अब्दुल खान - ४

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
8 May 2008 - 7:05 am

(पूर्वसूत्रः मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला?
आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!! ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....)

एका शनिवारी रात्री जेवण वगैरे आटोपून आम्ही आपापल्या खोल्यांत गेलो होतो. मी पलंगावर पडून काहीतरी वाचत होतो. बर्‍याच वेळाने खानची हाक आली,

"अरे सुलेश, जागे हो की सो गये?"
"क्या है खानसाब?"
"जरा इधर आना तो!"

मी त्याच्या खोलीत गेलो. बघतो तो जमिनीवर खोलीभर कागद पसरलेले आणि हा त्यामधे बसलेला. त्याच्या हातात एक फॉर्म होता.

"जरा ये पढकर मीनिंग बताना तो, ये पॉईंट मेरी समझमें नही आ रहा के क्या पूछा है!"
मी तो फॉर्म हातात घेऊन वाचला. बघतो तो न्यूयॉर्क मेडिकल बोर्डाच्या लेखी परीक्षेचा ऍप्लीकेशन!
"खानसाब ये आपके पास कैसे?" माझं आश्चर्य.
"कैसे मतलब? मुझे एक्झाम लेनी है लेकिन ये ससुरे ऍप्लिकेशनमें ये पॉईंट समझमें नही आ रहा की उनको क्या इन्फर्मेशन चाहिये!"
"आप ये एक्झाम लेंगे? लेकिन ये तो डॉक्टर लोगोंके लिये है. आप कैसे लेंगे?"

बाहेरच्या देशांतील डॉक्टरांना अमेरिकेत प्रॅक्टिस/ हॉस्पिटलांत नोकरी करण्याआधी इथे रेसिडेन्सी करावी लागते. त्या रेसिडेन्सीत प्रवेश मिळवण्याआधी ही अतिशय अवघड परीक्षा पास व्हावी लागते.

"कैसे का क्या मतलब? डॉक्टर हूं इसलिये!"
"आप और डॉक्टर?' माझ्या आश्चर्याचा कडेलोटच झाला.
"अबे नही तो फिर क्या कसाई दिखता हूं?" तो वैतागला.
"तो फिर आपका रातका बाहर जाना...."
"अरे वो टेंपररी जॉब है मेरा. रातको वह जॉब करता हूं इसलिये दिनमें थोडीबहुत पढाई कर पाता हूं"
"अच्छा?"
"तो तुम्हें क्या लगा, रातको मैं रंडियां घुमाने जाता हूं? अरे मॅनहॅटनके एक बँकमें सिक्युरीटीमें हूं मैं!"

मी त्याच्याकडे बघत राहिलो. माझ्या डोळ्यांतला अविश्वास त्याने ओळखला.

"अरे ये देखो, ये मेडिकल डिग्री है मेरी!" त्याने एक जुना कागद काढून माझ्या हातात दिला. पाहतो तर खरंच पाकिस्तानातल्या एका मिलीटरी मेडिकल कॉलेजचं सर्टिफिकेट! त्यावर इंगजीत अब्दुल खानचं नांव!!
"खानसाब, आप मिलीटरी डॉक्टर हैं?" मी उभ्या आयुष्यात इतका आश्चर्यचकित कधी झालो नव्हतो!!
"है नही, था!" मग त्याने त्याची कथा सांगितली.

अब्दुल खानचा जन्म पेशावरजवळचा. त्याचे आजोबा आणि वडील वस्तीचे प्रमुख होते, लष्करात काम केलेले होते. त्याच्या आजोबांनी खान अब्दुल गफ्फारखानांच्या विचारांनी प्रभावित होऊन याला फॅमिली-व्यवसायांत न गुंतवता डॉक्टर करायचं ठरवलं. पठाणांच्या शिरस्त्याप्रमाणे हा लष्करात भरती झाला आणि स्वतःच्या हुशारीवर मिलीटरी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला.

