ऊर्ध्वरेता

Primary tabs

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
19 Nov 2011 - 9:21 am

ऊर्ध्वरेता

एकदा श्रीकृष्णाला भेटावयाला दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासकट आले. यमुनेच्या पलिकडे वनांत त्यांनी मुक्काम ठोकला. श्रीकृष्णाची शिवाचे अंश असलेल्या दुर्वास ऋषींवर अनन्य भक्ती होती. तेव्हा दुर्वासांच्या भोजनाकरिता श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रीया भोजना़ची ताटे घेऊन निघाल्या. नदीपाशी येतात तो त्यांनी पाहिले की यमुना दुथडी भरून वहात आहे. आता काय करावयाचे? पलीकडे कसे जावयाचे ? त्या परत कृष्णाकडे आल्या व त्यांनी आपली अडचण त्याला सांगितली. तो म्हणाला " जा, यमुनेला सांगा की श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे ". स्त्रीया नदीपाशी आल्या व त्यांनी श्रीकृष्णाचा निरोप सांगितला. आणि काय आश्चर्य, यमुना दुभंग झाली व त्यांना पलीकडे जाण्यास वाट मिळाली. त्या सर्व जणींनी दुर्वासांसकट सर्वांना पोटभर, नव्हे, जरा जास्तच भोजन दिले.मग त्या परत निघाल्या. नदीपाशी येतात तो यमुना परत पहिल्यासारखी तुडुंब भरून वाहते आहे. त्या घुटमळलेल्या पाहून दुर्वासांनी विचारले " काय झाले ? " त्यांनी त्यांची अडचण सांगितली. मग दुर्वासांनी विचारले " तुम्ही आलात कशा ? " त्यांनी कृष्णाने यमुनेला दिलेला निरोप सांगितल्यावर दुर्वास म्हणाले " जा, यमुनेला सांगा, दुर्वासांनी आज उपास केला असेल तर तू आम्हाला वाट दे ." यमुनेला तो निरोप मिळाल्यावर ती परत दुभंग झाली व स्त्रीया राजधानीत परतल्या.

आता शंकराचा अंश असलेले दुर्वास श्रीकृष्णांच्या स्त्रीयांनी आणलेले अन्न खावून "उपाशी" राहिले हे थोडेफार कळू शकते. पण सोळा हजार एकशे आठ स्त्रीयांचा नवरा "ब्रह्मचारी"? हे कसे काय बुवा ? याला उत्तर असे की योगेश्वर श्रीकृष्ण "ऊर्ध्वरेता " होता. असा पुरुष कितीही स्त्रीयांशी संबंध ठेवून ब्रह्मचारीच रहाणार. (श्रीकृष्णाला सांब वगैरे मुले कशी हे मला विचारू नका. मी आपला तुम्हाला गोष्ट सांगणारा कथेकरी. बर्‍याच जणांना अशा सुरस गोष्टी माहीत नसतात म्हणून सांगतो बापडा !) तर सांगावयाचा मुद्दा हे " ऊर्ध्वरेता" प्रकरण योगासारख्या "तांत्रिक" पंथात भाव खाऊन होते.

मानवाच्या आदि काळापासून हे तंत्र प्रकरण जगभर लोकप्रिय आहे. जा गोष्टी आपणाला कळत नाहीत त्यांबद्दल विचारपूर्वक निर्णय घेणे सर्वसामान्य माणसाला जमत नाही. त्याच्यावर तंत्रमंत्रासारख्या अनाकलनीय गोष्टींचा पगडा लवकर बसतो. उपनिषदांतील तर्कज्ञानापेक्षा तो
ओम र्हिं क्लिं म्हणणार्‍या मांत्रिकाच्या पगड्याखाली लवकर जातो. भारतात वेदकाळापासून हे चालू आहे. अथर्व वेद हे त्याचेच उदाहरण म्हणावयास हरकत नाही. बौद्ध व जैन धर्मही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत. ज्ञानदेवकाळी बौद्ध, कौल, शाक्त, शैव,नाथ,असे अनेक पंथ या
तांत्रिकांच्या जाळ्यामध्ये सापडलेले होते. गोरखनाथ हे "ऊर्ध्वरेता" म्हणून प्रसिद्ध होते. लुईपा या तांत्रिक सिद्धाने आपल्या सिद्धीच्या प्रभावाने एका राजाला व त्याच्या प्रधानाला आपले शिष्य बनवले व वेश्येचा उपभोग घेण्यासाठी मोबदला म्हणून राजाला तिच्याकडे बारा वर्षे गहाण टाकले व प्रधानाला मद्यप्राशनाचा मोबदला म्हणून कलालाकडे ! आणि असा हा लुईपा महासिध्द ! आज गोष्ट सांगावयाची आहे ती "नाथपंथाची."

