मनातलं जनांत

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
26 Dec 2011 - 1:20 pm

गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग?

हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्‍या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती.

एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला.
राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला.

मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. :) १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय. :)
माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे.

नतमस्तक
-गणपा

हा पदार्थ इथे बरेच वेळा येउन गेल्यामु़ळे इथे पाककृती देत नाहीये.
(स्वाती ताईची कृती ,
आणि ही सुबक ठेंगणी यांची)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

26 Dec 2011 - 1:27 pm | मी-सौरभ

तुमच्या ब्लॉगला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'!!

अरे वा !
शुभेच्छा आमच्या पण :)

शाहिर's picture

26 Dec 2011 - 1:30 pm | शाहिर

अभिनंदन गंपा

मन१'s picture

26 Dec 2011 - 1:36 pm | मन१

भुकेल्या पोटानं असला खादाडीचा ब्लॉग वाचणं शिक्षा असते म्हणून आमेहे तसेही टाळतोच.
पण शुभेच्छा आहेतच.

प्रचेतस's picture

26 Dec 2011 - 1:36 pm | प्रचेतस

मस्त हो गणपाशेठ.
अभिनंदन.

विवेक मोडक's picture

26 Dec 2011 - 1:44 pm | विवेक मोडक

हार्दिक अभिनंदन बल्लवाचार्य

छोटा डॉन's picture

26 Dec 2011 - 2:12 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

पुढील कारकिर्दीसाठी भरगच्च शुभेच्छा आणि खुपसारे प्रोत्साहन :)

- छोटा डॉन

अप्पा जोगळेकर's picture

26 Dec 2011 - 1:48 pm | अप्पा जोगळेकर

शुभेच्छा.

सविता००१'s picture

26 Dec 2011 - 2:13 pm | सविता००१

आणि खूप खूप शुभेच्छा!!!!

प्यारे१'s picture

26 Dec 2011 - 2:18 pm | प्यारे१

अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Dec 2011 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

अभि चे नंदन रे गणपा :)

स्मिता.'s picture

26 Dec 2011 - 2:23 pm | स्मिता.

'खा रे खा' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सोत्रि's picture

26 Dec 2011 - 2:30 pm | सोत्रि

गणपाभौ,

अभिनंदन हो!

- (खवैय्या) सोकाजी

स्वाती दिनेश's picture

26 Dec 2011 - 2:36 pm | स्वाती दिनेश

'खा रे खा' ला पहिल्या वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा!
पाकृंच्या शतकी वाटचालीची वाट पाहत आहेच..
स्वाती

कवितानागेश's picture

26 Dec 2011 - 2:38 pm | कवितानागेश

हार्दिक अभिनंदन

मृत्युन्जय's picture

26 Dec 2011 - 2:40 pm | मृत्युन्जय

अभिनंदन गणपाशेट.

रणजित चितळे's picture

26 Dec 2011 - 2:47 pm | रणजित चितळे

मला माहित नव्हते. आत्ताच फॉलो करायला सुरवात केली. आपल्या ब्लॉगला शुभेच्छा.

अभिनंदन रे गणपा !!

पण ...मालक अजुन संपले नाही ! अजुन येवु देत !

अन्या दातार's picture

26 Dec 2011 - 3:02 pm | अन्या दातार

अशीच वाटचाल चालू राहुदे.

दिपक's picture

26 Dec 2011 - 3:13 pm | दिपक

अभिनंदन आणि शुभेच्छा रे गणपा!! :-)

४२,६०० तो झांकी है १,०००,०००,००० अभी बाकी है!

michmadhura's picture

26 Dec 2011 - 3:16 pm | michmadhura

'खा रे खा' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

साधामाणूस's picture

26 Dec 2011 - 3:31 pm | साधामाणूस

गणपाशेठ अभिनंदन! तुमच्या पाककृतींबरोबरच तुमचा विनयशील स्वभावही आवडतो.

मैत्र's picture

26 Dec 2011 - 3:38 pm | मैत्र

एक से एक पदार्थ .. अतिशय डिट्टेलवार आणि उपयुक्त माहिती..
बेश्ट .. खा रे खा ला शुभेच्छा.. असेच अनेक वाढदिवसाचे तिरामिसु, बकलावा, लाडू इ. इ. येत राहोत :)

गणपा भौ -- बॅचलर्स चे म्हणून जे पदार्थ आहेत ते सुद्धा बरेच वेळखाऊ आहेत. काही सोपे, कमी वेळ लागणारे पदार्थ टाका ... खूप जणांना उपयोग होईल...

प्रास's picture

26 Dec 2011 - 3:44 pm | प्रास

तुम्ही आमच्यासाठी द्रोणाचार्य आहात आणि आम्ही तुमचे एकलव्याच्या भावनेने बनलेले शिष्य आहोत.

माझ्यासारख्या नुसत्या खाण्यात हुशार असणार्‍याला तुम्ही स्वयंपाकाकडे ओढलेलं आहे. तुमच्या ब्लॉगच्या साहाय्यानेच आमची चिमुकली (नसलेली) पावले स्वयंपाक घरात पडली आणि तिथेच रमली आहेत.

