इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २)

Primary tabs

मन's picture
मन in काथ्याकूट
18 Mar 2011 - 5:04 pm
गाभा: 

पहिल्या भागात दिलेल्या भरभरुन प्रतिसादांसाठी, सुचवलेल्या दुरुस्त्यांसाठी सर्व वाचकांचे आभार.
पहिला भाग.:- http://www.misalpav.com/node/17293 .
मालिकेच्या नावातही ह्या भागापासुन दुरुस्ती करतोय.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २) जेणेकरुन शीर्षकावरुन मुख्य उद्देश जाहिर होइल. इथे संस्कृतींचा काळ दिलेला नाही. तो संपूर्ण इसवीसन पूर्व काळातला(इ स पूर्व २० ते २५ शतके इतकाही जुना) आहे. मुख्य उद्देश ह्या संस्कृती बायबलमधील घटनांत,कथांत डोकावत राहतील, त्यासाठी फक्त त्यांचं भौगोलिक माहात्म्य व कौशल्य सांगणे हा आहे.

३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
३. १प्राचीन इजिप्शियनः- बऱ्याचदा आपण अतिभव्य, अफाट अमानवीय वाटणाऱ्या पिरॅमिडबद्दल, तिथल्या स्फिंक्स बद्दल वाचतो, बघतो. आजच्या इतकं तंत्रज्ञान प्रगत नसतानाही शेकडो टन वजनाची एक शिळा, अशा शेकडो हजारो शिळांपासून अफाट बांधकाम करणारे प्राचीन लोक म्हणजे प्राचीन इजिप्शियन. नाइल नदीच्या काठावर ह्यांची वस्ती. काठावर हिरवीगार शेतं आणि काठापासून थोडसचं दूर लगेच अफाट, लांबच लांब वाळवंट, अशी वैशिष्ट्य पूर्ण नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेला हा भूभाग. ह्याचा बहुतांश भाग उत्तर आफ्रिकेत आणि थोडासा भाग आशियात येतो. (आशिया-आफ्रिका ह्यांच्या सीमेवर हा आहे. ) हे लोक मूर्तिपूजक. अगदी प्राचीन संस्कृतीपैकी एक. नागर, कृषी संस्कृती. सोन्याचा बराच वापर केलेला दिसतो. सोन्याचा देवही बनवत. बळी देण्याचीही प्रथा होती. सर्वात जुना लिखित इतिहास हा इजिप्तचाच आहे. हे लोक स्वतःला "हेत कोपता" असं काहिसं म्हणवून घ्यायचे. त्याचाच ग्रीक अपभ्रंश "हेगिप्तस" आणि त्याचाच पुढे "इजिप्त " बनला. ह्यांचे शासक फेरो/सम्राट स्वतःला देवाचा अवतार कीम्वा देवच मानायचे.
इब्राहिमी धर्मातले प्रमुख पंथ मात्र "कुठलाही मनुष्य स्वतः देव किंवा देवाचा अवतार असूच शकत नाही, परमेश्वर हा सर्व सृष्टीचा मालक/पालक असला तरी ह्यापैकी कुठल्याच एका घटकात बंदिस्त नाही" असं मानतात. त्यामुळं साहजिकच हे फेरो खलनायक किंवा वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून त्यांच्या ग्रंथात दाखवलेत. खोदकाम, बांधकाम, कृषी ह्यातलं प्रावीण्य आणि भक्कम, स्थिर समाजरचना म्हणजे तत्कालीन इजिप्त. ह्यांनी आदिम काळातच नकाशा, फिनिशियनांकडून कल्पना उचलून अॅबॅकसमध्ये सुधारणा केल्या होत्या. गणन यंत्रणेतही हे काळाच्या फारच पुढे होते. हे वंशानं आफ्रिकन नसावेत. आशियायी असावेत.
ह्यांचे तीन प्रमुख देव. त्यांची आपसात नाती होती :- नवरा बायको आणि पुत्र. शरद उपाध्ये ह्यांनी एका लेखात ही कल्पना शिव-पार्वती आणि श्री गणेश ह्याच्या अगदी जवळ जाणारे आहे असं म्हटलय.

३. २ हिटाईटस /हित्ती :- तुर्कस्थानच्या भूमध्य समुद्राच्या(Mediterranean) काठावर हा मानव समूह होता.
वेगवान रथ बनवण्यात ह्यांचा हातखंडा होता. ब्राँझ ताम्र पाषाण काळातून बाहेर येऊन लोखंडाचा वापर करण्याऱ्या प्रथम समूहांपैकी एक. वेगवान रथ वापरून ह्यांनी तत्कालीन प्रगत इजिप्शियन सम्राट रॅम्सिस (का रामसेस? ) ह्याच्याही नाकी नऊ आणले होते. तोवर, इजिप्शियनांना उघड युद्धात इतकं प्रखर उत्तर कुणीच दिलं नव्हत. इतर बहुतांश समूह तेव्हा संघटित आणि civilized झाले नसावेत. ज्यूंच्या इतिहासात ह्यांचा उल्लेख आहे. मात्र ख्रिश्चन आणि इस्लामच्या इतिहासात तितकासा नाही. कालौघात हे नष्ट झालेत किंवा इतर समाजात मिसळून, विरघळून गेलेत म्हणण्यास वाव आहे.
ह्यांच्या अनेकविध देवता होत्या. ह्या देवताही एकमेकांच्या नातेवाईक होत्या. मूर्तीपूजक.