जालंदर नाथांचा शिष्य कान्हपाद हा असाच एक सिध्द व ऊर्ध्वरेता म्हणून प्रसिध्द. आपल्या सातशे शिष्यांना घेऊन ही स्वारी हिंडत असे.
त्यात आपले सिध्दीचमत्कार दाखवण्याची हौसही मोठी. एकदा कान्हपाद एका योगिनीच्या बागेत उतरला. तिथल्या नारळाच्या झाडांवरचे नारळ आपल्या दृष्टीपाताने शिष्यांच्या हाती दिले. योगिनीला घुस्सा आला. तिने आपल्या सिध्दीने ते हातातले नारळ परत झाडांवर चढवले. या चमत्कारांच्या मारामारीत शेवटी तिने कान्हपादाला "रतियुध्दाचे" आव्हान दिले. त्यात आपला पराभव होतो आहे असे पाहिल्यावर तिने आपल्या गुरूयोगिनीचा सल्ला विचारला. व तिच्या सांगण्याप्रमाणे इंद्रियभागी हिरकणी ठेवली. मग या ऊर्ध्वरेतनाच्या प्रक्रियेत कान्हपाद ठार झाला इति अलम.

शरद

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

19 Nov 2011 - 9:43 am | विनायक प्रभू

उर्ध्वरेता ह्याचा 'वरच्या वर' असा घेतला.
चुक असेल तर समजाउन सांगा.

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2011 - 10:17 am | प्रभाकर पेठकर

उर्ध्वरेता ह्याचा 'वरच्या वर' असा घेतला

तुम्हाला 'अर्थ' असे म्हणायचे आहे का?

मन१'s picture

19 Nov 2011 - 10:08 am | मन१

एक शंका
योगिनीला घुस्सा आला
म्हणजे काय? योगिनी क्रोधित झाली किम्वा योगिनीला राग आला असे म्हणायचे आहे काय?

शरद's picture

19 Nov 2011 - 3:48 pm | शरद

खुलासा

जरा माफ करा. मला वाटले की ऊर्ध्वरेता याचा अर्थ सर्वांना माहित असेल.पूर्वी वीर्य किंवा रेत याला फार महत्व होते. पुरुषाचे बल किंवा तेज त्याच्या वीर्यावर अवलंबून आहे असे समजत. त्या मुळे संभोग करतांना वीर्य गळते/ खाली पडते. तेवढे तुमचे तेज/बल कमी होते. असे होवू नये म्हणून अशी कल्पना केली गेली की योगाने/तांत्रिक प्रक्रियेने तुम्ही तुमचे वीर्य उलटे, वर,खेचू शकता. यामुळे तुमचे बल/तेज कमी होत नाही. असे करणारा तो "ऊर्ध्वरेता". ही एक महत्वाची सिध्दी मानली गेली होती. कान्होपाद ऊर्ध्वरेता असल्याने हिरकणी वर खेचली गेली व ती स्वत:चे इंद्रियात घुसल्याने तो मरण पावला.
मनोबा विचारतात की योगिनीला राग का आला ? तुमच्या बागेतील नारळ कोणीही येऊन काढून नेऊ लागला तर तुम्हाला राग येईलच की; विशेषत: सिध्दीप्राप्त योगिनीला राग येणे स्वाभाविकच आहे.बलवान कोपिष्ट असतातच.
शरद

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2011 - 7:15 pm | प्रभाकर पेठकर

मनोबा विचारतात की योगिनीला राग का आला ?

मनोबा, योगिनीला राग का आला असे विचारत नसून आपल्या 'घुस्सा' ह्या शब्दप्रयोगावर त्यांचा आक्षेप आहे. 'घुस्सा' असा हिन्दी शब्द न वापरता 'क्रोध', 'राग' असे मराठी शब्द वापरायला हवे होते असे त्यांना सुचवायचे आहे असे, वाटते.
मी त्यांच्याशी सहमत आहे.

मन१'s picture

20 Nov 2011 - 10:53 am | मन१

"घुस्सा" ह्या शब्दाबद्दलच म्हणत होतो.
सध्या सर्व नागपुरी दोस्तांच्या गँगने घेरला गेल्याने असे शब्द सतत ऐकण्यात येतात. प्रयत्नपूर्वक मला स्वतःची भाषा जपावी लागते, व मग त्यातून काहीही लिहिताना वाचताना नजर चाळणी सारखे काम करू लागते.