तुमच्या ब्लॉगला ह्याप्पी बड्डे!

आणि

तुमच्या ब्लॉग-प्रपंचाला आमच्या (म्हणजे माझ्या) हार्दिक शुभेच्छा!

:-)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Dec 2011 - 3:59 pm | बिपिन कार्यकर्ते

गण्या भो*** लै लै शुभेच्छा लेका! नाव काढलंस मित्रा!

सर्वसाक्षी's picture

26 Dec 2011 - 4:01 pm | सर्वसाक्षी

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

नंदन's picture

26 Dec 2011 - 4:33 pm | नंदन

अभिनंदन गणपाशेठ, आणि 'खा रे खा'ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धमाल मुलगा's picture

26 Dec 2011 - 4:38 pm | धमाल मुलगा

उत्तरोत्तर तुला अनेकानेक पाककृती करायला वेळ मिळो, त्या तू अशाच प्रसिध्द करत राहोस आणि एके दिवशी तरलादलाल.कॉम किंवा संजीवकपूर.कॉम ह्यांचादेखील वाचकवर्ग तुला लाभो अशी श्री शंभूचरणि विनम्र प्रार्थना! :)

समीरसूर's picture

26 Dec 2011 - 4:41 pm | समीरसूर

ब्लॉग सतत चालू ठेवणं आणि त्याला लोकप्रिय बनवणं हे खरच कर्मकठीण आहे. मला अजून जमलेलं नाही. प्रॉब्लेम तोच, काय लिहायचं हेच कळत नाही. एक ब्लॉग माझा मेला या हलगर्जीपणामुळे. त्याचे रीतसर क्रियाकर्म करून मी दुसरा काढला पण त्याची पण अवस्था तशीच आहे. कधी मान टाकेल सांगता येत नाही.

आपलं कौतुक याचमुळे वाटतं. चिकाटी फार महत्वाची. आमची चिकाटी अजिबात चिकट नाही; खूपच सैल आहे...

जाऊ द्या, तुमचं मात्र अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

--समीर

माझं एक स्वप्न आहे.
एक दिवस मला फक्त माझ्याच हातानं तयार झालेल्या पाकृ खायच्या आहेत.. आणि त्यासाठी गंपा भाऊचा ब्लॉग मेन सोर्स आहे.
तुमच्या ब्लॉगला वाढ्दिवसाच्या शुभेच्छा! असेच चविष्टपणे वाढत रहा ;-)

सन्माननिय बल्लवाचार्य श्री श्री श्री १००८ गणपासेठ यांच्या 'खा रे खा'ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! :)

(शुभेच्छु: खादाड आणि मंडळी) ;)

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

पाषाणभेद's picture

27 Dec 2011 - 6:45 am | पाषाणभेद

गणपाशेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता खरोखरीची खाण्याची पार्टी पाहीजे. नुसत्या डिशा पाहून लाळग्रंथी सुकून गेल्यात.

पाषाणभेद's picture

27 Dec 2011 - 6:45 am | पाषाणभेद

गणपाशेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता खरोखरीची खाण्याची पार्टी पाहीजे. नुसत्या डिशा पाहून लाळग्रंथी सुकून गेल्यात.

अभिनंदन हो ब्लॉगचे मालक...

५० फक्त's picture

27 Dec 2011 - 6:53 am | ५० फक्त

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

अर्धवट's picture

27 Dec 2011 - 8:37 am | अर्धवट

गंपा.. मला एकदा माझ्या हातानं (मॅगी व चहा सोडून) काही पदार्थ बनवून खायचा आहे अशी महत्वकांक्षा माझ्या मनात निर्माण करणारा माणूस आहेस तू..
माझ्यासारख्या आळशी माणसाच्या मनात असे वेडे विचार सोडायला खूप कर्तुत्व लागतं बाबा..

प्रसन्न केसकर's picture

27 Dec 2011 - 12:04 pm | प्रसन्न केसकर

खा रे खा चा मी फॅन आहे.

निश's picture

28 Dec 2011 - 10:14 am | निश

मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा!

पैसा's picture

28 Dec 2011 - 7:15 pm | पैसा

वाढदिवसानिमित्त एखादा नवा शाकाहारी प्रयोग नाही का केलास? (म्हणजे परा खूष झाला असता.)

जाई.'s picture

28 Dec 2011 - 10:52 pm | जाई.

हार्दिक अभिनंदन

अभिनंदन अन अजुन पाकृ खास करुन व्हेज.. येउ द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2011 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा

आंम्ही मागे म्हंटल्या प्रमाणे आद्य खाद्य साहित्तीक श्री.गणपा भाऊ यांचे व त्यांच्या तश्याच ब्लॉगचे प्रथम वर्षपूर्ती बद्दल हार्दिक अभिनंदन ...व पुढिल वाटचालीस शुभेच्छा :-)

विकास's picture

29 Dec 2011 - 12:39 am | विकास

अभिनंदन गणपा! तुमच्या रेसिपीज आणि ब्लॉगचे फॅन आहोतच. पण तुम्ही केलेले,हे पदार्थ, नक्की कसे लागतात हे आम्हाला कधी कळणार? :-)