.

इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)

Primary tabs

मन's picture
मन in काथ्याकूट
4 Apr 2011 - 2:00 am
गाभा: 

नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः-
भाग ३ http://www.misalpav.com/node/17365
भाग २ http://www.misalpav.com/node/17324
भाग् १ http://www.misalpav.com/node/17293 .

सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन.

आज दोन लोक कथा, दोन गोष्टी बघुयात.
७. अच्छा. सृष्टी निर्मितीबद्दल असं मानतात होय ह्या श्रद्धा. पण ह्या सृष्टित माणुस कुठुन आला?
ख्रिश्चन्-ज्यू श्रद्धा आहे ती अशी:-
देवाने मनुष्य (आदम) व स्त्री (ईव्ह) ला निर्माण केले त्यानंतर त्यांच्या विहारासाठी एडेनमधे बाग निर्मिली आणि त्यात तर्‍हेतर्‍हेचे वृक्ष वगैरे लावले आणि त्याच बागेच्या मधोमध बर्‍यावाईटाचे ज्ञान देणारा वृक्ष लावला तसेच तेथे विविध प्रकारचे प्राणी पक्षीपण ठेवले, असे बायबल समजते. बायबलनुसार देवाने मनुष्य व स्त्रीचे अबोधपण जपण्यासाठी त्यांना बर्‍यावाईटाचे ज्ञान देणार्‍या वॄक्षाचे फळ खाण्यास मज्जाव केला.

परंतु, मनुष्याने व स्त्रीने सर्पाच्या फुस लावण्यावरुन आपल्या आज्ञेचे उल्लंघन करुन बरे-वाईट कळणारे फळ खाल्ले. हे समजल्यावर देव क्रोधित झाला आणि त्याने शाप दिले. सर्पास दिलेला श्याप असा: 'तु पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तुझ्या आणि स्त्रीच्या संततीत कायम वैर राहील. तिचे संतान तुझे मस्तक ठेचेल आणि तु त्याची टाच जखमी करशील.' स्त्रीचा शाप असा, 'प्रसुतीकाळात तुला क्लेश आणि दु:ख होईल. वेदना सहन करुन तु मुलांना जन्म देशील पण त्यांचा ओढा तुझ्या पतीकडे राहील. तुझा पती तुझ्यावर सत्ता गाजवेल.' आदामला शाप दिला की, 'आयुष्यभर कष्टाने भूमीची मशागत तुला करावी लागेल पण तिथे काटे व कुसळेच उगवतील. तु रानटी वनस्पतीच खाशील. मातीला जाऊन मिळेपर्यंत तुला घाम गाळावा लागेल.' त्यानंतर देवाने आदाम आणि ईव्हला चर्मवस्त्रे घातली आणि त्यांना एडन बागेतुन हाकलले.

इथुन पुढे बायबलच्या जुन्या करारातले एकसंध समाजनिर्मितीचे प्रयत्न सुरु होतात आणि त्यासाठी आदामची वंशावळ येते. (रक्ताच्या नात्याने बांधले जाणे हे सर्वात घट्ट बंधन आहे.) विस्तारभयाचा धोका पत्करुन दिलीच तर
ती अशी:

आदाम व हव्वाची मुले काईन , हाबेल आणि शेथ. काईलचा पुत्र हनोख. शेथचा मुलगा अनोश. हनोखचा मुलगा इराद. इरादचा मुलगा महुयाएल. महुलाएलचा मुलगा लामेखा. लामेखाची मुले याबाल, युबेल, तुबल काईन. अनोशचा मुलगा केनान. केनानचा मुलगा महललेल. महललेलचा मुलगा यारेद. यारेदचा मुलगा हनोख. हनोदचा मुलगा मथुशलह. मथुशलह्चा मुलगा लामेख तर लामेखचा मुलगा नोहा. नोहाची मुले शेम, हाम आणि याफेथ. नोहाला व त्याच्या मुलांना देवानेपुष्कळ मुलांना जन्म द्या व पृथ्वीवर लोकसंख्या वाढवा असा आशीर्वाद दिला होता. हा अभयाचा करारच होता.

(कॅथॉलिक)ख्रिश्चनांनुसार मनुष्य असा जन्माला आला तेच मुळी पापातुन. तो शापग्रस्त आहे. त्याला दैवी करुणेची गरज आहे.तो त्याशिवाय काहिसा असहाय्य आहे. एखादा प्रेषितच आता तुम्हाला त्या करुणेस पात्र बनवु शकतो. ह्यातुन सुटण्यासाठी आणि ईश्वराची मर्जी संपादन त्याने सतत/नियमित ईश्वराचा धावा करावा.

