" परतीच्या वाटेवर - ५

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
3 Oct 2011 - 12:03 pm

परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर - २
परतीच्या वाटेवर - ३
परतीच्या वाटेवर - ४

परतीच्या वाटेवर

तिवारी : मां जी मी झुठ नही बोल रहा ,मेरा विश्वास किजीये , मैडेम को ये तो कोई बाहर का मामला
लगता है ,बाहर की बाधा लगती है.
बाबा : बाहर मामला ? क्या बाहर का मामला?
तिवारी : जी वो भूतप्रेत ........
बाबा : क्या बकवास करा रहा है तू ? अन तू ग, तुला तरी काही समजतंय का?कुणी काही सांगेल अन तू ?
आई : अहो पण त्याच एकूण तर घ्या तो काय म्हणतो ते ? तिवारी बता ना साब को ,
तिवारी : साब मे उस दिन नाईट शिफ्ट को था मैने उस दिन डबल डूटी मारा था ,निंद बोह्त आ रहा था इसीलिये मे बिडी पिणे के लिये के पीछे वाली बिल्डींग का वोचमेण हे ना उसके पास माचीस लेने गया था, अचानक मैने गेट कि जोर से खड खडटहट सुनी, तो मुझे लगा कोई आया होगा .
इसलिये मे गेट कि चाबी लेके गेट खोलने दौडा " तो मैने देखा कि तेजू मैडेम जोर जोरसे गेट को दोनो हाथो से पकड के हिला रही थी, गेट खोलणे कि कोशिश कर रही थी
" क्या हुवा मैडेम ?आप अकेले क्या कर रही है यहा? इतनी रात मे? कुछ
परेशानी है क्या ? इमरजन्सी है ?साब किधर ह? क्या हुवा ?
मैडेम मेरी तरफ देखके बोली " वो जो खडी है ना वो उसके पास जाणा हें, गेट खोलो
मैने इधरउधर देखा साब , कोई भी नही था ?
क... कोण.. मैडेम , किधर है .........इधर तो .......................
"वो देखो ना ,सामने हि तो है "
मुझे तो कोई नाही दिखा साब

अपना पडोस का गोलू ( कुत्ता) उधर देख के इतना जोर जोरसे भोक रहा था मानो रस्सी तोड देगा
"वो देखो ना ,सामने हि तो है "
ऐसा बोल के मैडेम एकदम से जोर जोरसे हसणे लगी मेरा तो डर के मरे बत्ती गुल हो गया साब
मे केबिन मे भागा सोचा आपको इंटरकॉम करू ?
पर तभी मैडेम अचानक से वापीस मुडी और बिल्डींग के तरफ चली गई
मानो जैसे कुछ भी नाही हुवा हो
मैने उस दिन हि सोचा सुबह ये मामला मे आपको बता दु पर मे डर रहा था कि आप क्या सोचेंगे ? और दुसरे दिन मेरा छोटा लडका अचानकसे बिमार पड गया उसे हॉस्पिटल रखा इसीलिये मे ३ दिन छुट्टी पे था और कल वापीस ये घटना घटी तो मैने सोचा आपको बंता हि देता हु .
मेरी मौसी को भी ऐसा हि प्रोब्लेम हो गया था साब , वो तो बहोत अजीब अजीब हरकते करती थी शुरू शुरू मे किसीने ध्यान नही दिया बाद मे वो इतनी बाधित हो गई कि हमे उसको बेडी मे जकड कर पेड से या चारपाई से बांध के रखना पडता था कही किसीको कूछ कर ना दे साब ,
वो ऐसेही जोर जोर जोरसे चील्लती थी ,नाखून खाती थी ,अपने बाल नोचती थी साब अकेलेमे बड बडती थी
जैसे मैडेम उस दिन कर रही थी
आपका विशवास हो ना हो पार ये १०० टका सच है डॉक्टर कूछ नई कर सकता ऐसे मामले मे !
आई : अब कैसी तेरी मौसी ?
तिवारी : वो मर गई, बाबा बोले पेहले लाते, तो मी कुछ भी करके बचा लेता था ,

आई : अरे देवा ,बघा मी म्हणत होते ना ,आपण प्लीज तेजुच्या आई बाबाना बोलवूया का ? मला फार भीती वाटतेय हो ,उद्या काही कमी जास्त झाल म्हणजे ?
राजस : तिवारी तु कूछ भी बोलेगा और हम विश्वास करेंगे पागल समझा है क्या मुझे ? तुम जैसे देहाती लोग कभी नही सुधरेंगे पागल कही का ! जा जा यहांसे अपना काम कर चल ,
आई : अरे राजस तू चीडतोयस कशाला ?
बाबा : चिडणार नाही तर काय करेल तो ? कुणावरही विश्वास ठेवायचा ? तुला तरी अक्कल नको का ?

