( पेटवी लंका हनुमंत )

अर्धवट जे न देखे रवी...
कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन... गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला... या घरी विश्वचषक आला" लिहायचा विचार आहे.. :)) लीलया उडुनी वानखेडेत पेटवी लंका हनुमंत उडे दांडकी सेहेवागाची. बॅट कोसळे मग 'देवा'ची चिता भडकली जणूं चिंतेची राक्षसी करिती आकांत कुणी पळाले हरल्या पायी रिमोट मग कुणी टाकून देई कुणि भीतीनें अवाक होई वरून तो सडका श्रीशांत. गंभीरा पण नक्की ठावे सवे कोहली हळूच धावे कप्ताना कर्तव्य आठवे अचानक आला कल्पांत या सीमेहून, त्या सीमेवर कंदुक पळतो, नुरे भुईवर गंभीराचा स्ट्रोक भयंकर चालला धावा जमवीत उडे मलिंगा, फुटे थीसारा, मुरली पोकळ, कुणा न थारा रडे, ओरडे तों रणदिव कुमारा पडला चिंतेत सहज फोर ते असे मारती विजेपरी तें सिक्स मागुतीं आग वर्षवी नगरीवरती गर्जना करती फलंदाज आकांक्षा मग पुन्हा उसळल्या युवराजांच्या बाहू स्फुरल्या पवित्र मंगल घटिका भरल्या मातृभू बुडे उत्सवात धोनी, भज्जी, संघच सारा “देव” मस्तकी मिरवी प्यारा देवाच्या अन् भारतभूच्या नशीबीचा संपे वनवास ......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

29 टिप्पण्या 5,428 दृश्ये

Comments

चंबा मुतनाळ नवीन

मस्त कविता!! आंतरजालावर फिरवण्यासारखी झाली आहे!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

>>>>>बॅट कोसळे मग 'देवा'ची कालच्या सामन्यात देवा ची बॅट कोसळल्यावर आम्हाला कोसळायची वेळ आली होती. :) राम नामामुळे काल युद्धात विजय मिळाला तेव्हा दोन-चार ओळी आमच्या रामाबद्दल जास्त लिहायला पाहिजे होत्या राव. :) राम. [लोकमत आवृत्ती औरंगाबादमधून साभार] -दिलीप बिरुटे [राम भक्त ] :)

अर्धवट नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय.. रामनामाचा महीमाच तसा आहे.. शीजंत सारखे दगडही तरलेत..

प्राजु नवीन

तुफ्फान!! जबरदस्त झालीये कविता/गाणे.. अगदी चाल लावून आंतरजालावर फिरवावे..असे! सगळा वृत्तांत मस्त कव्हर झालाय.. :)

मेघवेडा नवीन

धोनी, भज्जी, संघच सारा “देव” मस्तकी मिरवी प्यारा
ब्येष्ट!! खरंय.. समर्थांचं तंतोतंत ऐकलं आपल्या संघानं काल.. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा! :) एक नंबर रे अर्धवटा! आता पुढलं अर्धवट ठेवू नकोस.. लौकर येवू दे! :)

सुधीर नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

अहो माझे आभार कसले, इथल्या बर्‍याचजणांकडे जबरदस्त प्रतिभा आहे. काही लेख अन काही कविता लक्षात राहतात त्यातलीच ही एक होती.

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by सुधीर

मान्य आहे पण असे साहित्य प्रथमच वाचायला मिळाले की ज्याच्यामुळे मिळाले त्यास धन्यवाद द्यावेसे वाटणारच.