सायबानू मीच त्यो .... भाग २

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
13 Dec 2010 - 1:54 pm

सायबानू मीच त्यो .... भाग १

***

त्यानंतर पुढे काय झाले त्यांना कळलंच नाही ,फक्त तिन्हीसांजेच्या भयाण प्रकाशात, ती मांजरे, तो चिंचेचा वृक्ष, त्यांची बंगली, आणि कोर्टाची इमारत भोवताली गरागरा फेर धरून नाचत आहेत एवढाच जाणवत होतं.
जाग आली तेव्हा ते बंगल्यातच होते. डोक भयानक ठणकत होतं. हनम्या समोरच उभा असतो, सोबत डॉक्टर दिलीप बिरुटे! हे इथे कसे काय? शेळ्क्यांना प्रश्न पडतो , ते उठायचा प्रयत्न करतात, पण अशक्तपणामुळे परत खाली कोसळतात,
हा हा उठू नका, झोपूनच राहा. , डॉक्टर सांगतात. 'डॉक्टर तुम्ही इथे? काय झालंय मला?' , शेळके विचारतात.
पण हन्म्याच उत्तरतो, साहेब म्याच बोलावणं धाडलं ह्यांस्नी.. म्या सकाळी आलू तेव्हा ,तुम्ही भाईरच बेसूद पडला व्हतात, म्या लय घाबरलो.
"हे बघा शेळके साहेब, तसं काळजी करण्यासारखं काही नाही, फक्त तुमचं B.P.अचानक लो झालं, म्हणून चक्कर आली,त्यात तुम्ही रात्रभर बाहेरच्या भयानक गारठ्यात असल्याने ताप सुद्धा भरला आहे, तेव्हा आता दिलेल्या गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या, आणि मुख्य म्हणजे चार दिवस पूर्ण आराम. ओके? मी येईन पार २ ३ दिवसांनी" एवढे म्हणून डॉक्टर निघून जातात, हनम्या त्यांना सोडायला बाहेर जातो. शेळके परत विचारात गुरफटतात, मला कधीपासून bp चा त्रास व्हायला लागला?
कि मांजरांना बघून मी घाबरलो ? छ्या छ्या कदाचित अति विचार करून असं झालं असेल, आपला पिणं पण वाढलंय हल्ली, स्वतःला जपायलाच हवं .

