जीवधन नाणेघाट - भाग १
जीवधन-नाणेघाटाच्या संरक्षक दुर्गचौकडीतील नाणेघाटाचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जवळचा साथीदार. ज्याचे हाती जीवधन त्याचे हाती नाणेघाटाचे स्वामित्व.
आज पुर्वी केलेल्या जीवधनच्या ट्रेकच्या आठवणी जागवत आहे. तर अश्या ह्या नाणेघाटाच्या पहारेकर्याला भेटण्यासाठी आम्ही मित्र सकाळीच पुण्याहून निघालो. नारायणगावहून जुन्नरला आलो. जुन्नरच्या पाठीमागेच पुराणपुरुष शिवनेरी आपल्या मायेचे पंख पसरून उभा आहे. जुन्नरहून पुढे आपटाळे गावी दोन फाटे फुटतात. डावीकडचा फाटा आंबोली, दुर्ग, धाकोबा, दार्या घाटाकडे जातो तर उजवीकडचा फाटा आपल्याला चावंड किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनला घेउन जातो. उजवीकडे वळून आम्ही आता जीवधनच्या पायथ्याचे गाव असलेल्या घाटघरचा मार्ग पकडला. आतापर्यंत साथ करत असलेल्या डोंगरांची जागा आता सह्याद्रीचे अजस्त्र पहाड घेत होते. थोड्यावेळात उजवीकडे चावंड किल्ल्याचे दर्शन झाले. नैसर्गिक तटबंदीने युक्त असलेल्या ह्या किल्ल्याला सर्वबाजूंनी खड्या कातळकड्यांचे संरक्षण आहे. जवळच पूर गावात कुकडी नदीकाठी असलेल्या कुकडेश्वराचे अप्रतिम कोरीव काम असलेले हेमाडपंथी शैलीचे भग्नावस्थेतील मंदिर आहे. थोड्याचे वेळात जीवधनच्या पायथ्याला असलेल्या घाटघरमध्ये पोहोचलो. हे एक छोटेसे आदिवासी गाव आहे. गावातूनच वाटाड्या घेतला व पाठीमागेच उभ्या असलेल्या जीवधनच्या मार्गाला लागलो. नाणेघाट २००० वर्षांपूर्वी बांधला गेला. जीवधनही तेव्हाचाच असणार. इकडील सर्व भाग सातवाहनकालीन बांधणीचा आहे. जीवधनला सर्वबाजूंनी कातळकड्यांचे संरक्षण आहेच. सुरुवातीला सपाटीवरून जाणारी वाट जीवधनला भिडून चढणीला लागते. ही पूर्व बाजूची वाट जाते ती सुकलेल्या ओढ्यावरून. कधी बांबूंच्या दाट बेटांमधून. वाटेवर घसारा फार आहे. काही वेळा एक्स्पोजर पण आहे. पदरातून जात जात ही अस्पष्टशी पायवाट अर्ध्या तासात जीवधनच्या मधल्या कातळकड्याला भीडते. आता सुरुवातीला उंच उंच कातळकोरीव पायर्या लागतात. पाठीमागे वळून पाहताच कोकणातल्या बाजूचा रौद्र कातळकड्याचे दर्शन होते. दमछाक करणार्या पायर्या संपल्यावर लागतो तो जीवधनचा सुप्रसिद्ध रॉकपॅच.