आई : ठीकाय तुम्हाला जे पटत तेच काय मी नाही बोलत मध्ये मध्ये तुम्हा दोघांच्या !
बाबा : अरे राजस आजच न्यायचं ना तेजुला हॉस्पिटल मध्ये ?
राजस : हो हो आजच !
राजस रुममध्ये आला तेजू शांत झोपलेली होती
राजसने तिला हलकेच उठवले त्याचा स्पर्श होताच ती दचकून जागी झाली
तेजूने घड्याळाकडे पाहिले अन निरागस पने आपली जीभ चावली "अरे देवा १२ वाजताहेत आज मी इतका वेळ झोपले? अन तुम्ही आज ऑफिसला नाही गेलात ? अहो मला उठवायचं ना , अन तुम्ही रुमाल का बांधला आहे तोंडाला ?
माय लेक काय माळे झटकताय कि काय ? जरा धूळ सहन होत नाही तुम्हाला अन तसेही बरेच दिवस झाले साफसफाई करून हो ना ?
तेजुला गेल्या रात्री घडलेला प्रकार काहीच आठवत नव्हता ती एकदम नॉर्मल होती.
विचार करून करून राजसच डोक आधीच बधीर झाल होत
राजस : ते नंतर ,आधी आपल्याला बाहेर जायचं जरा आवरून घे तू ओके !
तेजू : कुठे ? सांगा ना ?
राजस : तू आधी आवर तर ,!
तेजू : ओ ओ ...........म्हणजे सरप्राईज आहे वाटत काहि तरी ?
ड्रेस घालू कि साडी ? कुठली घालू सांगा ना मोरपंखी ? नको तुम्हाला आवडत म्हणून नेहमी मोरपंखी का घालायचं त्येच, त्येच .आज मी ना लिंबू कलरची घालते .आलेच हा, म्हणत तेजू बाथरूम मध्ये शिरली
राजस विचार करून करून शिणला होता. रात्रभर झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे भयंकर ताठरले होते तेजुच आवरूपर्यंत तो आरामखुर्ची मध्ये विसावला
अन कसल्या तरी खडखडीन त्याला जाग आली ,जांभई देत हातातल्या घड्याळात पाहिले
ओह माय गोड २ वाजताहेत इतका वेळ झोपलो आपण ? अन तेजू तेजू कुठाय ?
राजस बाथरूमच्या दारापाशी गेला
दारावर टक टक करून म्हणाला आग आवरला का नाही? झोपलीस कि काय आत ?

बाथरूमचा नळ फार जोरात चालू होता कि बाहेरपर्यंत आवाज येत होता
राजस : तेजू ,आवरलं का नाही काय करतेस तू ?
तेजून काहीच उत्तर दिल नाही
दरवाजा आतून बंद होता म्हणजे तेजू आताच असणार म्हणत त्याने जोरजोरात दरवाजा वाजवला
तेजूला परत काहि झाल तर ? नो नो नो .....
तेव्हढ्यात तेजुने आवाज दिला " मला वाचवा प्लीज दरवाजा उघडा ,ती इथे आहे ,प्लीज प्लीज मला वाचवा मला फार भीती वाटतेय !
राजसने बाबांना जोरात आवाज दिला " ओ बाबा जरा इकडे या दोन मिनिट आपल्याला दरवाजा तोडावा लागेल तेजू लॉक झालीये बहुतेक !
बाबांनी अन राजस ने तो दरवाजा ठोकून ठोकून कसाबसा उघडला
तेजू एका कोपर्यात शांत बसलेली होती ,बाथरूमचा नळ चालू होता ,बादली भरून वाहत चालली होती ,
तिची लिंबू कलरची साडी अगदी लालेलाल माखली होती रक्ताने !
तेजू : “ मला कि नै लाल रंग फार फार आवडतो “ , बघ ना राजस मला किती
किती लागल बघ ना, मला किती जखमा झाल्यात ,पण मी रडतेय का ? रडतेय का मी बघ ना !

