मँगो तिरामिसु

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
3 Aug 2010 - 12:39 am

साहित्य-
२ आंबे किवा २ वाट्या आमरस+ सजावटीसाठी आंब्याच्या फोडी.
५ ते ६ मोठे चमचे साखर, २ अंडी
१८ ते २० लॉफेल बिस्किटे( तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे) ही मिळाली नाहीत तर मेरी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या .लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे ५ ,६ चमचे साखर पुरते.
२५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज
फ्रूटी किवा ऑरेंज ज्यूस बिस्किटे भिजवण्यासाठी.
एक चौकोनी किवा लंबगोल ट्रे.

कृती-
आंब्याचा रस काढून ब्लेंडरमधून घुसळून गुठळ्या मोडा. मस्कार्पोन चीज त्या मध्ये घालून एकत्र मिसळा.
अंडी भरपूर फेटून घ्या. ती चीज आणि आंब्याच्या मिश्रणात मिसळा.
लॉफेल बिस्किटे ट्रे मध्ये एकापुढे एक ठेवा, आणि त्यावर चमच्याने हळूहळू फ्रूटी/ऑरेंज ज्यूस घाला.बिस्किटे तो ज्यूस शोषून घेतील. आता ह्या लेअर वर आंबायुक्तचीजचा एक थर देऊन बिस्किटे झाकून टाका.
पुन्हा बिस्किटांचा एक थर लावा, ज्यूस घाला व आंबायुक्त चीजने झाका.
बिस्किटे- आंबाचीज- बिस्किटे- आंबाचीज असे एकूण चार थर होतील.
आता आंब्याच्या फोडींनी सजवा.

फ्रिजमध्ये ६ ते ८ तास सेट करायला ठेवा. तिरामिसु थंड झाल्यावर घट्ट झालेले दिसेल.
हवा तेवढा पोर्शन डिशमध्ये थंडगार सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

3 Aug 2010 - 12:42 am | चतुरंग

स्वाती ताऽऽऽऽऽऽऽई!!!!!!!!!!!!!!!!!!!!

(खुद के साथ बातां : रंगा, इथे 'हवा तेवढा पोर्शन' म्हटल्यावर तू काहीच ऑप्शनला टाकणार नाहीस! ;) )

(*%#@$!*^!)बेरंग..

ता.क. 'कॅलिफोर्निया पिझ्झा किचन' मधे मिळणारा तिरामिसु मी खाल्लाय जबरी असतो. त्याच्या चॉकोलेट सॉसमधे किंचित रम टाकत असावेत कारण तो खाल्ला रे खाल्ला की जाम झोप येते अगदी गुंगीच म्हणा ना!

यम्मी!!!!

राकलेट विजा काढावाच म्हणतो आता....

मराठमोळा's picture

3 Aug 2010 - 12:45 am | मराठमोळा

तो.पा.सु.

कधी खाल्ले नाहीये पण अप्रतिम चव असेल असे दिसतेय फोतुवरुन.
सुंदर पाकृ. :) येऊ द्यात अजुन असेच नवनविन प्रकार.

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 12:48 am | ऋषिकेश

तिरामिसु हे माझं आतापर्यंतचं सर्वात आवडलेलं डेझर्ट.. मार डाला तै!!.. थ्यांकू!!!!
इटालियन मधे तिरामिसु म्हणजे "पिक मी अप".. आणि हे अस्स तिरामिसु समोर दिसल्यावर ते पिक मी अप म्हणतंय अस्साच भास नेहमी होत आलाय.. आजही होतोय!!
पुन्हा एकदा थ्यांकू

तिरामिसु हे माझं आतापर्यंतचं सर्वात आवडलेलं डेझर्ट

+१.

पण खायला मिळाल्यावरच थांकु! ;-)
(आम्ही आयटी वाले नसलो तरी आम्हाला 'स्वयंपाक' येत नाही. ;-) )

पुष्करिणी's picture

3 Aug 2010 - 1:03 am | पुष्करिणी

अहाहा..

