कातरवेळ (शब्दचित्र )

गणेशा's picture
गणेशा in कलादालन
10 Feb 2011 - 3:51 pm

कातरवेळ :

कातरवेळ

आपल्या प्रतिसादांमुळे आणि गणपा भाऊंच्या सहाय्याने चित्रकवितेचा प्रवास मस्त सुरु झाला, आता जरा ब्रेक घेतो खुपच जास्त झाली चित्रे म्हणुन. एका महिन्यात एक नविन कविता लिहिण्याची बोंब असताना ३-३ चित्रे सलग बनवने म्हणजे जास्त झाले, आणि काम पण पाहिले पाहिजे ना, नाहितर घरीच कॅनव्हास घेवून बसायला लागयचे, हा नविन प्रकार हाताळताना मजा आली मात्र. फाँट/ब्राउजर प्रॉब्लेम मुळॅ थोडे कष्ट पडले पण ते ही लवकर सोडवतो आहे.

मागील २ चित्रकवितेच्या लिंक

झेंडा मराठीचा

फुलपाखरु

----------------

कातरवेळ कवितेचा मुळ text format:
(फाँट/ब्राउजर प्रॉब्लेम मुळे येथे निट दिसत नसल्यास क्षमस्व, माझ्याकडे तर चौकोन दिसत आहेत त्यामुळे अंदाज लावणे कठीन आहे.)

बेधुंद कटाक्ष
हळुवार हलकासा
कातरवेळी सखे तुझा आतुर नजरेचा
मिठी शहारलेली नाजुक मोहक हळुवार थंड शिडकावा
चंदेरी किनार लेवुनी मखमली स्पर्ष अबोल नशिल्या धुंद शब्दांचा
आकाशी ओढणी रंगबिरंगी ओझरता अंगावर शहारा कंपीत भावनांचा
गालावर किरणांची केशरी लाली सप्तसूर झंकारलेले सूरताल श्वासांचा
नयनात हरवली गच्च मिठी शहारलेली हवीहवीशी सळसळ कातरलेल्या वेलीची
सोहळा रजनी गंधाचा स्पर्श रेशमी आनंदी सोनेरी किरणांची आकाशी नक्षी धुंद ओथंबलेली
लाजुनी दडला सूर्य ओठांची फक्त निशब्द बोली अल्हाद मोहक निर्मळ कोव़ळी झुळुक तरल स्वप्नांची
हे
मन
बेधुंद
बावरलेले
गहिवरलेले सखे तुझा
थोडे हरवलेले निशब्द| निर्मळ
स्वप्नस्पर्ष लेवुनी रंगीत सहवास
नयनात विसावलेले बहरलेला
क्षण उगाच गोंधळलेले का
अंगणी नभ अवतरलेले त
शब्द ओठात अडखळले र
श्वासांच्याच ठेक्यावरती वेळी
ह्रद्यगीत बेभान झुललेले
प्रीतफुल धुंद गंधाळलेले
सप्तसूर अंतरी ओथंबलेले
प्रीतीची तेजज्योत घेवुनी
ह्रद्यस्पंदने उष्ण धडधडलेले

- गणेशा

- धन्यवाद
गणेशा

प्रेमकाव्यरेखाटन

प्रतिक्रिया

गणपा's picture

10 Feb 2011 - 4:09 pm | गणपा

चित्र-काव्य आवडले :)

टारझन's picture

10 Feb 2011 - 4:18 pm | टारझन

आवडेश

नन्दादीप's picture

10 Feb 2011 - 4:52 pm | नन्दादीप

मस्तच.....

५० फक्त's picture

10 Feb 2011 - 5:08 pm | ५० फक्त

छान झालंय गणॅशा, फक्त एक सल्ला आहे, माझ्या सारख्या अज्ञान्याला कळावे म्हणुन मुळ कविता सलग लिहिलेली देत जा, नाहीतर थोडं अवघड जातंय वाचायला.

अवांतर - मा. शरदिनीतैंच्या कवितांची चित्रं काढुन दाखवा, आमच्या कडुन एक बाटली भेट.......... रंगाची.

धन्यवाद ...
हे माझ्या लक्षात आलेच नाही, की जे वाचक कविता जास्त वाचत नाहित त्यांना चित्र पाहुन शब्द जोडाजोड अवघड जाईल ते. देतो.

मुळ कविता :
१. हळुवार कातरवेळी
गच्च मिठी शहारलेली
चंदेरी किणार ल्यालेली
आकाशी ओढणी रंगबिरंगी

तव गालावर रेशमी
किरणांची केशरी लाली
जांभुळनयनात हरवली
गच्च मिठी शहारलेली

सोहळा रजनीगंधाचा
स्पर्श रेशमी आनंदी ..
लाजुनी दडला सूर्य
ओठांची निशब्द बोली..

