पुस्तकविश्व: लहानपणीचे मित्र-मैत्रिणी

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
12 Aug 2011 - 10:07 am

पुवि सुरू झाले आहे

सुदैवाने मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. आणि एकत्र कुंटुंबातील त्यावेळी एकमेव लहान सदस्य या नात्याने प्रत्येकाकडून हक्काने कोणती ना कोणती पुस्तके मिळायचीच.टिव्ही मर्यादित असल्याने आमचे अनेक हिरो-मित्र-मैत्रिणी आम्हाला या पुस्तकांनीच दिले. काल शाळेतल्या काही मुलांची कार्टुनमधल्या पात्रंबद्दल चाललेली बडबड ऐकली आणि मलाही माझ्या लहानपणीच्या अश्याच गप्पांची आठवण झाली. त्यावेळी हिरो कार्टुनमधले नसून कॉमिक्स, पुस्तके यांतील होते इतकाच काय तो फरक.

'ठक् ठक्'मधील "दिपू दी ग्रेट" आणि "बन्या" हे बहुदा माझ्या मनोराज्यावर हुकुमत गाजवणारे पहिले वीर. त्यांची नवी गोष्ट आली की कशी एकदा शाळेत जाऊन मी ती वाचल्याचे आणि त्यातील सस्पेन्स फोडण्याचे / मजा सांगण्याचे काम करतो असे होऊन जायचे. त्याच बरोबर "चाचा चौधरी" चे गारूडही काहि कमी नव्हते. चाचा चौधरी, साबु, चाचा चौधरींचे कंप्युटरहून जलद चालणारे डोके वगैरे गोष्टी फारच रोचक होत्या. आपल्याकडेही साबु सारखा एखादा बलाढ्य (आणि मठ्ठ) मित्र असावा असे वाटे (कारण माझे डोके चाचा चौधरींसारखे आहे असा (गैर)समज तेव्हा मनापासून बाळगलेला होता )

या कॉमिक्सच्या दुनियेतून बाहेर डोकावायला लावण्याचे काम 'देनिस'ने केले. एका सुट्टीत मामाकडे "देनिसच्या गोष्टी" दिसले ......................

पूर्ण लेख इथे

पुवि सुरू झाले आहे.. पुस्तकवेड्यांचे तेथे स्वागत आहे

ही एका अर्थी पुवि सुरू झाल्याची जाहिरात करण्याचा उद्देश असल्याने लेख इथे अर्धाच देत आहे. जाहिरातीचा उद्देश पुस्तकविश्व पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहे हे कळविणे आणि ते सुरू केल्याबद्दल अभिनंद्न करणे हा आहे :)
तेव्हा आमचे लाडके पुवि सुरू केल्याबद्दल पुवि टिमचे आभार, अभिनंदन. संपूर्ण लेख पुस्तकविश्व वर येथे वाचता येईलच

अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच

वाङ्मयशुभेच्छाअभिनंदनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

निनाद's picture

12 Aug 2011 - 10:10 am | निनाद

पुस्तकविश्व ची उत्तम वर्दी दिलीस - आवडली! पुस्तक विश्व विषयी एक ओळखपर लेख लिहिल्यास उत्तम मग पुस्तकविश्व विकीपानच तयार करू या!

निनाद's picture

12 Aug 2011 - 10:43 am | निनाद

पुस्तकविश्व विकीपान तयार केले आहे - माहिती हवी! :)

आनंदयात्री's picture

12 Aug 2011 - 9:27 pm | आनंदयात्री

धन्यवाद निनाद, सविस्तर माहिती पाठवतो.

ऋषिकेश's picture

12 Aug 2011 - 9:56 pm | ऋषिकेश

पुविच्या संपादक मित्रांना कळवतो मजकूर टाकायला..
मग जमेल तशी भर घालुच!

धमाल मुलगा's picture

12 Aug 2011 - 12:56 pm | धमाल मुलगा

लहानपणीच्या सगळ्या छान आठवणी जागवल्यास की. :)

अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच

च्छ्या:! कायतरी काय? पुस्तकविश्व हे मिपाचंच भावंड आहे की. आणि जाहिरात कसली म्हणतो रे? ज्यांना पुवि चालू झाल्याची कल्पना नाही त्या सगळ्या मिपाकर मित्रांना एकत्रितपणे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हा, :)

गणेशा's picture

12 Aug 2011 - 1:40 pm | गणेशा

कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो.

The Websense category "Shopping" is filtered.

असा मेसेज मला पहिल्यापासुन पुस्तक्विश्व साईट उघडताना येतो आहे.
सेम टाईम ला मला मिपा ओपन होते.
तरी कृपया पुस्तकविश्व ह्या साईट ला shopping या कॅतेगरीतुन काधुन जी मिपा ला आहे कॅटेगरी तीच करावी..

