चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..

काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.

नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी..

काय?.. सांगतो..

सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्‍या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या.

तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच. पण तरीही केल्या आहेत कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते. सगळ्या पाट्यांमधे काही धमाल जोक आहे असं नव्हे पण महाराष्ट्रात कानी न पडणार्‍या वेगळ्याच शुद्ध घी मधल्या हिंदीच्या शब्दांचीही झलक इथे दिसतेय.

फोटो सौजन्य : मीच

पाट्यांचे फोटो काढताना मी संशयास्पद ठरुन मार खाण्याचा अनुभव इथे लिहायची वेळ येऊ नये म्हणून मोबाईलमधून जमेल तेवढ्या झपाझप फोटो काढले आहेत. कलादालन म्हणून पाहू नये असं म्हणून पाहतो.

१)


१ वर टिप्पणी: भात नाही घेतलात तर किती पोळ्या जास्त मिळतील हे बाहेरच पाटीवर लिहिण्यातले "डीटेलिंग" पाहून प्रिय पुण्याची आठवण झाली.

२)

२ वर टिप्पणी: सध्या बिझनेस खेचण्यासाठी वापरलेल्या गुडविलच्या "के बेटे..के बेटे" च्या माळेतले वरुन दुसरे प्राचीन पंडितजी श्री. मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.

३)

३ वर टिप्पणी: पुण्याची तीव्र आठवण. भाषा वेगळी, भावना तीच..

४)

४ वर टिप्पणी: हा चष्म्याचा सेलवाला जाम चालू आहे. जो चश्मा गिर्‍हाईकाला आवडेल तो "फॅन्सी" ठरणार. आणि "फॅन्सी चश्मे"का रेट अलग से..

५)

५ वर टिप्पणी: वरुन चवथ्या क्रमांकाचे सूप (अगदीच अंदाज येत नसल्यास.. हॉट अँड सोअर सूप)आवडल्या गेले आहे. तिसर्‍या क्रमांकाचा पदार्थ मागण्याची इच्छा आणि धाडस झालेले नाही.

६)

६ वर टिप्पणी: हेच दुकानाचं नाव बरं का..
बाय द वे..दुकानाला काही "मनोज भांडार", "सत्कार भोजनालय" असं नाव द्यायलाच पाहिजे असं थोडंच आहे ?
प्रॉडक्ट आणि धंद्याचे नाव यांचं अद्वैत.

याच धर्तीवर पुण्यात "खमंग काकडी, साबुदाणा खिचडी" या नावाचं दुकान आता शोधीन.

७)

७ वर टिप्पणी: धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही.

८)

८ वर टिप्पणी: नाही.. मुळातच मान्य करतो की हे तेल जबरी गुणकारी आहे. पण नेमके कशावर? "चोट मोच" आणि "जले कटे" हे दोन विकार वगळून बाकीच्यापैकी एकातरी रोगाच्या नावाचा अर्थ कोणी माफक शुल्क घेऊन सांगेल का?

...

...

...
याखेरीज हरिद्वारमधे एक "मेल-फिमेल" फॅमिली हॉटेल असे हॉटेल पाहण्यात आले. त्याचा, विशेषतः बोर्डाचा फोटो विविध कारणांस्तव आणि मारभयास्तव काढता आला नाही याची रुखरुख लागली आहे.

ऑस्सम फोटो झाला असता यार. हो. "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" अशा नावाचं हॉटेल.. खरंच.. मी पाहिलं डोळ्यांनी..

......

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ...... smileysmiley

५व्या नंबरचा फोटो आणी त्यावरची टिप्पणी पाहून जाम हसतोय.

मेल-फिमेल नावाच्या हाटिलाचा फोटू पहायला आवडलं असतं, फोटो का नाही काढलात हो गवि?

~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..

- अशोक बागवे

सहमत.

फलकावर ४ रोट्या दाखवल्या आहेत आणि भात न घेतल्यास ६, म्हणजे भात न घेतल्यास एकूण १० रोट्या मिळाव्यात अशी, माफक, पुणेकरी अपेक्षा.

मनात आले होते.

एकदम खुसखुशित, चुरचुरित पाट्या. बघून जाम मजा आली.
बाकी तिकडे स्वस्ताई प्रचंड दिसतेय. ३० रू थाळी फक्त.

तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत.
खखाँ म्हणजे खोकला बिकला आणि बिवाई म्हणजे बिमारी असावी. smiley

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

>>तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत.
काय हे वल्ली, निदान बटाट्याच्या सळ्या तरी म्हण की !! smiley
गवि फोटो मस्तच, ते होडन सावर वाचल्यावर थोडी कल्पना आलीच, तोवर तुमची कमेंट वाचली आणि खात्री पटली. ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं.

हातकणंगल्याच्या रेल्वे स्टेशन वरचा बोर्ड हेच नाव दर्शवतो

अरेरे.....

--मनोबा
"The last Christian died on the cross".

मनोबा,
इथला अन् तिथला प्रतिसाद उलट सुलट झाला की काय?

http://www.misalpav.com/node/19378#comment-345263

कृपया संपादित करून घ्या. (नायतर कोणीतरी तिथं बूच मारेल) smiley

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

तिथे "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती पण कोणाच्या लक्षात आलं नसेल तर राहू दे म्हणून गप्प बसले..

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

>>>>> "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती .....

सेम टू सेम.

-दिलीप बिरुटे

हस हस हसतेय!
पुरोहितानी बोर्ड लावायची कल्पना अतिशयच आवडल्या गेली आहे. त्यातून "मख्खन चख्खन" ........
"होडन सावर" आणि "पटाटो चाप" smileysmiley मुंबईच्या हिंदीला कशाला हसायचं या लोकानी? या इंग्लिशला घाबरून अंग्रेजानी इथून काढता पाय घेतला असावा!
हंसी मजाक करना धार्मिक अपराध हैं? smileysmileysmiley
बाकी चीता तैल... मधले गठिया म्हणजे गाउट, बयार म्हणजे हवा smiley हे माहिती होतं. बिवाई म्हणजे पायाच्या भेगा हे विकिवर सापडलं. त्या खखाँ चा उच्चार कसा करतात भाऊ?

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

खरवाँ आहे बहुतेक ते.

बाकी शब्दांचे अर्थ (नि:शुल्क) सांगितल्याबद्दल अनेक आभार मानले जात आहेत. smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

अगदी एवढी छप्पर फाडके नाही पण एका हाटेलाची मजेशीर पाटी पहलगाम मध्ये पाहिली होती:

सालं हाटेलाचं नाव देल्ली दी पंजाबी रसोई आणि स्पेशलायझेशन पंजाबी खाणे सोडुन सगळ्यात. ये बात कुछ हजम नही हुई. smiley

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

मजा आला...
गवि, तुमच्या कल्पकतेची दाद द्यायला पाहीजे smiley

कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते.

ठ्ठो.... smiley

=====================================
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

आम्ही सध्या लेखणी म्यान केली आहे.
उफ़्फ़... ये गालिब!!

हरिद्वारी पाट्या आवडल्या.
लोकं उगाच आमच्या पुण्याला नावं ठेवतात. smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

शोलिद !

________/|\___________

त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. बाकी पाट्या लई भारी,

अवांतर - एक आव्हान

इथल्या सर्व कुक व कुकीण मंडळीना जाहीर आव्हान, येत्या २४ तासात होडन सावर ची पाक्रु टाकुन २५ प्रतिसाद मिळवणा-यास शाजी पराठे पुणे येथे प्यार्टी.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, ...आगागागागा smileyigsmile:

त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय,मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. > smiley खपलो.... खत्री निरीक्षण...

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

त्या पाटीवरचे निरिक्षण चांगले आहे.
शिवाय शेवटून दुसरा, ज्याचं नाव मोनू आहे त्याच्या मुलाचं नाव राज!
म्हणजे खापर किंवा खापर खापर पणजोबा जिवंत असल्याचं खापर कोणावर फोडायचं हा प्रश्न वेगळा!smiley
बाकी ते होडन सावर सूप प्यायला तुम्ही हरिद्वार गाठायलाच हवं म्हणजे गंगा मईया (संदर्भ:छोले पुरीची पाटी.) तुमच्यावर प्रसन्न होईल आणि पाय बरा करेल.smiley

मेलो हसून smiley ५० फक्त चे निरीक्षणही जबरी smiley

हा हा हा.. मजा आली! 'होडन सावर' ब्येष्ट!

होडन सावर बेस्ट .....

विजय नरवडे

मस्त

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

ते वरती भात न घेतल्यास रोट्या ६,,,हे स्पष्टीकरण पुणेरी प्रव्रुत्ती दाखवतच,,पण पुण्यात ''भात न घेतल्यास जादा चपाती मिळत नाही'',,,''मागू नये''-हे त्या वाक्यातच ध्वनीत असतं.तर ''मागितल्यास इतर ग्राहकांदेखत अपमान करणेत येइल'' ही त्याची अध्याह्रुत ओळ असते...