केशवसुमार's picture

3 Aug 2010 - 1:14 am | केशवसुमार

माझी यादी वाढते आहे..
(वसुली एजंट्)केशवसुमार
चव बघितल्या शिवाय प्रतिसाद कस्सा द्यावा ह्याचा विचार करतो आहे.
(विचारी)केशवसुमार

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 1:19 am | प्रियाली

२५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज

म्हणजे अमेरिकेतलं कोणतं चीज घ्यावं?

कोण म्हणालं मला हुशार!!

फोटो आकर्षक आहेत. चवही भन्नाट लागेल अशी खात्री वाटते.

भाग्यश्री's picture

3 Aug 2010 - 2:12 am | भाग्यश्री

मस्कार्पोन चीज मिळतं गं अमेरिकेत. याच नावाने.

तिरामिसू प्रचंड आवडते. फोटो पाहून तोंपासू!

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 6:55 am | प्रियाली

कुठे ठेवलेलं असतं? इतर विविध प्रकारची चिझं (अनेकवचन ;) ) असतात तिथेच असतं का?

चित्रा's picture

3 Aug 2010 - 8:29 am | चित्रा

उच्चार माहिती नाही, पण हा एक डबा मी यापूर्वी आणलेला आहे.

स्वाती, पाककृती मस्त. आंबा घालून तिरामिसू माहिती नव्हते. छानच दिसते आहे.

(माझा सर्वात आवडता गोड पदार्थ असावा - पुरणपोळीच्या खालोखाल). त्यात घालण्याच्या बिस्कीटांचे नाव लेडीज फिंगर्स म्हणून ऐकले होते, पण युरोपमध्ये कदाचित वेगळे नाव असावे.

प्रतिसादाशी भयंकर सहमत!

साष्टांग दंडवत. भन्नाट पाकृ आहे.
दिसतय तर एकदम कॅची, आईस्क्रिमच्या तोंडात मारेल असं.

पिंगू's picture

3 Aug 2010 - 2:17 am | पिंगू

स्वातीताय, डेझर्ट बघुनच तोंडाला पाणी सुटलं...

- (खादाडी राज्याचा सदस्य) पिंगू

बाकिच्यांना काढूदेत राकलेट व्हिजा!
मी तिरामिसू व्हिजावर फ्राफूला येते आहे.
भ्रमणमंडळाची पुढची ब्याच भरली का गं? ;)
फोटू भारी आणि पाकृ तर 'क्या केहेने!'

रश्मि दाते's picture

3 Aug 2010 - 3:13 am | रश्मि दाते

मस्त दिस्ते,पण फक्त पाहुन समाधान मानावे लागेल,आम्च्या कडे हे चिझ मिळ्त नाहि :(

दिपाली पाटिल's picture

3 Aug 2010 - 6:38 am | दिपाली पाटिल

वा वा वा s s s s s S S S s s s S S s s s वा

नंदन's picture

3 Aug 2010 - 6:52 am | नंदन

क्लास!

(राकलेट व्हिसा काढण्यात आपण फारच उतावीळपणा दाखवला, असं काही जणांना वाटलं असणार याची पूर्ण खात्री आहे ;))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून व्हीसा शिल्लक आहे, आणि त्या काळात जर्मनीमधली एक कॉन्फरन्सही हेरून ठेवलेली आहे रे नंद्या! माझ्या (नसलेल्या) दु:खात तू आनंद मानू नकोस!

ही ही ही .. नंदनच्या आनंदात (:) ) सहभागी...

स्वातीताई,
पाकृ मस्त दिसते आहे. फोटो सुद्धा जोरात :)

सहज's picture

3 Aug 2010 - 7:25 am | सहज

जबरदस्त!

आशिष सुर्वे's picture

3 Aug 2010 - 10:14 am | आशिष सुर्वे

आमच्या बहिणाबाईंच्या आदेशानुसार हा केक तिच्या वाढदिवसाला घेऊन गेलो होतो..
दक्षिण मुंबईत, कुलाबा इथे 'Theobroma' नावाची एक बेकरी-कम-दुकान आहे.. तिथे छान केक असतात..

हा केक एकदम लुसलुशीत असतो आणि ह्याचे स्थलांतर करणे (दुकानातून कुठेतरी दूरवर नेणे) हे एक दिव्य असते..
'Theobroma' पासून 'बी.पी.टी. कॉलनी' म्हणजे जेमतेम २ किलोमीटर अंतर टॅक्सीतून हा केक अलगद नेताना जणू 'बॉम्ब' हातात धरावा तसा हा केकचा बॉक्स घेऊन गेलो होतो त्याची आठवण झाली.. एवढे करूनही त्याचे टॉपिंग थोडे विस्कटले.. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ख प ले!

