गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता.
मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले. तिकीट मिळाले ते महिला गटाच्या उपांत्य सामन्यांचे..सामन्यांच्या आदल्या रात्री दोन उपांत्य सामन्यांमधी एक आमच्या स्टेडीयम मधून हालवून दुसरीकडे ठेवला गेला व आमच्या स्टेडीयम मधे पुरुष दुहेरीचा अंतीम सामना.
आमचा सामना साधारण ७ वाजता सुरू होणार असल्याने आम्ही साधारण ५-५.१५ च्या सुमारास पोहोचलो तर दिवसा होणार्या दोन सामन्यांपैकी जोकोवीच - फेडरर हा एकच सामना नुकताच संपला होता.. ५.३० वाजता आत जाऊन हिरवळीवर अंग टाकून मस्त पैकी मोठ्या पडद्यावर नदाल- मरे हा सामना पहिला... शेवटी आमचा ७ वाजता सुरू व्हायचा सामना १० वाजता सुरू झाला. त्यची क्षणचित्रे.
नदाल व मरे यांच्या सामन्या नंतरचे नंतरचे रिकामे स्टेडीयम
कॅरोलाईन वॉझनियाकी - टॉस साठी रेडी
कॅरोलाईन वॉझनियाकी - सर्वीस करताना
सेरीना विल्यम - - सर्वीस करताना
अपेक्षेप्रमाणे सरीनाने कॅरोलाईनचा दोन सेट मधेच फडशा पाडला.. :)
सामना संपल्यावर चेयर अंपायरशी हात मिळवताना
त्यानंतर रात्री ११.५० च्या सुमारास पुरुष दुहेरीचा अंतीम सामना चालू झाला. सामना चालू होण्याआधी अर्ध्याहून अधीक प्रेक्षक निघून गेले.त्यामुळे आम्हा उरलेल्या प्रेक्षकांना अपग्रेड करण्यात आले. वरून दहाव्या रांगेत बसलेले आम्ही आता कोर्ट्साईट दुसर्या रांगेत बसलो होतो.. :) त्या अंतीम सामन्याची काही क्षणचित्रे.
पुरुष दुहेरी सामन्यामधे मधे मेल्झर-पेट्शनर जोडी गुण मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना.
पेट्शनर सर्वीस करताना
सामाना जिंकल्यावर मेल्झर-पेट्शनर जोडी
विजेता चषक उंचावताना मेल्झर-पेट्शनर जोडी
उपविजेत्या फ्राय्स्टनबर्ग-मॅटोवास्की जोडीसोबत विजेते
प्रतिक्रिया
12 Sep 2011 - 12:39 pm | गणपा
ईनो घेतले आहे. :)
12 Sep 2011 - 12:44 pm | आत्मशून्य
प्रकाटाआ.
12 Sep 2011 - 12:43 pm | आत्मशून्य
त्याचा अॅस्पेक्ट रेशो आवडला. एकदम वाइडस्क्रिन आहे. त्यामूळं फटू मस्तच दीसत आहेत ;) बाकी सविस्तर वृत्तांताच्या जागी जूजबी विवेचन केल्या बद्दल निषेध. म्हणून प्रतीसाद इथच थाम्बवतो.
13 Sep 2011 - 9:39 am | प्रभो
कॅमेरा कॅनन एस एक्स १२० आय एस आहे. :)
12 Sep 2011 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
सला आमचा प्रभो म्हणजे...
बाकी जो लोकावरी विसंबला तो..... त्यात तू गुर्जींवर विसंबला होतास ? अरे रे ! काय ही तुझी दुर्दैवी अवस्था ;)
12 Sep 2011 - 1:29 pm | छोटा डॉन
च्यायला प्रभ्या, लै भारी की रे ...
मस्त फोटो आहेत, साल्या जरा अजुन वर्णन वगैरे केले असते तर तुझी लिव्हरपुल काय घायाळ झाली असती काय ?
धागा आवडला, असेच अजुन येऊदेत :)
- छोटा डॉन
13 Sep 2011 - 9:39 am | प्रभो
डान्या लेका, शनवारी लिव्हरपुलचा दिवस नव्हता...तिकडे स्टोक कडून फुटबॉल टीम हारली तर या मॅचमधे लिव्हरपुल सपोर्टर कॅरोलाईन. :(
12 Sep 2011 - 3:34 pm | शाहिर
अहो शारापोवा ची तरी मॅच बघायची ..