इस्लाम मध्येही कथा बरिचशी अशी आहे. पण मुख्य फरक हा की आदम्/अ‍ॅडम हा प्रथम प्रेषित होता असं ते मानतात. तो निर्माण झाला तोच मुळी ईश्वराचा जयघोष करत. जगात एकच एक्मेव ईश्वर आहे असं म्हणत. इस्लामनुसार आदम्-हव्वा ह्यांनी माफी मागितल्यावर ईश्वरानं त्यांना क्षमा केलं. आपण निर्माण केलेल्या पृथ्वीवर आपला प्रतिनिधी म्हणुन पाठवलं, शाप म्हणुन नाही. मनुष्य जात काही सर्वस्वी पापी वगैरे नाही. कट्टर ज्यू/मुस्लिम भाविक आजही यार्देनच्या बागेचा रस्ता दाखवतात. स्वर्गातून तैग्रिस आणि युफ्र्रेटिस उगम पावल्या एकाच ठिकाणी आणि त्यांच्या उगमापाशीच हे ईडन गार्डन आहे असं मानतात. आमची गंगा/भागिरथी नाही का स्वर्गातुन धो धो करत उतरली आणि शिवाच्या जटांत जाउन विसावली, तसच काहिसं.

८. बरं मग पुढं काय झालं ह्या नोहाचं?
तर अशा ह्या आदमाच्या वंशातल्या नोहाच्या काळात एक समाज बनला होता. अनेक लोक वसले होते. अनेक जमाती बनल्या होत्या. विविध संस्कृती नांदत होत्या.पण जसा जसा काळ जाउ लागला तसं तसं आपल्या गेलेल्या पूर्वजांची लोकांना आठ्वण येइ. काहीजण ह्या आठवणीतूनच त्यांचे पुतळे /मूर्तीउभारु लागले. उभारणं एकवेळ ठीक होतं. पण महत्पाप म्हणजे त्यांनी मूळ उद्देशाचा विसर पडुन ह्या मूर्तींचीच पूजा-अर्चा सुरु केली. ह्यामुळं सर्वशक्तिमान पण ईर्षापूर्ण असा परमेश्वर क्रुद्ध झाला. समाजात इतरही अनेक अनाचारांनी टोक गाठल्याचं बायबल म्हणतं.(अनाचारः- मूर्तीपूजा, निषिद्ध/महापापी संबंध, ईश्वरास नाकारणे,अस्थिर समाज,विव्ध गुन्ह्यांना आलेला ऊत. ) ईश्वरानं मग हे सगळच एकदम संपवायचं ठरवलं. पण त्याला आढळला एक सत्शिल, ईश्वरभक्त माणुस्-नोहा. सगळ्यांसोबत उगाच ह्याला का शासन द्यायचं ? असा विचार आल्यानं त्यानं नोहाला स्वतःचा साक्षात्कार घडवला आणि सांगितलः- "सर्व दुराचार संपवण्यासाठी मी एक महाप्रलय आणतोय- जलप्रलय. सगळि पृथ्वी जलमय होइल. पापे धुतली जातिल्.पापी बुडतिल्.विनाशोत्तर पुनृप्रारंभाची शेवटची आशा म्हणुन तु आतापासुनच एक नौका बांधायला लाग. सहा दिवसात प्रलय येइल. त्यावेळी नौकेवर प्रत्येक प्रकारचं एक एक प्राण्याचं जोडपं घेउन तु नौकेवर जा. इतर काही सत्शिल व्यक्ती सापडल्यास त्यांनाही सोबत घे आणि पूर ओसरल्यावर सर्वांना सुखरुप घेउन खाली ये."
नोहानं आज्ञेचं पालन केलं. नौका बांधली.(ही आजच्या जॉर्डन देशाच्या राजधानी अम्मन पासुन केवळ १२० किमी जवळ असणार्‍या एका जंगलात जाउन बांधली असं मानतात.) प्राणी ,पक्षी, कीटकांशी संवाद साधुन त्यांना आपल्यासोबत घेतलं. पण हाय रे दैवा. जे ह्या पशु पक्ष्यांना समजलं ते इतर माणसांना नाही. त्यांनी नौकेचं निमंत्रण द्यायला आलेल्या नोहाची थट्टा केली. कुणी त्याला हातचलाखी करणारा क्षुल्लक जादुगार म्हटलं. कुणी त्याला नुसत्या भविष्याबद्दल गप्पा ठोकणारा कर्मशून्य भविष्यवेत्ता म्हटलं तर कुणी थापाड्या! पण फक्त सहाच दिवस.