हनम्या तेवढ्यात भाताची पेज घेऊन येतो, "घ्या साहेब थोडं खाऊन घ्या, काल बी तुम्ही उपाशीच ऱ्हायलात ,बरं वाटेल."
"हम्म्म्म" ,हनम्या ,मला सुद्धा काल ती मांजरं दिसली बरं का? आणि एक नव्हे पूर्ण कुटुंब आहे त्यांचं , तू उगाचच घाबरतोस," साहेब जणू स्वतःलाच धीर द्यावा तसे स्वगत पुटपुटटात.
साहेब तुम्ही काय बी बोला , पण मला भ्या वाट्ते म्हणजे वाट्ते , हनम्या काय आपला हेका सोडत नाही. "बरं साहेब मागच्या 'संडासाच' काम काढलय ना, ते कामगार आलेत , मी मागच्या दारीच हाय, काय लागलं तर बोलवा "
ठीक आहे जा तू, साहेब कुशी बदलून झोपायचा प्रयत्न करतात, पण झोप कसली येतेय ... परत विचार चक्र सुरु होतं .त्यांना महिन्याभरापूर्वीचा घटनाक्रम आठवू लागतो. नवीन केस दाखल झालेली असते. कारण गावच्या सर्पंच्याच्या विधवा सुनेवर बलात्कार, आणि मग तिचा खून झालेला असतो. या खुनात एकमेव आरोपी असतो 'किसन गणपत शेलार' दादासाहेब रावराण्यांचा विश्वासू नोकर. त्याच्या आधीच्या दोन पिढ्या सुद्धा रावराणे घराण्याच्या सेवेतच गेलेल्या, त्यामुळे इतक्या विश्वासू माणसाने हे कृत्य करावे यावर गावकरी विश्वास ठेवायला तयार नव्हते.
याला अजून एक कारण होतं, स्वतः दादासाहेब रावराणे, अतिशय क्रूर व्यक्तिमत्व... त्यांची पिढीजात अमाप संपत्ती, दोन तीन हजार एकर जमीन, व्याजाचा धंदा, शिवाय अनेक काळे धंदे. कागदोपत्री दारिद्र्यरेषेखालील शेतकरी सिद्ध करून सरकारने जाहीर केलेली "प्याकेजेस" स्वतः लाटायची, गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जाखाली पिचवून टाकायचं आणि शेवटी त्यांची जमीन हद्पून टाकायची. हा त्यांचे सर्व धंदे अख्या गावाला माहित होते, पण बोलणार कोण ? स्थानिक नेते आणि पोलीस खाते ते खिशात ठेवून फिरायचे. बायकांच्या बाबतीत अतिशय वाईट नजर.
तर जेव्हा हि केस दाखल झाली तेव्हा 'किसन' चं वकीलपत्र घ्यायला कोणी तयार होईनात. तेव्हा शेळक्यांनी एक सरकारी वकिलाची नेमणूक केली. वरकरणी पाहता पुरावे तसे कमीच होते, २ ३ साक्षीदार, ती पण रावराण्यांचीच माणसं.
किसन ला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्यासाठी,तसे पुरावे कमीच, याउलट 'राव्रन्यांवर'संशयाची सुई फिरत होई, अख्या गावात तशीच चर्चा होती, सरकारी वकिलाने तर एकदा आपल्याला सर्व details आणून दिलेल्या...
शेळके साहेबांच्या विचारांनी आता वेग पकडलेला होता.
मग त्यांना पुढचं आठवू लागलं,
रावराण्यांच रात्री त्यांच्या घरी येणं, सरकारी वकील अन त्यांना २० एकर जमीन आणि 1 कोटी रुपयाची "ऑफर" देणं ,
इतक्या दिवसांची कडकी सुटली म्हणून आनंदाने बेहोष होऊन रावराण्याच्या वाड्यावर केलेली पार्टी.
"आपण तर कोल्हापुरात बापजन्मात इतके "पैसे" कमवू शकलो नसतो"..... त्याही परीस्थित साहेबांना खुदकन हसू आले...
पण आता स्वप्नील ला लंडन ला शिकायला पाठ्वाय्चेच, जमीन विकून टाकून कोल्हापुरात एक अलिशान बंगला ..... स्वप्नांचे थर रचत होते साहेब .
पण परत त्यांना पुढचा घटनाक्रम आठवला आणि त्यांचा तोंड परत कडू झालं..
पार्टीच्या दुसर्याच दिवशी 'किसन'वर खुन्याचा गलिच्छ आरोप लावून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण . त्याने निकाल ऐकल्यानंतर वेगळ्याच नजरेने रोखून बघणं, आणि तीच नजर शेवटी अगतिकतेकडे झुकणं ,बायकोने आणि दोन लहान मुलींनी त्याला मिठी मारून केलेला आक्रोश , आपल्या प्रामाणिकपणाचा असा मोबदला मिळालेला पाहून जागच्या जागी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने जागीच कोसळून, तिथल्यातिथे मरण पावलेला किसन....
बापरे.. तो दिवस तसाच्या तसा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला...
एक मन त्यांना सांगत होत, का असा बळी घेतलास एखाद्याचा, काय वाकडं केलं होतं त्याने तुझं? पैश्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचलास?
पण दुसरं मन त्यांना बंगल्याची स्वप्नं दाखवत होतं .
शेळके साहेब कूस बदलतात, पण विचार मात्र त्यांची पाठ सोडायला तयार नसतात. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही, त्यांना मागचा आठवडा आठवतो
कालच्यासारखीच संध्याकाळ ... गंगी 'किसन' ची बायको.. अचानक आपल्या घरी येते.. बापरे तिची नजर, त्यांच्या अंगावर काटा येतो...
अंगात रक्ताचा कण नसल्यासारखी पांढरी फटफटीत पडलेली, उघडं कपाळ, पण नजर, एक वेगळाच उद्देश असल्यागत तेजस्वी..
आपण तिला हाकलवून देतो, ... मग तिचं ते रात्रभर बाहेर बसून खुळ्यागत आपल्या बंगल्याकडे बघणं...
शेळके साहेबांना विचार असह्य होतात, ते उठून बसतात .बसल्याबरोबर त्यांना बाहेरचा चिंचेचा वृक्ष दिसतो , याच्याच पारावर बसून ती आपल्याकडे बघत होती.....
विचारांचा पगडा काही केल्या जात नाही .....
तिने आपल्याला एका शब्दाने सुद्धा शिव्या दिल्या नाहीत शाप दिले नाहीत... का असं?
ते विचार करू लागतात , पण तिच्या नजरेतच त्यापेक्षा भयानक सूड पेटलेला त्यांना जाणवतो....
गावातही त्यांच्या नावाने शिमगा सुरु असतो, बापरे हि केस वरपर्यंत नको जायला आपली नोकरीच जायची, वर घोटाळ्यात अडकलो तर अजून वाट... ते घाबरेघुबरे होतात....
मग त्याच्या दुसऱ्या दिवशीची घटना... गंगीची पोटच्या मुलींसकट विहिरीत उडी मारून आत्महत्या .. प्रकरण एवढं वाढेल असा त्यांना अजिबात वाटलेलं नव्हतं..
आणि ४ दिवसांपूर्वीची ती घटना घडते.. अख्खं 'नागरगोजे' हादरून निघतं....
दादासाहेबांचा 'खून' , नक्की कोणी केलाय ते कोणालाच कळत नाही ... त्यांचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत वाड्याच्या मागच्या बागेत सापडतो .. सर्व अंगावर नखांचे वार... डोळे बाहेर आलेले . आणि नाकातोंडात ...... कुठल्यातरी प्राण्याचे केस.. .

