" परतीच्या वाटेवर भाग - ६

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
14 Oct 2011 - 12:09 pm

"परतीच्या वाटेवर ...भाग - ६

परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर - २
परतीच्या वाटेवर - ३
परतीच्या वाटेवर - ४
परतीच्या वाटेवर - ५

तेजुने डोळे किलकिले करत हळूहळू उघडले , समोरचा प्रकाश डोळ्यावर येत होता
तेजू हसली , समोर तेजूची आई उभी होती .
" अरे आई तू केव्हा आलीस ? अन अशी अचानक ? असे म्हणत उठत होती तेच हाताला झटका बसल्यामुळे तेजू विव्हळली , सलाईनच्या सुईमुळे हात दुखावला .
हुस्स स्स्स्सस्स्स आई ग्ग्ग !
राजसने पुढे होऊन अग " हळूहळू जरा सावकाश, म्हणत तिला पाठीला उशीचा टेकू देऊन हळुवार बसवले
आपण हॉस्पिलाऐजड आहोत हे समजायला तिला वेळ लागला नाही
एका हाताला कोपऱ्यापर्यंत बँडेज केलेलं होत .
तिचा चेहरा त्रासिक झाला होता ,काय झालेय मला नक्की? ह्याचा विचार करत होती तोच राजसने तिच्या प्रश्नाचा रोख ओळखत " अग काल दुपारी अक्सीडेण्ट झाला ग आपला !
तेजूच्या कपाळावर आठ्या ,अन चेहर्यावर प्रश्नचिन्ह तसेच होते .
" कसा काय झाला ? मला तर काही आठवत नाही ते ?
राजस ": अग तुला कस आठवेल ?तू बेशुद्ध होतीस
तुला थोड जास्ती लागल होत म्हणून एक दिवसासाठी
अॅ डमीट कराव लागल ,संध्याकाळी डिसचार्ज मिळेल तुला !
" NO NEED TO WORRY OK "
तेजू हसली , बर झाल मला हॉस्पिटलमध्ये जायलाही नकोस होत . तिथल्या वासाने मला गरगरायला होत म्हणत तिने चेहरा वेडावाकडा केला .
" अरे पण तुमच्या चेहर्याला काय झाल?"
राजस : अरे काल बाईक स्लीप झाली होती न आपली, थोड खरचटल .
तेजू : आई ,तरी मी याना सांगत असते नेहमी " गाडी हळू चालवा म्हणून नाही तर एक्सिडेन्ट होतो
" प्रियाचा झाला तस्सा "
तेजुचे विसकटलेले केस सावरत शेजारी बसलेली तिची आई खडबडून उभी राहिली
तेजुच्या आईच्या भिवया उंचावल्या होत्या त्या अस्वस्थ अन भयभीत वाटल्या ,
राजस : प्रिया कोण ?
तेजूची आई : अ क ..क क्कोन प्रिया , तेजुला काय माहित ?
तेजू तू आराम कर बेटा लवकर डिसचार्ज हवाय ना ?
तेजुने हसत होकारार्थी मान डोलावली
राजसला थोड विचित्र वाटलं
" आई तुम्हाला खरच माहिती नाही प्रिया कोण आहे ? राजसचा प्रश्न
आई :(वैतागून ) अहो खरच नाही माहिती मला ,
राजस : नाही ,हे नाव मी तेजुच्या तोंडातून एकदा-दोनदा एक्ल्यासारख वाटल म्हणून विचारलं
आई : कधी ? केव्हा (आईच्या हाताची चुळबुळ चालू होती )
राजस : ती झोपेत किंचाळली होती एकदा " प्रिया प्रिया, म्हणून बहुतेक तेव्व्हाच !
: तेजूची आई : ( डोक्यावरचा घाम पुसत ) अ अं झोपेत न ,अहो स्वप्न- बिप्न पाहिलं असेल ,जात्याच भित्रा स्वभाव आहे तेजूचा तिचा म्हणत तेजूची आई कसनुस हसली .

