स्वगत (निवासी ) आईचे.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
4 May 2008 - 4:20 pm

परवा रात्री येताना माझ्यासाठी एक छोटसं पान बान्धून आणलं तेव्हांच माझ्या लक्षात आलं की बातमीचा सुगावा लागलेला दिसतोय्.मी पण वाट पहात होते कधी तोंड उघडून बोलतायेत त्याची.माणसाला थोडी तरी शिक्षा हवीच.यांचा एकमात्र सलग दुवा म्हणजे बँक वाला जोशी. जोशीणीला कळलं असणार ह्त्तंगडीच्या मोलकरणीकडून्.आता चार दिवस पान फुकट खायला जोशी बँकेचा जमाख्रर्च पण घडघडा वाचून दाखवेल गं. आल्याआल्या काही बोलले नाहीत.आधीच चार दिवस छळवाद मांडला होता.दिवसभर एकचं गाणं चालू होतं सैंया सैंया.ते पुरलं नाही तर पेटी काढून बसले. हव्या त्या पट्ट्या सापडेनात .दुप्पारभर हा संताप.आजकाल मी पण लक्ष घालत नाही.पण दुपारी झोप नाही. थोडा डोळा लागला तर चार वाजले. चहा-चहा म्हणून भूणभूण सुरु. तुझी आज्जी आणि हे माझ्या झोपेचे कायमचे शत्रू.जाउ दे मी भलतचं काहीतरी सांगत बसलेयं.
रात्री दिवे मालवल्यावर हळूच विचारतायेत शर्वरीला मुलगा झाला तुला कळलं का?
मी पण मुद्दाम रडवेल्या आवाजात म्हंटल
मला काही सांगू नका . चार वर्षं पोरीचं तोंड पाहील नाहीत मुलांशी संबंध तोडलेत आणि आता मला सांगताय. एवढं बोलल्यावर मात्र मला खरोखरीच रडायला आलं.यांचं हे एक बरं आहे. दिवे मालवल्यावर सगळे कबुलीजबाब मुकाट देतात.(मला उगाचचं असं वाटतं की सगळ्या पुरुषांना उजेडाची भिती वाटते आपला उणेपणा कबूल करण्यासाठी )आपली वाट बघण्याची तयारी हवी. सगळं काही आपोआप सुरळीत होत. छे बाई मी पण आजकाल आज्जी सारखी भरकटतेयं. तर काय सांगायचं काय....
मला म्हणतात कसे जाउ दे
.. रडू नकोस..
तू जा अमेरीकेला.
मुलगा सहा महिन्याचा होस्तो थांब. मी राहतो इथे , मनी कडे कोण बघणार? ...(जशी मनीच्या बाळंतपणाची उस्तवार हे करणार..)
आता मला अंदाज आला की हे निमंत्रणाची वाट बघतायत्.(सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं.)
मी हुशारीनी रडं आवरलं .
खरोखरीच वाईट वाटतंय का याचा अंदाज घेतला, आणि म्हटलं एकदा फोन तरी करा जावयाला आणि मुलीला.
तर म्हण्तात कसे
मी काही त्या मद्राशाशी बोलणार नाही. त्यानी करावा मला फोन.( मला अगदी मनातून खदखदून हसावसं वाटत होतं )
पण यांचा भरवसा काय गं.पंताच्या राज्यात घटकेत सौभाग्यवती .. तर घटकेत गंगाभारती.पण मग धीराने शेवटचा पत्ता टाकला आणि म्हंटल त्यानी फोन केला तर याल का माझ्यासोबत?
पटकन उठून बसले. म्हणले ठिक आहे येईन पण एका अटीवर. (माझ्या पोटात परत गोळा आला.)
अगं एवढी वर्ष झाली लग्नाला पण अंदाज चूकतो कधी कधी.
आता कसली अट?
मी ये ईन पण राहीन नाडकर्णीकडे. (हत्तगंडीचा जावई)
मी म्हटलं अमेरीका म्हणजे आपली अहमद सेलरची चाळ वाटली का हो ?
उतरला दादरला की चालले दोन नंबरमधे.(शरू ,विट आणला होता गं पाहुण्यांनी तिथे)
मग काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळानी कबूल झाले.(अगदी ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं)
*********************************************************************

कथा

प्रतिक्रिया

नंदन's picture

4 May 2008 - 4:55 pm | नंदन

सुरुवात चांगली आहे. बारकावे मस्त टिपले आहेत. फक्त हा भाग (खाली क्रमशः लिहायचे राहून गेले, असे धरून चालतो आहे) थोडा छोटा वाटला, अजून वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

5 May 2008 - 10:35 am | आनंदयात्री

बारकावे छान टिपलेत, येउद्या पुढचे स्वगत !

अभिज्ञ's picture

4 May 2008 - 5:26 pm | अभिज्ञ

अभिनंदन.
लेखन आवडले.
छानच सुरुवात. लेखाचे पुढचे भागहि लवकर येउ द्यात.

अबब

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2008 - 11:40 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखन आवडले... तुमचे भाषेवरचे प्रभुत्व जाणवते. लेखनाच्या खाली (क्रमशः) असे बघायला आवडले असते. वाट बघतो आहे.

बिपिन.

विसोबा खेचर's picture

5 May 2008 - 4:30 pm | विसोबा खेचर

छानच लिहिलं आहे... वरील सर्वांशी सहमत...

मी म्हटलं अमेरीका म्हणजे आपली अहमद सेलरची चाळ वाटली का हो ?
उतरला दादरला की चालले दोन नंबरमधे.

अहमदसेलर बिल्डींग नं २? नल्याला ओळखता काय? :)

अहमदसेलरच्या संदर्भात माझा एक लेख इथे वाचावा... :)

तात्या.

अभिज्ञ's picture

5 May 2008 - 11:47 pm | अभिज्ञ

तात्या,
दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद.
पण हा लेख आपण इथे का टाकला नाहित?
तात्यांचे लेख वाचायला दुस-या मराठी संकेत स्थळावर जावे लागत आहे,
हे मला तरी योग्य वाटत नाही. =((
आपले सर्वच लेखन मि.पा.वर उपलब्ध असावे असे वाटते.
जुन्या लोकांनि हे लेख आधिच वाचले असतिल,
परंतु आता नवीन लोकांचि संख्या जुन्या मंडळींपेक्षा जास्त आहे.
तेंव्हा हे लेख मि.पा. वर पुनःप्रसिद्ध करावेत ही विनंति.

अबब

रामदास's picture

6 May 2008 - 11:25 am | रामदास

नाही. माझ्या ओळखीत नाहीत. माझा अहमद सेलरशी संबंध आला मन्या ओक मुळे. तसा रंगारी बदक ते तेजुकाया ते मोहम्मदी मंजील असा नेहमी वावर असायचा.

मन's picture

5 May 2008 - 4:33 pm | मन

थोडसं नाट्यछटेसारखं वाटलं.
मस्त आहे एकदम.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)