आजच सकाळी कळलं की पुणे-फ्राफु डायरेक्ट फलाईट आहे. स्वातीताई, तुझं घरही माहित आहे आता ... कधीही येऊन अचानक तिरामिसुची मागणी करेन हां!!

रेवती's picture

3 Aug 2010 - 8:52 pm | रेवती

होय, मलाही नुकतेच समजले आहे.
आहे डायरेक्ट फ्लाईट!
राकलेट आणि मँगो तिरामिसू दिला तर टॅक्सी ड्रायव्हर फुकटात घरी पोहोचवतात.;)

अब् क's picture

3 Aug 2010 - 10:39 am | अब् क

:)

शरयुप्रितम२०१०'s picture

3 Aug 2010 - 11:17 am | शरयुप्रितम२०१०

झक्कासच आहे......
पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय.....delicious

मस्त कलंदर's picture

3 Aug 2010 - 11:57 am | मस्त कलंदर

फोटूत पण तिरामिसुचा गोडवा उतरलेला दिसतोय.. मस्कापॉर्नो म्हणजे भारतातले कोणते चीज वापरायचे???

बाकी, आमच्या एका मैत्रिणीने दिलेली तिरामिसुची आणखी एक पाकृ आठवली...

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 12:02 pm | ऋषिकेश

मके लिंकबद्द्ल , आणि सुबक ठेंगणी यांचे पाकृबद्दल आभार

स्वाती२'s picture

3 Aug 2010 - 11:56 pm | स्वाती२

मस्तच! आंबा आणि तिरामिसु दोन्ही अतिशय आवडते. त्यामुळे हा भन्नाट प्रकार केल्याशिवाय काही चैन पडणार नाही.

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2010 - 12:07 pm | स्वाती दिनेश

सर्व खवय्यांनो, धन्यवाद.
चित्राने दिलेला मस्कार्पोनचा फोटो दिला आहेच, तसेच मी वापरले आहे. ते न मिळाल्यास क्वार्कचीज किवा क्रिम घेऊ शकता.
मके,भारतातल्या मोअर किवा बिगबझार मध्ये मस्कार्पोन मिळते असे वाटते.
लॉफेल बिस्किटांना लेडिज फिंगर्स म्हणतात हे माहित नव्हते.
प्रियाली, सगळी चीजे असतात तेथेच फ्रेश चीजवाल्या सेक्शन मध्ये मिळेल.
चतुरंग, रम किवा कोनिअ‍ॅक घालतात ना तिरामिसुत. तीही रेसिपी देईन लवकरच..
तिरामिसु करण्यात अनेक व्हेरिएशन्स आहेत,त्यातलेच मँगो तिरामिसु हे एक.
तिरामिसुंच्या प्रकारांप्रमाणे प्रमाणात थोडा थोडा फरक असतो पण त्यामुळे चवीत खूप फरक पडतो, असे आमचे इटालियन मित्रमंडळी सांगतात.
सु. ठें ची तिरामिसु पाकृ ही मस्तच,सॉलिड्ड आहे.
अदिती,केव्हाही ये,स्वागत आहेच..:)
केसु, वसुली होईल की लवकरच.
बाकी लोकहो, काढा लवकर व्हिसा.. स्वागतम्... :)
पुन्हा एकदा सर्व खवय्यांना धन्यवाद,
स्वाती

शाल्मली's picture

4 Aug 2010 - 12:20 pm | शाल्मली

भन्नाट दिसत्ये ही पाकृ.. याला तिरामिसूचा अर्थ अगदी चपखल बसतो आहे..
जरा उशीराच देते आहे प्रतिसाद..
खाण्याचा योग आता कधी येईल याचाच विचार करत होते म्हणून उशीर झाला..
भारी पाकृ.
स्वातीताई, तुझ्याकडे घेण्याच्या पाहुणचारात फारच वाढ होते आहे हं.. ;) बघू किती लवकर योग येतो ते...