शरद's picture

26 Nov 2011 - 10:15 am | शरद

घुस्सा.
सप्रेम नमस्कार.
घुस्सा हा शब्द हिंदी आहे हे बरोबर. पण तो मराठी नाही असे आपण कसे समजता ? १९३५ साली छापलेल्या दाते-कर्वे यांच्या शब्दकोषात तो मराठी म्हणूनच दिला आहे. मराठी बाहेरील इतर भाषेंमधले अनेक शब्द आज मराठी म्हणून समाविष्ट झालेले आढळतील; त्यातला हा एक.
असो. अशा समजुती-गैरसमजुती प्रकट लिहण्याऐवजी व्य,नि.वर लिहाव्यात असे मला वाटते म्हणून चार दिवसांनी आपल्याला व्यनि पाठवत आहे. कळावे, आपला,
शरद

रणजित चितळे's picture

19 Nov 2011 - 12:19 pm | रणजित चितळे

मला आपल्या गोष्टी आवडतात, पण ही क्रमशः आहे का. नाथ पंथात ज्ञानेश्वर माऊली सुद्धा येते.

शरद's picture

19 Nov 2011 - 4:07 pm | शरद

चितळे साहेब, आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.ज्ञानेश्वर माऊली नाथपंथातीलच. पण नाथ पंथातच नव्हे तर सर्वच चांगल्या पंथात असे लोक असतातच.त्यामुळे सर्व पंथीयांवर ठपका येतो असे मला वाटत नाही. शिवाय अशी गोष्ट कोणीतरी (मी नव्हे) कथेकरी लिहतो.काही गोष्टी गंमत म्हणूनच वाचावयाच्या.
शरद

रणजित चितळे's picture

20 Nov 2011 - 10:09 am | रणजित चितळे

बापरे माफी मागण्याचे काहिच कारण नाही, माझ्या भावना पण दुखावल्या गेल्या नाहीत. मी क्रमशः आहे का हे विचारले कारण उर्ध्वरेता म्हणजे काय ह्याचा अर्थ स्पष्ट झाला नव्हता. मला माहित नव्हता व मला वाटले की आपण तो सांगणार आहात.

दुसरे म्हणजे नाथ पंथी ज्ञानेश्वर आहेत का हे विचारण्याचा उद्देश मला नेहमीच नाथ पंथापद्दल थोडे गूढ वाटत आले आहे इतकच काय पण चेन्नईचे जे १८ सिद्ध आहेत ते पण नाथ पंथीच आहेत असे मला वाटते (अगस्त्य त्यातलेच एक) त्या दृष्टिने गोंडवानाप्रदेश व लेमुरीयाचा अजून अभ्यास केला गेला पाहिजे.

मला परत हे लिहावेसे वाटते आपले लेख मला आवडतात व आपण सांगितलेली गोष्ट मी गंमत म्हणूनच वाचली.

अहो कथेकरी बुवा, एव्हढी कथा सांगून शेवटी उर्ध्वरेता म्हणजे काय ते सांगितलंच नाहीत तुम्ही. हे म्हणजे पोस्टरवर एकदम ढासू चित्र दाखवून प्रत्यक्ष चित्रपटात उगा आपलं "वरच्या वर" काहीतरी भावना चाळवणार्‍या बी ग्रेड सिनेमासारखं झालं.

बाकी निवॄत्ती, ज्ञानदेव आणि ईतर काही नाथ सोडले तर बाकी सगळे नाथपंथीय असेच होते काय? चलो मछिंदर गोरख आया टाईप?

तुम्ही नाथ संप्रदायाचा उल्लेख केला आहे म्हणून विचारतो, गुरुचरीत्र हा ग्रंथात कुणाच्या गोष्टी आहेत? दत्त गुरुंच्या की नाथ संप्रदायाच्या?

शरद's picture

19 Nov 2011 - 4:11 pm | शरद

गुरूचरित्र दत्त संप्रदायाचे. नाथपंथ शैव. दोन निरनिराळे. सर्व नाथ संप्रादायाचे लोक कसे होते ते पहाण्याक्लरिता नवनाथ चरित्र वाचा. (पाहिजे तर माझ्याकडचे घेऊन जा.)
शरद

आत्मशून्य's picture

19 Nov 2011 - 5:10 pm | आत्मशून्य

गुरुचरीत्र हे, नरसिहं सरस्वतींचे चरीत्र आहे. ( ते दत्तवतार आहेत).