३. ३ फिनिशियन:- "३०० " नावाचा दे- दणादण हॉलीवूडपट पाहिलात? त्यात इराणचा राजा झर्क्सिस ग्रीसवर (अथेन्स व स्पार्टावर) जहाजांचा अफाट ताफा घेऊन, समुद्र ओलांडून हल्ला करतो असं काहीसं दाखवलंय.
अशी जहाजं बनवण्यात तेव्हा पर्शियन राज्य प्रगत नव्हतं. त्यांनी ती विद्या शिकली, जहाजं बनवून घेतली फिनिशियनांकडून.
फिनिशियन हे उत्तम खलाशी होते. लेबनॉन, सिरिया आणि इसराइल हे देश भूमध्य समुद्राच्या काठावर एका पट्टीत, एका ओळीने आहेत. ह्या तीनही देशांच्या किनारपट्टीवर विरळ लोकसंख्येने राहणारे लोक फिनिशियन. दूर दूर पर्यंत समुद्री प्रवास, समुद्र ओलांडून प्रवास करणारे हे पहिलेच. (त्यापूर्वी, समुद्री किनाऱ्यावरील कोळी समुद्रात जाऊन समुद्री जीव घेऊन परत येत. समुद्र ओलांडून जाण्याची आणि मग तिथून परत येण्याची नेहमीची सवय फिनिशियनांचीच. ) ह्यांनी आपल्या स्थानावरून निघून ग्रीसपर्यंत प्रवास केला. तिथून पुन्हा ते तुर्कांकडेही जाऊ शकत. ह्यांनीच पुढे जाऊन कार्थेज वसवल असा एक अंदाज आहे. हो. तेच कार्थेज ज्यांनी पुढील काळात महाबलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी हन्निबल ह्याच्या नेतृत्वात दोन हात केले. इतका मोठा दणका रोमनांना तेव्हा आख्ख्या युरोपात किंवा मध्यपूर्वेत कुणीच दिला नसेल.
इ स पूर्वे १००० काळात चित्रलिपी सोडून स्वतंत्र अक्षर चिन्हे Byblos इथे बनवणारे हे पहिलेच लोक असावेत.
इथूनच ग्रीक biblia शब्द बनला असावा. ह्यांची छाप Aramaic व Greek मुळाक्षरांवर पडली.
हे सुद्धा बहुदेवता वादी. याव्हे-मोलोक हे पती पत्नी ह्यांच्या देवता.

३. ४मेसापोटेमियनः- आजच्या इराक मधील तैग्रिस आणि युफ्रेटिस ह्या नद्यांमधला सुपीक दुआब म्हणजेच मेसापोटेमिया.
इथेच पुढे अब्राहमाचा जन्म झाला. ते नंतर. नगर रचना शास्त्र, ज्योतिष गणित, चांद्र पंचांग ह्याच्यात हे खूप पुढे होते. १२ महिने असलेले क्यालेंडार, २४ तासाचा दिवस, ह्यांच्याकडे त्याही काळात वापरात होतं. नांगर सुधारणा, कुंभारकाम, कालव्यांचे जाळे खणणे ह्यात त्यांनी बरीच प्रगती केली. मेसापोटेमिया ह्या भागात आधी असीरियन मग सुमेरियन आणि शेवटी बाबिलोनिअन लोकांनी राज्य केलं. वेळोवेळी अब्राहमाच्या देवाचा प्रकोप ह्यांना अनैतिकते मुळे झेलावा लागला असं बायबलच्या जुन्या करारात दिलय.

३. ५ इतिहास प्रसिद्ध पर्शियन/इराणी साम्राज्य- "३००" हा दे-मार पट हॉलीवूड शिनेमा पाहिलात ना? त्यातली व्हिलनची बाजू म्हणजे सम्राट झर्क्सिसची बाजू म्हणजे पर्शियन साम्राज्य.
ह्याचा नुसता बायोडेटा देणं म्हणजे लिहिणाऱ्यानं हात दुखवून घेणं आणि वाचणाऱ्यानं थकून जाण्याइतकं आहे. इस पूर्वे पंधराएक शतकांपासून मध्य पूर्वेतीलच नव्हे तर जगातील एक महत्वाची, अवाढव्य लष्करी शक्ती, सुस्थित संस्कृती म्हणजे पर्शिया. हे लोक अग्निपूजक. झरतुष्ट्र ह्या प्रेषितानं त्या तत्त्वज्ञानाची अधिक मजबूत बांधणी केली. ह्यांचा विस्तार सांगतो:-
हे ग्रीसशी लढायचे म्हणजे भूमध्य समुद्र उतरून लढायला जायचे म्हणजे तितका भूभाग ह्यांच्या ताब्यात होता. आ़जचा इराक, इराण, पूर्व-दक्षिण तुर्कस्थान हा तर राज्याच मुख भाग होता. पूर्वेला ऐन भरात राज्य असताना(at its Zenith) आख्खा अफगाणिस्तान आणि भारताच्या सिंध-बलुच प्रांतातील बराचसा भाग ह्यांच्या ताब्यात होता. शिवाय मध्य आशियात
तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान (U S S R मधील) ह्यांचा दक्षिण पट्टा हातात. क्षत्रप नेमण्याची पद्धत ह्यांच्या कडून ग्रीकांनी आणि ग्रीकांकडून आख्ख्या जगाने उचलली म्हणतात. पर्शियनांना (राजा दारियस) हरवल्यावरच आपण खरोखर शक्तिशाली आहोत, जग जिंकू शकतो असं सम्राट सि़कंदराला वाटायला लागलं. जागतिक व्यापारातला हे एक महत्वाचं केंद्र होतं. ह्यांच्या बऱ्याचशा कल्पना प्राचीन वेदकल्पनांशी खूपच साधर्म्य दाखवतात.

