दोन बडबडगीते

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 Oct 2011 - 11:06 am

दोन बडबडगीते

१) ढग वाजले ढम ढम ढम
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?

२) चिमणे चिमणे

चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे
आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने

काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये
आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे

ईकडे ये रे भु भु
बाळाशी खेळतोस का तू?

हम्मा हम्मा शेपूट हलव
आमच्या बाळाला पाळण्यात झुलव

- पाषाणभेद

कविताबालगीत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Oct 2011 - 3:26 pm | प्रचेतस

एकदम छान लिहिलेस रे मित्रा.

आत्मशून्य's picture

23 Oct 2011 - 3:42 pm | आत्मशून्य

अत्यंत सोपी सहज व सूट्सूटीत, मजा येते वाचायला.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2011 - 6:21 pm | चित्रगुप्त

छान.

निवेदिता-ताई's picture

23 Oct 2011 - 6:47 pm | निवेदिता-ताई

छानच......:)

मदनबाण's picture

24 Oct 2011 - 10:26 am | मदनबाण

छान रे...

प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- माझ्या खवतं बडबडगीत इस्प्येश्यल इडियो डकवला आहे, पाहुन घे जरा. ;)

ज्ञानराम's picture

24 Oct 2011 - 3:11 pm | ज्ञानराम

छान.....

michmadhura's picture

24 Oct 2011 - 3:25 pm | michmadhura

चिमणे चिमणे हे बालगीत मस्तच आहे. मुलीला जेवण भरवताना कंपल्सरी गायला लागते, तेव्हा उपयोगी पडेल.

पाषाणभेद's picture

24 Oct 2011 - 3:53 pm | पाषाणभेद

ह्या गाण्यांचा काही प्रॅक्टीकल उपयोग होतो आहे हे वाचून मला खरोखर आनंद झालाय.
सर्व रसिकांना धन्यवाद.

कलंत्री's picture

29 Oct 2011 - 5:07 pm | कलंत्री

हेच खरे. गीतं आवडली.