सहा दिवसात मुसळधार पाउस सुरु झाला. नोहा आपल्या नौकेसह सुरक्षित होता. इकडं धरणी हादरली. आसमंत फाटले.वीज कडाडली. सतत सर्वत्र न भूतो न भविष्यति असा पाउस सुर झाला.चाळिसेक दिवस आणि चाळिसेक रात्र पाउस थांबलाच नाही. नौकेबाहेर कुणी प्रमुख पशु प़क्षी मानव वाचलेच नाहित. खुद्द नोहाचा एक पुत्र बुडाला. त्याची अश्रद्ध बायको बुडाली. इकडे जलपातळी वाढत वाढत जाउन तत्कालिन ज्ञात सर्वात उंच पर्वताच्या माथ्यापर्यंत पोचली. (हा पर्वत म्हणजे विद्यमान तुर्कस्थानातील माउंट आरात आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.)पाउस थांबल्यावर नोहानं पाणी किती उतरलय हे बघायला एक पक्षी सोडला. तो आलाच नाहे. मग दुसरा सोडला. तो काही झाडाची पाने घेउन आला. म्हणजे, झाडाच्य शेंड्यापर्यंत तरी पाणी उतरलय असा अंदाज नोहाला आला. त्यानी हळुहळु सर्व पशु पक्षी मानव व कीटकांना बाहेर काढलं.
पुनश्च एका नव्या जगाची सुरुवात होणार होती. पुन्हा ईश्वरी साक्षात्कार होउन हे सांगण्यात आलं की असा प्रलय पुनश्च होणार नाही. अत्यल्प मानव शिल्लक होते. प्रलय आला तेव्हा नोहाचं वय होतं ६००!
त्याचं आयुष्य होतं ९०० वर्षांचं. त्याची मुलं तीन शेम ,हाम आणि जपेथ (Shem, Ham, and Japheth. ) जपेथ प्रगल्भ,प्रगत,नेक आणि बलाढ्य होता. शेम सामान्य आणि हाम पापी व नीच निघाला. हामच्या वंशजांना पुढे शाप मिळाला.
(ह्याच लोक कथेचा आधार घेउन युरोपिअन वर्णवाद्यांनी मध्ययुगात मांडाणी केली ती अशी:- जपेथ ची मुले युरोपिअन्/गौरवर्णीय, शेम म्हणजे आशियायी जनता आणि हामची शापित मुले म्हणजे आफ्रिकन्स. त्यांचा जन्म दास्यासाठिच झालाय आणि त्यांना दास/गुलाम करुन आणि पशुतर जगवुन आपण एक दैवी कार्यच करतोय. )
तर ही कथा होती ख्रिश्चन आणि ज्यूच्या मतानुसार.
(ज्यू म्हणतात आता काही पुन्हा तसा प्रलय येत नाही. ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये मात्र DAy Of Judgement किंवा कयामत का दिन ही कल्पना आहे. अगदि तसाच प्रलय नाही, पण महा विनाश.)
इस्लामी कथे मध्ये नोहाला नुसतं सदाचरणी म्हटलेलं नाही, तर एक थोर प्रेषित म्हटलय. ईश्वराला शरण जाणारा आणि ईश्वरी एकत्वावर डळमळित काळातही ठाम श्रद्धा ठेवणारा एक थोराहून थोर , सहृदयी म्हटलय. त्याची इतकी स्तुती आधीच्या दोन धर्मात दिसत नाही. शिवाय इस्लामी कथेत नोहाच्या नेमक्या मुलांची संख्या सांगितलेली नाही. ती कदाचित जास्त किंवा कमी असेल असंही मानलय. आणि हो, आजचे शिया मानतात त्याप्रमाणे नोहा मुख्यतः राहिला तो इराकच्या आसपासच्या भागात्.,मेसापोटेमियामध्ये. पहिले शिया इमाम अलि ह्यांना इराक मध्ये जिथं दफन करण्यात आलं अगदि त्याच्या बाजुला नोहाचही दफन झालं असं ते मानतात.