हे सगळं मी का सांगितलं? कारण ह्या सर्व संस्कृतींचा उल्लेख ज्यू-ख्रिश्चन-इस्लामिक साहित्यात पुन्हा पुन्हा येत राहील.
कधी शत्रू म्हणून, कधी आश्रयदाते म्हणून तर कधी अनुयायी आणि दोस्त म्हणून. त्यावेळेस ही नावं ओळखीची असली, तर मस्त गोष्टी वाचल्याचा फील येईल.

४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
:-ज्यूंचा बायबल. बायबला जुना करार.
ख्रिश्चन बायबल चा जुना करार, नवा करार दोन्हीला मानतात.
बायबल हे गीतेसारखं एकटाकी, एकाच व्यक्तीनं लिहिलेलं किंवा सांगितलेलं पुस्तक नाही. ते अनेकानेक भविष्यवेत्त्यांनी, प्रेषितांनी आणि द्रष्ट्यांनी लिहिलंय. जुन्या करारात विश्वोत्पत्ती(जेनेसिस, अॅडम-ईव्ह कथा) आहे, मोझेसचा पराक्रम आणि वेळोवेळी भटकलेल्या ज्यू समाजाला इश्वरमार्गावर आणण्यासाठी परमेश्वरानं योजलेल्या घटना, उपदेश आहेत.
नवा करार म्हणजे येशूच्या चार अनुयायांनी येशूच्या चमत्काराचं आणि शिकवणुकीचं केलेलं वर्णन.
कुर-आन :- देवदूत जिब्राइल (गॅब्रियल ) ह्यानं इश्वर साक्षात्काराच्या दरम्यान प्रेषित महंमदाला उपदेश केला.
महंमदांनी प्रवचनातून आपल्या एकनिष्ठ आणि अगदी सुरुवातीच्या अनुयायांना (हे अनुयायी म्हणजे " साहाब" ज्यांनी महंमदाच्या हस्ते इस्लामची शिकवणी घेतली आणि शिष्यत्व पत्करलं. तुम्ही बघाल पुढे महंमदानंतर ज्या ज्या लढायात साहाबा लढले, तिथे सर्वत्र त्यांचा विजय झाला. ) हे सांगितलं. हे उपदेश महंमदानंतर काही वर्षातच ग्रंथीभूत करण्यात आले, ते म्हणजे कुर-आन. तोवर ते मौखिक परंपरेनं चालत होते.
हादिस/हादिथः- प्रेषित महंमद ह्यांच्या जीवनातील घटना/गोष्टी ह्यांचा संग्रह.
इस्लाममधील वेगवेगळे पंथातील हदिसमधलं प्रमुख घटनांचं वर्णन एकच असलं तरी काही पंथांच्या काही गोष्टी वेगवेगळे संदेश देतात. शिया आणि सुन्नी ह्यांच्या स्वतःच्या हदिसमधील बहुतांश घटना एक सारख्या आहेत, काही थोड्या मात्र वेगळ्या आहेत. ज्या गोष्टीबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही, त्याबद्दल हदीसला शरियत कायद्यात प्रमाण मानण्यात येतं.

५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
बस्स. येव्हढं एक माफ करा. हे पुढच्या भागात टंकतो. आता त्राण उरले नाहित.

आपलाच
मनोबा.

प्रतिक्रिया

खुप रोचक माहिती मिळतेय मनोबा तुझ्या या मालिकेतुन.
वाचनखुण साठवली आहे. :)

अन्या दातार's picture

18 Mar 2011 - 5:19 pm | अन्या दातार

असेच म्हणतो!

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 5:15 pm | प्रसन्न केसकर

वाचतो आहे.
एक शंका जो जुना करार ज्यु आणि ख्रिश्चन मानतात तोच नावे बदलुन मुस्लीमही मानत नाहीत काय? की इस्लाममधील मेटॅफिजिक्स वेगळे आहे?

मन१'s picture

18 Mar 2011 - 5:52 pm | मन१

"जो" जुना व नवा करार (सध्या ) ख्रिश्चन मानतात, तो मुस्लिम मानत नाहित.
इस्लाम ची स्वतःची अशी जुन्या व नव्या कराराची version आहे.
उदा:- मनुष्य जन्मतःच पापी आहे असं (ख्रिश्चनांच्या) नव्या करारात पुन्हा पुन्हा सांगितलय.
ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्यात आलं असं लिहिलय. पण इस्लामिक श्रद्धेनुसार ख्रिस्ताला मुळी क्रुसावर चढवल गेलच नाही!
प्रस्थापित ख्रिश्चन मतानुसार येशू हा देवपुत्र होता. आणि त्याचा जन्म इतर मानवांपेक्षा वेगळा झाला असं मानलं जातं.(नाहितर त्याचाही जन्म पापातूनच झाला असं म्हणायची वेळ येउ शकते.)
इस्लामिक मतानुसार, येशू प्रेषित होता, देव पुत्र नाही. त्याला क्रुसावरही चढवलं गेलं नाही. क्रुस घटानेचा केवळ भास अलम् दुनियेला घडवण्यात आला.
थोडक्यात, इस्लाम,ज्यू आणि ख्रिस्त हे तीघही अब्राहमाचा वारसा सांगतात. मात्र काही काही घटना आणि संदर्भ प्रत्येक धर्मात वेगळे येतात.