बाबा : " चला तेजुला थोडा आराम करू देत ,आपण बाहेर बसुया .
राजस ": "बाबा त्यापेक्षा तुम्ही सर्व घरी जा, अन आराम करा मी थांबतो तेजुजवळ कालपासून सर्व इथेच आहात .
तेजूची आई : नाही राजस , उलट तुम्हालाच जास्ती गरज आहे आरामाची रात्रभर तुम्ही तेजुजवळ बसून होता तेजुच्या नशिबाच कौतुक वाटत मला ,तुम्ही घरी जा अन फ्रेश व्हा .
हो नाही करत राजस घराकडे निघाला डोक्यात विचारचक्र चालूच होते
गेला आठवडाभर घडलेल्या विचित्र ,भयंकर गोष्टी ,तेजुच वागण ,तिची अवस्था हे सगळ्या गोष्टींचा विचार करून करून राजस त्रयस्थ झालेला होता

“नक्कीच काहीतरी आहे कि ज्याच्यापासून मी अजाण आहे या घडणार्या घटनांच अन तेजुच्या अश्या विक्षिप्त वागण्याचा ,काय संबध असेल बर” अचानक त्याला आठवलं कि आई अर्ध्या तासात येते अस सांगून २ तासापासून गायब होती राजसने तिला फोन लावला
राजस : आई कुठे आहेस तू ?
आई : अरे जरा काम होत आलेच मी ,तू कुठाय अन तेजू आराम करतेय ना ?
राजस : येस, ती बरी आहे आता ,संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तिला , हे काय मी घरीच निघालो तू कुठे आहेस ? मी मेनरोडवर आहे येऊ का तुला पिक - अप करायला ?
आई : ( गडबडून ) न.. न ...नको राजस मी येईन तू जा .
राजस : ओके लवकर ये पण, ठीकाय ठेवतो चल बाय .
आईने पदराने कपाळावरचा घाम पुसला अन तिवारीला म्हणाली " अरे तिवारी राजसका
फोन था , पुछ रहा था किधर हो ?
तिवारी : " मॉजी ,आप चिंता मत किजीये किसी को कुच्छ पता नही चलेगा
शहराच्या थोड आउट साईडला एक टेकडी होती , वर चढून गेल्यावर थोड़ी सपाट जागा होती २-३ मोठे मोठी जाड़े होती .भर उन्हात अन टेकडी चढल्यामुळे राजसची आई घामाघूम झाली होती
एका बाजूला असलेल्या मोठ्याश्या झाडा भोवती दगडी ओटा बान्धालेला होता त्या झाडाच्या विशाल बुंध्याभोवती खूप सार्या साखळ्या आणि कुलूप लावलेली होती
उन भयंकर होत ,थोड सावलीत बसुया म्हणत राजसची आई झाडाजवळ गेली
अन अचानक झाडामागे लपलेली एक १५-१६ वर्षाची मुलगी त्यांच्या अंगावर झेपावून आली
आई चपळाईने मागे सरकली पण अचानक झालेल्या ह्या प्रकाराने ती गांगरून गेली होती हात पाय लटपट हालत होते
दोन्ही हात पुढे करून ती मुलगी आईकडे बघून झेपावत होती ,मध्येच हसत होती ,मध्येच जोरजोरात ओरडत होती
भीतीने गलीतात्र झालेल्या आईने तीवारीकडे पाहत विचारलं " ये लडकी पागल लगती है ?
तिवारी : मा जी दूर रहिये इस लडकी से, बाधित हे वो ! जिनको ऐसे भूत प्रेत कि पिडा होती ही उन्हीको जकड कर रखते है बाबा
राजसच्या आईने तिच्या पायांकडे पाहिले,एक पाय साखळीने बांधून ठेवलेला होता अन ती तो सोडवण्यासाठी धडपड करत होती तिच्या अंगातला सलवार कमीज अगदी मलीन मातीने ,फुफाट्याने भरलेला होता ,केसांच्या जटा झाल्या होत्या,दोन्ही हाताने डोक खाजवत ती म्हणाली " कूच खाणे को दो ना भूक लगी हे !
पिशवी मध्ये आणलेले केळ आईने दुरूनच तिच्या दिशेने फेकले ती अधाश्यासारखी सालीसकट खाऊ लागली ,आईकडे रोखून बघू लागली.