श्रीगूरूदेव-दत्तांनी सर्वप्रथम श्रीपाद-श्रीवल्लभ (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ऐकलं असेलच) यांच्या रूपात अवतार घेतला, याच श्रीपाद-श्रीवल्लभांनी काही(शे) वर्षांनी नरसिहं सरस्वतीं म्हणून स्वतःला प्रकट केले. श्रीपाद-श्रीवल्लभ यांनी ज्या घरात जन्म घेतला त्यांघराची सलग तेहतीसावी पीढी आजही आंध्रप्रदेशमधे दत्तभक्तीमधे स्वतःला समरस करून आहे.

नवनाथ हे दत्तभक्तच पण या नाथपंथीयांबद्दल मी फारशी माहीती देऊ शकत नाही, यांवर भाष्य करणे सोडा यांच केवळ स्मरण करतानाही आपली ती लायकी आहे का असाच विचार करावासा वाटतो. पूण्यात (कोंढवा) जवळच कनीफनाथांची समाधी आहे.

मन१'s picture

20 Nov 2011 - 11:08 am | मन१

सामान्य माणसाची लायकी स्मरण करण्याची आहे. "लंगडा ग लंगडा देव एक पायाने लंगडा" म्हणत थेट देवाला शिव्या देण्याचीही, लाडेलाडे हक्काने बोलण्याचीही आहे. "मल्हार बारी मोतियाने भरुन", "न्हायतर द्येवा द्येवा मी जातो दुरून" हे "द्येवा" ला ऐकवण्याचीही आहे.
"तू आहेस की नाहिस" असे थेट जगन्नियंत्याला विचारायचीही आहे. जर जगन्नियंत्याला हे सगळे बोलू शकतो, तर सिद्ध तर शेवटी मानवत्वाचा प्रवास करूनच सिद्धपदी पोचलेत. त्यांच्यवर शंका घेण्याचीही सामान्य माणसाची लायकी आहे. आणि ते पटले तर त्यांच्या मार्गावर चालण्याचीही सामान्याची लायकी आहेच. नाही पटले तर सोडून द्यायचीही आहे.
"अंग आहे त्याला लिंग धारण करण्याचा अधिकार आहे" असे धार्मिक क्रांती करणारे महात्मा बसवेश्वर म्हणाले ते उगीच आणला. (त्यांना तेव्हा धार्मिक सत्तेकडून प्रचंड विरोध झाला. मग त्यांनीच लिंगायत पंथ पुढे आणला.) गौतम बुद्धाने पौरोहित्य उडवून लावत स्वतःच सत्याचा शोधा घ्यायचा प्रयत्न केला तो उगीच म्हणून नाही.त्यालाही "तुझी लायकी नाही" हे सांगण्यात आले. पण त्याने शोध घेतला. "सर्व मानव तो घेउ शकतात, त्यांची लायकी आहे" हे मग त्याने थेट जाहिरपणे सांगितले. हेच संतांनीही सांगितले. "लायकी नाही" हा स्वर सहसा त्याकाळात "देवाचा आणि दैवाचा अडत्या" म्हणून काम कराणारा जो एक अभिजन वर्ग होता तो लावायचा.

तेव्हां पून्हा इथे मला त्यावर चर्चा करण्यात स्वारस्य नाही. बाकी तूम्ही सामान्य माणसाची लायकी स्मरण करण्याची आहे म्हणत आहात त्याच्याशी मी संपूर्ण सहमत.

आपली ती लायकी आहे का असाच विचार करावासा वाटतो

हे मी माझ्या स्वतःबाबत म्हटले आहे. परीछ्चेद व्यवस्थीत वाचला तर हे कळेल. कळले नाही तरती माझी चूक समजून इथेच सूधारतो. सामान्य माणसाची लायकी भलेही स्मरण करायची असेल पण माझ्यासारख्या मूर्खाची ती आहे असं मला वाटत नाही, ज्याची मी कबूली दीली आहे. असो. तसच सदरील लायकी ही वैयक्तीक वर्तनाशी सबंधीत आहे. आणखी कूठल्या महामूर्ख सकंल्पनेशी न्हवे.

अवांतर :- माझ्या अशूध्द लेखनातील शब्दासोबत, माझ्या विचारातील भावनाही समजता येत नसतील तर मी तूम्हाला नक्कि मदत करेन.

आत्मशून्य's picture

26 Nov 2011 - 8:39 pm | आत्मशून्य

गौतम बुद्धाने पौरोहित्य उडवून लावत स्वतःच सत्याचा शोधा घ्यायचा प्रयत्न केला तो उगीच म्हणून नाही.त्यालाही "तुझी लायकी नाही" हे सांगण्यात आले. पण त्याने शोध घेतला. "सर्व मानव तो घेउ शकतात, त्यांची लायकी आहे" हे मग त्याने थेट जाहिरपणे सांगितले.