"तुम्हें पता है, मैं एक फेमस पोलिटिकल लीडरके मेडिकल पॅनलपर था."
"तो फिर?"
"बादमें कू-डे-टा हुआ और मिलीटरीने टेक-ओव्हर कर लिया. उस लीडरको मारा दिया गया. उसके सब नजदिकी लोगोंको हॅरेसमेंट शुरू हुयी. हम सब तितरबितर हो गये"

आता मला तो लीडर कोण असेल याचा जरासा अंदाज आला.

"लेकिन खानसाब, आप तो मिलीटरीमेंही थे, फिर आपकोही हरासमेंट कैसे हुयी?"
"तू तो बच्चा है, सुलेश! अरे मेरी नौकरी फौजमें थी इसका मतलब ये नही के मैं ऑटोमेटिकली डिक्टेटरशिप फेवर करता हूं. हम डेमॉक्रसी चाहते है इसलिये तो उस लीडर के साथ थे. आर्मीमें ये बात पता थी. उसमेंभी नयी रेजीम को शरियत का अंमल चलाना था. हम तो मजहब को पर्सनल मॅटर समझते है. बस, हम अनवेलकम हो गये. बडी मुश्कीलसे मैं वहांसे जान बचाकर भागा और लंडन जा पहुंचा. वहांसे पोलिटिकल असायलम लेके अमरिका आया. तभीसे इस न्यूयॉर्कमें हूं."
"और आपका नाईटजॉब?"
"हां! एक्स-आर्मी होनेसे यहां सिक्युरिटीने जॉब मिला. मिलीटरी ट्रेनिंग थी ना मेरे पास! सोचा, ये तो टेंपररी है, अपने मेडिकल पेशेमें काम मिलनेतक करूंगा!! बादमें पता चला की यहां इम्तहान लेनी पडती है और वह बहुत डिफिकल्ट है. इसलिये नाईटड्यूटी मांगकर ले ली. तभीसे रातको काम करके दिनमें जितनी हो सके पढाई कर लेता हूं."
"आपका और कोई रिलेटिव्ह है?"
"अरे हां फिर! पाकिस्तानमें मेरी औलाद है, एक बेटा और एक बेटी! ये देखो..." त्याने एक फोटो दाखवला. फोटोत दोन गोड मुलं आणि एक स्त्री होती.

"वह इन बच्चोंकी अम्मी, मेरी बीवी!" त्याचा आवाज कापरा झाला होता.
"अब बच्चे कहां है?"
"उनके चाचा चाचीके साथ सब रहते है पाकिस्तानमें. बच्चोंके इमिग्रेशनके पेपर्स फाईल कर दिये है. इव्हेंच्युअली यहां आ जायेंगे. बहुत होशियार और समझदार है मेरे बच्चे!!" डोळ्यातलं पाणी रोखायचा आटोकाट प्रयत्न करत तो लढवय्या म्हणाला.

"और उनकी अम्मी?"
"उनका यहां आना मुनासिफ नही! क्या बताऊं सुलेश, उसकी वजहसे मुझे कितनी तकलीफ हुयी!!
"तकलीफ?"
"हां, अरे घरकी प्रायव्हेट बातेंभी सब सीआयडीको मालूम हुआ करती थी. उसके लिये तो शौहरसेभी ज्यादा शरियत बडी है." त्याचा चेहरा विचित्र भेसूर दिसत होता...

"एक आर्मी अफसर मैं, लेकिन अपने खुदके घरकोभी फॅनेटिझमसे नही बचा सका. जबसे पाकिस्तान छोडा है, उससे बात तक नही की. बच्चे वहां अटके पडे है इसलिये चुप हूं. वे एक बार यहां सेफ आ जायें तो फिर ये झमेलाही खत्म कर दूंगा."

मी ऐकत होतो...

"उस दिन तुम पूछ रहे थे की मैं शबनमसे शादी क्यों नही कर लेता? लेकिन मेरे बच्चोंके इजाजत के बिना मैं ये शादी कैसे कर सकता हूं? वे इतने नन्हें तो नही है, उन्हे अब सब समझता है. अपनी अम्मीकी वजहसे अपने अब्बाको कितनी तकलिफोंका सामना करना पडा, वे सब जानते है. उनका डॉक्टर अब्बा, जिसके आगे-पीछे इंटर्नस-नर्सेस चला करते थे आज एक सिक्युरिटीका काम कर रहा है, यह जानकर उन्हें बहुत अफसोस होता है. दे क्राय ऑन द फोन एव्हरी टाईम!!"