" ईतक्यात तिवारीने आवाज दिला मा जी चलिये बाबा बुला रहे है "

*************************
तांबोळी बाबा ,
६०-६५ वय असेल बहुधा बाबांचं , पांढरी दाढी , डोक्याला एक फडक बांधलेलं अंगात साधासा कुर्ता -पायजमा तो पण मळलेला ,ठिकठिकाणी तेलकट डागाळलेला,
छोटीशी खोली ,एकच खिडकी ,आतमध्ये उजेड नाही वारा नाही भयंकर उकाडा
एका कोपर्यातल्या देवळीत धूप जाळलेले होत त्याच्या धुराने खोली भरून गेली होती
त्या अंधार्या खोलीत एक झिरो बल्ब सोडला तर कशाचाही प्रकाश नव्हता
बाबा डोळे मिटून बसलेले होते शेजारी एक १०-१२ वर्षाची मुलगी काहीतरी पठन करत होती
तिवारीने डोक्याला रुमाल बांधलेला होता
आई भिर भिरत्या नजरेन ती खोली न्याहाळत होती ,
बाबाने डोळे उघडले अन
बाबा : बैठो माई
थोडस लक्ष विचलित झालेल्या राजसच्या आईला तिवारीने डोळ्यांनच बसण्याची खुण केली
बाबांनी परत डोळे मिटले अन म्हणाले
बाबा : माई लोबन लायी हो ?
आई : लोबन ? क्या ?
तिवारी : मा जी वो अगरबत्ती हे ,वो दिजीये .
आईने पिशवीतून पुडा काढून दिला
बाबा : बच्ची, सुरमे कि डीब्बी लाना म्हणताच शेजारी बसलेली मुलगी डीब्बी
घेऊन आली बाबाने त्या काजळीने एक छोटेसे रिंगण काढले ,अन डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाला ते काजळ लावून काढून तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र बडबडत होते, तिवारी डोळे झाकून हात ध्यान मग्न बसला होता
राजसाची आई अस्वस्थ विचारात पडलेली " हे नक्की चाललय तरी काय ? खरच ह्याचा काही फायदा आहे कि हा आपला मूर्खपणा आहे हे विचार मनात घोळत असतानाच बाबा मध्येच ओरडले
?
" माई बच्ची पे साया हे , एक रोती लडकी दिखाई देती ही ,अकेली हे बेचारी , तडपती हुई "
तसे तिवारीने पटकन डोळे उघडले
तिवारी : मा जी मे केह नही रहा था आपको ?
"अरे देवा " राजसची आई प्रचंड गोंधळली होती ,घाबरली होती
इतक्यात त्यांच्या खांद्यावर मागून कुणी तरी हात ठेवला छातीत धस्स !
त्या सुरकुतलेल्या हाताकडे पाहत त्यांनी मागे वळून पाहिलं एक ८०-९० ची जख्ख म्हातारी
तिच्या मागे बसलेली होती करडे डोळे ,गोरा रंग , वर्ण गोरा होता पण सुरकुतलेल्या चेहर्यावर खूप सारे तीळ , अन चामखीळ होते
“उसाताला रस काढला कि जसे चिपाड तयार होते तसे काहीसे तिच्या शरीरच चिपाड झालेलं”
हिरव्या टम्म फुगलेल्या शिरा चामडी बाहेर येऊ पाहत होत्या , डोक्यावरील केस विरळ झालेले होते चालता येत नसावं बहुतेक हातानेच पुढे सरकत आली घोगर्या ,अन कापर्या आवाजात म्हणाली :
" बेटा ये उदी है , ओउर ये ताव्वीज है ,इस को बच्ची के सिरहाने रखना ,और ये उदी खाणे-पिणे मे मिलाके देणा सात दिन लगातार ! कसूर नको करू बच्ची. समझि?
आई : ठीक हे मै वैसे हि करूंगी

