केनू संग खेलू होली...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 Oct 2010 - 9:37 pm

केनू संग खेलू होली.. (येथे ऐका)

यमनचे स्वर, दीदीचा शांत स्वर. यमनच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रूप.

राग यमन..! सार्‍या विश्वाला कवेत घेणारा, एकत्र बांधणारा..

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातलं एक अजब रसायन.. ज्याचा ठाव, आदी-अंत कुणालाही कधीही लागला नाही आणि लागणार नाही असा राग..!

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली सार्‍या जगाला दिलेली एक अनमोल देणगी..

राग यमन..! केवळ शब्दातीत..!

'केनू संग खेलू होली
पिया त्यज गये है अकेली..!'

'त्यज गये है अकेली..' या शब्दांमधला भाव केवळ अनुभवा.. त्यातल्या शुद्ध गंधाराला, तीव्र मध्यमाला मुजरा करा..!

'भोजन भवन भलो नही लागे
पिया कारन भयी रे अकेली
मुझे दुरी क्यो मिली?'

गायकी, गायकी म्हणतात ती हीच..! शब्द, स्वर, भाव.. हे सारं शब्दातीतच, परंतु या ओळी, दीदीची गायकी, यमनचे स्वर हे अजूनही खूप काही सांगून जातात.. आपण त्यातलं देवत्व शब्दात नाही पकडू शकत.. हे फक्त अनुभवायचं.. ज्याने, त्याने..!

दोन कडव्यांमधली सतार फक्त वाजत नाही, ती यमन गाते..!

आपल्या सर्वांना हात जोडून वारंवार फक्त एकच विनंती.. यमनची भक्ति करा, साधना करा, उपासना करा.. यमनवर भरभरून प्रेम करा..!

सुखदु:खात आयुष्यभर जो साथ करतो तो फक्त यमन..! यमनसारखा अन्य सखा नाही, सुहृद नाही..!

'मीरा को प्रभू दरसन दिजो
मै तो जनम जनम की चेली
दरस बिना खडी दुहेली...'

'प़सासासां' या स्वरात जुळलेल्या तानपुर्‍यातून नैसर्गिक गंधार ऐकू येतो..

ज्या दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या लेकीकरता कल्पवृक्ष लावला त्याच दिनानाथरावांच्या थोरलीच्या गळ्यात हा गंधार वस्ती करून आहे..!

मानाचा मुजरा त्या शुद्ध गंधाराला..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

26 Oct 2010 - 10:07 pm | संजय अभ्यंकर

तात्याभय्या दाते!
उत्तम रसग्रहण.

"ज्या दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या लेकीकरता कल्पवृक्ष लावला त्याच दिनानाथरावांच्या थोरलीच्या गळ्यात हा गंधार वस्ती करून आहे..!"

तात्याभय्या, हिंदुस्तानी माणूस जन्माला येतो तेव्हा तोंडाने बाळकडू व कानांनी लता, आशा प्यायला लागतो.
जन्मभर हे आवाज त्याच्या गात्रागात्रात भिनत जातात. एक व्यसन, एक नशा बनून साथ करतात.
ही नशा केवळ माणूस मेल्यावर खाक होते, उतरत मात्र नाही.

क्रान्ति's picture

26 Oct 2010 - 10:55 pm | क्रान्ति

सर्वव्यापी यमन, मीराबाईचे आर्त शब्द, लतादीदींचा आवाज, हृदयनाथांचं संगीत या सगळ्याचा अर्क असलेलं हे अप्रतिम भजन! त्याचं इतकं सुरेख रसग्रहण केवळ अप्रतिम!

चिंतामणी's picture

26 Oct 2010 - 11:06 pm | चिंतामणी

यमनसारखा अन्य सखा नाही, सुहृद नाही..!

क्या बात है.

आणि लताबाईंना तोडच नाही.

पु.ल. एकदा म्हणाले होते "या बाईने काय काम केले आहे माहीत आहे का? हिने सर्वसामान्यांनासुध्दा सुरेल कान दिले."

चिगो's picture

26 Oct 2010 - 11:58 pm | चिगो

ब्बास.. आणखी काय बोलू? तात्या, फ्यानावलो तुमच्यापायी..

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Oct 2010 - 1:41 am | लॉरी टांगटूंगकर

http://www.mediafire.com/?y5tmz2ox9bz
आम्च्या आवद्त्या अभिशेकी बुआन्चा यमन

निल्या१'s picture

27 Oct 2010 - 4:48 am | निल्या१

बुवांचा यमन अप्रतिमच. बुवांनी बांधलेला हा यमनातला तराणा पहा. छान आहे.

तात्याचा व यमनाच्या लौकिकाला धरूनच सगळे. वर लता बाई व हृदयनाथ मग काय ? बोलती बंद.

