वॅलेंटाईन भेट प्रवास...

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
1 Feb 2011 - 1:56 pm

थोडेशे मनोगत : गद्य लिखान लिहायला गेलो तरी पद्य म्हनुनच लिहिले गेले होते हे सगळे ... निम्मित्त कवितेचा धागा असला तरी गद्य लिखान करणार्‍या समस्त मंडळीचा हेवा वाटुन गेला मात्र .. असो वाचायला लेख.. कथा आवडत असणारा मी कवितेचे काहीच कळत नसताना कविताच का करत असतो कायम हे कोडे मात्र ४ वर्षे झाले मलाच उलगडतच नाहि कधी

असो मुळ विषयावर येतो .. येथे कथा आहे एका दूर गेलेल्या सखी आणि प्रियकराची ..
साधी .. सरळ आठवण पण खुपच मनाला उत्तेजीत करुन जाते .. पहिली कविता खुपच साधी असली तरी थोड्या फार प्रमाणात ती खरीच आहे. बाकी सर्व काल्पणीक प्रवास असला तरी नक्कीच हे गद्य मिश्रीत पद्य कोणाच्या तरी आयुष्यात आलेच असेन असे वाटते ...

१.
(सखी ला किती तरी वर्षाने एकदम पाहुन , प्रियकाराचे मन क्षणात जाते भुतकाळात ... )

प्रियकर :

ओझरते पाहुनी तुला
डोळ्यांच्या कडा पानावल्या
आरसपाणी सत्याच्या रेघा
उभ्या-आडव्या मनावर उमटल्या

आठवतय तुला,
आपण एकत्र कॅंटीग मध्ये जायचो
चहा सांगतोय न सांगतोय तोपर्यंत
बाकीचे सगळे आपल्याच मागे

मग हरवलेला एकांत पुन्हा
गर्दीत नजर भिडवायचा
कुठल्याश्या टुकार गाण्यावर
टेबलावर ताल धरायचा

पुन्हा कॉलेजमध्ये येईपर्यंत
गणिताचा क्लास संपलेला
प्रॅक्टीकल ला पुन्हा आपण
एकच कॉम्प निवडलेला

तुझा तो असाच
ओझरता स्पर्श
सुखावुन जायचा
सागरकिणारी पडलेल्या
सूर्यबिंबास ही शहारा आणायचा
तो सूर्यबिंब आता कधी हलताना पाहिला ना
मला तुझाच भास होतो अजुनही - ओझरता

आठवतय ते ..
तु अन मी एका चमच्याने आईस्क्रीम खाय्चो
अन एकच कोल्ड्रिंग दोघात प्यायचो
४ मिनिट अभ्यास अन चार तास गप्पा मारय्चो

सखी :
अरे श्री, आज ईकडे ..
अन मी पुन्हा एका क्षनाच्या नविन आरसपाणी विश्वातून तिच्या समोर तसाच पुन्हा पाणावलेला कडा घेवून
अन ती स्मित हाश्याने बावळटच आहेस अजुन ही

---

२.

सखी :

अजुन का रे तु तसाच आहेस ?
उडान भावूक लाजरा जरासा
कवेत घेवून ओल्या स्वप्नांना
अजुन तसाच का हसरा जरासा ?

अनेक भेटी आता स्मरती
ढळणारा सूर्य त्यास साक्षी
कातरलेल्या सहवासाची
एक न एक रेघ आता भिडती

आठवते का तुज ते लाडीक चाळे
हळूच कवेत घेवून जगास विसरणे
गाडीचा जोरात ब्रेक दाबुनी
शिर्‍या तुझे गालात हसणे.

सुर्य मावळातानाचे रंग
माझ्या डोळ्यात न्ह्याहाळशी
मोबाईलवर एस एम एस
खुप सारे पाठवुन उत्तर माघशी

कशे रे ते दिवस असती
तू अन मी बस
काहीच बाकी न सुचती

३.

प्रियकरः

हो तसाच आहे मी
ढगांआड लपलेल्या
सोनेरी किरणासम...
अन जमिनीतून वाहणार्‍या
सुप्त निर्झरासम...

खळखळणारे दिवस ते
आठवतो मी जेंव्हा
पाणावतात डोळ्यांच्या कडा
ओलावतात भावना तेंव्हा

आधाराची गरज नाही
असे म्हणतो ना जेंव्हा
तुझ्या बोलाची कडी
जाणवते तेंव्हा

हेलकावे आयुष्याचे
बसतात जेंव्हा
तुझ्या माझ्या शपथांचे थवे
आठवतात तेंव्हा

सांग ना कुठे होतीस
कशी होतीस ?
माझ्यासारखीच तळमळणारी
की व्यवहारी चेहर्‍याने
भावनांची पाखर धरुन
जीवनास सामोरी होती
.

४.

सखी :

काहीच आवर्तणे आता मनात नसतात
ओल्या भावनांनाच आठवणी गच्च बसतात
तो वाळूचा किणारा
आणि थंड हवेचा शहारा
आता काहीच बोलत नाही
सगळे अनुभवलेले क्षण
आता पुन्हा बहरत नाही..