मन१ हे कूठे आपण अभ्यसलेत ? मला रेफरन्स हवाय. कारण जितकी माहीती मला आहे त्यानूसार बूध्द हा राजकूमार होताच त्यामूळे मानपानाचा प्रश्न न्हवताच पण (साधारण वयाच्या २८-२९ नंतर) सूरूवातीला तो ज्या ज्या गूरूंकडे गेला त्यांनी त्याला आपला केवळ शिष्यच न्हवे तर उत्तराधीकरीही बनण्याची विनंती केली होती, यावरून बूध्दाचा अध्यात्मीक अधीकार काय मानला गेला असेल हे लक्शात येते. पण ध्यानाच्या काही उच्च पण प्राथमीक अनूभव/अवस्थांवर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने त्यांचा स्वेछ्चेने त्याग केला.

समाधी अवस्थेच्या मार्गात बूध्दाने वैदीकतेला जरी बिधास्त फाट्यावर मारले तरी वैदीकतेने कधीही बूध्दाला कमी लेखलेले नाही उलट (बूध्दाला व बूध्दत्वाला) कायमच आदर दिला आहे व देत राहीलही. तसच बूध्दाला साक्षात विष्णूचा अवतारही म्हटलेलं आहे.

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला, व घरात एकच काय हजार फूलांच्या बागा फूलवून आयूष्य सूंदर करू पाहणारा/ जगणारा, अत्यंत ऐश्वर्य व छानचोकीची संपूर्ण जन्मभराची सोय आधीच झालेली असताना , कोणत्याही भौतीक सूखांची कमतरता नसताना केवळ दूसर्‍याच्या दूखा:कडे बघून समाधी अवस्थेकडे स्वेछ्चेने वळलेला बूध्दाला "तुझी लायकी नाही" म्हणनारा महाभाग कोण हे जाणून घेणे खरच आवश्यक आहे. तेव्हां आपली बूध्दाविषयीची रोचक माहीती ऐकून मला माझा अभ्यास वाढवावासा वाटत आहे. मन१ अपल्या या विवेचनावर थोडा उजेड टाकणार काय ?

रविंद्र गायकवाड's picture

19 Nov 2011 - 4:39 pm | रविंद्र गायकवाड

असल्या भोंगळ ज्ञाना वर काहीतरी कथा सांगणारे अतिशाहाणे जिथे आपले (अ)ज्ञान पाजळतात तिथे मी सभासद आहे याची माझी मलाच लाज वाटत आहे. कुठल्याशा स्वत:ल शाहाणा समजणार्‍याने सांगितलेल्या गोष्ठी ऐकून पंथांच्या नावाने मिर्‍या वाटनारे तुम्ही तरी आणि तुम्ही ज्यांच्या कडून हे ज्ञान मिळवलंत त्यांनी तरी स्वतः डोळ्यांनी ह्या गोष्टी बघितल्या आहेत काय?
स्वत: भगवाण विष्णूंनी ज्यांच्या शिष्याचे शिष्यत्व मिळावा म्हाणून पृथ्वीवर अवतार घेतला ते स्वत: किंवा त्यांचे गुरू यांबद्दल बोलताना स्वत:च्या बुद्धीचा नाहीतर कमित कमी विवेकाचा तरी वापर करा.

चूक केली इथला सभासद झालो.
गुड बाय.

अर्धवटराव's picture

19 Nov 2011 - 10:26 pm | अर्धवटराव

पालखीची वाट बघितली का आतापर्यंत??
पान-सुपारी वगैरे काहि मिळ्णार नाहि... चपला घाला अणि चालु लागा.

(मिपाकर) अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2011 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच मोक्षावर चर्चा सुरु केली आणि एवढ्यात निघालात.
मिपावरील आपले अवतार कार्य पूर्ण झाले वाटतं. :)

मिपा हे विज्ञानवादी नाही, मिपा वरील लोक विवेक शुन्य आहेत. मिपा (वैचारिक) पुरुषांसाठी योग्य संकेतस्थळ नव्हे, मिपा (मुक्त आणि आधुनिकोत्तर) स्त्रियांसाठी योग्य असे संकेतस्थळ नव्हे, मिपा म्हणजे नुसतं अशुद्ध लेखन. मिपा म्हणजे नुसतं टींबटींब. मिपा म्हणजे मूर्खपणा, मिपा म्हणजे गाढवपणा, मिपा म्हणजे असं असं आणि मिपा म्हणज तसं तसं. ही तर आता जुनी ष्टाइल झाली. मिपावरुन जातांना कसं कडाक्याचं भांडण करुन गेलं पाहिजे. किंवा मिपावर कधी गदारोळ उडाल्यावर संधीचं सोनं केलं पाहिजे. असं आणि यापैकी आपल्याला काहीही नीटपणे जमलं नाही राव. बाकी, जमेल तेव्हा येत चला. :)

आणि हो, अवताराबाबात आपला निव्वळ अंदाज हं... नाही तर या निमित्तानं आमच्या शरद सरांचा धागा हायजॅक व्हायचा.