आता तो आपली आंसवं थांबवू शकला नाही....

"जब वे यहां आ जायेंगे, शबनमसे मिल लेंगे तब अगर उन्हें पसंद होगा तो ही मैं ये शादी कर लुंगा. शबनमको यह सब पता है और उसका कोई ऑब्जेक्शन नही है. तब हमारे तीन बच्चे होंगे, मेरे दो और शबनमका एक."

"इन्शाल्ला खानसाब, जरूर होंगे!!" माझ्याही डोळ्यांतून आंसू ओघळले...

या पठाणाचं एक निराळंच रूप मी पहात होतो. एका अपत्यविरहाने विव्हल झालेल्या बापाचं कोमल, वत्सल रूप!!

माझा पठाणांच्या कठोरतेविषयीचा शेवटला पूर्वग्रहही गळून पडला होता.

....

आणि एक दिवस माझा न्यूयॉर्कमधला अंमल संपला. माझी इंटर्नशिप पूर्ण झाली होती. मला अटलांटाला कायम स्वरुपाची नोकरीही मिळाली. न्यूयॉर्क आणि अटलांटा! शेकडो मैलांचं अंतर!! मी जाणार म्हणून अब्दुल खान, शबनम आणि त्यांच्या पाकिस्तानी मित्रांनी मला मेजवानी दिली. आपापल्या घरून त्यांनी वेगवेगळ्या पाकिस्तानी खास डिशेस करून आणल्या होत्या. अब्दुल खानने न्यूजर्सीतून कुठूनतरी गोट-मीट (बकर्‍याचं मटण) मिळवलं होतं आणि शबनमने ते शिजवलं होतं. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी माझ्यासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या...

पार्टी संपल्यावर मी माझं सामान बांधू लागलो आणि माझ्या लक्षांत आलं की त्या सगळ्या भेटवस्तू माझ्या बॅगांत मावणं अशक्य होतं. मी त्या तिथेच खानकडे सोडून जायचा विचार केला आणि त्याला तसं सांगितलं.

"अरे नही, नही! ऐसा करो, तुम जब अटलांटामें तुम्हारा अपार्टमेंट वगैरा लेके सेटल हो जाओगे तब मुझे ऍड्रेस दे देना. मैं तुम्हें ये सब शिप करूंगा" खान.

मला वाटलं उगाच कशाला त्याला त्रास? पण तो काही ऐकून घेईना!!

यथावकाश मी अटलांटाला येऊन सेटल झालो. नोकरी सुरू झाली. महिन्याभरांत अब्दुल खानबरोबर चार-पाच वेळा फोन झाले. मी सेटल झालेला ऐकून त्याला बरं वाटलं असावं असं मला जाणवलं.

एके दिवशी मी कामावरून संध्याकाळी घरी आलो. पहातो तर दरवाजावर युनायटेड पार्सल सर्व्हिस (यूपीएस) ची चिठ्ठी चिटकवलेली!

"तुमच्या नांवे पार्सल आलेले आहे, पण खूप जड असल्याने डिलीव्हर करता येत नाही तेंव्हा खालील पत्त्यावरच्या ऑफिसातून पिक-अप करा..."

मी दुसर्‍या दिवशी कामावरून सुटल्यावर त्या ऑफिसात गेलो. पाहतो तर माझ्या नांवे खरंच एक भला मोठा बॉक्स आला होता. प्रेषक म्हणून अब्दुल खानचं नांव होतं. पण बॉक्स खरोखरच खूप जड होता. इतका, की मला तो गाडीत ठेवायला त्या ऑफिसातल्या माणसांची मदत घ्यावी लागली. बॉक्स घेऊन मी घरी आलो. मला एकट्याला तो उचलून घरात नेणं शक्यच नव्हतं. मी गाडीतच तो उघडला आणि एक-एक वस्तू काढून घरात नेऊ लागलो. तरी बॉक्स काही विशेष हलका होईना!! करता-करता मी बॉक्सच्या तळाशी हात घातला.

