स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
18 Dec 2010 - 4:56 pm

"स्नेहाच्या ठिकाणीच कामसंबंध येणार, बाळीशा." काड्यापेटीतली काडी तंदूरी चिकन चघळावं तशी चघळत हणम्या म्हणाला. "ही पुनरावृत्ती आहे. टॉटॉलॉजी. स्नेह नसेल तर कामसंबंध कसे येणार? आणि आले तरी त्रास नाही का होणार?"
"हणम्या, काही भलतंसलतं वाचू नकोस. तुला 'काम' या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, हा लेका तुझा दोष आहे. काम म्हणजे कर्म. मराठीत सांगायचं तर वर्क. इथं अर्थ हा असा आहे."
हणम्यानं काडी उलटी करुन तोंडात घातली आणि काडीवरचा गूल लॉलिपॉपसारखा चोखायला लागला. हणम्याबरोबर जगायचं म्हणजे अशा गोष्टींची सवयच करुन घ्यावी लागते. पण हणम्याचे हे असे 'वन ट्रॅक माईंड' आहे. 'काम' या शब्दाचा त्याला एकच अर्थ ठाऊक आहे. मध्ये एकदा औषधांच्या दुकानात ''जेलुसिल' द्या' च्या ऐवजी हणम्या 'कामसलील द्या' असं म्हणाला होता. केमिस्टची तीन दिवस दातखीळ बसली होती .
"केवढी गरज असते व्यक्तीला स्वतःविषयी बोलत राहाण्याची. कुणी ऐको वा न ऐको, बोलत राहाणे महत्त्वाचे." माझ्या मागे उभा राहून हणम्या वाचत होता. मला बिडी आणि कांद्याच्या संमिश्र 'कंदर्प' ची आठवण करुन देत. " हम्म . हे बरोबर आहे, बाळीशा. आपल्या 'सपना बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटचं'च उदाहरण घे की. जो तो साला 'आता माझंच बघ ना' याशिवाय बोलायला तयार नाही. तिसर्‍या पेगला माणसे हिंदीवर येतात. 'तू एकबार बोलके देख यार, सारी दुनिया की वाट लगा दूंगा..' हे ऐकू आले की बिल मागवण्याची वेळ झाली, हे अप्पा वाघालाही ठाऊक आहे. आणि अप्पा कधी बील तरी देतो काय?" हणम्या म्हणाला.
"अप्पाचा काय संबंध इथे, हणम्या? आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं, असं लिहिलंय इथं." मी करवादून म्हणालो.
"मन उघडं करणं म्हणजे? " हणम्यानं तोंडातली काडी थुंकून टाकली. "आपण पूर्वी जवाहरमध्ये प्यायला जायचो, तेंव्हा तिथे काय उघडं व्हायचं आठवतंय ना तुला? शिवाय मंगलोरच्या 'टेक ऑफ' बार मध्ये. तिथे तर साल्या अप्पाने माझा फोटो पण काढला होता. नंतर परत दिला म्हणा, त्यालाच लाज वाटायला लागली म्हणून. पण मन उघडं म्हणजे?"
"हणम्या, हे तुझ्या कुवतीपलीकडचं आहे रे. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते असं म्हटलंय इथे. "
"वादविवादातून विकास काय? विकास? विकास?"
"जपून हणमंतराव, जपून शब्द वापरा. अशा शब्दांचा रटाळ लिखाणाशी संबंध लावतील लोक..." मी म्हणालो.
