इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ३)

मन's picture
मन in काथ्याकूट
22 Mar 2011 - 2:28 pm
गाभा: 

नमस्कार. हा भाग तिसरा. तिसऱ्यावरून आठवलं इब्राहिमी धर्मही महत्त्वाचे तीन आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे प्रेषित ती
यहुदी/ज्यू (प्रेषित मोझेस), ख्रिश्चन ( प्रकटनकर्ता जीझस ) आणि इस्लाम ( अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर).
येशू क्रुसावर मारल्यावरही पुनर्जीवित ते तीन दिवसांनंतरच.

सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन. मागील काही प्रश्न पुन्हा लिहितोय.

४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
ह्यात अजून थोडं लिहायला हवं होतं. बायबलचे भाग दोनः- ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट( जुना व नवा करार (देवाने मानव प्रतिनिधींसोबत केलेला)). ज्यू ओल्ड बायबलला प्रमाण मानत असले तरी त्यातील लिखाणाचे ३ विभाग त्यांनी केलेतः-
तौरात (दैवी सूचना व आदेश), नेविम (प्रेषित व भविष्यवेत्ते/मार्गदर्शक/sooth sayers) केतुविम (संकीर्ण लिखाण, घटना कथा ह्यांचा संग्रह)मात्र ख्रिश्चन हे वेगळे विभाग न मानता एकाच "जुन्या करार" ह्या विभागात त्याचा उल्लेख करतात.

५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
हा प्रश्न असा मांडुयातः- आपल्या/सृष्टीच्या निर्मितीबद्दल ह्यांच्या काय कल्पना आहेत?
तर कल्पना अशी आहे की पूर्वी/सुरुवातीस सृष्टीनिर्माण होण्यापूर्वी दिवसही नव्हता. रात्रही नव्हती. प्रकाशही नव्हता. अंधारही नव्हता. आकाशही नव्हतं! जल, भूमी हे ही बनायचे होते. अगदी काहीच म्हणजे काहीच नव्हते. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता.
तर सृष्टीनिर्मितीबद्दल ही एक(तुरात मधील, जेनेसिस ह्या भागातील) कथा :-

प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा वायुरुप पृथ्वी अंधाराने वेढलेली होती आणि देवाचा आत्मा जलाशयांवर पाखर घालत होता. देवाने शब्द उच्चारले, `प्रकाश होवो' आणि प्रकाश अस्तित्वात आला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने अंधारापासुन प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिनसमय आणि अंधाराला रात्रसमय म्हणले. हे सर्व पहिल्या दिवशी घडले.

नंतर देवाने शब्द उच्चारले, 'जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि अंतराळामुळे वरचे वायुरुप जलाशय आणि खालचे जलाशय अशी विभागणी होवो.' त्यानुसार घडवुन आणल्यावर देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले आणि हे सर्व दुसर्‍या दिवशी घडले.

पुन्हा देवाने शब्द उच्चारले, `अंतराळाखालील जले एकत्र येऊन त्यांचे महासागर निर्माण होवोत आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो' तसेच घडल्यावर देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि जलाशयांस सागर अशी नावे दिली. मग देवाने शब्द उच्चारले, 'गवत, बीज देणार्‍या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमी उपजावो' आणि तसेच घडुन आले. हे सर्व तिसर्‍या दिवशी घडले.

त्यानंतर देवाने शब्द उच्चारले, 'दिवस आणि रात्र भिन्न करण्यास आकाशात ज्योती होवोत व त्या चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्षे दाखवणार्‍या होवोत' आणी तसे घडुन आहे. देवाने सुर्य व चंद्र या मोठ्या ज्योती आणि तारेही प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी निर्माण केले. हे चौथ्या दिवशी घडले.

पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले.

मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्‍या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा "किंवा प्राण" फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा, बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले. निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. (हाच दिवस म्हणजे सब्बाथ/ शब्बाथ. या दिवशी काम करणे "ज्यू " धर्माला अमान्य आहे.)

नंतर देवाने पुर्वेकडे एदनमधे बाग केली व त्यात मानवाला ठेवले. जीवनवृक्ष व बर्‍यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणि देण्यासाठी नदी केली व मनुष्याला बागेची मशागत व राखण करण्यास ठेवले. त्यावेळी त्याने मनुष्याला आज्ञा केली की बर्‍यावाईटाचे ज्ञान देणार्‍या वृक्षाचे फळ तु खाऊ नकोस. मनुष्याची मदतनीस म्हणुन त्याने स्त्री निर्माण करण्याचे ठरवले. त्याने मानव झोपेत असताना त्याच्या छातीची फासळी काढुन स्त्री बनवली. तेव्हा मानव म्हणाला, "ही माझ्या हाडांचे हाड, मांसाचे मांस आहे. ती नरापासुन बनवलेली आहे म्हणुन तिला नारी म्हणतील. याकारणे पुरुष आपल्या आईवडीलांना सोडुन पत्नीशी जडुन राहील आणि ती दोघे एकदेह होतील." बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अ‍ॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली.

बहुतांश अशीच काहीशी कल्पना इस्लाम मध्येही आहे. पण प्रमुख फरक हा की सृष्टी निर्माण सहा "दिवसात" झाली की नाही ह्याबद्दल फरक आहे. अरेबीमधील सहा "यौम" मध्ये सृष्टी बनली. "यौम" चा अर्थ केवळ दिवस असाही होतो, तसाच तो ठराविक पिरियड/कालावधी असाही होतो. म्हणजे सहा "भागात/कालावधीत" निर्माण झालेलं आहे असं ते म्हणू शकतात. हा एक कालावधी "एक दिवसच" आहे असं कुठेही नाही. तो इश्वरी कालावधी आहे, त्यावर मानवी बंधनं आणि अपेक्षा नाहीत.
सब्बाथ/शब्बाथ म्हणजे शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस ज्यूंमध्ये पवित्र समजतात. ईश्वराने विश्रांती घेतली तशीच आपण ह्या दिवशी घ्यावी आणि ईश्वराचं चिंतन/प्रार्थना करावी असा दैवी आदेश आहे.
मात्र इस्लाम मध्ये सर्वाधिक पवित्र मानला गेलेला आठवड्यातील काळ म्हणजे शुक्रवारचा पूर्ण दिवस.
ह्या दिवशी परमेश्वर अधिक मेहेरबान असेल, जुम्माच्या दिवशी प्रार्थनेला/नमाजला विशेष महत्व असेल अशी ईश्वराची आज्ञा आहे. ह्या दिवशी तुम्ही नमाज पढताय की नाही हे बघण्यासाठी साक्षात देवदूत मशिदीच्या दारात उभे असतात. येणाऱ्यांची ते नोंद ठेवतात. अशी श्रद्धा आहे. आमच्या इथल्या एका बुजुर्ग इस्लामिक श्रद्धावंताला विचारल्यावर त्यानं हे ही सांगितलं- "देवानं मानव/आदम निर्माण केला तो दिवस जुम्माह. आदम जेव्हा जन्नत मध्ये गेला तो ही शुक्रवार, म्हणजे जुम्माच. ज्या दिवशी जगाचा अंत आणि अंतिम निर्णय होईल तो ही जुम्माच असेल. (अंतिम निर्णयः- कयामत, जेव्हा सर्व पाप्यांना पापांची शिक्षा व श्रद्धावंतांना सत्कर्माची फळे मिळतील)"
ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र दिवस रविवार आहे(catholic church). पण तो कशासाठी हे अजून शोधतोय.
अवांतर
सृष्टीनिर्मितीची इब्राहिमी कल्पना वाचली आणि सहज नासदीय सूक्त आठवलं. (ऋग्वेद, मंडल १० वे. )
सगळं वाचलं नाही तरी चालेल पण त्यातल्या १ ते ४, ६, १३, १४ (इथे चटकन कळावं म्हणून हिंदीमध्ये देतोय. ) ह्या ओळींकडे जरा लक्ष देऊन बघा बरं.

सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १
अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २
छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३
उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४

सृष्टी का कौन है कर्ता कर्ता है वा अकर्ता ५
ऊंचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता ६
वही सचमुच में जानता, या नहीं भी जानता ७
है किसी को नहीं पता नहीं पता नहीं है पता नहीं है पता ८

वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान ९
वही तो सारे भूतजात का स्वामी महान १०
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर ११
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १२

जिस के बल पर तेजोमय है अंबर १३
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर १४
स्वर्ग और सूरज भी स्थिर १५
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १६

गर्भ में अपने अग्नी धारण कर पैदा कर १७
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर १८
जगा चुके वो ऐकमेव प्राण बनकर १९
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर २०

ॐ! सृष्टी निर्माता स्वर्ग रचियता पूर्वज रक्षा कर २१
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर २२
फैली हैं दिशाएँ बाहू जैसी उसकी सब में सब पर २३

ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २४
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २५

प्रतिक्रिया

डीलर's picture

22 Mar 2011 - 2:38 pm | डीलर

i think this was used as title song for a serial on Doordarshan if i am not mistaken it was Discovery of India.

पुष्करिणी's picture

22 Mar 2011 - 2:56 pm | पुष्करिणी

हाही भाग छान झालाय,

ख्रिश्चनांम्धे रविवार महत्वाचा कारण इस्टर संडे च्यादिवशी येशू ज्याला गुडफ्रायडेला क्रुसावर चढवलं होतं तो परत आला...

या तिन्ही धर्मातलं प्रकर्षानं जाणवणारं साम्य म्हणजे स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना. केलेल्या ( आणि न केलेल्या) प्रत्येक कृतीची स्वर्ग आणि नरकाशी घातलेली सांगड.पुनर्जन्म , निर्वाण / मोक्ष ह्या संकल्पना दिसत नाहीत.

व्याज हे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांत त्याज्य मानलं आहे. ज्यू धर्मांतही व्याज त्याज्य आहे का?

पंगा's picture

22 Mar 2011 - 3:03 pm | पंगा

व्याज हे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांत त्याज्य मानलं आहे. ज्यू धर्मांतही व्याज त्याज्य आहे का?

नसावे. बहुधा म्हणूनच एके काळी युरोपातील बहुसंख्य सावकार हे ज्यू असावेत. (कारण इतरांना हा धंदा धर्मानुसार करता येत नसे म्हणून. आणि कोणीतरी तर करायला पाहिजे.)

अर्थात हा केवळ अंदाज आहे.

पुष्करिणी's picture

22 Mar 2011 - 3:26 pm | पुष्करिणी

हो, असं मला पण वाटतं.

पण अतिधार्मिक ज्यू शुक्रवारी १ पैसाही खर्च करत नाहीत. मी वैयक्तिक रित्या काही ज्यूंना ओळखते, ते शुक्रवारचं ट्रेनचं तिकिट गुरूवारीच काढून ठेवतात. शुक्रवारी टॅक्सी वापरत नाहीत की कुठलीही खरेदी नाही.

शनिवारी कोणतेही काम करायचे नाही, यंत्र वापरायचे नाही (कारण यंत्र = काम), स्वयंचलित वाहन वापरायचे नाही (कारण स्वयंचलित वाहनाचे इंजिन = आग = काम), वीज वापरायची नाही वगैरेंबद्दल ऐकले होते. (दुवा १, दुवा २ आणि दुवा ३. तसेच, अपवादांकरिता दुवा ४ आणि दुवा ५ हेही बघावेत.) शुक्रवारी खर्च न करण्याबद्दल कल्पना नव्हती.

(अवांतर: तसे सब्बाथ हा शुक्रवारी सूर्यास्ताच्या काही मिनिटे आधीपासूनच सुरू होतो, असे वरील दुव्यांवरून कळते.)

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 4:23 pm | नितिन थत्ते

ज्यू शनिवारी काम करीत नाहीत.

नागांव (अलिबाग) परिसरातल्या तेलाचा व्यवसाय करणार्‍या ज्यूंना शनवार तेली म्हणतात.

पंगा's picture

22 Mar 2011 - 4:27 pm | पंगा

नागांव (अलिबाग) परिसरातल्या तेलाचा व्यवसाय करणार्‍या ज्यूंना शनवार तेली म्हणतात.

याबाबत ऐकलेले आहे, परंतु 'शनवार तेली' या संज्ञेच्या व्युत्पत्तीबद्दल साशंक आहे.

म्हणजे, जे शनवारी तेल विकत नाहीत ते शनवार तेली?

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 4:56 pm | नितिन थत्ते

"आम्ही चित्पावन" या पुस्तकात वाचले आहे.

त्या पुस्तकात याचा संदर्भ येण्याचे कारण म्हणजे "समुद्रातून जहाजातून वाहून आलेल्या प्रेतांची" कहाणी यांच्यातही प्रचलित आहे.

पंगा's picture

22 Mar 2011 - 6:02 pm | पंगा

"समुद्रातून जहाजातून वाहून आलेल्या प्रेतांची" कहाणी

हा काय प्रकार आहे?

(बायदवे 'शनवार तेली' ही संज्ञा ऐकलेली आहे पण त्याचा नेमका उगम खरोखरच कळलेला नाही.)

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 6:43 pm | नितिन थत्ते

चित्पावनाम्च्या उत्पत्तीची देखील अशीच कथा आहे. असेच वाहून आलेले लोक ज्यांना परशुरामाने जिवंत केले आणि ब्राह्मण बनवले.

Several historical descriptions of the Chitpavans describe their distinct physical features such as fair skin and light-brown or greenish-brown eyes, which set them apart from the other natives of Konkan and Maharashtrian Brahmins.[1][4][6][7][8] The Konkan region has been inhabited by several immigrant groups including the Parsis, the Bene Israelis, the Kudaldeshkar Gaud Brahmins, and the Gaud Saraswat Brahmins, and the Chitpavan Brahmins were apparently the last of these immigrant arrivals.[3] A 2005 study conducted by Sonali Gaikwad and VK Kashyap for National DNA Analysis Center, Central Forensic Science Laboratory, Kolkata, suggests that the Chitpavans may have roots outside of India, in either Iran or Turkey. The authors state that the Chitpavan were amalgamated and Brahminized at a late date in the Indian society.[9]
“ Chitpavan brahmin demonstrates younger maternal component and substantial paternal gene flow from West Asia, thus giving credence to their recent Irano-Scythian ancestry from Mediterranean or Turkey, which correlated well with European-looking features of this caste. This also explains their untraceable ethno-history before 1000 years, brahminization event and later amalgamation by Maratha... ”

A link between the Chitpavan and the Bene Israel has also been suggested. The Parshuram origin of the Chitpavan is identical to the story of origins of the Bene Israel from the Kolaba district. The Bene Israel claim that they share a common origin with the Chitpavan. According to legend, the Chitpavan and Bene Israel are descendants from a group of 14 people shipwrecked off the Konkan coast. One group converted to Hinduism as Chitpavan Brahmins, the other remained Jewish or Bene Israel.[10][11][12]

(विकी दुवा)

मन१'s picture

22 Mar 2011 - 6:54 pm | मन१

"इजिप्तमध्ये स्थायिक झालेले ग्रीक लोक चित्पावनांचे पूर्वज असल्याचा दावा करण्यात येतो. " असं आत्ताच उपक्रमावर वाचलं. मग चित्पावन ग्रीक आहेत, इजिप्शियन आहेत, की बेने इस्रायलांच्या वंशातील आहेत, कळायचं कसं?