या वरुन १ किस्सा अठवला,आमच्या नवी पेठेत चिमणबागेत तिलक हॉटेल आहे,(तिथला चहा पूर्वी फेमस होता smiley )...तिथे वडे पार्सल मिळण्या संदर्भात १ पाटी होती >दोन नगास चटणी पार्सल मिळत नाही मी त्यांना म्हणालो- अहो तुमच्या समोर तर हा एकच नग उभा आहे,,मग द्या की...? मालक ओळखीचा असल्यानी त्यानी मला चटणी तर दिलीच,,शिवाय ''काय राव तुंम्ही अमचा आज वडा केला...हे हे हे'' वगैरे संवाद होऊन,,,दुसय्रा दिवशी त्यानी नगा'चा 'वडा' केला... smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही. >>> गवि, सगळ्या पाट्या आणि त्यावरच्या टिप्पण्या धमाल आहेत ! smiley

श्यामल

छान, खुसखुशीत फोटो व टिपण्णी.

ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का?

'होड्डन सावर' चा अर्थ लक्षात नव्हता आला, त्याचे इन्टर्प्रिटेशन केल्याबद्दल धन्यवाद.

ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का?

हा हा..
अजिबात नाही. सर्वजण मजेत होते. दूरवरही स्मशान नव्हते. पूर्ण घाट भरुन असेच मजकूर होते.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

सगळा धागा वाचून, पाहून ख्या ख्या करून हसत होते.
होडन सावर सूप म्हणजे काय हे स्पष्ट केल्याशिवाय या जन्मात तरी समजलं नसतं.
पटाटो चाप भारी आहे.
गंगा किनारे ची सूचना फार आवडली. सरळ पापपुण्याच्या भाषेतच समजावलय.smiley
ज्यांनी दुसर्‍या साईडचा ढाबा विकलाय त्यांनी लिहिलेलं 'कृप्या' वाचून डोळे पाणावले.smiley
'के बेटे, के बेटे' अशी परंपरा राजकारणात आलिये ती हरिद्वारहूनच!
मीही एके ठिकाणी पाटी वाचली होती.
येथे शाखाहारी आणि मौसाहारी जेवण मिळेल.

हेच म्हणते... होडन सावर हे स्पष्ट केल्याशिवाय समजलं नव्हतंच मला.. smiley

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मस्त धागा! खूप ह्सले वाचून! smiley

मस्त धागा. आवडला.

"कढी़ चावल राजमा छोले पूरी" ... बराच वेळ मी हे "द्योले" काय प्रकरण आहे या विचारात पडलो होतो. !!
बायदवे: मामलेदाराची मिसळ जिथे मिळते त्या दुकानाचं नाव नक्की काय आहे?

------------------------
मराठे
http://kaaheebaahee.blogspot.com
http://ikadetikade.blogspot.com

त्यावरचं गंगा मईया वाचलत का?
हा हा

'होडन सावर' हिट्टं.

__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion

खल्लास हो गवि.

होडन सावर हे जबराच!! smiley
पं. मख्खन चख्खन सुद्धा शॉल्लिट.
बाकी टमाटर मधले 'ट' आणि 'मा' हे खास पंजाबी उच्चारानुसार जोडून लिहिलेले बघून ड्वाले पाणावले. smiley

(होडनसावरप्रेमी) पं. चतुरंग चतुर्वेदी

इंदूरला आल्यापासून माझ्यासुध्दा मनात असा उद्योग करायचा किडा येतोय.
पण कॅमवाला मोबाईल घेईपर्यंत वाट पहावी लागेल.
इथे तर चक्क

शासकिय मदिरालय

smiley
असे लिहीलेले बार आहेत.. विश्वास नाही? थांबा आता गविंसारखेच फोटो टाकतो..

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

>

हे वाचून धर्मेंद्र च्या (बहुदा प्रतिज्ञा) चित्रपटामधील सरकारमान्य देसी पुलिस चौकी आठवली.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

एक्दम मजेदार बोर्ड आहेत. त्यांचं हिंदी समजायला बराच वेळ लागला हेसुद्धा जाता जाता सांगते.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.
नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज..

smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmileysmiley
smileysmileysmiley
smileysmiley
smiley

_____/\____

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

गंगा किनारे बैठकर हसी मजाक.....ला पैकीचे पैकी मार्क दिले. smiley

-दिलीप बिरुटे

हाहाहाsmileysmileysmiley
होडन सावर भारीच smiley

smileysmiley कित्ती तरी वेळ हसले हा लेख वाचुन smiley

खरोखर असलीच परिस्थिती.