इथल्या पायर्या इंग्रजांनी १८१८ साली उद्धस्त केल्या. इथे आता २०/२५ फूट उंच उभा कडा आहे आणि त्यात खोबणी खोदलेल्या आहेत. पाय ठेवण्यासाठी किंचित पाउल मावेल इतक्याच पावठ्या व हाताची बोटे रोवण्यासाठी कड्यात छिद्रे पाडलेली आहे. हे तसे सोपेच कातळारोहण आहे. तरी काळजी आवश्यकच. इथे तुम्ही कड्यात हातपाय रोवले की तुम्ही अगदी भक्कमपणे कड्याशी जोडले जाता. शिवाय इथे खोल दरीचे एक्स्पोजरही तुलनेने कमी असल्याने हा भाग पटापट चढून जाता येतो. प्रस्तरारोहणानंतर एका भग्न दरवाजाचे अवशेष आहेत. व शेजारीच एका गुहेत पाण्याचे टाके आहे. पाणी एकदम शेवाळलेले पिवळेधमक दिसते. पण तो गालीचा थोडा हलवल्यावर खाली एकदम थंड, स्वच्छ पाणी आहे. ते अमृतासम पाणी पिवून आम्ही किल्यावर प्रवेश करते झालो. थोडे वरच्या भागात आल्यावर बरीचशी जमिनीत खोदलेली आणि थोडीशी बाहेर असलेली एक सुस्थितीतील इमारत आहे. हेच जीवधनचे धान्यकोठार. आतमध्ये ही इमारत प्रचंड मोठी आहे. उजेड नसल्यामुळे विजेरीशिवाय पर्याय नाही. आतमध्ये १८१८ साली जळून गेलेल्या धान्याची घोटाभर पाउल मावेल इतक्या उंचीची राख सर्वत्र पसरलेली आहे. इमारतीतून बाहेर येउन वरच्या दिशेने गेलो. वर जिवाई देवीची उघड्यावर असणारी मुर्ती आहे. हे जीवधनचे सर्वोच्च टोक. इकडे आता पश्चिमेला नाणेघाटाचा आभाळात घुसलेला अंगठा दिसू लागतो. सह्याद्रीची धार दृग्गोचर होत जाते. आम्ही आता पलीकडच्या बाजूला उतरू लागतो. इथे उतरताना खडकात खोदलेल्या छोटेखानी पायर्या आहेत. स्वछ पाण्याने भरलेली पाण्याची टाकी आहेत. तिथेच थोडावेळ बसून जेवण करून आम्ही पुढे निघालो. याभागात इमारतींचे भग्नावशेष आहेत. आता आमचे लक्ष्य होते. ते जीवधनच्या सुप्रसिद्ध वानरलिंगी सुळक्याचे दर्शन. आता इथे कडेला सह्यद्रीची अतिशय खोल कातळदरी आहे. जवळजवळ २५०० फूटांचा हा सरळ तुटलेला कातळकडा आहे. आता वानरलिंगीचा सरळसोट उभा सुळका दिसायला लागला पण त्याचा पायथा मात्र सहज दिसत नाही तो झोपूनच पहावा लागतो. वानरलिंगी हा ५०० फूट उंचीचा एकदम सरळ उभा असलेला सुळका आहे. त्याचे रौद्र रूप पहायचे असेल तर जीवधनवर जाण्यावाचून दुसरा पर्यायच नाही.
आता आम्ही जीवधनच्या पश्चिमेकडच्या नाणेघाटाकडे जाणार्या मुख्य दरवाजाने उतरायचे ठरवतो. हा जीवधनचा राजमार्ग. नाणेघाटात जमा झालेली जकात याच मार्गाने जीवधन किल्ल्यावर यायची. सुरुवातीला एक सुंदर कमान आहे. १०/१२ पायर्या उतरून आपण एका सुंदर दरवाजापाशी येतो. इथे दुसरा दरवाजा लागतो. इथे येण्याच्या मार्ग दरड कोसळल्यामुळे भग्न झालेला आहे. दरडीतूनच खाली उतरावे लागते की आपण थेट दरवाजातच. बाहेर आल्यावर दिसते की हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आहे. उंच उंच बुरुजांनी हा बंदिस्त केला आहे. इथल्या सुरुवातीच्या पायर्याही भग्नावस्थेत आहे. एकदम अप्रतिम असेच हे प्रवेशद्वार आहे. ही नळीसारखी वाट आता