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 6:59 pm | नितिन थत्ते

अहो हे नुसते कयास आहेत. पाश्चात्यांच्या अज्ञानातून आलेले.

चित्पावन इथलेच असं प वि वर्तकांनि सांगितले आहे. :)

प्रचेतस's picture

22 Mar 2011 - 10:46 pm | प्रचेतस

कोण हे प. वि. वर्तक?
ते हेच ना की ज्यांनी सूक्ष्म देह धारण करून मंगळावर जाउन आल्याचा दावा केला होता? :)

पंगा's picture

22 Mar 2011 - 7:12 pm | पंगा

पण माझ्या त्रोटक ऐकीव माहितीप्रमाणे (चुकीची असू शकेल) ज्यूंच्या बाबतीत या कथेत थोडा फरक असावा. म्हणजे फुटक्या जहाजातून येऊन कोंकणकिनार्‍याला लागलेले लोक खरेच, पण प्रेतांना कोणी जिवंत केल्याबद्दल ऐकलेले नाही. (अर्थात माझी ऐकीव माहिती फारच वरवरची, अपुरी आणि/किंवा चुकीची असण्याची शक्यता नाकारत नाही.)

('शनवार तेली' या संज्ञेच्या व्युत्पत्तीच्या खातरजमेसाठी मनोबांचे आभार.)

पुष्करिणी's picture

22 Mar 2011 - 7:20 pm | पुष्करिणी

माझ्या परिचयातले सगळेच ज्यू शुक्रवारी काम करतात ( सगळे नोकरीवाले आहेत, दर शुक्रवारी कोण सुट्टी देणार ), शनिवारी काय करतात माहित नाहीत. पण शुक्रवारी एक दमडी सुद्धा खर्च करत नाहीत. यांत काही भारतीय आणि बरेचसे अभारतीय आहेत.

Weekends in Israel are Friday to Saturday. The law designates 36 hours of weekly holiday from Friday afternoon till Sunday morning.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 10:20 pm | निनाद मुक्काम प...

पूर्वापार सावकारी हि ज्यू लोकांची मक्तेदारी आहे .अमेरिकेन सुद्धा ह्या शेत्रात ज्यू आहेत .ह्यावरून त्यांच्यात व्याज घेणे गैर मानले जात नाही बहुतेक

प्रसन्न केसकर's picture

22 Mar 2011 - 3:07 pm | प्रसन्न केसकर

याबाबत बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

पुनर्जन्म , निर्वाण / मोक्ष ह्या संकल्पना दिसत नाहीत.

आहेत. पण वेगळ्या प्रकारे. जजमेंट डे, कयामत का दिन वगैरेमधे ते अंतर्भुत आहे. आणि पागन रिलिजन मधे तर माणसांची ऑलिंपस/ स्वर्ग, हेडन/ नरक ते पृथ्वी यामधे सतत ये जा असे. (जणु शटल सर्विस होती.)

पुष्करिणी's picture

22 Mar 2011 - 3:22 pm | पुष्करिणी

हो रिझरेक्शन बाबत बरेच मतप्रवाह आहेत...पण रविवार महत्वाचा त्यातल्याच एका मतप्रावाहामुळे आला असावा .

पेगन आणि अब्राहमी धर्म बरेच वेगळे असावेत असं वाटतं..पेगन एकेश्वरवादी नाहीत.

अजून एक अब्राहमी धर्मातलं साधर्म्य म्हणजे डुकराचं मांस खाणं निषिद्ध. ख्रिश्चन लोकं आजकाल पाळत नाहीत पण त्यांच्याकडेही हे पूर्वी निषिद्धच होतं. बहुतांश ज्यू आणि मुस्लीम अजूनही पाळतात हा नियम.

डीलर's picture

22 Mar 2011 - 4:13 pm | डीलर

हे पेगन कोण होते?
dictionary meaning of pagan is "A person who follows a polytheistic or pre-Christian religion (not a Christian or Muslim or Jew)."

the only reference i read about pagan in the book 'da vinci code'

ख्रिश्चन लोकं आजकाल पाळत नाहीत पण त्यांच्याकडेही हे पूर्वी निषिद्धच होतं.

नव्या करारात (ख्रिश्चनांकरिता) डुकराच्या मांसाचा निषेध नाही. जुन्या करारात (ज्यूंकरिता) तो आहे, परंतु नव्या करारानुसार तो बंधनकारक नाही असे वाटते.

हेच बहुधा पुरुषांच्या सुंतेबद्दलही म्हणता यावे. जुन्या करारानुसार बंधनकारक आहे, नव्या करारानुसार नाही.

इस्लामचे या बाबतींतील नियम हे बर्‍याच अंशी जुन्या करारातील (पक्षी: ज्यूंच्या) नियमांच्या जवळ आहेत असे वाटते.

(अतिअवांतर: इस्लामच्या 'हलाल' खाद्यनियमांप्रमाणे ज्यूंचेही 'कोशर' खाद्यनियम आहेत. या दोन्ही नियमपद्धतींमध्ये 'डुकराच्या मांसाचा निषेध' हा एक समाईक भाग आहे खरा. मात्र 'कोशर' नियमपद्धतीत बरीच अधिक गुंतागुंत असल्याबद्दल ऐकलेले आहे. जसे, दूध किंवा दुधाचे पदार्थ यांना बंदी नाही. तसेच, डुकराचे मांस आणि कदाचित काही आणखी प्राण्यांचे मांस वगळता बहुतांश इतर प्राण्यांचे मांस वर्ज्य नसावे. परंतु कोणतेही मांस आणि दूध किंवा दुधाचे पदार्थ हे एकत्र शिजवणे वर्ज्य आहे. याचे कारण असे वाचलेले आहे की कोठल्याशा एका धर्मग्रंथाप्रमाणे - नक्की कोणता ते माहीत नाही - कोठल्याही प्राण्याच्या बाळास त्याच्या आईच्या दुधात शिजवणे हे क्रूर आहे. याचा तात्त्विक विपर्यास म्हणून कोणतेही मांस कोणत्याही दुधात किंवा दुग्धजन्य पदार्थाबरोबर शिजवणे निषिद्ध आहे. तसेच कोणतेही मांस खाल्ल्यानंतर दूध पिण्यापूर्वी किंवा दुग्धजन्य पदार्थ खाण्यापूर्वी काही तास थांबणे आवश्यक आहे, वगैरे वगैरे. (काही जण भांडीसुद्धा वेगळी वापरतात असे कळते.) अधिक माहिती येथे सापडू शकेल.)

