तिरामिसु: A Piece of Cake

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in पाककृती
7 Oct 2009 - 12:15 pm

'आपण खातो ते पदार्थ जर बोलू शकत असते तर त्यांनी काय बरं सांगितलं असतं?'असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाचा प्रत्यय येतो. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या!

असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी झाला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली. चारी दिशांत भरलेली युद्धाची धुमश्चक्री. युद्धावर जायला निघालेल्या एखाद्या अनाम सैनिकाचं घर. कितीही निरोप घेतला तरी कमीच अशी वेळ. एका डोळ्यात विरह आणि दुस-या डोळ्यात त्याच्याविषयीचा प्रचंड अभिमान बाळगून चेह-यावर मंद हास्याचा मुलामा देणारी त्याची ती. इतरांकडून मिळालेले निरोप, आशीर्वाद, प्रार्थनांच्या बरोबरीनेच त्याने जपून ठेवलेली आणखी एक वस्तू. तिने स्वत: केलेलं तिरामिसु! त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा! आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी! नेहमीच तिरामिसु खाताना हे सगळं प्रेम मला जाणवतं...आणि मग कॅलरी वगैरेचा विचार करायला वेळच मिळत नाही.

पारंपरिक इटालियन तिरामिसु करताना लिकर, केक, मास्कारपोनी (?) चीज आणि सॅवॉर्डी (?) बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खाना खजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईलच्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही! :)

साहित्य

  1. २ चहाचे चमचे भरून कॉफी पावडर
  2. १०० मि.ली. दूध
  3. १२ मारी बिस्किटे
  4. २०० मि.ली. क्रीम
  5. ५० ग्रॅम बारीक साखर
  6. २ चहाचे चमचे व्हिनेगर (पुस्तकात तांदळाचं व्हिनेगर वापरा असं लिहिलेलं आहे. पण मी फ्रुट- व्हिनेगर वापरूनही करते)
  7. एका अंडयाचा बलक
  8. सजावटीसाठी थोडी कोको पावडर (साखर नसलेली)
  9. मारीची ६ बिस्किटं (३ x २) झोपतील असा एक डबा


हे लागणारं सामान!

कृती

  1. कॉफी पावडर दुधात विरघळवा.
  2. मारी बिस्किटं त्या दुधात बुडवून ठेवा. बिस्किटं अखंडच रहातील (त्यांचा लगदा होणार नाही) याची काळजी घ्या. बिस्किटं पुरेशी भिजली की बाजूला काढून ठेवा.
  3. एका बाऊलमधे क्रीम घेऊन त्यात साखर फेटून विरघळवून घ्या.
  4. मग व्हिनेगर घालून पुन्हा थोडेसे फेटा. व्हिनेगर घातल्याघातल्याच क्रीम घट्ट होत जाईल. जवळजवळ भज्यांच्या पिठापेक्षा किंचित जास्त घट्ट होईल.
  5. आता त्यात अंडयाचा बलक घालून पुन्हा नीट फेटून घ्या.
  6. आता डब्यात ती कॉफीत भिजवलेली सहा बिस्किटं ३ x २ अशी ठेवा. त्यावर त्या फेटलेल्या क्रीममधलं अर्धं ओता आणि सारखं पसरा. त्यावर पुन्हा उरलेली सहा बिस्किटं लावून उरलेलं क्रीम पसरून घ्या.
  7. वरती गाळण्यातून कोको पावडर भुरभुरवा आणि ८-१२ तास फ्रीजमधे थंड करत ठेवा.
  8. चांगलं घट्ट झालं की त्याचे तुकडे करून आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा तिची आठवण काढत खा.