-दिलीप बिरुटे
(कट्टर मिपाकर)

-

अन्या दातार's picture

20 Nov 2011 - 10:40 am | अन्या दातार

जो जे वांछिल तो ते लाभो!
मे गॉड ब्लेस यु.

कट्टर मिपासमर्थक

अन्या दातार

अहो शरदकाका,
इथे सगळे अधोरेते आणि बाथरुम रेते.
त्यांना या गोष्टीतलं मर्म कळण्यापेक्षा ते मजाच जास्त घेतील.

(बाथरुम रेता) यशवंत

उर्ध्वरेतामागचे शास्त्र आधी जाणून घ्या..

युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय यात किडनीकडून येणारी लघवी गोळा होते.. त्याला खाली युरेथ्रा ही नळी असते. ती मधून लघवी बाहेर येणार. मूत्राशयाच्या खाली प्रोस्टेट असते. टेस्टिस मधून येणार्‍या दोन नळ्यादेखील प्रोस्टेट्मधून युरेर्थातच ओपन होतात .. टेस्टिसमधून सिमेन येते ते युरेथ्रात येते, त्यात प्रोस्टेट्मधूनही काही द्रव्ये मिसळतात आणि अखेर हे सिमेन मूत्राच्याच मार्गाने बाहेर येते..

या सगळ्या सिस्टिममधील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्फिंक्टर.. हा एक वॉल्व असतो.. तो चित्रात हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. या वॉल्वचे काम आहे, जेंव्हा सिमेन बाहेर येत असते त्या काळात मूत्राशयाचे भोक बंद करुन मूत्र अडवून धरणे, जेणेकरुन सिमेन लघवी न मिसळता बाहेर येईल.

आता कल्पना करा, काही कारणाने हा वॉल्व बिघडला .. तर काय होईल? सिमेन खाली येण्याऐवजी वर मूत्राशयात जाईल. यालाच उर्ध्वरेता म्हणतात.. यामुळे सिमेन बाहेर येत नाही.. जेंव्हा सिमेन मूत्राशयात जाते त्या क्षणाला पुरुषाला ऑर्गॅझम मिळेल, पण सिमेन मात्र बाहेर येणार नाही... त्यामुळे याला ड्राय क्वाइटस- ड्राय इंटरकोर्स असे म्हणतात..

हटयोगी वगैरे उर्ध्वरेता कसे करतात, हे माहीत नाही.. पण बहुतेक यातदेखील चांदीची तार घालून स्फिंक्टर बाद करणे, असेच काहीतरी केले जाते, असे ऐकून आहे..

उर्ध्वरेताने काय होते..? काय होणार? सिमेन वर जाते आणि लघवीत मिसळते.. त्यानंतर जेंव्हा लघवी बाहेर जाईल, तेंव्हा ते त्यात मिसळून बाहेर जाते.. :)

पण नाथसंप्रदायी साधूंबाबत मात्र वेगळेच वर्णन असते.. त्यानी सिमेन ताटात घेतले.. आणि पुन्हा पंपाने शोषून घेतले.. ही मात्र शुद्ध अतिशयोक्ती किंवा दंतकथा ( किंवा लिंगकथा :) ) म्हणावी लागेल..

डायबेटिस, स्क्लेरोसिस, सिफिलिस अशा अनेक आजारंमध्ये हा वॉल्व बिघडतो आणि ड्राय इंटरकोर्सचा प्रॉब्लेम येतो.. मग हे सगळे लोक महान हटयोगी आहेत, असे मानायचे काय?

दादा कोंडके's picture

20 Nov 2011 - 12:01 am | दादा कोंडके

तसंच धागाकार शरदरावांचे ही आभार!

शरदबोवा आपल्या कथा आवडल्या. आमच्या ज्ञानात अशीच भर टाकीत रहा.
जामोप्यायांचा प्रतिसादानेही ज्ञानवर्धन झाले. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2011 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदबोवा आपल्या कथा आवडल्या. आमच्या ज्ञानात अशीच भर टाकीत रहा.जामोप्यायांचा प्रतिसादानेही ज्ञानवर्धन झाले.

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

आत्मशून्य's picture

19 Nov 2011 - 5:28 pm | आत्मशून्य

होय ऊर्ध्वरेता यालाच म्हणतात .