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 12:58 am | पुष्करिणी

अवांतर : दूध आणि मांस एकत्र शिजवण्यासंबंधी / खाण्यासंबंधी बरच काही आहे ज्यूधर्मात. हा जो नियम आहे तो शेळीच्या पिल्लाचं मांस शेळीच्या दूधात शिजवायला मनाई करणारा आहे. तिकडे म्हणे पूर्वी असं शिजवून ते शेतात पसरलं की उत्तम पीक येतं अशी अंधश्रद्धा होती तिचा बीमोड करण्यासाठी हे सुरू झालं पण नंतर ते सर्व कोशर मांसांना लागू केलं गेलं.
उंट, कासव आणि डुक्कर हे खायला निषिद्ध. जर पक्षीण जवळ असेल तर घरट्यातली अंडी घ्यायला निषिद्ध.
मासे हे मांस कॅटेगिरीत येत नाहीत त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांबरोबर चालतात खाल्लेले.

मांस खाउन झाल्यावर ६ तासांनी दूग्धजन्य पदार्थ खायला परवानगी पण दूग्धजन्य पदार्थ खाउन झाल्यावर तोंड धुवून मांस खायला परवानगी. शिजवायच्या भांड्यांबद्दलही बरंच काही आहे.

बंधूंकडून व्याज वर्ज्य आहे - ड्यूटरॉनोमी २३:१९
परकीयांकडून व्याज घेणे चालते : ड्यूटरॉनोमी २३:२०
स्रोत : विकिपेडिया पान
(ड्यूटरॉनोमी हा हिब्रू बायबलचा भाग आहे. अर्थात ख्रिस्ती लोकांनासुद्धा मान्यच आहे. मात्र ज्यू लोकांना त्यांच्या देवाची लेकरे=बंधू म्हणजे फक्त अन्य ज्यू लोक; मुसलमान-ख्रिस्ती लोकांसाठी सर्वच माणसे.)

वरील विकिपेडिया पानावर उल्लेख आहे की गौतम बुद्धालासुद्धा व्याज अमान्य होते. याबद्दल संदर्भ शोधला पाहिजे, शहानिशा केली पाहिजे.

ब्राह्मणः क्षत्रिया वाऽपि वृद्धिं नैव प्रयोजयेत् ।
कामं तु खलु धर्मार्थं दद्यात्पापीयसेऽल्पिकाम् ॥ मनुस्मृति १०:११७

अर्थ : ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी व्याज आकारू नये. आपल्या इच्छेने धर्मार्थ द्यावे. फार पापी व्यक्तीला अल्प व्याज आकारावे.

मनुस्मृतीप्रमाणे अन्य जातींच्या लोकांनी व्याज आकारले तर चालते.

पुष्करिणी's picture

22 Mar 2011 - 11:58 pm | पुष्करिणी

छान माहिती. अर्थात यामुळे वैश्य लोकंच पारंपारिक सावकारी करत असावेत..

मन१'s picture

22 Mar 2011 - 2:49 pm | मन१

शेवटचा फिनिशिंग टच देताना "पूर्व दृश्य " ऐवजी "प्रकाशित करा" हे बटन दाबलं. आणि नीटसं संपादित करायच्या आतच प्रकाशित झालय. ते इट्यालिक्स अजुन दोन प्यारेग्राफ पुढपर्यंत हवं होतं. म्हणजे " बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अ‍ॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली." ह्या वाक्यापर्यंत हवं होतं हो.
कुणी संपादक वगैरे मदद करतील काय?
मागील दोन भागांची लिंक्/दुवे:- भाग २ http://www.misalpav.com/node/17324
आणि भाग १ http://www.misalpav.com/node/17293 .

@dealer हो. ते दूरदर्शन च्या "भारत एक खोज" मधुनच घेतलय. तेही लिहिणार होतो पण शिंचं बटनच चुकीचं दाबलं गेलं.

आपलाच
मनोबा.

आपले अनेक आभार! बरेच दिवस मी हे शोधत होतो!!

प्रसन्न केसकर's picture

22 Mar 2011 - 3:02 pm | प्रसन्न केसकर

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
(सध्या माझी एव्हढीच प्रतिक्रिया. कृपया समजुन घ्या.)

मेघवेडा's picture

22 Mar 2011 - 3:06 pm | मेघवेडा

छान! :)

इरसाल's picture

22 Mar 2011 - 3:57 pm | इरसाल

मस्तच आहे वाच्तोय..........

एकंदर सगळा मामला इंतरेस्टिंग आहे. बर्‍याच अख्याईका ऐकुन (अर्धवट) माहित होत्या.
उर्दु/अरेबिक आणि इंग्रजीच कच्च ज्ञान या मुळे कुराण बायबलच्या वाट्यास कधी गेलो नाही.

मनोबा तु आणि इतर सगळेच या मालिकेतुन ज्ञानात मौलिक भर टाकताय. धन्स.
(बाकी स्वसंपादन चालु आहे बहुतेक त्याचा फायदा घे :) )

मला देखील बायबलमधील तो उतारा वाचताना नासदीय सूक्तच आठवले होते. केवळ अर्थच नव्हे तर शब्दांचेही साम्य आहे.
बायबलामधील विविध प्रकरणाम्पैकी संकीर्ण विचार असनारे एक प्रकरण आहे. ते बरेचसे ऋग्वेदासारखे वाटते. त्या प्रकरणाचे नेमके नाव मला आताआआठवत नाही. पण तत्वज्ञान सांगताना निसर्गातील शुद्ध जीवन आणि त्यातील प्रतिके यांचा वापर केलेला आहे.

sagarparadkar's picture

22 Mar 2011 - 4:37 pm | sagarparadkar

नासदीय सूक्त की नारदीय सूक्त ?

मी तरी आत्तापर्यंत नारदीय सूक्त असंच ऐकलं होतं .... नासदीय सूक्त हेच खरं नाव असेल तर ज्ञानात भर पडली म्हणायची ...

ते नासदीय आहे. नारदीय नाही.. नारद ऋग्वेदात कशाला येईल? :)

http://www.youtube.com/watch?v=-o0dd1hXSZQ यात न हे अक्षर जास्त वेळेला आलेले आहे. म्हणून नासदीय असावे.

प्रास's picture

23 Mar 2011 - 12:03 am | प्रास

यात न हे अक्षर जास्त वेळेला आलेले आहे. म्हणून नासदीय असावे.

नव्हे नव्हे.......

नासदीय सूक्ताची सुरुवात,

"नासदासीन्नोसदासीत् (न असत् आसीत्.....)..." अशी असल्यामुळे हे नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. हे ऋग्वेदाच्या १०व्या मण्डलात असून याचा मंत्रद्रष्टा 'अज्ञात' आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2011 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार

मनोबा अप्रतिम रे.
वाचत आहे...

मन१'s picture

22 Mar 2011 - 6:01 pm | मन१

एखाद दोन घंटे व्हायच्या आत २२७ वाचनं आणि दोन डझन प्रतिसाद! आणि तेही खच्चुन भरलेले, काहीतरी सांगणारे.
मस्तच.
@पुष्करिणी-> धार्मिक ज्यूंबद्द्ल नवीनच माहिती मिळाली.(शुक्रवारी खर्च न करणे वगैरे.) ख्रिश्चनांबद्दलचही आपलं मत आत्ता शोधलं तेव्हा जुळ्लं. बाकी बहुतांश शंकांबद्द्ल पंगा शेट,थत्ते जी,केसकरजी ह्यांनी लिहिलच आहे.