आईने तिवारीच्या हातात पैसे दिले बाबाना द्यायला .
बाबा : इसिकी कोई जरुरत नही माई , हा, एक करो तुम जिस भगवान को मानते उसको तेल का दिया जलाव दिन रात ,सात दिन लगातार !
ठीक हे बाबा ,म्हणत तिने बाबांना दुरूनच हात जोडले,बाबांनी मोरपिसांचा झाडू त्यांच्या डोक्यावर दोनदा तीनदा हळुवार थापटला.

आईने ती पुडी अन तावीज ,धागे पर्समध्ये टाकले
तिवारी : मा जी आप परेशान मत होईये ,भरोसा रखिये सब ठीक हो जायेगा

तिवारीने शेजारी असलेल्या पिराला वाकून नमन केले त्यावर फुलांची चादर घातली
,शेजारच्या दर्ग्याला बाहेरूनच हात जोडून राजसची आई रिक्षात बसली ,अन पुन्हा त्या मुलीकडे लक्ष गेल ती डोळे रोखून त्यांच्याकडेच पाहत होती राजसच्या आईला गलबलून आल तिच्या चेहर्यामध्ये तिला तेजुचा चेहरा दिसू लागला ,भयंकर भीती वाटली

" भाई साब चलो जल्दी
*************************

राजस घरी आला फ्रेश होऊन ग्यालरीत उभा होता
गेटसमोर रिक्षातून उतरताना आईला पाहिले
***********************************************
" आई भर दुपारी कुठे गेली होतीस ?
आई : अरे आधी घरात तर येऊ देत कि दारातच प्रश्नाला सुरुवात ?
आई घामाघूम झालेली त्रासलेली दिसत होती ,राजसने फ्यान मोठा केला अन गार पाण्याचा ग्लास घेऊन आईसमोर धरला घट घट पाणी घशाखाली उतरवल्या नंतर आई म्हणाली " अरे सामान संपल होत जरास घरात म्हणून आणायला गेले होते . राजसला संशय येऊ नये म्हणून आईने मुद्दाम थोडस मार्केटिंग केलेलं होत .
राजस : ओके ओके, अग पण मला सांगायचं ना !
आई : बर जाउ दे ते ! आज संध्याकाळी डिस्चार्ज मिळतोय ना तेजुला ?
*************************************
संध्याकाळी तेजुला घरी आणले आईने दारातच तिची दृष्ट काढली तशी बाबांनी कपाळाला हात मारून घेतला
आई : हम्म्म कळतंय मला पण तुम्हाला काय समजायचं ते समजा ,मला काही फरक पडत नाहीये.
बाबा : तुझ्याशी वाद कोण घालणार ग बाई ? चालू देत निवांत
तेजू रुममध्ये जायच्या आधीच राजसच्या आईने तिच्या गादीखाली गंडेदोरे ,अन तावीज लपून ठेवले होते
आईने सर्वासाठी चहा बनवला सगळ्यांना चहा दिल्यानंतर फक्त तेजुच्या चहात त्यांनी बाबांनी दिलेली उदी मिसळून तिला तो कप देणार तोच राजसने हात पुढे केला
आई जवळ जवळ ओरडलीच " अरे हा कप तेजुसाठी आहे, तू दुसरा घे ना !"
अरे चिल .......... चिल........... घेतो बाबा दुसरा इतकी का चिडते आहेस ?
तेजुने चहा घेतला राजसच्या आईला हायसे वाटले " हुश्श एक दिवस संपला राहिले फक्त ६ दिवस !