मी स्वतः रतीशास्त्रावरील ग्रंथात "हटयोगाच्या" काही क्रियांबाबत वाचन केले आहे ज्यामधे विर्य पून्हा शरीरात शोषून घ्यायच्या प्रक्रीयेचे अत्यंत किचकट व अशक्यप्राय वाटणार्‍या कृतींसोबत विवरण दिले होते. व याने ब्रम्हचर्य टीकून रहात असे असं म्हटलं होतं. (इथ माहीती देण शक्य नाही, व जूने रेफरन्सही उचकटावे लागतील नूकतच वयात येत असताना हे सगळ (अनूभवाशीवाय) वाचल्याने त्यावेळी मला याची फार आवश्यकताही वाटली न्हवतीच ;) )

पण एकूणच हटयोग जरी शरीराशी निगडीत असेल तरी विचीत्र भासणार्‍या क्रीयांनी भरलेला आढळला, उदा आपली जिभ आतमधे ओढून टाळूच्या(?) मागून मेंदू पर्यंत न्हेऊन मेंदूला स्पर्श करून ध्यान लावणे वगैरे वगैरे वगैरे... हटयोगच तो :)

ता.क.:- सध्या मार्केटमधे उपलब्ध असलेल्या पूस्तकात अननरंग-रतीशास्त्र (तत्सम) नावाचा एक ग्रंथ अजूनही (बहूधा) मिळतो यात काही रेफरन्स मीळतो का ते पहा.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Nov 2011 - 3:29 pm | llपुण्याचे पेशवेll

अननरंग??
अनंगरंग रतीशास्त्र म्हणायचे आहे का तुम्हाला?

म्हणून विश्वरेता प्रजाभवा झालो.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Nov 2011 - 8:18 pm | अविनाशकुलकर्णी

अनगरंग

जामोप्या यांनी म्हटल्यासारखेच लिहायला आलो होतो.

हे तंत्र आरोग्यदायकच असेल असे नव्हे. (काही लोकांना उलट त्रासदायक असेल.)

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2011 - 11:29 pm | आनंदी गोपाळ

प्रत्येकासच.
ब्रह्मचर्य हेच जीवन अन वीर्यनाश हाच मृत्यू असल्या भाकड कथा प्रसविण्यार्‍या कुणा कथेकर्‍याने प्रसवलेली ती 'उर्ध्वरेता' कल्पना आहे. योनीप्रवेश करून फक्त स्खलन नाही झाले की हा ब्रहमचारी कसा?? योनीवर लिंग ठेवीले तर कायद्याने बलात्कार होतो. काय तरी फालतू पणा सुरू आहे झालं.

विनायक प्रभू's picture

20 Nov 2011 - 10:38 am | विनायक प्रभू

@ आनंदी गोपाळ
तुम्ही काय म्हणता ते कुठे म्हणता तिथे न ठेवता जी क्रिया होते त्या आजकाल उर्ध्व्ररेता म्हणतात.

राही's picture

19 Nov 2011 - 11:20 pm | राही

श्रीकृष्णांची कथा न सांगताही या विषयाचे विवेचन करता आले असते. शास्त्रीय ज्ञानाच्या नावाआड धागा थिल्लर होऊ पाहतो आहे. नाथपंथाचा इतिहास आणि पंथीय प्रथा,कर्माचरण याविषयी डॉ. रा. चि. ढेरे यांनी प्रबंध लिहिला होता तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. जुन्या (अवांच्छितही) रूढी,प्रथा, संज्ञा यांविषयी कुठेही टिंगलटवाळी न करता समजूतदारपणाने, समतोलपणाने आणि पूर्ण गांभीर्याने, तेही सोप्या ओघवत्या भाषेत,कसे लिहावे याचा हे पुस्तक म्हणजे आदर्श आहे.
असो. जास्त काय लिहावे?

Nile's picture

20 Nov 2011 - 2:42 am | Nile

यावरुन गुद् द्वारावर टाच ठेवून आलेली 'पाद' (गॅस, फार्ट इ. इ.) रोखून धरल्याने (की पुन्हा वर पाठवण्याने) ती मेंदूत का मणक्यात कुठेतरी जाऊन भलतीच सिद्धी प्राप्त होते वगैरे आठवले. त्यासाठी असलेल्या योगासनाचे नाव विसरलो!

बाकी पुर्वीचे साधू लोक तांब्याच्या लंगोटी घालत वीर्यनाश होऊ नये म्हणून. त्याची काही कथा बिथा आहे काय हो शरदराव?