@पंगा:- अहो केवढी ती माहिती ! शनिवार तेली जे शनिवारी तेल काढत "नाहित" तेच. आत्ता गुगलुन पाहिलं. शिवाय बेने इस्रायलींच्या स्थळावर भारताबद्द्ल " ...India is the only country in the world where there has never been an indigenous anti-Semitism" ही ओळ वाचुन छान वाटलं. भारतानं त्यांनाच नाही तर पारशी, बहाई ह्यांनाही आश्रय दिलाय. अगदि इस्लाम मधील अहमदिया पंथाचे लोकही भारतात शांततेने आहेत (ज्यांना शेजारील देशात "काफिर" म्हणुन छळाला सामोरं जावं लागतय.) हे ही आठवलं. असो. अवांतर जासत्च होतय.
अन्नाबद्दलची माहिती /दुवा उपयुक्त आहे.ज्यूंना दूध्+मांस चालत नाहित हे ऐकलं होतं. आयुर्वेदातसुद्धा मांस+ दूध हे अतिभयंकर विरुद्धान्न म्हणुन सांगितलय.(ज्याच्या सेवनानं प्रकृतीची झीज होते.) तितकच नाही, दुधात खरं तर कुठलही फळ मिसळणे, त्याचा मिल्क शेक करणे (अगदि केळ्-शिकरण्,स्ट्रॉबेरी,जांभूळ वगैरे )आयुर्वेदानुसार वर्ज्य आहे, ह्याची आठवण झाली.(अपवाद एकचः- पूर्ण पिकलेला गोड आंबा चालतो.)

@डीलर आभार.
@केसकर्जी :- तुमचे विशेष आभार तर मूळ लेखातच मांडलेत. हे पेगन धर्म हिंदुंच्या काही सध्याच्या चालीरितींसारखेच वाटले. ट्रॉय ही एक ग्रीक दंतकथा आहे dark age च्या काळातील. त्यामध्ये एका योद्ध्याच्या अंतिम संस्कारात चक्क त्याची चिता जळताना दाखवली होती ,हिंदुंसारखी! त्याला पुरत नव्हते,मूठमाती देत नव्हते!!
पेगन धर्मातले बरेचसे देव आपल्या इंद्र्-वरुण्-स्कंद्-अग्नी-रुद्र ह्यांच्यासारखेच वाटतात.

@ थत्ते :- चित्पावनांच्या पुस्तकात ज्यूंची माहिती बघुन आश्चर्य वाटलं.

@मेवे,इरसाल, गणपा,जामोप्या,परा :- थ्यांकु. तुम्हा लोकांमुळच कळफलक सोडवत नाहिये. काही ना काही शोधुन लिहित बसलोय.

@ सागर पारडिकर : - "http://home.comcast.net/~prasadmail/nAsadeeyasUktam-s.pdf" इथे विस्तृत माहिती आहे. "नाससिन्नो सदासित्त्दानीम्" अशी त्या सूक्ताची सुरुवात आहे.

sagarparadkar's picture

22 Mar 2011 - 6:52 pm | sagarparadkar

म्हणजे इतके दिवस चुकीचे नाव कानावर पडत होते आणि वर त्याचा नारदांशी काहीतरी संबंध असेल असे वाटायचे.

आपला अभ्यास जबरदस्तच आहे ... अजून माहिती वाचायला आवडेलच.

जाता जाता, एका कट्टर धार्मिक ज्यु वृद्ध व्यक्तिचा किस्सा श्रीनिवास ठाणेदार ह्यांच्या 'ही श्रीची इच्छा' मधे वाचलेला आठवतोय. ते बहुतेक गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी त्या व्यक्तीबरोबर कारने प्रवास करत होते. आणि त्या माणसाने श्री. ठाणेदारांना आधिच सांगितलेले असते की सूर्यास्तानंतर मी कारमधून प्रवास करत नाही, तेव्हा मला सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच योग्य त्या ठिकाणी सोड. पण ऐनवेळेला बहुतेक त्यांची कार बंद पडते आणि वाटेतच सूर्यास्त होतो. त्या क्षणी तो वृद्ध एकटाच कारमधून उतरून त्या निर्जन रस्त्यावरून खुश्शाल पायी चालायला लागतो, अनेक विनवण्या करून सुद्धा कार सुरू झाल्यावर तो परत कारमधे बसतच नाही, तस्साच पायी चालत आपल्या गंतव्य स्थानी पोहोचतो ...

पेगन धर्मातले बरेचसे देव आपल्या इंद्र्-वरुण्-स्कंद्-अग्नी-रुद्र ह्यांच्यासारखेच वाटतात.

याबद्दल विकी वर थोडी माहिती मिळाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2011 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मना, वाचतोय रे. मस्त माहिती.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

22 Mar 2011 - 9:29 pm | प्रचेतस

मनोबा,
खूप चांगली माहिती पुरवताय तुम्ही. मिपाकरांच्या प्रतिसादातूनही बहुमूल्य माहिती मिळत जातीय.
वाचनखूण साठवत जात आहेच.

jaydip.kulkarni's picture

23 Mar 2011 - 12:07 am | jaydip.kulkarni

अतिशय उत्तम , खुप काही नविन वाचायला मिळाले .....................

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 12:37 am | पुष्करिणी

ज्यू धर्म हा आईवर अवलंबून असतो. म्हण्जे जर आई ज्यू असली तर मुलं आपोआप ज्यू असतात.

ज्यू आणि इस्लाम मधे लग्न हा करार असतो, घटस्फोट मान्य आहे. ज्यूंमधे फक्त पुरूष घटस्फोट देउ शकतो, इस्लाममधे बायकांना 'खुला' चा पर्याय आहे. तलाक आणि खुला मधला फरक माहित नाही. इस्लाम मधे पुरूषालाएकापेक्षा अनेक लग्न करायची मुभा आहे, ज्यूंबद्दल माहिती नाही.

ख्रिश्चन लग्न मात्र देवासमोर घेतलेल्/दिलेलं वचन असतं, घटस्फोट मान्य नाही, एकापेक्षा अधिक बायका करायला परवानगी नाही.

ज्यू धर्मानुसार कोणत्याही गुन्ह्यासाठी देहांताची शिक्षा नाही.

पंगा's picture

23 Mar 2011 - 12:42 am | पंगा

ज्यू धर्मानुसार कोणत्याही गुन्ह्यासाठी देहांताची शिक्षा नाही.

ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यात आले ते नेमके कोणत्या कायद्याप्रमाणे? ज्यू (धार्मिक) की रोमन (ऐहिक)?

क्रूसावर चढवणारा रोमन असला तरी हे ज्यू मान्यवरांच्या मागणीवरून घडले होते, असे वाटते.

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 1:08 am | पुष्करिणी

मलाही हाच प्रश्न पडला होता, पण ४० एडी पासून धर्मग्रंथात हा बदल केला गेला म्हणे,

http://en.wikipedia.org/wiki/Jewish_views_on_marriage

वाहीदा's picture

24 Mar 2011 - 12:24 pm | वाहीदा

यहूदी (ज्यू) अन ईसाई यांनी जिब्राईल / गाब्रियल ने जे सांगीतले त्यात बदल केला आहे. अन इस्लामने तसे केले नाही .
जिब्राईलने सांगीतलेल्या कुरआन शरिफ मधील कुठल्याही बदल ला इस्लाम मध्ये बंदी आहे
Jews altered their scripture and christians followed the same in Bible

वाहीदा's picture

23 Mar 2011 - 12:16 pm | वाहीदा

क्रूसावर चढवणारा रोमन असला तरी हे ज्यू मान्यवरांच्या मागणीवरून घडले होते
सहमत !
ज्यू धर्मात देहांत शासन आहे

अनेक देव मानणार्‍यांपासून केवळ एकच देव मानण्याकडे येणे हे एक योग्य दिशेला उचललेले पाऊल आहे. पण ते अजून पुढे नेऊन शून्य देव मानण्यापर्यंत पोचले तर जास्त अचूक होईल! :-) असो.