12 Sep 2011 - 4:35 pm | रेवती
फोटू भारी आलेत.
अजून दोन शब्द खर्च केले असतेस तरी चालले असते.
12 Sep 2011 - 4:39 pm | स्पा
अजून दोन शब्द खर्च केले असतेस तरी चालले असते.
अगदी असेच्च म्हणतो :)
12 Sep 2011 - 4:40 pm | गणपा
अगं त्याच शब्दभांडार रित नसत का झाल? ;)
- कंजुस(प्रभ्याचा मित्र) गण्या
12 Sep 2011 - 5:26 pm | चित्रा
मस्त फोटो - समोर बसून सामना बघण्यातली मजा काही वेगळीच.
13 Sep 2011 - 1:27 am | पाषाणभेद
बरोबर आहे. फोटो मस्त आले आहेत.
12 Sep 2011 - 6:24 pm | सहज
लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे! :-)
मस्त रे प्रभो!
12 Sep 2011 - 6:40 pm | छोटा डॉन
>>लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे!
ऑय्य !!!
पाचवी स्पर्धा कुठली हो सहजकाका ? ;)
आम्हाला तर ४ ग्रॅंड स्लॅमच माहित आहेत.
अवांतर : टायपो आहे हे माहित आहे, खुप दिवसांनी सहजकाका सापडल्याने मोह आवरला नाही ;)
- ( चौकस ) छोटा डॉन
12 Sep 2011 - 7:26 pm | मी-सौरभ
ऑलिम्पिक गोल्ड मेडल धरुन ५ होतात ना ?????
12 Sep 2011 - 8:03 pm | प्रभो
>>ऑलिम्पिक गोल्ड मेडल धरुन ५ होतात ना ?????
ते चार वर्षात एकदा ना? वरती सहजमामा दरवर्षी म्हणालेत.. :)
असो, सहजमामा स्वतः एखादी ग्रँड स्लॅम स्पाँसर करणार असावेत. ;)
13 Sep 2011 - 6:23 am | सहज
बरोबर चार ग्रँड स्लॅम. पाचवे ऑलिम्पिक्स मेडल मिळून गोल्डन स्लॅम का कायसेसे म्हणतात ना? वरच्या यादीत दर चार वर्षानी होणारी फूटबॉल स्पर्धा देखील अॅडवा डोन्राव :-)
12 Sep 2011 - 8:04 pm | राजेश घासकडवी
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला जायचं सोडून युएस ओपनला जायचं? आजकाल मिपावर जो नास्तिकपणा बोकाळला आहे त्यात तू देखील सामील झालात? गेलास तो गेलास, पण जाऊन वर चान चान फोटो टाकून सगळ्यांना जळवल्याबद्दल निषेध. आम्हाला टांग मारणारे म्हटल्याबद्दल डब्बल निषेध. त्यात लंबूटांगने एक टांग मारली की ती माझ्या सहापट होते, हे माहीत नाही का तुला?
12 Sep 2011 - 9:57 pm | शिल्पा ब
मस्त. टीव्हीवर मॅच बघण्यापेक्षा तिथे जाउन मॅच बघणे एक अनुभव असतो. (पण याचा आम्हाला अजुन अनुभव नाही.)
13 Sep 2011 - 2:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उतारा म्हणून टीव्हीवर जोकोविच-नादाल सामना लाईव्ह पहाते आहे.
प्रतिसाद संपला. धन्यवाद. :-)
13 Sep 2011 - 9:39 am | प्रभो
धन्यवाद दोस्तहो..
13 Sep 2011 - 9:59 am | बिपिन कार्यकर्ते
आला मोठा!
13 Sep 2011 - 7:39 pm | पैसा
प्रभ्याने चक्क लेख लिहिलाय म्हणून सरसावून वाचायला सुरुवात केली, पण ये रे माझ्या मागल्या!!! ;)
असो, मागच्या वेळेपेक्षा जास्त शब्द आहेत, आणि फोटो तर फारच छान आलेत!
14 Sep 2011 - 12:09 am | Nile
हिरव्या माजाचे लोक साले!