मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'सायलेन्स प्लीज'...थँक यू...

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता. मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले. तिकीट मिळाले ते महिला गटाच्या उपांत्य सामन्यांचे..सामन्यांच्या आदल्या रात्री दोन उपांत्य सामन्यांमधी एक आमच्या स्टेडीयम मधून हालवून दुसरीकडे ठेवला गेला व आमच्या स्टेडीयम मधे पुरुष दुहेरीचा अंतीम सामना. आमचा सामना साधारण ७ वाजता सुरू होणार असल्याने आम्ही साधारण ५-५.१५ च्या सुमारास पोहोचलो तर दिवसा होणार्‍या दोन सामन्यांपैकी जोकोवीच - फेडरर हा एकच सामना नुकताच संपला होता.. ५.३० वाजता आत जाऊन हिरवळीवर अंग टाकून मस्त पैकी मोठ्या पडद्यावर नदाल- मरे हा सामना पहिला... शेवटी आमचा ७ वाजता सुरू व्हायचा सामना १० वाजता सुरू झाला. त्यची क्षणचित्रे. नदाल व मरे यांच्या सामन्या नंतरचे नंतरचे रिकामे स्टेडीयम कॅरोलाईन वॉझनियाकी - टॉस साठी रेडी कॅरोलाईन वॉझनियाकी - सर्वीस करताना सेरीना विल्यम - - सर्वीस करताना अपेक्षेप्रमाणे सरीनाने कॅरोलाईनचा दोन सेट मधेच फडशा पाडला.. :) सामना संपल्यावर चेयर अंपायरशी हात मिळवताना त्यानंतर रात्री ११.५० च्या सुमारास पुरुष दुहेरीचा अंतीम सामना चालू झाला. सामना चालू होण्याआधी अर्ध्याहून अधीक प्रेक्षक निघून गेले.त्यामुळे आम्हा उरलेल्या प्रेक्षकांना अपग्रेड करण्यात आले. वरून दहाव्या रांगेत बसलेले आम्ही आता कोर्ट्साईट दुसर्‍या रांगेत बसलो होतो.. :) त्या अंतीम सामन्याची काही क्षणचित्रे. पुरुष दुहेरी सामन्यामधे मधे मेल्झर-पेट्शनर जोडी गुण मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना. पेट्शनर सर्वीस करताना सामाना जिंकल्यावर मेल्झर-पेट्शनर जोडी विजेता चषक उंचावताना मेल्झर-पेट्शनर जोडी उपविजेत्या फ्राय्स्टनबर्ग-मॅटोवास्की जोडीसोबत विजेते

वाचन 4054 प्रतिक्रिया 0