क्रमश :

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Oct 2011 - 12:09 pm | प्रचेतस

छान लिहिलेस.
पण कथानक रेंगाळतेच आहे अजून. पुढे सरकायला पाहिजे आता.

मनराव's picture

3 Oct 2011 - 12:25 pm | मनराव

^^^^
अनुमोदन.......

ह्यो भाग लवकर (२ तासातच) संपला........

मृत्युन्जय's picture

4 Oct 2011 - 12:18 pm | मृत्युन्जय

+२

@ वल्ली
छान लिहिलेस.

धन्यु :)

ओके फार ताट्कळ्त नाही ठेवत आता !
पुढील भागात प्रयत्न करते कथा संपवन्याचा ओके :)

स्मिता.'s picture

3 Oct 2011 - 1:04 pm | स्मिता.

कथा छान चाल्लीये गं. उगाच संपवायची घाई करू नकोस... फक्त कथेला पुढे सरकव.

हिंदी व्याकरण पण सुधारलंय, धन्यवाद.

पण पुढच्या भागातच का संपवताय, चालु द्या की अजुन थोडा वेळ, मस्त लिहिलंय. फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी.

किमान जोपर्यंत रॉयल्टीची काही बोलणी होत नाहित तोपर्यंत तरी चालु द्या.

असो, भाग थोडा लांबल्यासारखा वाटला, बहुधा रिटर्न मान्सुनचा परिणाम असावा.

प्रतिसाद दोन वेळा झाल्याने काढुन टाकत आहे,

रणजित चितळे's picture

3 Oct 2011 - 2:19 pm | रणजित चितळे

वेळ लागेल थोडा वाचत आहे. आज ब-याच दिवसाने जालावर येता आले. नंतर सविस्तर प्रतिसाद कळवेन.

कथा पटापट पुढे सरकली तर मजा येईल अजून. पुढे सरकणे म्हणजे संपवणे नव्हे. घटना एकापाठोपाठ एक वेगाने घडणे. तसेच, भागही जरा मोठे टाकले तर बरं होईल. हा आणि ह्याच्या आधीच मिळून असा एक भाग असता तर तोचतोचपणा जाणवला नसता.

वपाडाव's picture

3 Oct 2011 - 6:06 pm | वपाडाव

बरोब्बर.....
संपवु नकोस लौकर.....
हळु हळु सरकु दे कथानक समोर.....

अप्रतिम लेखन ..
असेच लिहित रहा.. वाचत आहे..

श्यामल's picture

3 Oct 2011 - 5:33 pm | श्यामल

पियुशा, छान लिहितेस............पुढचा भाग लवकर येऊ दे.

रेवती's picture

3 Oct 2011 - 6:12 pm | रेवती

बरं, पुढं काय झालं?

शिल्पा ब's picture

4 Oct 2011 - 1:05 am | शिल्पा ब

छान लिहितेस पण कथा जरा पुढे सरकंव की!!

पियुशा's picture

4 Oct 2011 - 11:55 am | पियुशा

@ ५० फक्त
फुलपाखरी वस्तुंच्या सहवासात असता असे समजले, त्याबद्दल पण लिहा की कधितरी.
हे वाक्य डॉक्यावरुन गेलेय माझ्या ,सविस्तर सान्गा :)

प्रचेतस's picture

4 Oct 2011 - 12:41 pm | प्रचेतस

काय हे पियुशाबै,
तुमचाच मिपाचा प्रोफाईल तपासा. :)

श्री. वल्लि, मदत केल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

या फुलपाखरी वस्तुंनीच आमचे फुलपाखरी दिवस अक्षरश उडवुन लावलेत याचे फार दुख आहे हो.

आत्मशून्य's picture

4 Oct 2011 - 1:53 pm | आत्मशून्य

घाइ नको... विस्त्रुत हौद्या...

किसन शिंदे's picture

4 Oct 2011 - 1:56 pm | किसन शिंदे

कथा आरामशीर चालु दे विस्तॄतपणे....