बघतो तर तळाशी तांदळाची वीस पौंडांची पिशवी!! या पठ्ठ्याने मला किंमतीच्या दुप्पट पोस्टेज भरून वीस पौंड तांदूळ पाठवला होता. सोबत त्याची चिठ्ठी होती. मी चिठ्ठी वाचत होतो...

वाचतांना माझ्या ओठावर हसू फुटत होतं पण डोळे मात्र टचकन पाण्याने भरले होते...

"डियर सुलेश! तुम अपनी नयी जिंदगी शुरू कर रहे हो. बहुतसी कठिनाईयोंका सामना करना पडेगा और तुम्हें ताकद की जरूरत पडेगी. इसलिये तुम्हारे इंडियन राईससे बेहतर खास इंडस बासमती राईस भेज रहा हूं. बिल्कुल डरना नही, इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...."

(संपूर्ण)

टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. कुणा हयात वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

अब्दुल खान - १

अब्दुल खान - २

अब्दुल खान - ३

कथादेशांतर

प्रतिक्रिया

सहज's picture

8 May 2008 - 7:18 am | सहज

आवडले.

अब्दुल खान आता अमेरिकेत डॉ. आहेत का? मुले अमेरिकेत आली का? लग्न झाले का? कळले तर बरे होईल. याराना झाला ना ह्या "काल्पनिक" लेखनातुन राव. असे अर्धवट नका सोडु हो...
हा कसला "काल्पनिक" इंडियन दोस्त, अपने दोस्तो की खबर नही रखता.

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 8:17 am | प्रभाकर पेठकर

श्री. पिवळा डांबिस,

अब्दुलखानेचे शब्दचित्र अतिशय भावूक आणि नेमक्या शब्दात, प्रभावीपणे मांडले आहे. वाचताना आपण कुणी त्रयस्थ वाचक आहोत हे भान रहात नाही. कथानकाचाच एक भाग बनून जातो. तुमच्या संवेदनशील लेखनकौशल्याने हृदयाचा ठाव घेतला. ह्या शेवटच्या भागाने डोळ्यात पाणी आणले.

तुम्हाला, अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

अभिनंदन.

केशवसुमार's picture

8 May 2008 - 4:24 pm | केशवसुमार

डांबिसशेठ,
सगळे भाग वाचले.. कथा संपलीकी एकत्र प्रतिसाद द्यावा असे ठरवले होते..(हा पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)
पेठकरशेठशी एकदम सहमत.. हेच म्हणतो....(हा ही पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)..खानाचे पुढे काय झाले असा उगाच एक भुंगा डोक्यात घुसला आहे..आता त्याचे काय करावे?
सुरेख लेख आवडला..
(अस्वादक)केशवसुमार
(स्वगतः- डांबिस नावाचा माणुस अशी कथा कशी काय लिहू शकतो बाबा? :? निदान अस चांगल लिहिताना नाव बदला बॉ.. :> )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2008 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आणि खानसाहेबाची दोस्तीने मन हेलावले.
अप्रतिम समारोप !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋचा's picture

8 May 2008 - 9:12 am | ऋचा

खरच तुम्ही खुप छान लिहीता

अगदी अस वाटलं कि हे खरच आहे...

अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

यशोधरा's picture

8 May 2008 - 9:25 am | यशोधरा

अतिशय मनस्पर्शी झाले आहेत सगळेच भाग!! अब्दुल खान खूपच आवडला. त्याने निवडलेल्या आयुष्यात तो सुखी असावा, हीच शुभेच्छा आणि प्रार्थना.
एकदम सुरेख लिहिले आहे.

मनस्वी's picture

8 May 2008 - 9:46 am | मनस्वी

डांबिसकाका, आमच्याही डोळ्यातून नकळत आंसू ओघळले.
तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

आणि तेवढं अब्दुलखान आणि शबनमचं लग्न झालं का आणि त्यांची मुलं तिकडे आली का? ते रेसिडेन्सीची परिक्षा पास झाले का? त्यांना नोकरी मिळाली का - तेवढं सांगा की म्हणजे मनाला रुखरुख लागून रहाणार नाही.