कॉफीत भिजलेली बिस्किटं

साखर, व्हिनेगर आणि अंडं मिसळलेलं क्रीम

फ्रीजमधून काढलेला केक

सुगरणीचा :P सल्ला

  • व्हिनेगरचं प्रमाण पुस्तकात जरी २ चमचे लिहिलं असलं तरी मी पहिल्यांदा केलेला केक मला जरा आंबट वाटला. म्हणून मी आता दीडच चमचा व्हिनेगर घालते. व्हिनेगरप्रमाणेच कॉफी पावडरचं प्रमाणही आवडीनिवडीप्रमाणे कमी-जास्त झालं तरी चालतं.
  • पण क्रीममधे साखर, व्हिनेगर आणि अंडं घालायचा क्रम बदलला तर मात्र पुढे जे काही होईल त्याला केक म्हणता येणार नाही. :)


"Pick-Me-Up!!!" आका तिरामिसु

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Oct 2009 - 12:19 pm | अवलिया

पाकृ वाचली नाही
फटु पाहिला नाही
सबब प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच नाही :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पर्नल नेने मराठे's picture

7 Oct 2009 - 12:23 pm | पर्नल नेने मराठे

=P~ वाव.....
चुचु

सहज's picture

7 Oct 2009 - 12:29 pm | सहज

ज ब ह र्‍या!!!!

वर्णन भारी, कृती भारी. तिरामिसुप्रकरण देखील आवडीचे.

तिरमिसु जलेटो.. ओऽऽहोहो काय व्याकूळ करुन सोडलेत.

थोडीशी कॉफी लिकर/लिक्युअर, थोडे डार्कचॉकलेट मिक्स केले तर बिघडेल की "घडेल"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2009 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तोंडाला पाणी सुटलं. (लेखाचं शीर्षक देखील आवडलं)

बेली'ज कशी वाटेल यात?

अदिती

सुबक ठेंगणी's picture

7 Oct 2009 - 2:43 pm | सुबक ठेंगणी

चांगलंच लागेल्...फक्त प्रमाण माहित नाही. लिकर वापरली तर बिस्किटांच्या ऐवजी स्पाँज केक जास्त चांगला लागेल.
रही बात डार्क चॉकलेट की...ते कोको ऐवजी वरून किसून घालता येईल. :)

समंजस's picture

7 Oct 2009 - 12:37 pm | समंजस

वा!!! अफलातून पदार्थ आणि साजेसं वर्णन!!! :)

स्मिता श्रीपाद's picture

7 Oct 2009 - 12:40 pm | स्मिता श्रीपाद

सुबक ची "सुबक" पाकॄ

जीव गेला गं तो फोटु पाहुन...
मलापण पाहिजे... :-((

अप्रतिम,सुरेख...आणि सोपी पाकॄ..

-स्मिता

(एक शंका...क्रिम कसलं वापरावं...म्हणजे इथे भारतात अमूल चं जे क्रिम मिळतं ते चालेल का?)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Oct 2009 - 12:57 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान आहे पाककृती अन माहितीही.

गणपा's picture

7 Oct 2009 - 12:59 pm | गणपा

खल्लास पाककृती. तितकच सुरेख शब्दांकन.
फटु सोने पे सुहागा.

हॅटस् ऑफ टू यु..

राधा१'s picture

7 Oct 2009 - 2:30 pm | राधा१

सुबक,
खुप छान..मस्त पाणी सुटल आहे तोंडाला...!!
करुन बघणार नक्की...(हे हे कधी करणार ग?..ऑफीसमधुन येतेस उशीरा नेहमी कधी करणार तू?)

प्रभो's picture

7 Oct 2009 - 2:44 pm | प्रभो

१ नंबर....

--प्रभो

श्रावण मोडक's picture

7 Oct 2009 - 3:56 pm | श्रावण मोडक

आणा ती डिश इथं पटकन.

नंदन's picture

7 Oct 2009 - 3:58 pm | नंदन

तिरामिसूची माहिती, पाकृचं वर्णन आणि फोटो लाजवाब!
(मेन्यूमध्ये वाचताना यात लेडीफिंगर्स असतात हे वाचून प्रथम उडालोच होतो. पण तो पदार्थ म्हणजे भेंडी नसून सॅवॉर्डी म्हणजे इटालियन बिस्कीट/कुकीला इथे लेडीफिंगर म्हणतात हे ज्ञान यथावकाश पदरात पडलं :))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुबक ठेंगणी's picture