आता तुमच्या "ओळख बायबलची " मधलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर, ख्रिस्त आणि ज्यू परंपरेनं ईव्हला आत्यंतिक दोषी मानलय.अ‍ॅडम्-ईव्हला पापातला भागिदार मानलय. मात्र, इस्लाम मध्ये दोघंना समान दोषी मानुन ईश्वर क्रुद्ध होतो, क्षमायाचनेनंतर माफही करतो आणि स्वतःचे प्रतिनिधी म्हणुन पृथ्वीवर पाठवतो, शिक्षा करायला म्हणुन नाही.

ज्यू-ख्रिश्चन मतानुसार अब्राहम आपल्या ईश्वर निष्ठेची साक्ष देण्यासाठी देवाला आपला धाकटा मुलगा आयझॅक(ज्यूंचा पूर्वज,सराय ह्या पत्नीपासुन झालेला पुत्र ) अर्पण करतो ,बळी देउ इच्छितो. मात्र इस्लामिक मतानुसार अब्राहम ह्या पवित्र कामासाठी आपला थोरला मुलगा इस्माइल (अरबांचा पूर्वज, हग्गर ह्या दुसर्‍या पत्नीपासुन झालेला पुत्र ) ह्याला निवडतो.
ज्यूंच्या आणि ख्रिश्चनांच्या करारांत मक्का-मदिनेचा फारसा उल्लेख नाही.
इस्लामिक परंपरेत मक्का मदिना हे अब्राहमानच स्थापन केलेत(धार्मिक पवित्र पीठं म्हणुन) आणि वंशपरंपरेनं महंमदाकडे ते कसे आले ह्या उल्लेख आहे.

तर, सांगायचं म्हणजे, ह्या सगळ्यांचे नवे-जुने करार थोडेफार वेगवेगळे आहेत.
(कधी कधी कथा अगदि सारख्या आहेत, पण मग interpretation वेगळे आहेत!)
आपलच मनोबा.

प्रसन्न केसकर's picture

18 Mar 2011 - 6:26 pm | प्रसन्न केसकर

पटलं!
अश्या अँगलने पाहिले तर प्रत्येक धर्माचे स्वतःचे मेटॅफिजिक्स तयार होऊ शकते.

वाहीदा's picture

18 Mar 2011 - 7:29 pm | वाहीदा

Both Arabs and Isrealis are cousins and have indirect relations with each other and offcourse Prophet Muhammad(pbu) who himself was an Arab then obviously has relations with Jews or Isrealis.

Jews are the descendants of Isaac(pbuh) and Arabs are the descendants of Ismail(pbuh) ,both Isaac(pbuh) and Ismail(pbuh) were brothers.

Abraham(pbuh) the father of Ismail(pbuh) and Isaac(pbuh) had 2 wives 1)Hajra ,2)Sarah(Sera).

Sarah gave birth to Isaac(pbuh) and Hajra gave birth to Ismail(pbuh).

This is why you see similarities between culture and religion of Muslims and Jews.

ज्यू-ख्रिश्चन मतानुसार अब्राहम आपल्या ईश्वर निष्ठेची साक्ष देण्यासाठी देवाला आपला धाकटा मुलगा आयझॅक(ज्यूंचा पूर्वज,सराय ह्या पत्नीपासुन झालेला पुत्र ) अर्पण करतो ,बळी देउ इच्छितो. मात्र इस्लामिक मतानुसार अब्राहम ह्या पवित्र कामासाठी आपला थोरला मुलगा इस्माइल (अरबांचा पूर्वज, हग्गर ह्या दुसर्‍या पत्नीपासुन झालेला पुत्र ) ह्याला निवडतो.

तो पर्यंत इसाक / आयझैक चा जन्म झाला नव्हता.
असो, इब्राहिम / अब्राहम यांच्या त्यागाचे प्रतिक म्हणूनच ‍ईद-उल-जुहा (Eid-uz Zuha) / बकर-ईद साजरी होते.

The Eid-uz Zuha commemorates the mental agony of Prophet Ibrahim/ Abraham.

Prophet Ibrahim had been put to a test by God when he was asked to sacrifice whatever was the dearest to him and he decided to sacrifice his first born son, Ismaeil / Ishmael On the altar at the mount of Mina near Mecca, as he was on the point of applying the sword to his son's throat, it was revealed to him that it was only a test to determine his measure of submission to Divine commandments and his love for his Creator.

The feast of Bakr-Id is an occasion to give and to sacrifice. It is a day to thank the Almighty for one's good fortune and to share it with the less fortunate brethren.

Id-ul-Zuha, or Id-ul-Azha, as it is called in Arabic, translates as 'the feast of sacrifice'. Popularly, Bakr-Id is marked by the slaughter of animals as sacrificial offerings, after which the meat is distributed among the needy and deprived.