शेवटी "क्रमशः" वाचायला अधिक आवडले असते :)

आनंदयात्री's picture

8 May 2008 - 10:26 am | आनंदयात्री

पुढचे ऐकण्याची उत्सुकता आहे.
आणी नेहमीप्रमाणेच नितांतसुंदर लेख हे वेगळे सांगणे न लगे !

स्वाती दिनेश's picture

8 May 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश

अब्दुल खानाची विलक्षण कथा ऐकताना डोळे भरुन आले,एका रांगड्या पठाणातला कोमल बाप,हळवा मित्र मन हेलावून गेला.तुमचा हा मित्र आता उत्तम रीत्या डॉक्टरी करत शबनम आणि मुलांबरोबर सुखाने आयुष्य व्यतित करत असेल,ही आशा..कारण त्याचाच आशावाद..
"इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...."
सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.
A genius is a one who knows where to stop!
Hats off!!!
स्वाती

मनस्वी's picture

8 May 2008 - 12:12 pm | मनस्वी

सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.

+१

रम्या's picture

8 May 2008 - 11:54 am | रम्या

..खरोखरच वाट पाहत होतो.
लिखाण फार आवडलं.
मनातील पठाणां बद्दलांचा राग कुठच्या कुठे गेला.

सुधीर कांदळकर's picture

8 May 2008 - 11:58 am | सुधीर कांदळकर

झकास.
अशाच आणखी येऊ द्यात.

सुधीर कांदळकर.

मन's picture

8 May 2008 - 1:19 pm | मन

नुसतीच लेखन शैलीच नाही ,तर "कंटेंट" सुद्धा एकदम खास आहे.
"पठान" च्या भाषेत "काबिल्-ए-तारीफ" है.
बहुत ही बेहतरीन!

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

प्रशांतकवळे's picture

8 May 2008 - 2:24 pm | प्रशांतकवळे

हृदयाला हात घालणारे लेखन

अप्रतीम!

प्रशांत

मदनबाण's picture

8 May 2008 - 3:42 pm | मदनबाण

सुलेशजी आप बहोत बढीया लिखते हो....
और क्या कहु.....

मदनबाण>>>>>

वरदा's picture

8 May 2008 - 5:32 pm | वरदा

कुछ केहेनेकाभी होश नही है..डोळ्यात पाणी आलय आणि स्क्रीन दिसत नाहीये..खूपच मस्त लिहिलय...
पण ते सांगा तो आहे का इथे अजुन? आली का त्याची मुलं इथे....न्युजर्सीत असेल तर भेटूनच येईन म्हणते एकदा..

शितल's picture

8 May 2008 - 5:59 pm | शितल

आता पर्य॑त खान साहेब आमच्याही ओळखीचे झाले आहे, सुद॑र वर्णन असे वाटते ते प्रस॑ग डोळ्यासमोर घडत आहेत हे तुमच्या लिखानाची जादु आहे.
एक छान कथानक आम्हाला वाचायला मिळाले, या बद्दल तुमचे आभार. :)

झकासराव's picture

8 May 2008 - 6:03 pm | झकासराव

क्या लिखेला है सुलेश बहोत बढिया.
मस्तच. :)
तुमचा खान आवडला.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

8 May 2008 - 6:28 pm | विसोबा खेचर

अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं!

आपला सलाम...!

अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज...

तात्या.