"पण वादविवादातून विकास? म्हणजे इथे बराच काळ प्रतिबंधित राहिलेल्या आणि अलीकडेच जनप्रवाहात सहभागी होण्याची परवानगी मिळालेल्या एका लोकप्रिय सदस्याला सगळ्यांचा विकासच साधायचा होता म्हण की. सदरहू गृहस्थांचे जे काही तथाकथित वाद झाले, त्यामागे 'समोरच्या व्यक्तीचा विकास' यापलिकडे काय कारण असू शकते? 'गुणग्राही संपादक' म्हणून नावारुपाला आलेले दुसरे एक प्रतिभावंत पाहा. 'वादातून विकास' या कल्पनेची त्यांनी इतकी जबरदस्त कास धरली की बिचार्‍यांना अखेर वाचनमात्र व्हावे लागले. तेच ते कवनदुष्ट, परपुष्ट पण तूर्तरुष्ट कुमार. या सगळ्यांना विकासच करायचा आहे म्हण की."
"काय की बुवा. तीच गोष्ट भेटवस्तूंची असंही इथं म्हटलंय. अर्थात तुला हणम्या काय फरक पडतो म्हणा. तू आयुष्यभर दुसर्‍यांच्या वस्तू बिनदिक्कत वापरत आला आहेस. त्यातून तुझी सगळ्यात आवडती भेटवस्तू म्हणजे 'नारंगी' ची क्वार्टर. ती मिळाली की तुला आनंद तर होतोच, पण ती चपटी पोटात गेली की मग तुझं जे काही होतं, ते बघूनच इतरांनाही अवर्णनीय आनंद होतो.
"चल." हणम्या उठला.
"अरे, थांब, थांब. सात तरी वाजू देत.तोपर्यंत हे पुढचं वाच. नोकरी करणार्‍या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फायदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात काय आहे, हणम्या, यातलं तुला काही ठाऊक असण्याचा प्रश्नच येत नाही..." मी म्हणालो.
"म्हणून काय झालं? नोकरी करणार्‍या तुमच्यासारख्यांचं काय होतंय ते मी बघतो आहेच की. लोकांनी पैसे बुडवणे, बॉसने त्याच्या वशिल्यातल्या माणसांना प्रमोशन देणे, आपल्या मऊपणाचा फायदा घेऊन आपल्या सहकार्‍यांनी आपल्यावर कामाची गाठोडी टाकून स्वतः टिंग्या मारत हिंडणे .... मनस्वास्थ्य टिकवण्याचे कित्ती कित्ती हे मार्ग गं बाई!"
"कुजकटासारखं बोलू नकोस माणूसघाण्या. चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात, हे माहिती आहे का तुला?
"संबंधांतून काय शिकायला मिळतं म्हणालास?" हणम्यानं दुसरी काडी उचलली.
"काही नाही. एलनला मूल नाही म्हणे."
"हे असंच होणार बघ. संबंधातून शिकायचा ध्यास घेतला तर लोकांना मुलं कशी होणार?" हणम्या खिदळला.
"मूर्ख आहेस तू हणम्या. स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध नव्हे, कामाच्या ठिकाणाचे स्नेहसंबंध."
"तेच ते.प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?"
मी कॉम्प्युटर बंद केला. "चल.." मी चपला सरकवत म्हणालो. हणम्या तर एव्हाना जिन्याच्या पायर्‍या उतरायलाही लागला होता.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 5:07 pm | रन्गराव