However, the concept of sacrifice is better understood through an incident from the Old Testament (Bible) , explanation of the concept of Bakr-Id.

As we look at the historical background of the Id-ul-Zuha, we gain information that ALLAH (ALMIGHTY) had commanded Prophet Ibrahim (Abraham) to sacrifice his son Ismail on Mount Mina near Mecca. Ibrahim, unable to see himself kill his son, blindfolded himself and carried out the pronouncement of God. When he took off the blindfold, a lamb lay slaughtered on the altar and his son stood there unharmed. Ibrahim understood then that this willingness on his part to give up his only son was what God sought, and not the sacrifice of human flesh and blood. Thus, the history of Bakr-Id confirms the belief of the devouts that God requires of man is a surrender of his will and self. Like Ibrahim, who willingly surrenders his beloved son to God, a true follower of Islam is expected to sacrifice something that is dear to him.

The animal sacrifices made during Bakr-Id are mainly to provide food to the poor and to commemorate the noble act of Ibrahim (Abraham) .

मन१'s picture

19 Mar 2011 - 7:07 pm | मन१

आत्ताच विकिपीडिया बघितला. http://en.wikipedia.org/wiki/Binding_of_Isaac इथं मी म्हणतोय तशी माहिती सापडली. काही हिब्रू दुवे सुद्धा जाउन पाहिले. तिथेही मी म्हणतोय तसाच उल्लेख आहे.
बहुतांश ख्रिश्चन आणि सर्व ज्यू समाजात हीच धारणा आहे.

"प्रेषित अब्राहमानं बळीसाठी आपला थोरला पुत्र इस्माइल ह्याची निवड केली. " हे मत सध्या सर्व अरब आणि मुस्लिम समाजात मानलं जातं.

कथेच्या दोन्ही भागात समान गोष्टी ह्या आहेतः-
ह्या घटनेनं अब्राहमाची ईश्वरनिष्ठा व त्याग दिसुन येतो. इतर मानवांनी त्यातुन काय शिकण्यासारखं आहे व अनुकरणीय(स्वतः करण्ण्यासारखं) काय आहे ते.

वेगळ्या गोष्टी:-
१.घटना कुठे घडली:-
१.१तुम्ही म्हणताय अरबस्थानात, "मीना" ह्या ठिकाणी(हेच म्हणताय ना? नसल्यास दुरुस्त करा.) बळी देण्यासाठी ईश्वराला आवाहन केलं गेलं.
१.२ज्यू आणि ख्रिश्चन मतानुसार बळी दिली ती जागा-- माउंट मोरिया ही इस्रएल्/पॅलेस्टाइन मधील जरुसलेमच्या जवळ आहे.
त्याच जागेवर, बळी दिलं त्या दगडावर पुढे सोलोमन्/सुलेमान ह्यानं टेम्पल ऑफ सुलेमान बांधलय.

२.बळी कुणाला दिलं
२.२आणि तुम्ही म्हणताय कथेत बळीसाठी निवडलेला पुत्र ईस्माइल आहे, आयझॅक नाही.
२.३सध्याच्या ज्यू मतानुसार बळीसाठी निवडलेला पुत्र हा ज्यूंचा पूर्वज आय्झॅकच आहे.

हां आता याउपर तुम्ही तुमचं स्वतःच मत अधिक योग्य आहे हे इथं जाहिरपणं नक्कीच म्हणु शकता. ते तुम्हाला का वाटतं हे ही इथं साधार सांगु शकता.
त्याला लागतिल ते दुवे आणि संदर्भ इथं दिलेत तर अधिक योग्य होइल.
अधिकाधिक लोक तुमचं मत मान्य करु शकतात.
आपण पूर्वीपासुन त्या वातावरणात वाढला असाल तर आपल्याकडं माहिती जास्ती असणं शक्य आहे.
मी सध्या एक त्रयस्थ, थर्ड पर्सन म्हणुन वाचतोय. सध्या तरी माझ्या हाताला लागलय ते सगळ्यांसमोर ठेवणं हे काम मी जमेल तसं करतोय, उजवं-डावं , चूक-बरोबर करण्यासाठी संशोधकांनी अस्सल इतिहाचे पुरावे पाहिले पाहिजेत.(मूळ संहिता, शिलालेख, तेव्हाची नाणी, इतर लोक कथांमधुन येणारे संदर्भ वगैरे ) हे काम अस्सल अभ्यासकाचं किंवा इतिहासकाराचं आहे. लोकांचे ह्यात जन्मच्या जन्म गेलेत.

इथे अतिखोलात जाणं ह्या पामराच्या आवाक्याबाहेर आहे. फक्त त्यातल्या कथा आणी प्राथमिक तोंडओळख इथे मांडणे हा उद्देश आहे.
पण एकच म्हणणं आहे, जे काही आहे ते इथेच म्हणत चला, लेखातली माहिती चूक वाटली तर बरोअबर वाटणारी माहिती अशीच इथे द्या. न जाणो कुणाला तीच जास्त पटॅल.

आपलाच
मनोबा.

म्हणून मी सांगत होते कोठल्याही साईटवर पाहू नकोस
असो,
ज्या साईटवर हे सर्व लिहीले होते ती साईटच हैक झाली आहे.

