पुणेरी आजोळ- ई-पुस्तक प्रकशित..

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
26 Oct 2010 - 4:40 pm

पुण्यासारखं आजोळ लाभणं म्हणजे कोणतंतरी पुण्यकर्मच म्हणायचं. पुण्याशी नातं जोडायला अनेकजण उत्सुक असतात. मग ते राजकीय असो वा सामाजिक अथवा वैयक्तिक. तिचं माहेर पुणं आहे याचा आमच्या आईला पराकोटीचा अभिमान होता. पुण्याशी नाळ जोडलेली होती ती अशी. मराठी वाचक असो वा लेखक पुण्याची हौस अन् आस सर्वांनाच. बहुतेक मराठी 'नेट'कर हे पुणेकरच आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दी नजिक असले तरी नेटीव्ह प्लेस म्हणून पुण्याचा उल्लेख करायला कचरत नाहीत. इतका पुण्याचा सर्वांना लळा लागलेला असतांना आम्ही तर ते आजोळच्या नात्यानं पाहिलं, अनुभवलं. त्याचीच ही छोटेखानी लेख मालिका..
चोखंदळ पुणेकरांनाही ती नक्कीच भावेल अशी.
माझ्या पहिल्या वहिल्या 'मिश्किली' या ई-पुस्तकाच्या यशानंतर लगेचच हे दुसरे ई-पुस्तक 'पुणेरी आजोळ' आपणापुढे झळकविण्याचे काम केल्याबद्दल मीमराठीच्या नेटवर्तुळातील उल्लेखनीय 'राजे'शाहीला मुजरांकित धन्यवाद!

समाजजीवनमानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2010 - 4:48 pm | इंटरनेटस्नेही

:)

धमाल मुलगा's picture

26 Oct 2010 - 4:51 pm | धमाल मुलगा

गल्ली चुकलं काय ओ पिएल?

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2010 - 5:00 pm | llपुण्याचे पेशवेll

छान छान. अभिनंदन. :)