आम्ही उतरू लागतो. इथे एक छोटेखानी रॉकपॅच आहे. पण पूर्व बाजूपेक्षा सोपा असाच. साधारण ६/७ फूटांचा हा पॅच आम्ही कसरत करून उतरतो. आता परत उंच उंच पायर्या लागतात. वाटेत नळीत ठिकठिकाणी छिन्नी हातोड्याने खोदून वाट तयार केल्याच्या खुणा दिसतात. थोड्याच वेळात कडा उतरून आम्ही मध्यभागावर येतो. आता इथे एक पायवाट कड्याला आडवी मारत जाते (ट्रॅव्हर्स). बाणांच्या खुणा जागोजागी केल्याने वाट चुकण्याचा तसा संभव नाही. ह्याच वाटेने सरळ पुढे गेल्यास आपण वानरलिंगीच्या पायथ्याला भिडतो. तिकडे न जाता आम्ही खालच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. कड्याला लगटून जाणारी वाट आता पदरातल्या दाट झाडीतून जाते. इथे आता मातीचा तीव्र उतार व घनदाट झाडी आहे. पण सोपी वाट आहे. झरझर ती वाट उतरून आल्यावर आपण झाडीतून बाहेर येतो. बाहेर पड्ल्यावर लागते ते नाणेघाटाचे विस्तृत पठार. आता जीवधनच्या वानरलिंगीला चिकटून असलेलेल काट्याची लिंगी, टोक हे सुळकेही दिसू लागतात. आता आम्ही निघतो ते २००० वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन वहिवाटीच्या मार्गावर असलेल्या नाणेघाटात जाण्यासाठी.
घाटघर गावातून दिसणारा जीवधन
पाठीमागे असणारे वर्हाड डोंगराचे नवरा, नवरी, भटजी हे कडे
ओढ्यातून जाणारी वाट
पायर्यांच्या सुरुवातीला
उंच पायर्या
कातळारोहणाची सुरुवात
जीवधनवरून होणारे नाणेघाटाचे प्रथमदर्शन
वानरलिंगी सुळका
झोपून पाहिल्यानंतरच
पश्चिम दरवाजाकडे उतरताना
दरडींमधून उतरताना
दरडीतून बाहेर आल्यानंतर
नळीतून जाणारा मार्ग
ट्रॅव्हर्स घेताना
पदरातून
उतरल्यावर आम्ही जिथून उतरलो ती दिसणारी घळ
झूम इन
नाणेघाटाकडे जाताना
मागे वळून पाहताना

ओढ्यातून जाणारी वाट
कातळारोहणाची सुरुवात
जीवधनवरून होणारे नाणेघाटाचे प्रथमदर्शन
झोपून पाहिल्यानंतरच
पश्चिम दरवाजाकडे उतरताना
दरडींमधून उतरताना
दरडीतून बाहेर आल्यानंतर
नळीतून जाणारा मार्ग
ट्रॅव्हर्स घेताना
पदरातून
उतरल्यावर आम्ही जिथून उतरलो ती दिसणारी घळ
झूम इन
नाणेघाटाकडे जाताना
मागे वळून पाहताना

Book traversal links for जीवधन नाणेघाट - भाग १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त
+१
ढासु फटु. स्टन्न्ड!!!
थँक्स वल्ली. बघताना परत एकदा
अरेच्चा
हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही
मला पण आत एखादा ट्रेक क्लब
मला पण असेच वाटते आहे. पण
दोनदा आल्याने स्वसंपादित
मला पण नुकतीच आठवण आली होती
मस्त लेख आणि फोटो. तो सुळका
जबरदस्त एकदम
मस्तच ! अवघड आहे हे मला
वल्या.. खतरा फोटू... अजून
व्वा!! वल्ली, सुरेख... इतक्या
वानरलिंगी
वल्ली नेहमीप्रमाणेच झ का स
वल्ली, लई भारी बाबा तुम्ही
नाही
वल्ली, झक्कास
दरडीतून उतरताना...!!
अहो
"दरडींमधून उतरताना"
वावा..
जबऱ्या
अप्रतिम!!! काय सुरेख आहेत
झक्कास
मस्त फोटो आणी
वल्ला...
+१ आता कधी?
+१ आता कधी?
कधी ते