नशिब ! मी म्हणते त्याचा संधर्भ इथेतरी सापडला
http://www.theholidayspot.com/islamic/muharram/id_ul_zoha.htm

mount of Minanear = mount of Mina
(mount of Mina की दुसरा कोणता mount याबध्दल मी अभ्यासकरुन प्रतिसाद टंकेन)

http://www.anusha.com/isaac.htm -- यात तुम्हाला मी सांगीतलेल्या बारकाव्याचे प्रूफ सापडतिल
बाकीचे लिंक
http://www.islamawareness.net/Prophets/ismail.html

असो ,
या बाबतित इंटरनेट वॉरही सुरु आहेत :-( मी संधर्भ शोधून देते, जरा वेळ द्यावा म्हणजे तुझ्या सर्व विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळतिल.
हा वाद न सुटणारा आहे.

पण सर्वात महत्वाचे या सगळ्यात काय आहे तर प्रेशित इब्राहिम / अब्राहिम यांची त्यागवृत्ती, त्या पुढे सर्व वाद नगण्य !!

I personally feel it is nonsense to fight on such thing rather than to pay attention on Sacrifice , and feed the hungry and poor.

कुराणातही स्वतःच्या हाताने गरिबाला / भुकेलेल्याला जेऊ घालणे / भरविणे याला महत्व आहे

तुर्तास एवढेच म्हणेन पुढे जा ...
अन हो जमशेद अन झोराष्ट्रीयन (पारसी धर्म )बध्दल ही लिहावे कारण तो ही अतिशय महत्वाचा भाग आहे. :-)

प्रचेतस's picture

18 Mar 2011 - 5:18 pm | प्रचेतस

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
वाचनखूण साठवली आहे.

मस्त.

वाहीदा's picture

18 Mar 2011 - 6:35 pm | वाहीदा

Gabriel was the medium through whom God revealed the Qur'an to Prophet Muhammad
The angel Gebraee (Jibril) was dictating him the Quraan From ALLAH
and the Hadith are what the Prophet said by himself.

देवदूत जिब्राईल / गाब्राईल बध्द्ल येथे वाचता येईल ज्यांचा उल्लेख तिन्ही धर्मग्रंथात आहे
http://en.wikipedia.org/wiki/Gabriel

Islam is very clear on the concept of God and the concept of Prophet so that there is no confusion or ambiguity in the minds of Muslims between the two. Islam distinguished between
a) The word of Allah brought by the angel Jibreel (Gabriel) as revelation, known as the Qur’an; and
b) The words of Prophet Muhammad (sallallaahu Walaihi wa sallam) which are known as the Hadith.

ज्यूंचा धर्मग्रंथ बायबल नव्हे तो ज्यूंचा धर्मग्रंथ तौरात आहे
अवांतर : कामाच्या गडबडीत असल्याने तुर्तास एवढेच ....

jaydip.kulkarni's picture

18 Mar 2011 - 7:17 pm | jaydip.kulkarni

उत्तम लेख आहे ......... बरेच नविन वाचायला मिळाले ...............................
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.

अभिज्ञ's picture

19 Mar 2011 - 5:30 am | अभिज्ञ

खरेतर या विषयाचा गाभा खुप मोठा आहे,त्याअनुषंगाने हा लेख खुप संक्षिप्त व विस्कळित झालाय.
परंतु हे सर्व टंकणे खुपच वेळकाढु आहे ह्याची कल्पना आहेच.
:)

परम्तु तुम्ही चालु केलेला उपक्रम स्तुत्य आहे.
लिहीत रहा.वाचतोय.

अभिज्ञ.

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2011 - 7:34 am | नगरीनिरंजन

फार छान माहिती! बरंच नवीन कळतंय. लिहीत राहा.

लई भारी माहिती येते आहे, येउ द्या अजुन वाचनखूण साठवली आहे.

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 2:05 pm | अप्पा जोगळेकर

जबरदस्त. किती माहिती हो. एन्सायक्लोपीडियाच.

तेच कार्थेज ज्यांनी पुढील काळात महाबलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी हन्निबल ह्याच्या नेतृत्वात दोन हात केले.

हिस्टरी चॅनेलवर यासम्दर्भात एक कार्यक्रम पाहिला होता. आल्प्स मधून हत्ती चढवण्याचे अशक्य वाटणारे कॄत्य हानिबाल्ने करुन दाखवले आणि रोमनांची धूळधाण केली. या युद्धातून वाचलेल्या रोमन सम्राटाच्या मुलाने नंतर हानिबलला हरवल. बस्स एवढंच आठवतंय. जाणकारांनी अधिक माहिती दिल्यास आवडेल.

इब्राहिम, येशु, महम्मद हे एकाच कुळातील आहेत. त्यानी ३ धर्म स्थापन केले तेही एकाच गावात जेरुसलेम.

गणपा, अन्या, केसकरजी,वल्ली, आत्मशून्य,जय्दीपजी ,जागो मोहन प्यारे, सौरभ,५० फक्त ,अभिज्ञ, नगरी निरंजन, अभिज्ञ प्रतिसादांचा धावफलक हलता ठेउन माझी विकेट वाचवल्याबद्दल आभार.
सामन्यागणीक,लेखागणिक आपण अधिकाधिक गोष्टी explore करुयात.
(विश्वचषक ज्वराचा परिणाम!!)

