Skip to main content

दोन बडबडगीते

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बडबडगीते
१) ढग वाजले ढम ढम ढम ढग वाजले ढम ढम ढम विज चमकली चम चम चम पाऊस पडला छम छम छम नाच नाचूनी भिजले कोण? भिजले कोण? २) चिमणे चिमणे चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे ईकडे ये रे भु भु बाळाशी खेळतोस का तू? हम्मा हम्मा शेपूट हलव आमच्या बाळाला पाळण्यात झुलव - पाषाणभेद
लेखनविषय:

वाचने 2261
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

एकदम छान लिहिलेस रे मित्रा.

छान.

छान रे... प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- माझ्या खवतं बडबडगीत इस्प्येश्यल इडियो डकवला आहे, पाहुन घे जरा. ;)

चिमणे चिमणे हे बालगीत मस्तच आहे. मुलीला जेवण भरवताना कंपल्सरी गायला लागते, तेव्हा उपयोगी पडेल.

In reply to by michmadhura

ह्या गाण्यांचा काही प्रॅक्टीकल उपयोग होतो आहे हे वाचून मला खरोखर आनंद झालाय. सर्व रसिकांना धन्यवाद.