प्राण्याचे केस? शेळके साहेब फाटकन भानावर येतात.... नखांचे वार? ........ त्यांना आत्ता कळत हनम्या का घाबरतो ते. ती मांजर....
त्यांना आता लवकरात लवकर त्या गावातून कायमचं निघून जायचं असतं. ..
ते पाणी प्यायला उठतात तर समोरच............................एक मांजर खिडकीत बसून त्यांच्याकडे बघत असत.. ते किंचाळतात .. हनम्या हनम्या ..... लवकर ये..
हनम्या धावत येतो... शेळके साहेब उशीत तोंड लपवून थरथर कापत असतात ..
हनम्या तू बरोबर होतस ... ती मांजर नक्कीच विचित्र आहेत...
आता हनम्या पण घाबरतो.. साहेब तुम्ही झोपा.. मी बसतो तुमच्या बाजूला..... कसे बसे शेळके साहेब शांत होतात.
तो दिवस तसाच उदास मावळतो..
हनम्या निघायला लागतो , साहेब त्याला राहायची विनंती करतात... पण त्याची आधीच एवढी फाटलेली असल्याने, तो स्पष्ट नकार देतो,
"साहेब तुम्ही बी राहू नका इकडं एकट्याने . मी तुम्हाला सांगणार नव्हतो, पण आता बोलतोच त्या 'किसनाच्या' केस नंतरच हे आक्रीत घडाय लागल्या गावान."
शेळके साहेब विचार करतात, काय करायचं? ते आपल्या वकील मित्राला फोन करतात त्याला रात्री राहायला बोलावतात .
तो सुद्धा तयार होतो. साहेबांची सोय झालेली बघून हणम्या सटकतो .
परत तीच तिन्हीसांजा....... साहेब झोपूनच असतात .सारखी नजर इकडे तिकडे भिरभिरती.. कुठून झक मारली आणि राव्रण्याच्या बाजूने निकाल दिला .. साला स्वतः तर गचकलाच, आता माझी पण लावून ठेवलीये.. तसा माझा भूता वर विश्वास नाहीये. पण जश्या घटना घडता आहेत.. काहीच समजेनासं झालाय.. साहेबांचे विचार सुरूच... कधी एकदा त्यांचा मित्र येईल असं झालेलं असतं... ते उठून परत एकदा, दार खिडक्या व्यवस्थित लावली आहेत न ते पाहतात.. जवळ एक काठी सुद्धा घेऊन ठेवतात, आता 8 वाजून गेलेले असतात.. अजून काही त्याचा पत्ता नसतो.....
तेवढ्यात कर्कश्श आवाजात फोन किंचाळतो, शेळके परत दचकतात....
हेल्लो.. हा हा ... काsssssय .... अरे बापरे...... काय सांगतोस ? कधी? ठीक आहे.... ओके ... शेळके साहेबांचा चेहरा काळवंडतो,
मित्राची सासू वारल्याने तो तडक बाहेरगावी जायला निघालेला असतो.....
अजून पर्यंत तरी सगळं नॉर्मल असत, शेळके साहेब स्वतःलाच समजावतात. उगाच घाबरलो... मस्त जेवूया आणि झोपून जाऊया.. काही होत नाही. सगळे विचार काढून टाकायचे.... हवंतर एक छोटा पेग मारू, झोप नाही आली तर ..
तूर्तास जरा आराम करूया, म्हणत परत टेकतात ......
डोळे मिटून गुणगुणत असताना अचानक , त्यांना गळ्याशी मऊ मऊ भूळभूळ जाणवायला लागते ... काही समजायच्या आता तो फास गळ्याभोवत आवळला जातो ..
शेळके साहेब जीवाच्या आकांताने किंकाळी फोडायला जातात.. पण घशातून आवाजच येत नाही..... डोक्यावर नखाने कोणीतरी खरवडतय एवढेच जाणवू लागते....
तसेच ते पलंगावरून खाली कोसळतात .... आता पाश अचानक नाहीसे होतात.. पण खोली धुराने भरून गेलेली असते...... काहीतरी जळल्याचा वास , अतिशय घाण दुर्गंधी तिथे दाटलेली असते.....
त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते.. ते जोरजोरात तोडावर हात ठेवून खोकतात ....
त्यांना काहीतरी जाणवत.. . ते हातात बघतात.. त्यात मांजरीच्या केसांचा पुंजका असतो......