7 Oct 2009 - 5:30 pm | सुबक ठेंगणी

लेडीज फिंगर्स म्हण्जे भेंडी हे फक्त आपल्यालाच शिकवतात की काय कोण जाणे?? इथे भेंडीला लेडीज फिंगर्स कुणीच म्हणत नाहीत. "ओक्रा" म्हणतात. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा सॉल्लिड कसंतरीच वाटलं होतं. :)

तुझी पा.कृ. बघून जीभेवर चव घोळली.
गेले ... ते दिन गेले.... :(
आपला,
(नॉस्टॅल्जिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

सोनम's picture

7 Oct 2009 - 4:09 pm | सोनम

एका अंडयाचा बलक :(

हे नाही वापरले तर चालेल का? :?
बाकी पदार्थ खूप छान.... :) त्यात केक म्हटल्यावर :D

सुबक ठेंगणी's picture

7 Oct 2009 - 4:21 pm | सुबक ठेंगणी

करून बघ आणि सांग मलाच :)

स्वाती२'s picture

7 Oct 2009 - 5:05 pm | स्वाती२

देवा! आधीच माझा उपास आणि त्यात जीवघेणं तिरामिसू.
तिरामिसूची कथा आणि पाकृ दोन्ही झकास.

दशानन's picture

7 Oct 2009 - 5:27 pm | दशानन

ठार मेलो... गचकलो !

पार झालो ;)

तिरामिसूची माहिती, पाकृचं वर्णन आणि फोटो खतरा !

खुप सुंदर :)

दिपाली पाटिल's picture

7 Oct 2009 - 8:33 pm | दिपाली पाटिल

वा वा तिरामिसु...
भारीच आहेस तु...
दिसतंय छान पण
मला पाकृ नीट समजली नाही गं...

दिपाली :)

संदीप चित्रे's picture

7 Oct 2009 - 10:56 pm | संदीप चित्रे

विशेषतः शेवटचा.
बाकी पहिल्यांदा तिरामिसु खाताना आम्हालाही नंदनसारखंच वाटलं होतं की लेडी फिंगर बिस्किटस म्हणजे भेंडीची बिस्किट्स की काय !

Mascarpone चीज (क्रीम आणि व्हिनेगरच्या ऐवजी) आणि Espresso coffee (नेसकॅफेच्या ऐवजी) वापरूनही बघ.

(आपल्याकडे भारतात मस्त फेसदार कॉफी 'एस्प्रेस्सो' म्हणून मिळते ती नाही म्हणत आहे मी :) )

दिपाली पाटिल's picture

8 Oct 2009 - 12:23 am | दिपाली पाटिल

>>Mascarpone चीज (क्रीम आणि व्हिनेगरच्या ऐवजी) आणि Espresso coffee (नेसकॅफेच्या ऐवजी) वापरूनही बघ.

हे अगदी खरं आहे...यापासुन बनवलेला तिरामिसु अतिशय मस्त लागतो... Espresso coffee मात्र सुपर स्ट्राँग हवी आणि Mascarpone चीज पण इटालियन मिळालं तर उत्तम...

दिपाली :)

प्राजु's picture

8 Oct 2009 - 12:40 am | प्राजु

खल्लास!!!
सॉल्लिड पाकृ.. फोटो कहर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

8 Oct 2009 - 2:21 am | चित्रा

छान पाककृती. मस्त दिसतोय तिरामिसूचा तुकडा.

पण कधी करण्याच मनातपण आल नव्हत.. खूप कठिण असेलस वाटलेल. पण जमेल्स वाटतय.. करून सांगीन तुला कस झाल ते.

क्रान्ति's picture

8 Oct 2009 - 8:15 am | क्रान्ति

फोटो खूपच खास! पाकृ लिहिलीय पण मस्तच.:)

क्रान्ति
अग्निसखा

किट्टु's picture

8 Oct 2009 - 5:49 pm | किट्टु

मला वाटलं नव्ह्तं की इतकी सोपी रेसिपी मिळेल म्हणुन....इथे खातांना तर वाटलं होतं की या जन्मात ही रेसिपी मला जमणार नाही #:S , पण आता थोडी आशा दिसतेय.... :D

फोटो खूपच मस्त! पाकृ आणि वर्णन पण मस्तच लिहिलय. =D>