( पेटवी लंका हनुमंत )

अर्धवट's picture
अर्धवट in जे न देखे रवी...
3 Apr 2011 - 11:42 am

कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...

गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला... या घरी विश्वचषक आला" लिहायचा विचार आहे.. :))

लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत

उडे दांडकी सेहेवागाची.
बॅट कोसळे मग 'देवा'ची
चिता भडकली जणूं चिंतेची
राक्षसी करिती आकांत

कुणी पळाले हरल्या पायी
रिमोट मग कुणी टाकून देई
कुणि भीतीनें अवाक होई
वरून तो सडका श्रीशांत.

गंभीरा पण नक्की ठावे
सवे कोहली हळूच धावे
कप्ताना कर्तव्य आठवे
अचानक आला कल्पांत

या सीमेहून, त्या सीमेवर
कंदुक पळतो, नुरे भुईवर
गंभीराचा स्ट्रोक भयंकर
चालला धावा जमवीत

उडे मलिंगा, फुटे थीसारा,
मुरली पोकळ, कुणा न थारा
रडे, ओरडे तों रणदिव
कुमारा पडला चिंतेत

सहज फोर ते असे मारती
विजेपरी तें सिक्स मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करती फलंदाज

आकांक्षा मग पुन्हा उसळल्या
युवराजांच्या बाहू स्फुरल्या
पवित्र मंगल घटिका भरल्या
मातृभू बुडे उत्सवात

धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास

......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत

वीररसविडंबन

प्रतिक्रिया

दगड्या's picture

3 Apr 2011 - 12:31 pm | दगड्या

अप्रतिम ...केवळ अप्रतिम....

विनायक बेलापुरे's picture

3 Apr 2011 - 12:34 pm | विनायक बेलापुरे

:)

चंबा मुतनाळ's picture

3 Apr 2011 - 12:40 pm | चंबा मुतनाळ

मस्त कविता!!
आंतरजालावर फिरवण्यासारखी झाली आहे!!

फिरवा की मग.. नाव लिहा म्हणजे झालं..

प्रास's picture

3 Apr 2011 - 1:54 pm | प्रास

नावासकट.... :-)

गणपा's picture

3 Apr 2011 - 1:36 pm | गणपा

जबरान रे अर्धवटा.

>>>>>बॅट कोसळे मग 'देवा'ची
कालच्या सामन्यात देवा ची बॅट कोसळल्यावर आम्हाला कोसळायची वेळ आली होती. :)
राम नामामुळे काल युद्धात विजय मिळाला तेव्हा दोन-चार ओळी आमच्या रामाबद्दल
जास्त लिहायला पाहिजे होत्या राव. :)

राम.
[लोकमत आवृत्ती औरंगाबादमधून साभार]

-दिलीप बिरुटे
[राम भक्त ] :)

खरंय..
रामनामाचा महीमाच तसा आहे.. शीजंत सारखे दगडही तरलेत..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2011 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शीजंत सारखे दगडही तरलेत..

लंबर एक..........! :)

-दिलीप बिरुटे
[इहलोकातील दगड]

सुधीर's picture

3 Apr 2011 - 2:18 pm | सुधीर

तुमच्या प्रतिभेला सलाम! झकास जमलीए!!

प्रीत-मोहर's picture

3 Apr 2011 - 3:54 pm | प्रीत-मोहर

अर्ध्या _/\_

मस्त झालिये कविता:)

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 6:25 pm | चतुरंग

अर्धवटराव एकदम मस्तच. एकूणएक कडवी तुफान जमली आहेत! :)

रंगा

स्वछंदी-पाखरु's picture

3 Apr 2011 - 6:36 pm | स्वछंदी-पाखरु

कविता मस्त जमलीये पण.... पूनम नाहीये हो कुठे हि....... :(

स्वपा

उगाच हं

प्राजु's picture

3 Apr 2011 - 7:17 pm | प्राजु

तुफ्फान!! जबरदस्त झालीये कविता/गाणे..
अगदी चाल लावून आंतरजालावर फिरवावे..असे!

सगळा वृत्तांत मस्त कव्हर झालाय.. :)

मेघवेडा's picture

4 Apr 2011 - 3:24 am | मेघवेडा

धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा

ब्येष्ट!! खरंय.. समर्थांचं तंतोतंत ऐकलं आपल्या संघानं काल.. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा! :)

एक नंबर रे अर्धवटा! आता पुढलं अर्धवट ठेवू नकोस.. लौकर येवू दे! :)

अमोल केळकर's picture

4 Apr 2011 - 10:37 am | अमोल केळकर

खुप छान

अमोल

sneharani's picture

5 Apr 2011 - 10:18 am | sneharani

मस्त झालीये कविता!!
:)

गणेशा's picture

5 Apr 2011 - 2:24 pm | गणेशा

मस्त

साहेबांच्या गौरवार्थ शेवटचं कडवं पुन्हा आठवलं..
स्वतःच जरा जुना धागा वर आणतोय त्याबद्दल क्षमस्व

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 6:32 pm | चौकटराजा

अर्धवटाने कविता लिहिली
एकदम, पूर्ण, अन मस्त !

बॅटमॅन's picture

23 Apr 2013 - 9:51 pm | बॅटमॅन

अप्रतिम, केवळ अप्रतिम!!!!

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी

या कवितेचा दुवा दिल्याबद्दल सुधीर यांचे आभार...

सुहास झेले's picture

23 Apr 2013 - 10:04 pm | सुहास झेले

सहीच.... :) :)

सुधीर's picture

24 Apr 2013 - 8:58 am | सुधीर

अहो माझे आभार कसले, इथल्या बर्‍याचजणांकडे जबरदस्त प्रतिभा आहे. काही लेख अन काही कविता लक्षात राहतात त्यातलीच ही एक होती.

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2013 - 9:29 am | श्रीरंग_जोशी

मान्य आहे पण असे साहित्य प्रथमच वाचायला मिळाले की ज्याच्यामुळे मिळाले त्यास धन्यवाद द्यावेसे वाटणारच.

वपाडाव's picture

24 Apr 2013 - 9:33 am | वपाडाव

वाह... मस्त एकदम मस्त...

मूकवाचक's picture

24 Apr 2013 - 9:46 am | मूकवाचक

_/\_

प्यारे१'s picture

24 Apr 2013 - 10:26 pm | प्यारे१

सही. एकदम मस्त.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2013 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

जय हो............. जबराट लिवलय हो :)