मुक्तसुनीत's picture

8 May 2008 - 6:43 pm | मुक्तसुनीत

ललित लिखाणाच्या यादीत या लिखाणाचा नंबर एकदम वरचा लागेल !
मात्र हे सर्व पूर्णपणे काल्पनिक लिखाण आहे यावर एक वाचक म्हणून भरवसा ठेवता येत नाही (सस्पेन्शन ऑफ डिस्-बेलिफ) , इतके हे लिखाण अस्सल वठले आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 May 2008 - 7:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

सु॑दर लेखन..वाचत राहावे असे.. अजुन असेच लिहा डा॑बिसराव

चतुरंग's picture

8 May 2008 - 8:20 pm | चतुरंग

अपत्यविरहानं व्याकूळ आणि बायकोनं केलेल्या प्रतारणेनं खचलेल्या अब्दुलखानाने मनाचा ठाव घेतला; ते कातर, हळवं झालं!
तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नेमक्या शब्दात प्रसंग मांडण्याचे कसब लाजवाब!
असेच सकस लिखाण अजून आवडेल. अनेक शुभेच्छा!

(अवांतर - हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? :) )

चतुरंग

वरदा's picture

8 May 2008 - 8:30 pm | वरदा

मी वाचलंच नव्हतं काल्पनिक आहे...काहीतरीच काय काका..

भाग्यश्री's picture

8 May 2008 - 10:13 pm | भाग्यश्री

खूप सही लिहीलयत हो डांबिस काका..काल्पनिक नाही वाटते.. खूप आवडलं!

वाचक's picture

8 May 2008 - 11:57 pm | वाचक

थोरा मोठ्या लेखकांच्या पंक्तीत सहजगत्या नेउन ठेवेल असे सहज सुंदर, प्रभावी लेखन.

नकळत "काबुलीवाला" ची आठवण झाली.

हे सगळे 'एकत्र' वाचायला मिळेल अशी सोय करता येईल का ? कृपया विचार व्हावा.

ब्रिटिश टिंग्या's picture

9 May 2008 - 12:44 am | ब्रिटिश टिंग्या

सुरेख व्यक्तीचित्रण अन् ओघवती शैली.....आवडले आपल्याला!

सर्व भाग योग्य ठिकाणी क्रमश: करुन उत्कंठा वाढविण्याचे कसब तर लैच भारी!

असो, अजुन एखादा भाग वाचायला निश्चितच आवडला असता.

>>अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं!
सहमत!

टिंग्या

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 1:28 am | भडकमकर मास्तर

झकास लिखाण ,. मस्त शेवट...
..........
आणि उत्सुकता ताणली जाईल पण तुटणार नाही, अशा योग्य वेळानंतर पुढचा भाग टाकण्याची हातोटी खासच आहे...

खरा डॉन's picture

9 May 2008 - 7:38 am | खरा डॉन

वा सुलेश तुने तो खूश कर दिया यार. बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर काहीतरी सकस वाचायला मिळाले.

स्वगतः च्यायला त्या गटण्याचे निरर्थक/निर्बुद्ध काथ्याकूट आणि धमु-डॉन-आंद्या गँगचे पानचट प्रतिसाद वाचून पार वीट आला होता बुवा..छ्या मिसळपावची क्वालीती जरा घसरत चालली आहे बॉ..

पिवळा डांबिस's picture

9 May 2008 - 8:39 am | पिवळा डांबिस

वरील प्रतिक्रियेतील अब्दुल खान या आयडी धारकाचा आमच्या अब्दुल खानशी वा पिवळा डांबिस याच्याशी संबंध नाही.
मला प्रथम ही कुणीतरी करत असलेली गंमत आहे असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इतरही धाग्यांवर तो दिसू लागल्याने हे स्पष्टीकरण!
http://www.misalpav.com/node/1725#comment-23083

कुणी ते नांव घ्यायला आमची हरकत अर्थातच नाही, पण इतर वाचकांचा आम्हीच काड्या करतो आहोत असा गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा...
आपला,
पिवळा डांबिस

सखाराम_गटणे™'s picture

9 May 2008 - 8:59 am | सखाराम_गटणे™

पण तो 'अब्दुल खान ' स्वतः ला तुमचाच 'अब्दुल खान' समजतो आहे.
त्याचे ले़खन वाचा.
http://misalpav.com/node/1725#new

पिवळा डांबिस's picture

9 May 2008 - 9:08 am | पिवळा डांबिस

जाऊ द्या, आपण सोडून द्यायचं झालं....
आता आंतरजाल म्हटलं की तिथे हरतर्‍हेचे नमुने मिळायचेच की!
आपण आपला त्यात काही संबंध नाही एव्हढं जाहीर केलं म्हणजे झालं...
कदाचित कुणीतरी निखळ गंमत करत असेल...

