मारली फेक,
दुरकी २ बाळ्याने दिले मेंदिचे कोन !
तीरकी ३ उद्यापासुन द्यावी बाळ्याला लाईन,
चौकी ४ बाळ्याची आई चौकस फार !
पाची ५ दाखवायचा होतोय रोजचा जाच,
साही ६ बाळ्याला सांगेन लग्नाचं पहा !
साती ७ काल बाळ्यानं गल्लीत धरला हात ,
आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट,
नौवे ९ या वर्षी हनिमुनला जाउ
दाही १० चार वर्षानी पोराचं नाव शाळेत लिहा!
हे एका लग्नाळु म्हंजे सभ्य भाशेत चि१००कां युवतीचे (का घोडनवरीचे) मुक्तक कसे वाटते ?
In reply to काय ती कविता काय ती प्रेरणा by ५० फक्त
एकी १, सासर्याची लेक,
दुरकी २, तिचा आला फोन !
तीरकी ३, मागे माझा ATM पिन
चौकी ४, खरेदी करे फार !
पाची ५ , डोक्यावर माझ्या नाच
साही ६, म्हणे स्वतःच स्वतः पहा!
साती ७, लावतो कुकर मध्ये भात
आठी ८, घासून ठेवतो ताट !
नौवे ९, पाठ झाली मऊ
दाही १०, हाल माझे पहा !
एका कनिष्ठ भगिनी योग असलेल्या नवर्याचे मनोगत
आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट,
म्हन्जि काय?
In reply to ऑ? by स्पा
स्पावड्या..
मला वाटते आपल्या एरियात साधारण शीळफाट्यावर मारणे असतं ना त्यासारखाच अर्थ आहे.
चूभूदेघे.
In reply to ऑ? by स्पा
स्पावडु, मला असं वाटते की तिने एकाच दिवशी बर्याच जणांच्या मिटिंगा फिक्स केल्या असाव्यात....
अन त्यात तिने बंड्यासाठी कात्रजचा घाट निवडला असावा.....
बाकी, सारसबाग, संभाजीबागही इतरांना दिलेली असेल पण ती इथे यमकात घुसवता येत नसल्या कारणाने उल्लेखिलेली नाही.....
- (कधीच बाळ्या/बंड्या/पिंट्या न झालेला) वप्या
छानच आहे, आणि काही शब्द करुण रस देखील निर्माण करत आहेत.
एकी १ प्रतिसादाला मारली फेक,
दुरकी २ मालकाचा आला फोन!
तीरकी ३ चावडीवरती मारली पीन,
चौकी ४ अवांतराचा गोंधळ फार !
पाची ५ डूआयडींचा होतोय जाच,
साही ६ जे होतय ते गुमान पहा !
साती ७ म्हातारीच्या हातचा दूध-भात ,
आठी ८ एकोळींनी लावलीये वाट,
नौवे ९ स्वाक्षरीपेक्षा प्रतिसाद मऊ
दाही १० शक्यतो लॉगईन न करताच मिपा पहा!
हे एका थकलेल्या संपादकाचे मुक्तक / 'थकलेल्या संपादकाची कहाणी' कसे वाटते आहे ?
मस्त ओ पराशेट,
धन्यवाद धन्यवाद.
मध्ये कुणीतरी मिपाच्या विडंबनांच्या परिस्थीतीबद्दल काळजी करणारा धागा काढला होता ना, त्यांची काळजी मिटली असावी.
____/\____
काय ती प्रतिभा!
आहाहा.
अगदी बहरच आलाय की.
बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.
In reply to ____/\____ काय ती by प्यारे१
बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.तुंबलेले बोळे असं म्हणायचंय का तुम्हाला?
प्रकाटाआ
२ च्या पाढ्यावर कविता करुन टाका कुणीतरी
In reply to आता by मी-सौरभ
२ एके २
सौरभने टाकले प्रतिसाद २.
या बालगीताने बर्याच कवीना प्रेरणा पुरवली, त्यामुळे ही कविता अत्यंत यशस्वी म्हणायला हवी!
In reply to =)) by पैसा
हौ ना.. परासारखे कविता न वाचणारे लोक्स ही कविता लिवु लागलेत ...
हाहाहा
In reply to हौ ना =)) =)) by प्रीत-मोहर
या बालगीताने बर्याच कवीना प्रेरणा पुरवलीहे गीताने बर्याच जणांना प्रेरणा पुरवली असे वाचले ;) शिव!! शिव!! शिव!!
वा वा चान चान. सुंदर कविता