चिंतामणी's picture

27 Oct 2010 - 10:50 am | चिंतामणी

पं. वसंतराव देशपांडे
"यमन"
http://www.mediafire.com/?onmlyhzfzou

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2010 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

चिंतामणराव,
हापिसात असल्याने कोणता यमन नक्की चढवला आहे हे कळण्यास मार्ग नाही. मिडीयाफायर ऑफिसमधे ब्लॉक आहे. तरी जरा वसंतरावांच्या या यमनाबद्दल जरा माहीती द्याल तर फार बरे होईल. "मोरा मन बांध लिजो" हीच बंदिश आहे का ही?
-(वसंतप्रेमी)पेशवे

हे रेकॉर्डिंग एका मैफिलीतले आहे. त्यातील त्याची आलापी फार छान आहे आणि यमन समजण्यासाठी तीच पुन्हा पुन्हा ऐकली. चिज "ऐसी लागी" अशी आहे.

चिंतामणी's picture

27 Oct 2010 - 10:53 am | चिंतामणी

पं. निखिल बॅनर्जी.
राग यमन.
http://www.mediafire.com/?53zrfz5ng2j

चिंतामणी's picture

27 Oct 2010 - 11:02 am | चिंतामणी

यमन
उ. विलायत खान यांचे बहारदार सतार वादन.
डाउनलोड करण्यासाठी लिंक.
http://www.mediafire.com/?thmzymhmhtm
विलंबित तिनताल, मध्यलय तिनताल आणि द्रुत तिनताल (50.37)
ऐका आणि आनंद लूटा.

इन्द्र्राज पवार's picture

27 Oct 2010 - 12:15 pm | इन्द्र्राज पवार

तात्या तुमच्या या क्षेत्रातील ज्ञानाला सलाम तर सर्व करतातच, त्यात मीही आहेच. सध्याच्या गळक्या 'कौला'च्या आणि 'जाती'च्या राख-वर्षावात तुमचा हा लेख म्हणजे हिरवा रावा शेतातून डौलाने जावे आणि त्याला पाहून डोळे निवावेत असा गारवा मिळतो.

'केनू संग खेलू होली...' चा उल्लेख 'कल्याण' रागाच्या संदर्भात एका गायिकेने येथील देवल क्लबच्या अशाच बैठकीत केला होता याची पुसटशी आठवण आहे मला.... तसे असेल तर मग हा कल्याण राग 'यमन' च्या जातकुळीतील की, यमन चे कल्याणशी काही संबंध?

(जाताजाता एक विनंती ~~ कधीतरी लताच्या 'कुछ दिलने कहा....कुछ भी नही...' वर लिहाल? ~ 'अनुपमा' मधील कैफी साहेबांचे अनुपमेय गीत आहे....."पलकोंकी थंडी सेजपर, सपनोकी परियाँ सोती है... ऐसीभी बाते होती है !.....वेड लावतात शब्द....लताचा 'भीमपलास' डोळ्यात पाणी आणतो...तसेच त्याचे सकाळच्या प्रहरचे चित्रीकरणही, शर्मिलाही....लाजवाब आहे तोही अनुभव....जो तुम्ही योग्यरितीने शब्दबद्ध कराल !)

इन्द्रा

मिसळभोक्ता's picture

27 Oct 2010 - 11:32 pm | मिसळभोक्ता

http://www.sawf.org/newedit/edit01142002/musicarts.asp

In this conspectus we turn our attention to one of the foundational blocks of the Hindustani melodic edifice - Raganga Raga Kalyan. It is denominated variously by Yaman, Iman, Eman and Aiman. Although the Raga is as old as the hills, its historical antecedents are not easy to pin down. The fog of uncertainty concerning its origins has given rise to many mythologies, such as the ipse dixit that assigns credit for its conception to Amir Khusro. In recent times several writers have reflected an awful lot of moonshine off Mr. Khusro; a recent 'study' conducted at a 'leading' American university has shown that he was the first man in the world to perform surgery on the testicles of the axolotl. This feature addresses Raga Kalyan's contemporary musical structure and performance practice.

चिंतामणी's picture

27 Oct 2010 - 11:56 pm | चिंतामणी

मला खूप सखोल ज्ञान नाही. पण एक गोष्ट नक्की माहीत आहे की यमन रागाचा "थाट" कल्याण आहे.

बिलावर, खमाज, काफी, आसावरी, भैरवी, तोडी, पुर्वी, मारवा आणि कल्याण असे थाट आहेत.

एकाच थाटातील रागांमधे साधर्म्य असते एव्हढेच मला सांगता येइल.