ह्या सर्व सेमिटिक धर्मांच्या लेखी मूर्तीपूजा आणि अनेक ईश्वर मानणे हे अत्यंत त्याज्य समजले जाते.
कुराणात ह्याविरुद्ध लिहिले आहेच पण बायबलमधेही कुठल्याशा आद्य प्रेशिताने (मोझेस) इस्रायलमधे चालत असलेली मूर्तीपूजा जातीने बंद केल्याचे उल्लेख आहेत. पूर्वी इथे सोन्याचे वासरू पूजायची प्रथा होती. मोझेसने त्या सगळ्या मूर्ती फोडून टाकल्या आणि तमाम जनतेला "खर्‍या" देवाकडे वळवले.

मूर्तीपूजा सर्वथा त्याज्य मानणारे हे धर्म मूर्तीपूजेचे स्तोम असणार्‍या, हत्तीचे डोके असणारा देव, कपिवंशाचा देव, तीन, चार, सहा तोंडाचे देव, गाईसारखे जनावर देव असे मानणार्‍या हिंदू धर्माकडे काय दृष्टीने बघत असतील हे ओळखणे फार अवघड नाही!

एकच ईश्वर मानणारे लोक भयंकर असहिष्णू असतात हे इतिहासात अनेकदा बघायला मिळते. अनेक देव मानणारे तुलनेने जास्त सहिष्णू असतात. कारण अनेक देव मानत असाल तर त्यात अजून एक भर घातली तर काय बिघडते?
उलट अमका एक देव सोडून दुसरा कुणीही देव नाही असा जप करणारा समुदाय अजून एक देव कसे स्वीकारेल?

मुस्लिम धर्म मोझेस, आब्राहम आणि येशूला मानतो. पण काही तज्ञांच्या मते मुस्लिम धर्म नवा असताना त्याविरुद्ध त्यावेळेस बलिष्ठ असणारे धर्म त्यांच्याशी असणारी ही एक तडजोड होती.

कुराणात ज्यू लोकांविरुद्ध अनेक वाईट गोष्टी लिहिलेल्या सापडतील.
माझ्य माहितीनुसार ख्रिस्ती आणि ज्यू लोक महंमदाला मानत नाहीत.

मन१'s picture

24 Mar 2011 - 9:01 am | मन१

ज्यू मानवसमूह की ज्यू प्रेषित?
प्रेषितांबद्दल बर्‍याच गोष्टी चांगल्या लिहिल्यात. मोझेस चा उल्लेख खुद्द मुहम्मद किंवा येशू पेक्षा जास्त वेळेस केलेला आढळतो गौरवाने. ज्यूंना सर्वप्रथम देवाज्ञा मिळाल्या, ते पहिले पुस्तकधारी आहेत म्हणुन त्यांच्याकडे काहिशा अप्रूपाने बघायचा दृष्टिकोन दिसतो कुर् आन मध्ये.

सध्या अरब किंवा मुस्लिम ह्यांचा ज्यूंबद्दल तसा दृष्टीकोन नाही, हा भाग वेगळा.

--मनोबा.

मुस्लिम धर्म मोझेस, आब्राहम आणि येशूला मानतो. पण काही तज्ञांच्या मते मुस्लिम धर्म नवा असताना त्याविरुद्ध त्यावेळेस बलिष्ठ असणारे धर्म त्यांच्याशी असणारी ही एक तडजोड होती.
हे तज्ञ कोण ?? आपण याचे तज्ञ आहात का ?

मूर्तीपूजा सर्वथा त्याज्य मानणारे हे धर्म मूर्तीपूजेचे स्तोम असणार्‍या, हत्तीचे डोके असणारा देव, कपिवंशाचा देव, तीन, चार, सहा तोंडाचे देव, गाईसारखे जनावर देव असे मानणार्‍या हिंदू धर्माकडे काय दृष्टीने बघत असतील हे ओळखणे फार अवघड नाही!

काय दृष्टीने बघतात ? हे सर्व तुमच्या डोक्याचे गलिच्छ खेळ आहेत. मी स्वतः मुस्लिम आहे अन् माझे अनेक मित्र मैत्रिणी हिंदू आहेत आमच्या घरात / घराण्यात आम्ही कधीही कोणा हिंदूंना तुच्छ लेखले नाही.

माझ्या आईच्या अंत्यसंस्कारात माझ्या ताईची जिवाभावाची मैत्रिण ज्यू हि होती अन तिच्या नवर्‍याने माझ्या आईच्या जनाज्याला खांदा ही दिला होता. (तिचा नवरा भारतातल्या ज्यूंचे जागतिक स्तरावर प्रतिनिधत्व करतो, मी नाव घेऊ ईच्छित नाही ) तसेच अनेक हिंदू मित्रांनी ही दिला होता अन ते शेवट पर्यंत कब्रस्थानात ही हजर होते.

त्यांनी माझ्या अम्मीजान साठी मागितलेली दुवा मी कधीच विसरु शकणार नाही , मग त्यालाही तुम्ही आत्ताच्या काळातील तडजोड म्हणणार का ???

जनाब हुप्प्या,
आप तो हमें हमेशासे ही फसादी लगते हो . बेवजेह फसाद मत फैलाईये ||

मन१'s picture

24 Mar 2011 - 5:59 pm | मन१

अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया.
ही प्रातिनिधिक असेल तर मी माझे महद् भाग्य समजेन. जर सर्व अवाम ह्याच विचाराची असेल तर भारतभूमी खुशनसीब आहे.

--मनोबा.

प्रसन्न केसकर's picture

24 Mar 2011 - 6:33 pm | प्रसन्न केसकर

असाच विचार करतात. पण काही थोडे माथेफिरु असतात प्रत्येक धर्मात अन अगदी काही धर्म न मानणारे पण.
दहा वर्षांपुर्वीचा माझा एक अनुभव इथे अगदीच अप्रस्तुत ठरु नये.
पुण्यात दोन तीन दिवस सुरु असलेली धार्मिक दंगल चांगलीच भरात होती अन शिवजयंती आली. त्या दिवशी तरी काही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन आदल्या दिवशी पोलिसांनी पीस मार्च ठेवला होता. सगळ्या जाती-धर्माचे अन निधर्मी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे अन संघटनांचे नेते आले अन पोलिस आणि सीआयएसएफच्या कडेकोट बंदोबस्तात शांतता फेरी सुरु झाली. चार दोन गल्ल्या फिरुन मार्च संमिश्र वस्ती असलेल्या सर्वात संवेदनाक्षम गल्लीत पोहोचला अन अचानक एका इमारतीतुन तुफान दगडफेक सुरु झाली. बघता बघता सगळ्या बाजुंनी दगडांचा वर्षाव व्हायला लागला. सगळ्यात जास्त दगड फेकले जात होते ते निधर्मी म्हणवुन घेणार्‍या नेत्यांवर. सगळी पळापळ अन पीसमार्च कव्हर करणारा मी मात्र अडकलो होतो रस्त्याच्या मधोमध एकटा. अन अचानक दगडफेक थांबली. गल्लीतली सगळी राडेबाज पोरं गोळा झाली माझ्याभोवती लागलं नाही ना विचारायला. मी घाबरलेलो, थरथरत उभा होतो काही न बोलता. कुणीतरी पाणी पाजलं अन म्हणालं, "भाई डरना नही. लीडरोंने बच्चोंको भडकाया था इसलिये फसाद हो रहा था. लेकीन चार दिनसे बच्चेभी परेशानीयां झेल रहे है. अभी लीडरोंके खिलाफ भडास निकाल ली उन्होने तो दंगे भी बंद हो जाएंगे." अन खरच त्या क्षणानंतर तासाभरात सगळं वातावरण बदललं. दोन्ही बाजुचे लोक परत रस्त्यावर एकत्र गप्पा मारताना दिसले.
हे आहे आपलं अवाम! उगीचच बर्‍याचदा आपण पुर्वग्रह मनात ठेऊन असतो.