सुमीत's picture

9 May 2008 - 12:48 pm | सुमीत

वाट पहात होतो ह्या भागाची, एकदम कलाटाणी वाटली जेव्हा टीप वाचली. इतके सुरेख व्यक्तीचित्रण आणि कल्पित.
फर फर सुरेख.

धनंजय's picture

9 May 2008 - 8:46 pm | धनंजय

भावले.

गृहिणि's picture

9 May 2008 - 9:28 pm | गृहिणि

फारच सुरेख! अब्दुल खान ला भेट्ल्यासारख वाटल. फारच जिवंत व्यक्तिचित्रण आहे.

गणपा's picture

10 May 2008 - 4:16 pm | गणपा

काका, (इथे डांबिसकाका म्हणवत नाही)
सर्वात उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व आणि खानाची परत भेट घालुन दिल्याबद्दल थँक्स.
कधी न्हवे त्या क्रमशः ची अपेक्षा ठेवावीशी वाटली आणि (संपूर्ण) हाती आलं.
टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत.
ही ओळ वाचे पर्यंत मुळ्ळीच वाटल नाही कि हा खान्या ही एक काल्पनिक वल्ली आहे. तुमच्या लेखन कौशल्यास प्रणाम.

अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज...
तात्या.

हेच म्हणतो.
-गणपा.

फिरसे कहँते हैं! मान गये उस्ताद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विजुभाऊ's picture

11 May 2008 - 7:25 pm | विजुभाऊ

हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच?
हो डाम्बीसपणाच असावा :) माणुस कायकाय लिहील सांगता येत नाही. पण एकंदरीत मस्त लिहितो डाम्बीस काका.
डाम्बीसपणावर खुष असलेला विजुभाऊ

देवदत्त's picture

11 May 2008 - 8:07 pm | देवदत्त

चारही भाग एकत्र वाचले. मस्त लिहिले आहे.
असेच पुढे लिहत रहा.

नाना चेंगट's picture

5 Jun 2012 - 7:31 pm | नाना चेंगट

पुन्हा वाचले ! मस्त वाटले !! :)

प्रास's picture

5 Jun 2012 - 8:08 pm | प्रास

पुन्हा वाचले !

मी पण.....

मस्त वाटले !!

मला पण.....

सुंदर लिखाणाबद्दल पिंडाकाकांचा आणि चांगल्या खोदकामासाठी नानाचा आभारी आहे.

हेमंत लाटकर's picture

1 May 2016 - 2:34 pm | हेमंत लाटकर

पिडा मस्त लेख

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

26 Mar 2021 - 10:04 am | ॲबसेंट माइंडेड ...

सकस व दर्जेदार लेखन मनापासुन आवडले.

मिपाच्या खजिन्यात अशी किती रत्ने आहेत त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
काय अफलातून लिहिलंय राव, जाम आवडले.
आणि हो, हे कथानक काल्पनिक आहे असं तुम्ही म्हटलंय खरं पण त्यावर विश्वास बसत नाहीये.

पिवळा डांबिस's picture

26 Mar 2021 - 11:25 pm | पिवळा डांबिस

बापरे, हे लिखाण अजून टिकून आहे मिपावर?
मला वाटलं होतं की काळाच्या ओघात गडप झालं असेल. :)
ॲबसेंट माईंडेड आणि टर्मिनेटर, धन्यवाद हे नजरेस आणून दिल्याबद्दल...

बरेच दिवसांनी मिपा वर आले, बरंच झालं. चारही भाग एकत्र वाचता आले. सुंदर व्यक्तीचित्रण आणि ओघवत्या भाषेमुळे हे प्रसंग काल्पनीक नसुन खरेच घडले असावेत असं वाटल. अप्रतीम!! शेवटच्या भागात काबुलीवाल्याची आठवण झाली.