केसकरजींचे विशेष माहितीसाठा खुला करण्यासाठी आभार.
वाहिदाजी आपले बहुतांश दुवे वाचले. वाचुन इतकं नक्की म्हणेनः-
I have learnt that the story of Taurat or Bible has one version of story. Holy Quran has other one.(but mostly similar.) Students of Islam believe that the correct version is mentioned in Holy Quran.

बाकी तुम्ही दुवे/लिंक्स देत चला, न जाणो वाचुन कुणाला पटतीलही. मला जे सापडेल ते मी मांडतोच आहे.

आपलाच
मनोबा

वाहीदा's picture

21 Mar 2011 - 12:33 pm | वाहीदा

http://www.islam21c.com/theology/172-abraham-the-man-behind-the-hajj

(ज्या वेगाने या विषयावरील साईट अन त्यावरील माहीती hack हो आहे त्यावरुनतरी हि वरिल लिंक किती दिवस राहील हे माहीत नाही :-( )

असो मी महत्वाचा भाग देत आहे इब्राहिम / अब्राहम हे परमेश्वराला पूर्णत: शरण जाणारे पहिले प्रेशित होते

Known as the father of the three Abrahamic faiths, Abraham is considered the friend of Allah in the Islamic tradition and holds an esteemed position amongst the Prophets and Messengers of Islam.

Furthermore, Islam holds that Judaism and Christianity are not separate religions but deviations from Abraham's original teachings of monotheism also known as AL-HANAFI (Someone who surrenders Almighty completley)

The Qur'an states,
And they say: Be Jews or Christians, then you will be rightly guided. Say: nay, but (we follow) the religion of Abraham, the monotheist, and he was not of those who associated partners with God.

1 Abraham was not a Jew, nor yet a Christian; but he was a monotheist (Hanif) who had surrendered to Allah (Muslim), and he was not of those who associated partners with God. :-)

2 In these verses, Allah establishes the fact that Abraham did not belong to a 'religion', but was a monotheist who surrendered to the commandments of God.

परमेश्वराची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण तोच तिन्ही जगाचा निर्माता आहे.
म्हणून इस्लाम मध्ये ७८६ ला महत्व आहे
७+८+६ = २१ = २+१ = ३ (No.3 Which Indicated ALMIGHTY)
तिन्ही जगाचा स्वामी फक्त अन फक्त परमेश्वर !!
जो परमेश्वराला पूर्णत: शरण जातो त्यालाच मुस्लिम असे म्हणतात. "खुदा के अलावा कोई माबूद नहीं !
"

विसुनाना's picture

21 Mar 2011 - 1:25 pm | विसुनाना

अबजाद पद्धतीप्रमाणे ७८६ = बिस्मिल्लाह इर्रहमानिर्रहीम = अल्लाहच्या नावाने जो दयाळू आणि प्रेमळ आहे .
नाही का?

वाहीदा's picture

21 Mar 2011 - 1:45 pm | वाहीदा

ती खरेतर मू़ळ पध्दत आहे. जिथे वर्णाअक्षरांना नंबर दिले आहेत

मग ७७७ का महत्व नाही?

आणि ५८९ ला?

आणि ६८७?

आणी १११?

आणि....

बरं मी काय म्हणतो.. थेट ३लाच महत्त्व द्याना.. बातच खतम!

म्हणून ७८६ च

इतकच नाही तर मूळ इस्लाम मध्ये कुणाचेही दर्गे बनवायला, तिथे उरुस भरवायलाही मनाई आहे!

हे मी म्हणत नाहिये, खूप सारे मौलवी म्हणताहेत! हा एक दुवा बघा:-
Read more: http://wiki.answers.com/Q/What_is_786_in_Islam#ixzz1HDsqBnHA
http://www.youtube.com/watch?v=SNraVirlP8U&feature

यु ट्युब वरती , इस्लाम बद्दल प्रवचन देणारे झाकीर नाइक सुद्धा दिवसभर PEACE TV वर हेच म्हणतात.
वहाबी मूव्हमेंटवर विश्वास असणारे लोक, कुर्आन किंवा हादिस मध्ये ७८६ आणि दर्गा ह्यांचा उल्लेख नसल्या कारणानं ७८६/दर्गा हटवुन टाकले पाहिजेत, पुसुन टाकले पाहिजेत असं म्हणतात.

७८६ला पवित्र मानण्याचा उद्देश जरी अल्ला" ची भक्ती असला, तरी , इस्लामच्या मूळ शिकवणीनुसार तसं करणं चूक आहे. असं बरेचसे श्रद्धावंस्त मानतात.

काहिंचा अंदाज आहे की सुरुवातीला जे हिंदु मस्लिम बनले, त्यांची थॉट प्रोसेस हिंदुंचीच होती. ती जायला काही वेळ लागला. पण त्यांनी त्या दरम्यान आपल्या विचारपद्धतीनुसार, अब्जादी पद्धत वापरुन ७८६ असं ठरवलं. हा काळ अब्बासिद सत्तेचा होता. अब्बासिद सत्ता महंमदाच्या काळानंतर निदान १००-१२५ वर्षांनी अस्तित्वात आली. तोपर्यंत ७८६ ला मह्त्त्व नव्हतं.

डिसक्लेमरः- . इस्लामच्या मुस्लिम अभ्यासकांची आणि कित्येक श्रद्धावंत मुस्लिमांची मतं मी वरती लिहिलित. माझी नव्हे.