एक सत्शिल मनुष्य.जलप्रलय् होतो. होडी घेउन मानव जातो. पाणी उतरल्यावर पुनश्च प्रारंभ करतो. अरेच्चा. ह्या कथासूत्रात फक्त एक मासा , नौकेचं रक्षण कराणारा, भलामोठा मासा-मीन्-मत्स्य ,एक दैवी अवतार टाकला तर कथा जशीच्या तशी ऐकलिये की मी आजीकडुन, विष्णुचा प्रथम अवतार मत्स्य आणि नौकेवाला माणुस मनु म्हणुन!

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Apr 2011 - 8:43 am | प्रचेतस

हाही भाग मस्तच. वाचनखूण साठवली आहेच हे सांगायला नकोच.

विष्णुचा प्रथम अवतार मत्स्य आणि नौकेवाला माणुस मनु म्हणुन!

अगदी अगदी. नोहा वाचतांना हेच सुरुवातीला डोक्यात आले होते. शिवाय मायन, इंकन, प्राचीन ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीतही जगबुडीबद्दलच्या अशाच स्वरूपाच्या काही कथा असल्याने कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

गणपा's picture

4 Apr 2011 - 4:36 pm | गणपा

मनोबा वाचतोय रे......

मृत्युन्जय's picture

4 Apr 2011 - 5:23 pm | मृत्युन्जय

आदाम व हव्वाची मुले काईन , हाबेल आणि शेथ. काईलचा पुत्र हनोख. शेथचा मुलगा अनोश. हनोखचा मुलगा इराद.

सृष्टीच्या सुरुवातीला जर फक्त अ‍ॅडम आणि इव्हच होते तर त्यांच्या मुलांच्या बायका कोण होत्या?

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 8:46 pm | धमाल मुलगा

व्हेर्री प्र्याक्टिकल प्रश्न आहे हा.
मलाही हा प्रतिसाद वाचल्य्यावर एकदम भंजाळायला झालं.

ह्या विषयीची काही माहिती मिळू शकेल काय? अन्यथा, अशा गोष्टीला अर्थच राहणार नाही असं माझं मत.

त्या काळात नातेवाइकांपासून संततीस मुभा होती म्हणे. मग पुढे कधीतरी आई आणि बहिण यांच्याशी संततीसाठी संबंध पुरुषाला वर्ज्य झाला. (पिता आणि भ्राता हे स्त्रीसाठी वर्ज्य.) बायबलमध्ये (किंवा त्या काळातल्या बहुतेक वंशावळींमध्ये) स्त्री अपत्यांचे परिगणन काळजीपूर्वक केलेले नाही. त्यामुळे आदमाच्या मुलांना कोणापासून संतती झाली हे सांगता येत नाही. (पण झाली ती जवळच्या नात्यातल्या कुठल्याशा स्त्रीकडूनच.)

(गंभीरपणे - असेच स्पष्टीकरण देतात. ते स्पष्टीकरण पटावे किंवा पटू नये याबद्दल माझा काही आग्रह नाही. :-) हे माझे श्रद्धास्थान नव्हे!)

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 9:48 pm | धमाल मुलगा

ह्या स्प्ष्टीकरणाला विरोध दर्शवण्याचं काहीच कारण मलातरी दिसत नाही. प्रॅक्टिकलच वाटते आहे.
पण, प्रश्न असा पडला, की जर हे असं आहे (म्हणजे होतं), तर 'फॉर्बिडन' किंवा 'टाबू' चा पगडा असलेल्या पुर्वीच्या लोकांनी धर्मग्रंथांमध्ये अशा कथेला स्थान का दिलं असावं (किंवा कसं काय दिलं असावं)?
कारण हा/असाच प्रश्न तेव्हाही कुणालातरी पडला असेलच.