अप्पा जोगळेकर's picture

27 Mar 2011 - 3:11 pm | अप्पा जोगळेकर

असाच विचार करतात. पण काही थोडे माथेफिरु असतात प्रत्येक धर्मात
हो. पण कित्येकदा धर्मच माथेफिरु असतो तेंव्हा काय करणार ?
सगळे धर्म मुळातून चांगलेच आहेत, सहिष्णूच आहेत असे गॄहीत धरण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही.

प्रसन्न केसकर's picture

27 Mar 2011 - 6:45 pm | प्रसन्न केसकर

विचारसरणी माथेपुरु आहे म्हणण्यासाठी त्याचा संपुर्ण अभ्यास करुन तो धर्म किंवा विचारसरणी संपुर्ण समजावुन घ्यावी लागते. तेव्हढा अभ्यास किंवा समज नसल्यामुळे आम्ही व्यक्तींनाच माथेफिरु म्हणतो.

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2011 - 7:34 pm | अप्पा जोगळेकर

विचारसरणी माथेपुरु आहे म्हणण्यासाठी त्याचा संपुर्ण अभ्यास करुन तो धर्म किंवा विचारसरणी संपुर्ण समजावुन घ्यावी लागते.
मूळामध्ये जे निर्माण झाले ते तत्वज्ञान आणि ती विचारसरणी हे नीटनेटके आणि सुबकच होते असे गॄहीत करणे अतार्किक वाटते. शिवाय विचारसरणीचा किती अभ्यास केला म्हणजे संपूर्ण अभ्यास झाला असे ठरवण्यास काही क्रायटेरिया आहे काय ?

प्रसन्न केसकर's picture

29 Mar 2011 - 2:12 pm | प्रसन्न केसकर

याच्याबाबत मी कोणतेच मतप्रदर्शन केलेले नाही. तश्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी त्या विषयाचा जेव्हढा अभ्यास मला आवश्यक वाटतो तेव्हढा मी केलेला नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे. संपुर्ण विषय समजल्याखेरीज सार्वत्रिक मत बनवु नये असे माझे व्यक्तीगत मत आहे.
अर्थात हे माझे व्यक्तीगत मत मी नोंदवले. इतर कुणी काय करायचं हा निर्णय ज्याची त्याची समज, ज्याची त्याची बुद्धी, ज्याचे त्याचे मत अश्या अनेक निकषांवर आधारित आहे असेही माझे मत आहे. त्यामुळे ज्याचे त्याचे मत आणि ज्याचे त्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र या विचारधारेस अनुसरुन आणि मन यांच्या लेखमालेला उगीच माझ्यामुळे गालबोट लागु नये या प्रामाणिक इच्छेमुळे मी अन्य कुणाच्या मतांना समर्थन देत नाही किंवा त्यांचा प्रतिवाद देखील करत नाही.
अवांतरः याचा अर्थ कुणाला मी अश्या मतांना आणि ती मांडणार्‍यांना फाट्यावर मारतो असा काढायचा असेल तर तसा जरुर काढावा. मी आधीच वर म्हणल्याप्रमाणे ज्याची त्याची समज, ज्याची त्याची बुद्धी, ज्याचे त्याचे मत इ.इ. येथेही लागु होते.

माझ्या सारख्या अगाढ अज्ञानी माणसासाठी अतिशय सुंदर आणि अभ्यासपुर्ण मालिका सुरु करुन अतिशय व्यवस्थित पदधतीने चालु ठेवल्याबद्दल मन यांचे आभार. वाचनखुणं साठवली आहे.

sneharani's picture

23 Mar 2011 - 11:20 am | sneharani

नवीन माहिती मिळती आहे प्रत्येक भागात..येऊ दे आणखीन!

मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला
सहमत !
इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा !
औरत, मर्द के फ़सली से बनी हुई है |

विकास's picture

23 Mar 2011 - 9:41 pm | विकास

इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा !
औरत, मर्द के फ़सली से बनी हुई है |

दोन्ही वाक्यांचा मिळून असा अन्वयार्थ आहे का की "औरत इन्सान नही है"? का माझ्या समजण्यात काही गडबड होत आहे?

=)) =))

हाण्ण... मेलो हसुन हसुन! =))

बाकी पाशवी बायकांनी पुरुषांच्या जातीला पार मातीमोल केलेला पाहुन डोळे पाणावले! ;-)

वाक्याच्या अर्थाचा अनर्थ लावणे अन त्यावर हसणे हे तुमच्यासारख्यांचे पूर्वापार आलेले कामच आहे.
जनाब,
दिमाग के बारेमें आप इतने तो गये गुजरे नहीं है , या अपना जहेन गलत तरिके से चला रहे हो :-?
इस्लाम में औरतोंको भी मरनेके बाद दफ़नाया जाता है, इसका मतलब वो भी इन्सान ही है, :-)
हां तुम अगर हम औरतोंके अंदरकी हैवानीयत को ललकार रहे हो,
तो जरा युयुत्सुसे पुछना अगर औरत अड गई तो मर्द की जिंदगी जहान्नुम जरुर बना सकती है,
किस कदर.. वो वोही बेहतर तरिकेसे समझाऎंगे आपको
जिस दिन हम औरतोंकी बर्दाश करनेकी हदें खतम हो जाएगी ना, तुम मर्द मुंह के बल गिरोगे.. तबाह, बारबाद हो जाओगे
हमारी हैवानियत आजमाना मत , महेंगा पडेगा :-)
यह जो कायनात में रंग झलक रहें हैं ना सब फिके पड जाऎंगे ..
संभल जाईंऎंगा जनाब |
बाय द वे हसते वक्त, आपने दात सफा करने के लिए बंदर छाप काला दंतमंजन इस्तेमाल किया था इसका सबुत मिल गया ;-)
( Just kidding ..No hard feeling Please :-) )
अवांतर : हि मस्करी आहे त्याची कुक्सरी होऊ देऊ नये

इन्सान मध्ये औरत, मर्द दोन्ही येतात :-)
अन इस्लाम / यहूदी ( ज्यू) / ईसाई मध्ये दोघांचेही मेल्यानंतर दफनविधीच होतात त्यांच्या साठी वेगवेगळे कब्रस्थान नाही कब्रस्थानात स्त्री अन पुरुष दोघांच्याही कबरीही असतात अन त्या जवळ जवळ पण असू शकतात

विकास's picture

25 Mar 2011 - 4:31 pm | विकास

धन्यवाद वाहीदाजी,

मी प्रश्न खरच विचारला होता, थट्टा नव्हती. फक्त ती वाक्ये एकत्र दिसल्याने माझे confusion झाले हे नक्की.