आप्लाच
मनोबा.

दर्गाह ला देव मानणे चुकीचे आहे अन त्यावर उदर्निवाह करणे त्याहूनही जास्त चुकीचे आहे :-)

अबजाद हि अरेबिक सिस्टीम आहे
http://www.abjad.com/about.html

७८६ चुकीचे आहे की नाही किंवा ती हिंदू पध्दत आहे की नाही यावर माझा अभ्यास नाही त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही .

अबजाद यांचा हिंदू धर्माशी काहीही संधर्भ नाही.

मी वहाबी नाही म्हणून मी वहाबींच्या मतांशी किंवा जाकीर नाईक यांच्याही सर्व मतांशी सहमत नाही .

असो ,
अंदाज अपना , अपना !

(आता मिटिंग ला पळते ... नंतर उर्वरित :-)

प्रसन्न केसकर's picture

21 Mar 2011 - 5:52 pm | प्रसन्न केसकर

७+८+६ = २१ = २+१ = ३ (No.3 Which Indicated ALMIGHTY)
इंटरेस्टिंग!
कृपया जरा सविस्तर लिहा. वाटल्यास वेगळा लेख येऊ दे.
ख्रिश्चॅनिटीसंदर्भात ३ हा आकडा अनेक अर्थांनी येतो. इस्लामशी निगडीत अर्थ काय आहेत समजावुन घ्यायला आवडेल.

नितिन थत्ते's picture

21 Mar 2011 - 6:14 pm | नितिन थत्ते
प्रसन्न केसकर's picture

21 Mar 2011 - 6:27 pm | प्रसन्न केसकर

मी त्या संदर्भात म्हणले नाही. ३ आकडा वगैरेबाबत जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.

>

बायबल जे आज आपण बघतो ते येशू नंतर किती वर्षांनी लिहीले गेल?

नितिन थत्ते's picture

21 Mar 2011 - 12:41 pm | नितिन थत्ते

आपल्या म्हणण्याच्या विपरीत माहिती ज्या साईटवर दिसेल ती हॅक झालेली असते असा बोध आम्हाला या धाग्यातून मिळाला आहे. :)

वाहीदा's picture

21 Mar 2011 - 12:49 pm | वाहीदा

नाही काका,

ज्या साईट वर काही दिवसापूर्वीचा मूळ लेख गायब होणे याला किंवा त्यावर कार्टून दिसावेत अशी साईट हॅक म्हणावी :-(

प्रेशित युसुफ (Joseph) हे सर्वात Handsome होते, त्यांच्यावर बहुतेक तरुणी अन लग्न झालेल्या स्त्रीयाही फिदा होत्या
:-)

अन त्याच्यांबद्धल कुराणात, बायबल , अन तौरात मध्ये जे आहे त्यात काहीच जास्त फरक नाही.

It is related that among the reasons for its revelation is that the Jews asked the Prophet Muhammad (pbuh) to tell them about Yusuf (pbuh) who was one of their old prophets

http://www.islamicboard.com/prophets-islam/1703-prophet-yusuf-joseph.html

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुंदर लिहितो आहेस मनोबा :)

धन्यवाद आमच्या ज्ञानात भर घालत असल्याबद्दल. विशेष म्हणजे हे सर्व ज्ञान मराठीतुन येत असल्याने तुझे विशेष कौतुक करावेसे वाटत आहे.

वाखू साठवली आहेच.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 6:38 pm | धमाल मुलगा

मनोबा,
लेखमाला उत्तम होते आहे. नवनवीन माहिती कळते आहे.
अर्थातच वाचनखूण साठवत चाललो आहेच.

@वाहिदा:
तुमचे बरेचसे प्रतिसाद इंग्रजीत आले आहेत, त्याऐवजी कृपया मराठीमध्ये ते भाषांतरीत करुन द्याल काय? संदर्भासाठी त्या त्या संकेतस्थळाची लिंक दिली तरी चालू शकेल असं वाटतं.

अवांतरः वाहिदा ह्या मनोबाला एका प्रतिसादात म्हणतात की "म्हणून मी सांगत होते कोठल्याही साईटवर पाहू नकोस" आणि सतत हॅक होणार्‍या साईटवरिल मजकूर संदर्भासाठी देत आहेत हे मात्र त्रांगडं कळेना.

मी दिलेल्या कुठ्ल्या हि साईटची लिंक हॅक नाही फार शोधून शोधून दुवे दिले आहेत.
बॉस ची नजर चुकवून ..

मी सुरवातीला हे सांगीतले कारण मला वाटले मनोबा मुळ धर्मग्रंथाच्या प्रति आणून वाचेल.
तो फक्त हिब्रू (जो की ज्यूईश ) बायबल अन बायबल टेस्टामेंट वाचत आहे. तो कुराणातील संदर्भ वाचतच नाही :-(

मराठीत समजविणेही मला तितकेसे जमत नाही. अन मी इस्लामिक स्कॉलर ही नाही.

पण मला परमेश्वरावर अढळ श्रद्धा आहे. अन त्याच्या एकेश्वरवाद Uniqueness वर माझा पूर्ण विश्वास आहे
परमेश्वर आहे अन निश्चित पणे आहे !
"जिसका कोई नहीं, उसका खुदा तो जरुर हैं " हे नितांत सत्य आहे