क्रमशः

कथामौजमजा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

13 Dec 2010 - 2:18 pm | पियुशा

मस्त लिहिले आहेस पु.ले.शु.

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 2:49 pm | शिल्पा ब

छान लिहिलंय...कथा आवडली.

रोमना's picture

13 Dec 2010 - 2:53 pm | रोमना

तुमचे लिखाण मुरत जाणार्‍या लोणच्याप्रमाणे वाटते.
अजुन एक भाग हवा होता, शेळकेंना शिक्षा कशी होते ते नमुद करायला हवे होते.
पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.

रोमना's picture

13 Dec 2010 - 2:53 pm | रोमना

तुमचे लिखाण मुरत जाणार्‍या लोणच्याप्रमाणे वाटते.
अजुन एक भाग हवा होता, शेळकेंना शिक्षा कशी होते ते नमुद करायला हवे होते.
पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.

रोमना's picture

13 Dec 2010 - 2:53 pm | रोमना

तुमचे लिखाण मुरत जाणार्‍या लोणच्याप्रमाणे वाटते.
अजुन एक भाग हवा होता, शेळकेंना शिक्षा कशी होते ते नमुद करायला हवे होते.
पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.

बेस हाय, पन भाष्येत आजूनबी जरा मार खातंय !!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Dec 2010 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार

छान रे स्पा.
एक वेगळा प्रकार हाताळला आहेस हे आवडले :) असेच छान छान लिहित रहा.

इंटरनेटस्नेही's picture

13 Dec 2010 - 5:49 pm | इंटरनेटस्नेही

मस्त लेख =)) =))

कार्यबाहुल्यामुळे दीर्घ प्रतिसाद काही काळानंतर देईन!

परा यांच्याशी बाडीस.

-

ॠषिकेश इंटेश,
मिपा दुर्लक्षित पँथर.

'ॠषिकेश' हे आमचे खरे नाव आहे!

प्रीत-मोहर's picture

13 Dec 2010 - 3:26 pm | प्रीत-मोहर

मस्त लिवतोस रे स्पा!!!

चा मारी, हाय अजून एक भाग........................

एवढ्यात आभार प्रदर्शन नकू.......

क्रमश: टाकायला इसरलो

(शेल्क्याचा पार ब्यांड वाजणार आहे ) :)

अरे ते डॉचे नाव चुकले आहे का? ;)
पूर्ण वाचुन प्रतिक्रिया देतोच.

नन्दादीप's picture

13 Dec 2010 - 4:36 pm | नन्दादीप

>>डॉचे नाव चुकले आहे का?

चुकले नाही रे, मला वाट्ते जुना हिशोब बाकी असावा...कि॑वा पुर्ववैमनस्य... है ना स्पा भाऊ????

मला वाट्ते जुना हिशोब बाकी असावा...कि॑वा पुर्ववैमनस्य... है ना स्पा भाऊ???

पुर्ववैमनस्य?????

हॅ हॅ हॅ

कै च्या कै....
असच नाव लिहिलंय.....

जरा मजा म्हणून.. काही इशेष कारण नाही

रणजित चितळे's picture

13 Dec 2010 - 4:46 pm | रणजित चितळे

मी विचारच करत होतो, अजुन पुढे असणार म्हणुन तेवढ्यात स्पा ने कळवले.

आता पुढच्या भागाची वाट बघतोय

sneharani's picture

13 Dec 2010 - 4:53 pm | sneharani

पुढे लिहा.

तुमे जिव देयाला निगला वता ना बाऊ.
अता आमला जिव देयाचा पाली आला

चांगली रंगवलीस रे स्पावड्या भावड्या..
येऊंदे अजून

बद्दु's picture

13 Dec 2010 - 5:42 pm | बद्दु

एकदम फटका..जबरी गोष्ट्...तोडलंस मित्रा...