तेजू राजसची मनमोकळे पणाने गप्पा मारत होती ,हसत होती, ते पाहून राजसला खूप हायस वाटलं
पण हे सुख किती वेळापर्यत टीकतय ? याचीही त्याला मनातल्या मनात धास्ती वाटत होती
रात्री जेवण उरकल्यावर सर्व जन झोपली ,राजस झोपला नाही ग्यालरीत बसला होता ,डोक्यात विचार चालूच होते ,वातावरण शांत होत .हळूहळू त्याच्या लक्षात आल कि कुणीतरी दबक्या आवाजात काहीतरी बोलताय अस्पष्ट अस त्या आवाजाचा कानोसा घेत तो रूमबाहेर आला बाहेर कुणीच नव्हत आवाज आईचा नक्की नव्हता मग कोण ?

अस कुणाच बोलन एकन राजसला पटत नव्हत ,पण इतक्या रात्री कोण बडबड करतेय याची त्याला उस्तुकता लागून राहिली होती तो आवाजाच्या दिशेने सरकत दबकत गेला समोरच्या ग्यालरीत तेजूची आई उभी होती राजस दरवाजा मागे लपला अगदी चोरासारखा !
" अहो आज मी तेजुच्या तोंडून " प्रियाच नाव ऐकल , अन भीतीने हातपायच गळाले माझे ,इतक्या वर्षांनी ,
आता कुठे सगळ सुरळीत होतंय ,इतकी छान माणस मिळालीत नशिबाने ,अन पुन्हा हे काय ?
मला तर भयंकर भीती वाटतेय हो त्या पेक्षा तेजूची काळजी वाटतेय
ती प्रिया तेजुच्या पदरातल सुख हिरावून तर नाही घेणार न पुन्हा
देव तरी का असा निष्टुर वागतोय ? माझ्या लेकीलाच का हा जाच ?
" हे प्रिया नावाच संकट का जात नाही एकदाच तिच्या आयुष्यातून "?
किती किती सहन करायचे ? तुम्ही या बघू पटकन माझी तर झोपच उडालीये असे म्हणत आई डोळे पुसत मागे वळाली
राजसला अचानक समोर पाहून आईला काय बोलावे ते सुचेना
त्यांनी घाइघाइत फोन बंद केला
कसबस "अरे झोपला नाहीत अजून ?" विचारलं
राजस : " प्रिया कोण आहे ? प्रियाचा अन तेजुचा काय संबध ?
मी तुम्हाला हा प्रश्न हॉस्पिटल मध्ये विचारला होता तेव्हा तो तुम्ही किती सहजपणे टाळून गेलात
पण तुमच्या चेहर्यावरची भीती ,अन अस्वस्थता मी नोटीस केली होती
नक्कीच " काहीतरी आहे ,कि ज्यापासून मी अजाण आहे ,”
शांत नका राहू प्लिज ,मला उत्तर अपेक्षित आहे
सांगा प्रिया कोण ?

क्रमश :

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

मन१'s picture

14 Oct 2011 - 12:41 pm | मन१

तेजूचं काय झालं मग?
तेजूनं ते मंतरलेलं खालं का मग?
सांग ना पटकन.

वपाडाव's picture

14 Oct 2011 - 4:05 pm | वपाडाव

तीन-चार वेगवेगळे प्रसंग नीट हाताळलेत.....
राजसच्या आइची तगमग, तेजुच्या आइची घालमेल मस्त चित्रित केलिये.....
कहाणी दमदार तर नाही, पण चित्तवेधक नक्कीच आहे....
कारण गर्ल नेक्स्ट डोअर - पियुशा कडून इतके छान मांडणी असलेले सुसुत्रित असे काही येइल याची आशा नव्हती.....

लगे रहो.....

पियुशा's picture

15 Oct 2011 - 10:43 am | पियुशा

@ व.प्या
गर्ल नेक्स्ट डोअर - पियुशा कडून इतके छान मांडणी असलेले सुसुत्रित असे काही येइल याची आशा नव्हती.....