हाबेल, शेथ ह्यांनी आपापल्या जुळ्या भावंडांशी विवाह केला व वंशावळ वाढवली. मात्र ईश्वराला मान्य असलेला असा हा पहिला आणि शेवटचा संबंध होता(त्या पिढीपुरतं ते मान्य होतं.). त्यानंतर मात्र असं काही करण्यास ईश्वरानं विविध प्रेषितांना सक्त मनाई करण्यास सांगितलं.
काइन हा सर्वात धाकटा होता, चक्क १०० एक वर्षे लहान होता. त्याच्याच वयाच्या आसपास त्याची पुतणी होती,हाबेल की शेथची ज्येष्ठ मुलगी. तिच्याशी विवाह करुन त्यानं वंशावळ वाढवली.
जेव्हा स्वतः आदमला अजुन एक मुलगी झाली तेव्हा तिच्याशी विवाह कुणी करावा ह्यावरुन दोन ज्येष्ठ भावात पराकोटीचं भांडण होउन एका भावाची हत्या झाली.
आणि हो एका ठिकाणी तर चक्क "Abel(हाबेल) then gradually replaced Adam as expected by Eve" असं काहिसं धक्कादायक गोष्ट सूचित करणारं वाक्य दिसलं.

पुढील काळात नोहानंतरच्या काही पिढ्यात सर्व प्रेषितांपैकी जवळजवळ सर्वाधिक आदरणीय अब्राहम होउन गेला(त्या गोष्टी आता येतीलच पुढल्या भागात.) त्याने आपल्या सावत्र बहिणीशी -"साराय"शी विवाह केल्याचं मानलं जातं.
त्याच्या काळात केवळ सख्खे पालक आणि सख्खे भावंड हेच काय ते निषिद्ध होते. त्यानंतर चारेकशे वर्षात मोझेस्/मोशे होउन गेला. त्याच्या काळात मात्र हळुहळु आज प्रचलित असलेले कायदेकानु आणि नैतिकतेच्या कल्पना आल्या.

एकाही मुलिच्या नावाची नोंद नाही हे खरच. पण मुळात ह्या श्रद्धा आणि दंतकथा तिथल्या पंथापंथानुसार बदलतात.
ख्रिश्चनांच्या थोड्या वेगळ्या, ज्यूंच्याही वेगळ्या आणि इस्लाम कधी कधी दोघांपेक्षा अधिक विस्तृत,सविस्तर माहिती देते, पण तीही पुन्ह जराशी वेगळी. खुद्द ख्रिश्चन मान्यता भिन्न भिन्न आहेत. ढोबळ मानाने आपण भारतीय ज्यांना "ख्रिश्चन" समजतो ते प्रचलित मत आहे "कॅथॉलिक चर्च"चं. ह्यावर युरोपिअन विचारसरणीचा पगडा आहे. पण खरं तर ह्याची बांधणी पुष्कळच उशीरा झाली्. ह्यांच्या पेक्षा अधिक जुनी पण कमी प्रसार झालेली विचारसरणी म्हणजे सिरियन चर्च, इथिओपिअन चर्च. सर्वात नवीन प्रोटेस्टंट, हे ही युरोपिअनच. ज्यूंमध्येही अनेक पाठभेद आहेत, भिन्न भिन्न पुस्तकांना प्रमाणभूत मानण्यात आलय (पण त्यांची आपसातली मत भिन्नता कमी वाटते.)

इस्लाममध्ये मात्र मूळ कुर्-आन ची जी प्रत बनली ती तशीच सुरु आहे. त्यातील मतात, घटनांत कुणीही बदल केलेले नाहित. निदान कथांमध्ये आणि घटनांमध्ये विविध मुस्लिम पंथात सर्वाधिक एकवाक्यता आहे. (हादिस मधील काही थोड्याशा गोष्टी/कथा ज्या थेट मुहम्मद पैगंबराचं भाष्य मानले जातात्,त्या सुन्नी आणि शिया ह्यांच्यात वेगळ्या आहेत, पण इस्लामपूर्व काळाबद्द्ल एकमत आहे.)

अवांतरः- भारतीयांनी धक्का वाटुन घ्यायच काही कारण नाही. बौद्ध रामायणानुसार सीता ही रामाची बहिण होती. अजुन एका रामायणाच्या व्हेरिएशननुसार ती रावणाची मुलगी होती. हे झाले इतिहासातले दाखले. अर्जुन्-उर्वशी हा महाभारतातला किस्सा तर आपल्याला माहित असेलच.
आता जरा बहरतीय इतिहासात पाहु:- गौतम बुद्ध जन्मला शाक्य कुलात. शाक्य कुलाची विविध गणराज्ये आजच्या नेपाळमध्ये व नेपाळला लागुन असलेल्या युपी बिहारच्या भागात होती. शिवोपासक शाक्य कुलांमध्ये वंशशुद्धी टिकवण्यासाठी उलट घरातच विवाह करण्याची काहिशी सक्ती होती!!!