Qur'an 49:13 Surah Al-Hujurat (The Inner Apartments)

O mankind! We created you from a single (pair) of a male and a female and
made you into nations and tribes that ye may recognise each other
(not that ye may despise each other). Verily the most honored of you
in the sight of Allah is (he who is) the most righteous of you.
And Allah has full knowledge and is well acquainted (with all things).

"God made woman from man's rib- not from his head to top him,
nor from his feet to be walked upon;but from his side to be his partner in life,
from under his arm to be protected by him,and from near his heart to be loved by him
."
-- Dream Mate By Dr AR Bernard

मन१'s picture

26 Mar 2011 - 6:06 pm | मन१

सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं. मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या.
काल बाबावाल्याकडे गेलो. आणि windows ची recovery disc (installable) जी बनवायची राहिली होती, ती करुन दे म्हणलं. नेमकं ते करताना प्रॉब्लेम आला. "रिकव्हरी डिस्क आधीच बनलेली आहे" असा काहिसा तो संदेश होता. वस्तुस्थिती तशी नव्हती. मी कधीही अशी बन्वलेली नाही. बाबा वाला म्हटला की HP चं मुख्य सेवा केंद्र पौड रस्त्याला सुझुकी शोरूमच्यावर आहे. तिथं संपर्क करुन त्यांना हा प्रॉब्लेम सांगितल्यास ते नवीन डिस्क उपलब्ध करुन देतील.

ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की ग्राहकांच्या "सोयीसाठी" ह्या सर्व सेवा त्यांच्या कॉल सेंटर वरील ग्राहक सेवा केंद्राला(टेलेफोनिक कस्टमर केअर) ला सांगितल्यास, घरपोच डिस्क पोचती केल्या जाइल.

काल सतत घंटाभर प्रयत्न करत होतो. पण बोंब. "सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता.

आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो" असा संदेश आंग्ल भाषेत येउन चक्क फोन कट होउ लागला. मला कळेना कुठल्या देशातले ६ ते. घड्याळ पाहिलं तर चक्क दुपारचे ३ वाजलेले. ६ वाजायला भरपुर अवकाश.

पुन्हा पौड रस्त्यावर जाउन हुज्जत घातली. त्यांचं म्हणणं एकचः- "आम्ही काहीही करण्यास असमर्थ आहोत. तुमच्या तक्रारे फोन करुन कॉल सेंटर लाच कळवा." डोकं तापलं. त्याला म्हणलं की बाबा रे, तुझी ती फोन वाली मंडळी ६ वाजुन गेलेत असं म्हणताहेत. तर त्याचं उत्तर तयार. "शिश्टिम बिघडली असेल. मी काहिही करु शकत नाही. पुन्हा सोमवारी संपर्क करुन बघा."

दळभद्री तिच्याय्ला.

तर माझ्या आंतरजालिय बंधु भगिनींनो कृपया तुम्ही ह्या नाडाल्या गेलेल्या , दीनवाण्या, केविलवाण्या ग्राहकाची काही मदत करु शकता काय?
१. ग्राहक तक्रार मंचात कसे जाउ?(consumer forum)
2.तक्रारीपूर्वी कुठल्या फॉर्मॅलिटीज् आहेत?
३. लेखी अर्ज मी HP सर्विस सेंटरला देउ केला, त्यांनी तोही घेण्यास नकार दिलाय.
सध्या माझ्या कडे भरभक्कम पावती आहे, मशिन घेउन नुकताच महिना झालाय.

मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा.

आपलाच
वैतागलेला मनोबा.

--सध्या मिपा वरही काथ्याकूट बन्वायल घेतल तर बनत नाहिये. म्हणुन प्रतिसादातच ही बोंब मारुन घेतोय.

वाचवा हो वाचवा.

मन१'s picture

26 Mar 2011 - 6:07 pm | मन१

एच पी पासुन वाचवा.

सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं. मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या.
काल बाबावाल्याकडे गेलो. आणि windows ची recovery disc (installable) जी बनवायची राहिली होती, ती करुन दे म्हणलं. नेमकं ते करताना प्रॉब्लेम आला. "रिकव्हरी डिस्क आधीच बनलेली आहे" असा काहिसा तो संदेश होता. वस्तुस्थिती तशी नव्हती. मी कधीही अशी बन्वलेली नाही. बाबा वाला म्हटला की HP चं मुख्य सेवा केंद्र पौड रस्त्याला सुझुकी शोरूमच्यावर आहे. तिथं संपर्क करुन त्यांना हा प्रॉब्लेम सांगितल्यास ते नवीन डिस्क उपलब्ध करुन देतील.

ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की ग्राहकांच्या "सोयीसाठी" ह्या सर्व सेवा त्यांच्या कॉल सेंटर वरील ग्राहक सेवा केंद्राला(टेलेफोनिक कस्टमर केअर) ला सांगितल्यास, घरपोच डिस्क पोचती केल्या जाइल.

काल सतत घंटाभर प्रयत्न करत होतो. पण बोंब. "सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता.

आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो" असा संदेश आंग्ल भाषेत येउन चक्क फोन कट होउ लागला. मला कळेना कुठल्या देशातले ६ ते. घड्याळ पाहिलं तर चक्क दुपारचे ३ वाजलेले. ६ वाजायला भरपुर अवकाश.

पुन्हा पौड रस्त्यावर जाउन हुज्जत घातली. त्यांचं म्हणणं एकचः- "आम्ही काहीही करण्यास असमर्थ आहोत. तुमच्या तक्रारे फोन करुन कॉल सेंटर लाच कळवा." डोकं तापलं. त्याला म्हणलं की बाबा रे, तुझी ती फोन वाली मंडळी ६ वाजुन गेलेत असं म्हणताहेत. तर त्याचं उत्तर तयार. "शिश्टिम बिघडली असेल. मी काहिही करु शकत नाही. पुन्हा सोमवारी संपर्क करुन बघा."

दळभद्री तिच्याय्ला.

तर माझ्या आंतरजालिय बंधु भगिनींनो कृपया तुम्ही ह्या नाडाल्या गेलेल्या , दीनवाण्या, केविलवाण्या ग्राहकाची काही मदत करु शकता काय?
१. ग्राहक तक्रार मंचात कसे जाउ?(consumer forum)
2.तक्रारीपूर्वी कुठल्या फॉर्मॅलिटीज् आहेत?
३. लेखी अर्ज मी HP सर्विस सेंटरला देउ केला, त्यांनी तोही घेण्यास नकार दिलाय.
सध्या माझ्या कडे भरभक्कम पावती आहे, मशिन घेउन नुकताच महिना झालाय.

मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा.

आपलाच
वैतागलेला मनोबा.

http://www.consumercourtforum.in/f43/hcl-laptop-15348/
http://www.indiaconsumerforum.org/

PUNE DISTRICT
District Consumer Disputes Redressal Forum
692, Pushpa Heights
Bibewadi
Pune 411037
Telephone No.: 4210364 (Registrar), 4217489 (Office)

अप्पा जोगळेकर's picture

26 Mar 2011 - 6:53 pm | अप्पा जोगळेकर

१. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता.

२. सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १
अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २
छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३
उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४

क्लास , अप्रतिम लिहित आहात. वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संकल्पनांच्यामधले नाते दर्शवण्याचा प्रयत्न तर खासच.

अर्धवट's picture

26 Mar 2011 - 7:36 pm | अर्धवट

वाचतोय... चालु द्या

मुस्तफा's picture

29 Mar 2011 - 3:52 pm | मुस्तफा

जनाब आप बहुत अच्छा लिहित आहात.