अब तेरा क्या होगा सन्जोप? ;)

सुहास..'s picture

18 Dec 2010 - 5:09 pm | सुहास..

* त्या प ण ती !!

बाकी

'वादातून विकास' हा शब्द भयानक आवडला !! काय ते WPTA Club का काय तरी !!

वाश्या
आमच्या इथे आपल्या परदेशवारीची फुकटात 'जाहीरात' करुन मिळेल.

श्रावण मोडक's picture

18 Dec 2010 - 5:25 pm | श्रावण मोडक

चालू द्या. वाचतो आहोत.
जवाहर? बाळीशाचं आणि हणम्याचं वय किती असं विचारण्याचा मोह झालाच. किती जुन्या हाटेलचं नाव हे. त्या काळात तिथं फक्त पिणं चालायचं नाही. इतरही बरंच...!

जवाहर? बाळीशाचं आणि हणम्याचं वय किती असं विचारण्याचा मोह झालाच. किती जुन्या हाटेलचं नाव हे. त्या काळात तिथं फक्त पिणं चालायचं नाही. इतरही बरंच...! >>>

मा ही त गा र !!

असणे चांगले , बसणे मात्र ..हॅ हॅ हॅ !

इंटरनेटस्नेही's picture

18 Dec 2010 - 6:02 pm | इंटरनेटस्नेही

''जेलुसिल' द्या' च्या ऐवजी हणम्या 'कामसलील द्या' असं म्हणाला होता.

या वाक्यातला 'तो' विशिष्ट हा शब्द टाईप करताना लै डेअरिंग लागलं असेल नै? साला वाचातानच अंगावर काटा आला! बाकी लेख वाचुन हसुन हसुन पुरेवाट झाली. विडंबन आवडले! :)

स्पा's picture

18 Dec 2010 - 6:30 pm | स्पा

+१

शुचि's picture

18 Dec 2010 - 6:10 pm | शुचि

विडंबन झकास. अफलातून!
फक्त
>> "केवढी गरज असते व्यक्तीला स्वतःविषयी बोलत राहाण्याची. कुणी ऐको वा न ऐको, बोलत राहाणे महत्त्वाचे." >>
सन्जोपराव तो चिमटा काढायची गरज होती का?

सन्जोपराव तो चिमटा काढायची गरज होती का?

सहमत .. सन्जोपरावांनी असा चिमटा काढायला नको होता .. सन्जोपराव पुढच्या जन्मी सन्जनाबाई बनुन येतील आणि शुचि शम्मीम्हणुन जन्म घेतील आणि चिमट्यांची सेटलमेंट होईल असे काल रात्रीच मला स्वप्न पडले होते.

- स्वप्निलराव

तिमा's picture

19 Dec 2010 - 11:49 am | तिमा

लेखन इतकं प्रभावी आहे की वरील प्रतिसादातल्या

' चिमट्यांची सेटलमेंट' हे वाचताना चुकून चिमट्यांची सलीलमेंट' असं वाचलं.

टारझन's picture

18 Dec 2010 - 6:29 pm | टारझन

कांटां लगा .. हाय लगा ... ह्हा आज्जा राज्जा बंगले के पिछे तेरी बेरी के निचे आहा हा रे पिया हा हा रे पियाआआआ ... कांटां लगाआआआआआअ :)

आजकाल शेफाली जरिवाला कुठे दिसत नाही ;)

"मराठी संकेतस्थळावरील महिला- पुरूष- मसं संबंधांचा गाळीव इतिहास" नावाचे पुस्तक आंजावरील एका विव्दानाने लिहायला घेतले आहे, मागणी नोंदवा अशी बातमी आत्ताच मिळाली होती मुंबईच्या एका मित्राकडून.

त्यातलाच हा लिक झालेला भाग आहे का? ;-)

वेताळ's picture

18 Dec 2010 - 6:37 pm | वेताळ

अगाया या...... तुमच्या बार मध्ये एकदा यायला पाहिजे....

राजेश घासकडवी's picture

19 Dec 2010 - 6:05 am | राजेश घासकडवी

मस्त विडंबन. काही कोपरखळ्या कळल्या नाहीत, पण मजा आली.

इंटरनेटस्नेही's picture

19 Dec 2010 - 4:34 pm | इंटरनेटस्नेही

छान!

स्वाती२'s picture

19 Dec 2010 - 5:25 pm | स्वाती२

:)

चिंतामणी's picture

19 Dec 2010 - 5:49 pm | चिंतामणी

मला एक शंका आहे की शूचीच्या लेखामधून स्फुर्ती घेउन लिहीले की

http://www.misalpav.com/node/15863#comment-267574

ह्या मुळे स्फुर्ती मिळाली??????????

ऋषिकेश's picture

20 Dec 2010 - 8:42 am | ऋषिकेश

रावसाहेब ब्याक इन फॉर्म! :)
मस्त