एका ठिकाणी मी पण असेच पाहीले होते जसे की:
थमसअप
पवा म्हणजे पोहे


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गुजराती भाषेत पोह्यांना पोवे म्हणतात...
अन बटाट्याला बटाका.....
असे बरेच वुच्चार आहेत जे थोडेफार प्रदेशानुसार चेंज होत असतात......

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

सगळे एकाहून एक भारी .

मालक हरिद्वारला दिल्लीहून गेला असाल.
अगोदर कळवते तर भेटलो असतो ना?

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

आजच ही एक पाटी फेसबुकावर पाहिली.

बहुदा वाड्याला फ्लॅटपण देणार्‍यांनी केलेल्या सततच्या विचारणेला कंटाळून लावली असावी.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मी पुण्यात असताना लक्ष्मीरोडवर भली मोठ्ठी वाड्याच्या इतक्याच रुंदीची निऑन साईन तयार करुन लावलेली पाहिली.

"वाड्याचे मालक श्री.--- मालकाचे पूर्ण नाव नाव-वडिलांचे नाव-आडनाव---- हे आहेत. बहुधा मराठे किंवा तत्सम नाव होतं.

नंतर सुधीर गाडगिळांनी त्यावर लेखही लिहिला होता कुठेसा.

हल्ली काय स्थिती आहे माहीत नाही.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

लक्ष्मी रस्त्यावर ..
मराठे आडनाव आहे..अजुनही आहे ती पाटी

शाहिर....
--------------------------------------------------------------
कॅलरी काँशंस नसले तरी सॅलरी काँशंस असावे

आहे आहे ती पाटी अजुन आहे फक्त आता निऑन बंद असतात, त्या जागेची किंमत २०० ४ - ५ मध्ये साधारण ८-१० कोटी इतकी होति असे ऐकले आहे, मी ज्या दिवशी ती पाटी नेटवर पाहिली त्यादिवशीच रात्री प्रत्यक्ष बघायला गेलो होतो तिथे.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

गवि,
छान लेख. मला अजून 'होडन सावर' चा अर्थ कळला नाही.

- तिरशिंग डंबोणे

स्वाक्षरी: लता आणि आशा यांचा आवाज, हा माझ्या जगण्याचा श्वास आहे.

मनचुरियन सूप आणि पटाटो चाप चापा.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

पैसाताई, असा हँसी मजाक केलास तर गंगा मईयाँच्या दृष्टीने धार्मिक अपराध ठरतो.
त्यापेक्षा ति. मां. ना सांगून टाक ना हे हॉट आणि सावर सूप आहे ते!
अहो ति. मा., हॉट हा शब्द वेगळ्या तीर्थक्षेत्री चालतो इथं नाही!smiley

अहो ति. मा., हॉट हा शब्द वेगळ्या तीर्थक्षेत्री चालतो इथं नाही!

भारी हं!! smiley
बाकी गवि... खूप हसतेय मी. ५० फक्त यांची टिप्पणी आवडली.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

__/\__

हसून हसून अतिशय वाईट प्रकारे खपल्या गेलो आहे smiley

***************************************

- मन्या फेणे

मग तुम्हाला मोनु किंवा राजु कडे जाउन चालणार नाही, श्री. मख्ख्नन चख्खन यांचेकडेच जावे लागेल, वाईट प्रकारे खपल्यास काय करायचे याचे ट्रेनिंग हे मोनु किंवा राजु यांनी घेतलेले नाही अजुन.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

हॅ हॅ हाआआ

We are who we are!

ही पाटी बहुधा, इथं येणा-या परदेशी गे किंवा लेस्बियन पर्यंटकांचा गोधळ टाळण्यासाठी सिरियसली लावलेली असावी अशी एक प्रामाणिक शंका आहे.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

गंगा किनारी बसून गप्पा, खाणे पिणे इ.इ. जर धार्मिक अपराध असेल तर.....
तिथे हॉट(गरमागरम) आणि सॉर (आंबट - शौकीन) लिहेले तर ते महापातक असावे म्हणून त्याला पर्यायी शब्द होडनसोर smiley वापरत असावेत.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

>> मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.
मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडल्या गेले आहे
सुखी माणूस मानल्या गेला आहे