आठवतात ते दिवस
रात्रीच्या धुंदीत घालवलेले
तुझ्या गिटारच्या तारेवर
माझे शब्द विखुरलेले

अजुनही कुठनसा
एक झंकार कानावर येतो
फ़क्त येतोच तो
बाकी काहीच आवर्तने निर्माण करत नाही

तुझ्या नसण्याने
सगळेच विसरले आहे
ते मुक्त हसणे अन
बागडणे संपले आहे

५.

सखी : आठवतं का तुला आपण गावी गेलेलो

आठवतं का तुला
पारंब्यांच्या विळख्यात
वड उभा असलेला
पारावरच्या पोराला
कवेत घेवू पाहणारा

प्रियकर :

आठवतं मला तेंव्हा
तुझ्या बटांचं मोहक उडणं
वार्‍याच्या मंद झुळुकेनं
प्रेमाचे गीत गाणं

सखी :

कातरवेळी आकाशाने
रंगीत पदर सोडलेला
नदीच्या काठावर
सूर्य नाजुक निजलेला

प्रियकर :

हलक्याच मिठीत
ओढणीचा तोल ढळलेला
स्पर्शाच्या मोहक संगतीत
देह चैतन्यात नाहलेला

सखी :
मंद चंद्राचा कवडसा
अंगणात प्राजक्त ओला
गोठ्यातून घुंगराची किणकिण
आवाज मायेचा लाभलेला

प्रियकर :

गंधाने फ़ुललेल्या रात्री
तारकांचा पहारा
अंधाराच्या मिठीत गहिर्या
निशब्दतेचा सडा सांडलेला

६.

(एकमेकासमोर उभे राहून असा मनाशीच चाललेला संवाद एकदम संपला आणि सखी आणि प्रियकर भानावर आले )

प्रियकर :

ओलेत्या पापण्यांना
थांब सखे झाकू नकोस
माझ्या कोवळ्या भावनांना
डोळ्यात फक्त सामावू नकोस

आठवणींचा पाउस येवून गेला
गर्द धुक्यात मात्र हरवू नकोस
आठवणींच्या खळाळत्या भरतीला
दुरावलेल्या चंद्रास या विसरू नकोस

७.

सखी :

डोळ्यातून अंतरंगात पोहचलेल्या
रक्तीमात तूच आहेस
हृदयाच्या स्पंदनावरती
तुझाच अधिकार आहे

भरकटलेल्या मेघांमध्ये
तुझाच थंड शिडकाव आहे
उधाणलेल्या सागरामध्ये
मोत्यांचा आविष्कार आहे

८.
( पुन्हा आपले वलेंटाईन मिळाल्या मुळे सखी आणि प्रियकर खुष असतात)

सखी :
सख्या आता नको दूर जाणे
क्षणा-क्षणातुन आसवांचा पुर येणे
नको आता दुर जावु कधी
डोळ्यात माझ्या तुला सामवु कसा रे ..

प्रियकर :

तुज्या दाटलेल्या नेत्रामध्ये
हेलकावे माझी जीवन नाव
नको ढाळूस अश्रू कधी
वाहणारा त्यात मीच आहे

सखी :

प्रतिबिंब आसवात उमटलेले तुझे
हदयाच्या शिंपल्यात ठेवीन मी
मोत्यासम निर्मळ प्रिया तुला
मनात माझ्या बसवेन मी

प्रियकर :

फ़िरुनी आल्या आठवणी सार्‍या
दिवस पुन्हा पान्हावले
सखे ओल्या आठवणींचे
मोहर पुन्हा बहरले.....

-- शब्दमेघ

प्रेमकाव्यरेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

1 Feb 2011 - 2:26 pm | माझीही शॅम्पेन

चान , चान , कविता वाचून "उत्तेजित" अवस्था प्राप्त झाली.

सवाल-जबाब टाइप मनोगते आवडली (एकदम भापो)

प्रकाश१११'s picture

2 Feb 2011 - 10:59 am | प्रकाश१११

गणेशा हे सर्व मस्त जमलेय .

मग हरवलेला एकांत पुन्हा
गर्दीत नजर भिडवायचा
कुठल्याश्या टुकार गाण्यावर
टेबलावर ताल धरायचा

पुन्हा कॉलेजमध्ये येईपर्यंत
गणिताचा क्लास संपलेला
प्रॅक्टीकल ला पुन्हा आपण
एकच कॉम्प निवडलेला

जुन्यां आठवणी ह्या छान असतात .त्यातील बोचरेपणा जाऊन फक्त हळुवार पणा
राहिलेला असतो. आणि तो फार भावतो मनाला. हा फ्ल्याशब्याक असतो. झालेली म्याच बघणे फारसे छान नसते.
सर्व माहित असते . पण आयुष्याचा फलाश ब्याक बघणे निनिराले संदर्भ नव्याने उलगडत जातात