अधिक माहेती तज्ञांनी लिहावी. अथवा सवड मिळेल तेंव्हा जाणकार लोकांकडुन माहिती घेउन लिहीन.

मिसळभोक्ता's picture

28 Oct 2010 - 12:01 am | मिसळभोक्ता

वरील लिंक ही राजनपारीकरने लिहिलेली आहे.

कल्याण हा थाट आहेच. पण राग कल्याण म्हणजेच राग यमन असे पारीकर म्हणतात.

यमनच्या जवळपासचेच शुद्ध कल्याण आणि यमन कल्याण हे देखील राग आहेत.

पण राग कल्याण म्हटले की तोच राग यमन.

ह्यालाच कल्याणी असे देखील म्हणतात.

चिंतामणी's picture

28 Oct 2010 - 8:01 am | चिंतामणी

पण समजण्यात गल्लत होत आहे असे मला म्हणायचे आहे.

मी वरती लिहीले आहे "एकाच थाटातील रागांमधे साधर्म्य असते एव्हढेच मला सांगता येइल.". म्हणजे एकाच थाटातील अनेकरागात एकसारखा स्वरसमुहाचा वापर दिसतो. थोडेसे चलन वेगळे असते. त्यामुळे अभ्यास असल्याशिवाय हा सुक्ष्म फरक समजावुन सांगणे अवघड आहे.

जागु's picture

27 Oct 2010 - 1:13 pm | जागु

मस्त.

ईन्टरफेल's picture

27 Oct 2010 - 8:45 pm | ईन्टरफेल

छान ओ तात्यानु !
आमि पामर. काय लिवनार ओ,
कवि आनि कविता !
या दोघांपासुन १० कोस
लांब र्‍हातो आम्हि!

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 12:46 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवरांचा मी ऋणी आहे..

वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..

इंद्र पवार,

'केनू संग खेलू होली...' चा उल्लेख 'कल्याण' रागाच्या संदर्भात एका गायिकेने येथील देवल क्लबच्या अशाच बैठकीत केला होता याची पुसटशी आठवण आहे मला.... तसे असेल तर मग हा कल्याण राग 'यमन' च्या जातकुळीतील की, यमन चे कल्याणशी काही संबंध?

मूळ थाट कल्याण आहे. मूळ रागही कल्याणच आहे ज्यात शुद्ध मध्यमाचा अंतर्भाव आहे. एक शुद्ध मध्यम हा स्वर वगळता जो कल्याण गायला जातो त्यालाच यमन म्हणतात. यमन गातांना शुद्ध मध्यमाचाही प्रयोग केला की त्याचा 'यमनकल्याण' होतो अशी माझी माहिती आहे.

उदा -

'खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा..' ह्या ओळीत 'पूर्वसंचिताचा' या शब्दात शुद्ध मध्यम लागतो व यमनकल्याण प्रस्थापित होतो. अशी अनेक उदाहरणं देता येतील..

अर्थात, जाणकारांना अवश्य खुलासा करावा. मी अजून विद्यार्थीदशेत आहे.

(जाताजाता एक विनंती ~~ कधीतरी लताच्या 'कुछ दिलने कहा....कुछ भी नही...' वर लिहाल? ~ 'अनुपमा' मधील कैफी साहेबांचे अनुपमेय गीत आहे....."पलकोंकी थंडी सेजपर, सपनोकी परियाँ सोती है... ऐसीभी बाते होती है !.....वेड लावतात शब्द....लताचा 'भीमपलास' डोळ्यात पाणी आणतो...तसेच त्याचे सकाळच्या प्रहरचे चित्रीकरणही, शर्मिलाही....लाजवाब आहे तोही अनुभव....जो तुम्ही योग्यरितीने शब्दबद्ध कराल !)

कधितरी निश्चित प्रयत्न करेन..

पुनश्च एकवार सर्वांचे आभार..

तात्या.

30 Oct 2010 - 1:11 am | चिंतामणी

लताबाई या भुतलावरच्या आश्चर्याला सलाम.

हर एक बात पे कहते हो तुम के तू क्या है
तुम्हीं बताओ ये अन्दाज़-ए-गुफ़्तगू क्या है

रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है

ए पियूँ शराब अगर ख़ुम भी देख लूँ दो-चार
ये शीशा-ओ-क़दह-ओ-कूज़ा-ओ-सुबू क्या है

हुआ है शह का मुसाहिब फिरे है इतराता
वगरना शहर में ग़ालिब की आबरू क्या है

या बाईला कोणी हक्क दिलेत आहेत की माझ्या/तुमच्या डोळ्यातुन या बाईनी पाणी काढावे???????

को़णिही काही म्हणोत अभीजात(भारतिय) संगीत आणि प्रतिभा यांना विरोध करून काहिही मिळत नाही.