दुसरा भागही चांगला झालाय.
मला वाटले आता या भागातच कथा संपणार पण अजून एक भाग आहे म्हणून उत्सुकता वाढली आहे.

प्रकाश१११'s picture

13 Dec 2010 - 8:20 pm | प्रकाश१११

स्पा--आवडले.भाषाशैली आवडली .
मस्त लिहित राहा .

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

अनामिक's picture

13 Dec 2010 - 9:57 pm | अनामिक

छान लिहिलं आहेस, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

अवांतरः मला ह्या कथेत त्रुटी वाटताहेत... १) तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका असते की ग्रामपंचायत? २) पहिल्या भागात नगरगोजे गावाची जमीन सुपीक आणि मुळ पीक ऊस असं सांगीतलं आहे. मग दुसर्‍या भागात तिथे गरीब शेतकरी आणि त्यांना लुबाडणारे रावराणे कसे? जर जमीन सुपीक असेल आणि ऊसाचं पीक असेल तर तिथला शेतकरी श्रीमंत नसला तरी अती गरीबही नसावा.

स्पा's picture

14 Dec 2010 - 12:51 pm | स्पा

@ अनामिक.. फक्त.. एक छोटा विषय, म्हजे फक्त 'कोर्ट; बघून डायरेक्ट कथाच लिहायला घेतली

त्यामुळे कथेची बारीकसारीक माहिती चांगलीच गंडली आहे..
भाषेचा पण बोजवारा उडालेला आहे...

पण वाचकांनी बरोबर मुद्दे मांडत चुका लक्षात आणून दिल्या .त्यसाठी धन्यवाद
पुढे लिहिताना, बारीक सारीक तपशील पण कुठे चुकणार नाहीत याची काळजी घेईन

इन्द्र्राज पवार's picture

13 Dec 2010 - 10:30 pm | इन्द्र्राज पवार

'स्पा' चा प्रतिसादातील खुलासा वाचण्यापूर्वी असे वाटले की, शेळके यांना "वर" पाठविल्यानंतर ते मांजर (आणि स्पा देखील) शेवटी थंड झाले असतील....पण आता तर असे दिसते की, शेळक्यांची साडेसाती अजून संपलेली नाही. बरं झालं, नाहीतर १ कोट रुपये रावराण्यांकडून खाऊन शेलाराच्या घराची वाट लावणारा हे कोर्ट इतक्यातच कसे "सुटले"?

हिरव्या डोळ्याच्या काळ्या मांजराला पुढील (यशस्वी) वाटचालीसाठी शुभेच्छा !

इन्द्रा

इंद्रराज पवार यांचा आयडी हॅक झालेला आहे..

इन्द्र्राज पवार's picture

14 Dec 2010 - 9:37 pm | इन्द्र्राज पवार

शिल्पा.....आपल्या शाळा-कॉलेज-विद्यापीठीय प्रश्नपत्रिकेत किमान १५-२० गुणांचा एक प्रश्न कायमपणे असतो..! "सकारण सिद्ध करा...." ~ त्याच चालीवर विचारतो तुम्हाला की, तुम्ही वर जे डिडक्शन काढले आहे ते प्लीज सकारण सिद्ध करा....जेणेकरून ते मलाही उमजेल.

(थोडेसे अवांतर कुजबूजतो : "खरंच हॅक झालाय...?")

इन्द्रा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Dec 2010 - 5:09 am | निनाद मुक्काम प...

मस्त वळण घेतले आहे कथेने
बहुदा अशी दिसत असावी .

शिल्पा ब's picture

14 Dec 2010 - 10:14 am | शिल्पा ब

ही जर्मनीतली मांजर आहे का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Dec 2010 - 3:39 pm | निनाद मुक्काम प...

नाही हॉलीवूड ची

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 9:46 am | आंसमा शख्स

कथा रंगते आहे. पुढील भागाच्या पर्तिक्षेत...

अवलिया's picture

14 Dec 2010 - 9:47 am | अवलिया

मस्त !

कथेच्या शीर्षकाचा एकुण कथेशी काय संबन्ध आहे?

कथेच्या शीर्षकाचा एकुण कथेशी काय संबन्ध आहे?

सध्या तरी काहीच नाही............

पण विजुभाऊ तुम्ही प्रतिसाद दिलात......?
माझ्या धाग्यावर ते पण?
बापरे

चिगो's picture

20 Dec 2010 - 11:12 pm | चिगो

मस्त...
जबरा दोस्ता...

प्रकाश१११'s picture

21 Dec 2010 - 10:26 am | प्रकाश१११

छान नि सुरेख.अभिनंदन.मनापासून !!