--मनोबा.

विलासराव's picture

4 Apr 2011 - 7:53 pm | विलासराव

तुम्ही लिहा आम्ही आहोतच वाचायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2011 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोबा, वाचतोय रे........! महाप्रलय झाला आणि पुन्हा एक नवी सृष्टी निर्माण झाली अशा विषयाच्या लोककथा विविध धर्म कथांमधे एकमेकात गुंतून गेलेल्या दिसतात. आपण त्या त्या धर्माच्या लोककथांची चांगली ओळख करुन देत आहात. लगे रहो.

-दिलीप बिरुटे

चावटमेला's picture

5 Apr 2011 - 10:54 am | चावटमेला

मागील भागांप्रमाणेच छान माहिती, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

तिमा's picture

5 Apr 2011 - 6:40 pm | तिमा

असा महाप्रलय पुनश्च होणार नाही असे आश्वासन दिले तर मग २०१२ ची धास्तीच नको.

असो , इथे प्रेशित आदम- अलेह- सलामची वंशावळ देत आहे
अन प्रेशित नुह-अलेह सलाम (नोहा) कधी आले ते ही देत आहे
You will see the words bin and bint used, bin means "son of" and bint means "daughter of" Example:
Farras bin Khalid means "Farras the son of Khalid" And Fuzia bint Salem means "Fuzia the daughter of Salem".
1 Prophet ADAM Alaihi Salam (Prophet #1, lived for 910 years) + Hawwa (Eve)
...2 Habil* (Abel) bin Adam (Alaihi Salam)
...2 Qabil* (Cain) bin Adam (Alaihi Salam)
......3 Akhnukh (Enoch) bin Qabil
.........4 Irad bin Akhnukh
............5 Methujael bin Irad
...............6 Lamech bin Methujael
..................7 Zillah bin Lamech
.....................8 Tubal-Cain bin Zillah
.....................8 Naamah bin Zillah
..................7 Adah bin Lamech
.....................8 Jabel bin Adah
.....................8 Jubal bin Adah
...2 Labuda Bint Adam **twin sister of Habil (Abel) ...2 Eklema bint Adam **twin sister of Qabil (Cain) ...2 Shiith (seth) bin Adam (Alaihi Salam)
......3 Anush bin Shiith
.........4 Qinan bin Anush
............5 Mahlabil bin Qainan
...............6 Yard bin Mahlabil
..................7 AKHNUKH (Enoch or Idris, Alaihi Salam) bin Yard (Prophet #2)
.....................8 Mutwashlak bin Akhnukh (Alaihi Salam)
........................9 Lamik bin Mutwashlak
....................10 NOOH (Noah, Alaihi Salam) bin Lamik (Prophet #3) 146 years after the death of Adam, Alaihi Salam, 1,056 years after the creation of Adam, Alaihi Salam
11 Ham bin Nooh (Alaihi Salam)
...12 Cush bin Ham
......13 Raamah bin Cush
.........14 Sheba bint Raamah
.........14 Dedan bin Raamah
......13 Sabterah bin Cush
......13 Nimrod bin Cush
......13 Sheba bint Cush
......13 Navilah bin Cush
......13 Sabiah bin Cush
...12 Mizraim bin Ham
......13 Ludim bin Mizraim
......13 Anamim bin Mizraim
......13 Lebahu bin Mizraim
......13 Napatuhim bin Mizraim
......13 Pathrusim bin Mizraim
......13 Casluhim bin Mizraim
.........14 Philistim bin Casluhim
......13 Caphthorim bin Mizraim
...12 Phut bin Ham
...12 Canaan bin Ham
......13 Sidon bin Canaan
......13 Heth bin Canaan
......13 Jebusite bin Canaan
......13 Amorite bin Canaan
......13 Girgasite bin Canaan
11 Yam bin Nooh (Alaihi Salam)
11 Japheth bin Nooh (Alaihi Salam)
...12 Javan bin Japheth
......13 Elishah bin Javan
......13 Tarshish bin Javan
......13 Kittim bin Javan
......13 Dodanim bin Javan
...12 Tubal bin Japheth
...12 Mescheh bin Japheth
...12 Tiras bin Japheth
...12 Gomer bin Japheth
......13 Asheewaz bin Gomer
......13 Ridhath bin Gomer
......13 Togarham bin Gomer
......13 Bark bin Gomer
...12 Magog bin Japheth
...12 Madai bin Japheth
...12 Bulgas bin Japheth
...12 'Algan bin Japheth
......13 Yunan bin 'Algan
.........14 Rumi bin Yunan
11 Sham bin Nooh (Alaihi Salam)
...12 Eram bin Sham