लगे रहो.....

ड्वाले पानावले ;)
धन्स :)

मनराव's picture

14 Oct 2011 - 1:01 pm | मनराव

वाचतो आहे........

मस्त एकदम, अशावेळी संबंधित प्रत्येकाची एकच प्रश्न सोडवण्यासाठी चाललेली धडपड मस्त रेखाटली आहे.

आत्मशून्य's picture

14 Oct 2011 - 1:30 pm | आत्मशून्य

कथा टूकार पण लेखन कौशल्य जबरा......

अवांतर :- हा भाग जरा जास्तच वेगवान होता, कथा संपवायची घाइ आहे काय ?

दीप्स's picture

14 Oct 2011 - 1:47 pm | दीप्स

अग लवकर लवकर लिही कोन आहे ही प्रिया ?????????

जाई.'s picture

14 Oct 2011 - 2:03 pm | जाई.

उक्तंठा वाढवलीये या भागाने

पुभाप्र

वपाडाव's picture

14 Oct 2011 - 4:04 pm | वपाडाव

म्हणजे काय ते?
पुढील भागातला प्रतिसाद असे तर नाही ना!!

प्रास's picture

14 Oct 2011 - 4:20 pm | प्रास

म्हणजे पुढील भागाच्या प्रतिक्षेत असावं, वपाशेठ!

@ पियुशा,

भारी जमलीय बरं का ही कथा!

लिही लिही, लौकर लिही...

:-)

'पुभाप्रि' असं पाहिजे खरं तर - पुढच्या भागात प्रिया.

किचेन's picture

13 Nov 2011 - 3:14 pm | किचेन

कोण आहे हि प्रिया? लवकर लिही.खूप वाट बघतीये.
अतृप्त आत्मा वैगैरे काही? कि तेजू वर बदला ,सूड?
प्रतीक्षेत आहे.

अतृप्त आत्मा वैगैरे काही? कि तेजू वर बदला ,सूड?

आमच्या जालीय मित्रांच्या नावाचे आयडी वापरुन तुम्ही हे असे बदनामीचे चक्र चालवु नाही शकत.... याबद्दल कार्यवाही करणेत येइल....

प्रचेतस's picture

14 Oct 2011 - 2:26 pm | प्रचेतस

उत्कंठावर्धक, वेगवान भाग. रेंगाळलेली कथा पुढे सरकतेय वेगाने आता.
पुढचा भाग येउ दे लवकर. प्रियाचं रहस्य उलगडायला हवं आता.

कौन है ये प्रिया? लवकरच पुढील भाग येऊदे.. बाकी कथानक टुकार असलं तरी लेखनशैली छान आहे.
फक्त अपेक्षा आहे ही शुद्धलेखन व्हावे.

- पिंगू

रेवती's picture

14 Oct 2011 - 11:09 pm | रेवती

हम्म्म
वाचतिये.
आता कथा संपण्याची अपेक्षा आहे.
वाईट अर्थाने नव्हे.

किसन शिंदे's picture

15 Oct 2011 - 12:49 pm | किसन शिंदे

ठिक आहे... तेजुच्या आईची सत्य लपवण्याची केविलवाणी धडपड चांगली लिहलिये.

स्मिता.'s picture

13 Nov 2011 - 3:42 pm | स्मिता.

पिये... पुढचा भाग केव्हा टाकणार आहेस?

मी तर आशाच सोडलिये.
सूचना: आशा हे इथे स्त्रीचे नाव म्हणून वापरलेले नाही.

मोहनराव's picture

15 Nov 2011 - 1:41 am | मोहनराव

वाचतोय वाचतोय वाचतोय!!
पण संपत नाहीये कथा!! खुप चांगले लिहीताय तुम्ही!!
उत्कंठा वाढलीये!! पुलेप्र!!