यूं तो है हमदर्द भी...(६)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
5 Jan 2011 - 12:43 am

या आधीचे कथा भागः , , , , आणि

.....अडीच महिने भारतात काढून ऑगस्ट च्या अखेरीस पद्मा-संपदा आजीला घेऊन डियरफील्डला यायला निघाल्या.

************
डियरफील्डला त्या सगळ्या आल्यावर संपदाची शाळा लगेचच सुरु झाली. पद्मा ने disability leave घेतली आणि महिनाभर तरी घरीच काढायचं ठरलं. आठवड्यातून दोनदा मेड-सर्व्हिस मिळाल्याने थोडीशी घराच्या स्वच्छतेला मदत मिळाली. जमेल तशी पद्मा स्वयंपाकघरात यायची, पण आईंनी खूपच सहभाग घेतला स्वयंपाकात, त्यामुळे जेवणं, डबे वगैरे व्यवस्थित वेळेवर होत होतं.

दोन आठवडे गेले. मधून मधून तीन चार दिवसांनी थकवा यायचा परत पद्माला, मग पडून रहायची. आल्यावर संजयने 'कशी आहेस?' विचारलं की ती किती चटकन थकते ते ती सांगायची, 'आराम कर, वाटेल बरं' म्हणून संजय टी व्ही पहायला, कधी संपदाबरोबर खेळायला तर कधी आपल्या कामाला लागायचा. आल्यापासून कामाच्या गडबडीत तो विसरूनच गेला होता, पण एका शनिवारी घरी आल्यावर संजयने डॉ. गानूंनी पाठवलेल्या CFS च्या लिंक वरून माहिती वाचायला सुरुवात केली.
*********

'Symptoms of CFS include post-exertional malaise; unrefreshing sleep; widespread muscle and joint pain; cognitive difficulties (confusion/lack of recognition or understanding/inability to process information); ....'

त्याला परिचित नसलेल्या शब्दांचा अर्थ शोधून काढून तो पुढे सरकत होता

malaise - अस्वस्थ वाटणं

'...chronic, often severe, mental and physical exhaustion observed in a previously healthy and active person. .......additional symptoms include muscle weakness, hypersensitivity, orthostatic intolerance, digestive disturbances, depression, poor immune response, and cardiac and respiratory problems.'

orthostatic intolerance - development of symptoms during upright standing relieved by recumbency or by sitting back down again...'

त्याला पद्माचं उभं राहिल्यावर लगेचच बसावंसं वाटणं आठवलं. हे असं का होत असावं याचंही उत्तर त्याला पुढे माहिती वाचल्यावर कळलं..'आपण जेंव्हा उभं राहतो तेंव्हा छातीतलं जवळजवळ पाऊण लिटर रक्त अचानक पायाकडे धावतं, orthostatic intolerance चा त्रास होणाऱ्या लोकांमध्ये याला compensate करणारी यंत्रणा काम करत नाही.'

'All diagnostic criteria require that the symptoms must not be caused by other medical conditions.'

त्याला डॉ. गानूंनी सांगितलेलं diagnosis of exclusion आठवलं. 'Boy, she must be really good!' त्याच्या मनात विचार आला.

'Studies have reported numbers on the prevalence of CFS that vary widely, from 7 to 3,000 cases of CFS for every 100,000 adults, ...it is estimated that more than 1 million Americans suffer from CFS (and approximately 80% of the cases are undiagnosed) and approximately a quarter of a million people in the UK have CFS. ...'

भारतात याची काय आकडेवारी आहे ते त्याला प्रयत्न करूनही सापडलं नाही.

For unknown reasons, CFS occurs most often in people in their 40s and 50s, more often in women than men.
'पद्मा तर आता कुठे ३८ ची होतेय...'
'In the absence of a clear etiology, the treatment of CFS has been both empirical and unconventional.'

त्याने पुन्हा डिक्शनरी काढली: etiology - उत्पत्तीचं कारण, उत्पत्तीचा अभ्यास, empirical - information gained by observation. ...मागील अनुभवांवरून पुढील उपचार ठरवणं ...

'Therapies have included immunostimulant therapy, with uneven results.....

('हं...म्हणजे डॉक्टर गानू immune modulators वापरा म्हणाल्या ते यासाठी होय!')

Anti-depressants, NSAIDs, anxiolytic drugs, stimulants, anti-allergy drugs and anti-hypotensive drugs have all been used, but are not universally beneficial.'

त्याला डॉ. गानूंची allopathic ट्रीटमेंटची अनिच्छा आठवली.

'The lack of effective therapy has led to use of plant extracts, homeopathy, hypnosis, acupuncture, and traditional medicine, only some with sustained benefits."
('हं! सप्रे जे काय देताहेत ते उपयोगी पडेल का?')

'Infectious Xenotropic murine leukemia virus-related virus (XMRV) has been isolated from sera of CFS patients.....'
आणि असं बरंच काही, रात्रीचे बारा वाजून गेले तरी संजय वाचतच होता.

**********

(क्रमशः)

- बहुगुणी

कथाविचार

प्रतिक्रिया

वाचतेय...पुढ्चा आणि शेवटचा भाग येऊ दे लवकर :-)

Nile's picture

5 Jan 2011 - 4:30 am | Nile

वाचतो आहे.

मस्त कलंदर's picture

5 Jan 2011 - 11:31 am | मस्त कलंदर

वाचतेय. अगदी पहिल्या भागापासून. विषय वेगळा तर आहेच आणि तो समजेल असा मांडला आहे त्याबद्दल अभिनंदन. आणि रोज एक भाग येत असल्याने एकदम भडिमार नाही आणि मोठ खंडही नसल्याने आधी काय वाचलं हे मुद्दाम आठवावंही लागत नाही. आधी कथा लिहून ती काही भागांत प्रकाशित करण्याची तुमची पद्धत आवडली.

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..

रेवती's picture

5 Jan 2011 - 5:00 pm | रेवती

वाचतिये.

प्राजक्ता पवार's picture

5 Jan 2011 - 5:39 pm | प्राजक्ता पवार

वाचतेय .

मिपा वर आजपर्यंत वाचलेल्या उत्तम कथांमधील ही आहे ... पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहेच !
(आता तरी कृपया 'वाचनखुण साठवा' सुविधा मिळेल का please)