...12 'Iram bin Sham
......13 'Ars bin 'Iram
.........14 'Aad bin 'Ars
............15 Jaloud bin 'Aad
...............16 Raya' bin Jaloud
..................17 'Abdullah bin Raya
................18 HUD bin 'Abdullah (Prophet #4)
......13 Jasser bin 'Iram
.........14 Thamud bin 'Ars
............15 Hader bin Thamud
...............16 'Ubaid bin Hader
..................17 Masih bin 'Ubaid
................18 Auf bin Masih
...................19 Abir bin Auf
...............20 SALIH bin Abir (Prophet #5)
...12 Arfakshad bin Sham
......13 Shalikh bin Arfakshad
.........14 Hud bin Shalikh (lived in Al-Ahqaf between Yemen and Oman in a land called Ashar, stretching out into the sea in the valley of Mughith)
.........14 Abir bin Shalikh
............15 Joktan bin Abir
...............16 Abimael bin Joktan
...............16 Sheba bint Joktan
...............16 Ophir bin Joktan
...............16 Havilah bin Joktan
...............16 Jobab bin Joktan
...............16 Hadoran bin Joktan
...............16 Uzal bin Joktan
...............16 Dirlah bin Joktan
...............16 Obal (Ebal) bin Joktan
...............16 Al-Modad bin Joktan
...............16 Sheleph bin Joktan
...............16 Hajaramaveta bin Joktan
...............16 Jerah bin Joktan
............15 Falikh bin Abir
...............16 Multan bin Falikh
..................17 KHILR bin Multan (the one who was more knowledgeable than Musa (Moses))
...............16 Ra'u bin Falikh
..................17 Saru' bin Ra'u
................18 Nahur bin Saru'
...................19 Tarih (Azar) bin Nahur
...................19 Hazo bin Nahur
...............20 Hazo bin Haroun
...............20 Pildash bin Haroun
...............20 Jidlaph bin Haroun
...............20 Bethuel bin Haroun
...............20 Huz bin Haroun
...............20 Buz bin Haroun
...............20 Kemuel bin Haroun
..................21 Aram bin Kemuel
...............20 Chesel bin Haroun
...................19 *2nd Spouse of Haroun bin Nahur
...............20 Millah bin Haroun
...............20 Islah bin Haroun
...................19 *3rd Spouse of Haroun bin Nahur
...............20 LUT (Lot, Alaihi Salam)(Prophet #7) bin Haroun
...............20 Hazo bin Haroun
..................21 Daughter #1
..................21 Daughter #2
...............20 *2nd Spouse of Lut (Alaihi Salam) bin Haroun
..................21 Moab bin Lut
....................22 MOABITES
...............20 *3rd Spouse of Lut (Alaihi Salam) bin Haroun
..................21 Bin Ammi bin Lut
....................22 AMMONITES
...............20 Nahor bin Tarih + Reumah (Concubine)
..................21 Thebah bin Nahor
..................21 Gaham bin Nahor
..................21 Thamash bin Nahor
..................21 Maalah bin Nahor
..................21 Bethuel bin Nahor
....................22 Laban bin Bethuel
......................23 Leah bint Laban + Ya'coub (Jacob) bin Ishak (Isaac)
......................23 Rachel bint Laban + Ya'coub (Jacob) bin Ishak (Isaac)
....................22 Rebekah bint Bethuel + Ishak (Isaac) bin Ibrahim
...............20 IBRAHIM (Abraham, Alaihi Salam) bin Tarih (Azar) (Prophet #6) lived for 175 years + Sarah + Hazra

प्रचेतस's picture

12 Aug 2012 - 5:22 pm | प्रचेतस

पुढचा भाग कधी टाकताय मनोबा?

मन१'s picture

12 Aug 2012 - 6:15 pm | मन१

थँक्स रे. पण आता इतक्यात , नजिकच्या भविष्यात वेळेअभावी काही जमेलसे वाटत नाही. :(

नया है वह's picture

18 Mar 2016 - 12:16 pm | नया है वह

?

वगिश's picture

18 Mar 2016 - 1:40 pm | वगिश

पुभाप्र

पुढचा भाग कधी टाकताय मनोबा?