मदनबाण's picture

20 Nov 2011 - 10:29 am | मदनबाण

मारुती सुद्धा ऊर्ध्वरेता आहे.

संदर्भ :--- श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३रा.

विनायक प्रभू's picture

20 Nov 2011 - 10:34 am | विनायक प्रभू

मारुती होता की नाय ते माहीत नाही.
पण आजकाल 'उर्ध्वरेता' पार्लर्स मधे अशा सर्विसेस असतात असे समजते.

Nile's picture

20 Nov 2011 - 11:42 am | Nile

मारूती कोणता संभोग करायचा हो? संभोग केल्या शिवाय उर्ध्वरेता असू शकत नाही की शकतो? आणि समोरचा उर्ध्वरेता आहे (मुळात रेता आहे की नाही!) हे कळण्याकरता काय चाचण्या असतात हो? जरा अडाण्याला दोन थेंब द्या... ज्ञानामृताचे!!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2011 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

मारूती कोणता संभोग करायचा हो? संभोग केल्या शिवाय उर्ध्वरेता असू शकत नाही की शकतो?

हो की भाड्या ;)

तू विज्ञानवादी आहेस वैग्रे अगदी सगळे मान्य आहे. तुझ्या विचारांचा, ज्ञानाचा आदर देखील आहे. पण म्हणून हे असले का लिहायला लागला आहेस बाबा ? तुला असल्या भाषेत वाद घालताना बघून वाईट वाटले.

Nile's picture

26 Nov 2011 - 1:18 pm | Nile

"मारुती सुद्धा उर्ध्वरेता होता" ह्या वाक्यात मी लिहलेले अध्याहृत आहे. इथे विज्ञाननिष्ठता दाखवण्याचा हेतू नाहीए. ब्रह्मचर्याचे आदर्श उदाहरण असलेल्या मारुतीलाही संभोग करणारा असे म्हणतानाच तो उर्ध्वरेताही होता असे म्हणून मोठेपणा देतानाचा विरोधाभास दर्शवणे इतकाच उद्देश आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2011 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

भावना पोचल्या.

मात्र त्या प्रतिसादात शब्दांची निवड थोडीशी चूकली आहे असे प्रामाणिकपणे वाटते.

@ परा अरे मागे एका प्रतिसादात मारुती बद्धल जे मी वर सांगितले आहे ना तेच माझ्या वरच्या प्रतिसादात सांगितले आहे आणि तोच संदर्भ दिला आहे. दिलेला संदर्भ वाचुन मत देणारे लोक फार कमी असतात ! तू उगाच स्वतःला त्रास करुन घेउ नकोस कसे ? ;)
बाकी उपक्रमा वरील http://mr.upakram.org/node/1744 या चर्चेत देखील तोच संदर्भ आहे.

प्रतीसाद देखिल ज्ञानवर्धक आहेत.
(आत्ता सारखे त्या काळी ब्रह्मचार्य आबाधीत राखण्यासाठी "कंडोम" ची सोय नव्हती म्हणुन या "ऊर्ध्वरेता" पध्द्तीचा शोध लावला असावा")
Indian yogi live 70 years without water and food

अविनाशकुलकर्णी's picture

20 Nov 2011 - 11:50 am | अविनाशकुलकर्णी

नसबंदी केली असली तर काय करायचे?
उर्ध्वरेता आपोआप होते का?

आनंदी गोपाळ's picture

20 Nov 2011 - 8:25 pm | आनंदी गोपाळ

अर्धवटरेता म्हणू आपण.

नसबंदी करतात म्हणजे ज्या चित्रात वास म्हणून दोन नळ्या दाखवल्या आहेत, त्या बंद केल्या जातात. पण प्रोस्टेट मधून फ्लुइड येत असते.. तेच बाहेर येते. त्यात शुक्र जंतू नसतात

नंदन's picture

20 Nov 2011 - 12:24 pm | नंदन

धागा रोचक आहे. बाकी धाग्याचे शीर्षक आणि काही प्रतिसादांचे 'कॅथार्टिक' स्वरूप यातली विसंगती अंमळ मनोरंजक आहे ;)

आनंदी गोपाळ's picture

27 Nov 2011 - 11:37 pm | आनंदी गोपाळ

कृत्रीम रेतन पद्धतीबद्दल काय म्हण्ण आहे तुम्हा लोकांच?

ऋषिकेश's picture

28 Nov 2011 - 1:48 pm | ऋषिकेश

या उर्ध्वरतेपणाबद्दल मागे कोणीतरी बहुदा प्रतिसादातून लिहिलं होतं (बहुतेक शनंजय यांनी.. नक्की आठवत नाही). असो.
गोष्ट-माहिती रंजक आहे :)