निखिल देशपांडे's picture

12 Aug 2011 - 2:07 pm | निखिल देशपांडे

वेबसेन्स ला ऑलरेडी एकदा मेल पाठवला आहे.
शक्य असल्यास तुमच्या सिस्टम अ‍ॅडमीनला पुविची राईट कॅटेगिरी सुचवा.

वेबसेन्सच्या त्रासातुन सुटलेला

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2011 - 2:09 pm | कानडाऊ योगेशु

कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट ओपन केल्यावर खालील कारण देवुन साईट ब्लॉक केली आहे असा मेसेज येतो.

The Websense category "Shopping" is filtered.

कंपनी बदल लेका.

आनंदयात्री's picture

12 Aug 2011 - 9:30 pm | आनंदयात्री

धन्यवाद रे ऋषिकेश :)

>>अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच

हा प्रश्नच उद्भवत नाही, मिसळपाव आणि पुस्तकविश्व भावंडं आहेत हे जगजाहिर आहे, पुविची आरएसएस फीड इथे आधी होती (ती पुन्हा येईल), त्यामुळे तु हे वाक्य लेखातुन काढुन टाकावे असे वाटते. धन्यवाद.

ऋषीकेष, आपला संपूर्ण लेख पुस्तकविश्ववर जाऊन वाचला.
लेख खूप आवडला. अमर चित्रकथा, अमृत , चांदोबा (एकाक्ष, चतुराक्ष), किशोर आठवले. लहानपणीच्या पुस्तकांना एक खूप छान सुगंध असे. का आपल्या संवेदना त्या वयात अधिक तीक्ष्ण असतात नकळे. पण अगदी तो सुगंध हा लेख घेऊन आला.
जाईची नवलकहाणी (अ‍ॅलिस इन वंडरलँड) माझीदेखील आवडती होती/आहे. त्यातील तत्वज्ञान माझ्या लक्षात आहे - दिसायला , हुद्द्याने फार मोठ्या भयंकर लोकांचा बाऊ करायचा नसतो. हे शेवटी खेळातले पत्ते असतात. आपण काय ते खरे आपले मित्र.
दिवाळीत सकाळी फटाके मग टेकडीवर फिरून येणे,किल्ल्याची डागडुजी मग दुपारी कॅरम/पत्ते आणि थोडा वेळ चिवडा-चकलीचे बकाणे भरत दिवाळीअंक वाचणे. परत संध्याकाळी फटाके आणि रात्री थंडीत शेकोटी त्यातही टिकल्या टाक, लवंगी टाक, भूतांच्या गोष्टी सांग..... आहाहा! स्वर्ग याहून काय वेगळा असतो?
आपण खरच या लेखाने बालपणाची सफर घडवून आणलीत.

पैसा's picture

12 Aug 2011 - 11:57 pm | पैसा

ऋषिकेश, धन्यवाद रे! पुस्तकविश्व चालू नसताना काही चुकल्यासारखं वाटत होतं.

विकास's picture

13 Aug 2011 - 12:18 am | विकास

लेख आवडला! वर येथे (आणि तेथे) काहींनी म्हणल्याप्रमाणे त्याच बरोबर, चांदोबा, किशोर काही अंशी कुमार ची आठवण झाली.

ना.धो. ताम्हणकरांचा "गोट्या" देखील आठवला....

मुली मुळे काही हॅरी पॉटर व्यतिरीक्त अमेरीकन कॅरॅक्टर्स समजत गेल्यात त्यातील आत्ता पटकन आठवणार्‍या मजेशीर व्यक्तीरेखा म्हणजे: ज्युनी बी जोन्स, ज्युडी मुडी आणि अर्थातच चित्रपटामुळे नावारुपाला आलेला विंपी कीड...

पुवि चालू झाल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद!

वास्तवीक पुवि संपादकांनी अथवा मालकांनी सगळ्या आयडींना एक इमेल पाठवायला देखील हरकत नाही.

आनंदयात्री's picture

13 Aug 2011 - 1:07 am | आनंदयात्री

आजवर पुविवर लेखन केलेल्या सदस्यांना निरोप टाकला आहे, सगळ्या सदस्यांना एकदम मेल पाठवण्यास संकोच केला.

अप्पा जोगळेकर's picture

13 Aug 2011 - 12:40 pm | अप्पा जोगळेकर

लेख आवडला. आमचा सगळ्यात आवडता हिरो म्हणजे सिंदाबाद

सुमो's picture

13 Aug 2011 - 1:16 pm | सुमो

लहानपणीच्या किशोर, चांदोबा,अमर चित्रकथा,यांच्या बरोबरीने
बिरबल नावाचं मासिक अतिशय आवडीनं वाचत असे.
इन्द्रजाल कॉमिक्स सुद्धा अतिशय आवडीने वाचत होतो.

या सगळ्यांची आठवण करुन दिलीत आपण.