[संवाद... ]

आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा ...
अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा...

[गीत...]
मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!

क्षण हे गोंधळलेले
थोडेशे बावरलेले
अंगणात हृद्याच्या
नभ अवतरलेले !!

[संवाद...]
हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ...
चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची...
सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी...
अल्हाद मोहक निर्मळ... झळुक स्वप्नांची ...

[गीत]
शब्द अडखळलेले
ओठात हरवलेले
श्वासांच्या ठेक्यावरती
ह्रद्यगीत झुललेले !!

प्रीतफुल गंधाळलेले
सप्तसूर ओथंबलेले
प्रीतीची ज्योत घेवूनी
ह्रद्य धडधडलेले !!

मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!

प्राजक्ता पवार's picture

10 Feb 2011 - 5:46 pm | प्राजक्ता पवार

छान .

मुलूखावेगळी's picture

10 Feb 2011 - 6:00 pm | मुलूखावेगळी

हे पण मस्त रे
अजुन येउ देत

पाषाणभेद's picture

10 Feb 2011 - 6:49 pm | पाषाणभेद

एक वेगळाच प्रयोग

सुनील's picture

10 Feb 2011 - 6:53 pm | सुनील

छान प्रकार!

कविता आधी सरळ स्वरूपात देणे आणि नंतर हा प्रयोग करावा!

कच्ची कैरी's picture

10 Feb 2011 - 7:01 pm | कच्ची कैरी

गणेशा मस्तच रे!तु तर कवितेच्या निमित्ताने अख्खा निसर्गच भेटीला घेऊन येत आहे ,कीप इट अप !

प्राजु's picture

10 Feb 2011 - 7:51 pm | प्राजु

छान आहे. नविन शब्द्चित्र.. प्रकार छान आहे हा.

धनंजय's picture

10 Feb 2011 - 9:01 pm | धनंजय

छान

पैसा's picture

10 Feb 2011 - 11:19 pm | पैसा

नवीनच प्रकार सुरू केलास या निमित्ताने!

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 7:31 am | नगरीनिरंजन

+१
असेच म्हणतो.

स्पंदना's picture

11 Feb 2011 - 10:11 am | स्पंदना

गणेशा याच पेटंट करुन घे, नाहीतर दुसरे चोरुन स्वतःच्या नावावर खपवतील.

फार छान प्रकार आहे अन त्या मागे कष्टही आहेत. आवडल!!

कविता ही आवडली.

गणेशा याच पेटंट करुन घे, नाहीतर दुसरे चोरुन स्वतःच्या नावावर खपवतील.
+१ सहमत
कविता छानच !

मनापासुन धन्यवाद सर्वांचे...

डावखुरा's picture

12 Feb 2011 - 5:30 pm | डावखुरा

गणेशा पावलाय वाटतं...
अतिशय सुंदर शब्दचमत्कृतीयुक्त काव्यचित्रे...

निवेदिता-ताई's picture

13 Feb 2011 - 9:50 pm | निवेदिता-ताई

मस्त

ज्ञानराम's picture

14 Feb 2011 - 11:51 am | ज्ञानराम

छानच...

विंजिनेर's picture

14 Feb 2011 - 1:02 pm | विंजिनेर

कल्पना छान आहे पण वाचनीयतेवर (Readability) मर्यादा येतात.
पण लॅटेक वापरून अधिक वाचनीय प्रयोग करता येतील :

धन्यवाद. लिंक येथे ओपन नाही झाली.
परंतु हे सोफ्टवेअर ने अक्षरांना एका सेप मधेय आणने असे आहे का?

खरे तर वाचण्याला मर्यादा येतात हे मान्य.. पण एक विरंगुळा म्हणुन ठिक वाटते आहे... आणि जे कविता वाचत नाहीत जास्त ते सुद्धा चित्रांमार्फत कविता ही समाजावुन घेवु शकतील असे नंतर वाटुन गेले.

बाकी चित्रकविता लिहिणे हे खुप वेळ खावु काम आहे

प्रकाश१११'s picture

14 Feb 2011 - 3:51 pm | प्रकाश१११

गणेशा - छान आणि काहीतरी निराळेच. आवडले.
छान प्रयोगशील कलाकृती . शुभेच्छा !!

प्रकाश१११'s picture

16 Feb 2011 - 4:15 pm | प्रकाश१११

गणेशा -कातरवेळ [शब्दचित्र] वाचले . एकदम सुपर्ब. निव्वळ अप्रतिम लिहिले आहे.
मुल कविता खाली दिली आहेस .तीपण वाचली.मग चित्रांकित केलेली वाचली. आता मस्त वाटली
खूप शुभेच्छा