(कापित केक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
13 Oct 2010 - 11:01 am

एका शापित मेघा*ने फारच डोक्याला त्रास दिला ;-)

सार्‍या रिकाम शुभेच्छा घेऊन राहिलो मी
कापीत केक मात्र वाढीत चाललो मी

गेले सफेद केसही, ओसाड होई टाळके
झाले बधीर नयन 'उप-नयन' वापरतो मी

उत्साह झडून गेला, नाही कशात लक्ष
शर्करा होई कडवट शोधीत चाललो मी

झाले श्रवण परके, उदास विराण गाणे
यंत्र असे तारक वापरीत ऐकतो मी

विस्मरण सतत सोबत, विसरलो वय वाढ
संगे सोबती अन् केक कापीत चाललो मी

*यात मेव्याचा काहीही संबंध नाही.

करुणविडंबन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Oct 2010 - 11:03 am | अवलिया

खो खो खो... ! मस्त.. !!

मस्त कलंदर's picture

13 Oct 2010 - 11:04 am | मस्त कलंदर

वाचताना मला हे नानाचे मनोगत असावे असेच वाटत होते.

नगरीनिरंजन's picture

13 Oct 2010 - 11:05 am | नगरीनिरंजन

हा हा हा!
'केका'वली आवडली!

बेसनलाडू's picture

13 Oct 2010 - 11:14 pm | बेसनलाडू

उपनयन खास!
(डोळस)बेसनलाडू

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Oct 2010 - 11:07 am | ब्रिटिश टिंग्या

:)

आमच्या एका मित्राची आठवण झाली :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

टिंग्याच्या मित्राची आठवण झाली.

बरे आहे विडंबन (हे आपल उगाच हिणकसपणा दाखवायला)

राजेश घासकडवी's picture

13 Oct 2010 - 11:56 am | राजेश घासकडवी

वेगळ्या विषयावरचं विडंबन छान जमलेलं आहे.

'मिपावरच्या समस्त काका लोकांना अर्पण' असं कुठे पांढऱ्यात लिहिलं आहे का ते तपासून पाहिलं...

राजेश

काका की दाढी मे सफेद बाल हे सत्यवचन आठवले.

श्रावण मोडक's picture

13 Oct 2010 - 12:05 pm | श्रावण मोडक

चांगला प्रयत्न. पुलेशु. ;)

मेघवेडा's picture

13 Oct 2010 - 2:18 pm | मेघवेडा

ढिश्क्लेमर टाकलास म्हणून वाचलीस. :D

इडंबन ठीकठाक. मूळ काव्यच ठीकठाक असल्याने असंच म्हणावं लागत आहे. नाहीतर "चान चान" नक्की म्हटलं असतं! ;)

नावातकायआहे's picture

13 Oct 2010 - 4:21 pm | नावातकायआहे

वा! वा!!
चान! चान!!

डोक्याला त्रास दिल्या बद्दल शमस्व
------

विडंबन मस्त आहे ..

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार

डोक्याला त्रास दिल्या बद्दल शमस्व

अहो कशाला उगाच ?
ते वाक्य म्हणजे आपल्याला डोके आहे हे दाखवण्याचा क्षिण प्रयत्न आहे हे लक्षात घ्या ;)

असुर's picture

13 Oct 2010 - 5:32 pm | असुर

छे छे पराषेठ!

डोके नावाचे कुणी सदगृहस्थ असतील त्याना ही कविता वाचून त्रास झाला असे काहीसे म्हणावयाचे असेल, पण विडंबन लिहिण्याच्या गडबडीत त्या वाक्याचेसुद्धा विडंबन झाले असावे.

अदितीतै,
विडंबन मस्तच हो. आणि मेव्यावर विडंबन करुन परत डिसक्लेमर टाकण्यात काय हशील आहे ते समजले नाही!

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

असुर शेठ तुम्ही आपल्या पार्टितले का पल्याडच्या ? नाव असुर म्हणजे लगेच पाशवी लोकांची बाजु घ्यायची का?

ये उम्मीद न थी आपसे.

पराशेट,
ते वाक्य जरा क्रिप्टीक होतं हो. वारंवार वाचून पाहिल्यास विविध अर्थांचा उलगडा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणे म्हनजे हे हे हे हे... आपणास कुठली उपमा द्यायची म्या पामराने! आता सगळ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या तर मला पाशवी मार पडेल हेवेसांनल! ;-)
आणि असुर (क्याप्टन, सिंहलद्वार रेजिमेंट, सोन्याची लंका! रिपोर्टींग टू दशाननरावजीचंद्रसाहेब) असलो तरी मी 'पाशवी' मुळीच नाही हे मी नम्रपणे नमुद करू इच्छितो. त्यामुळे आपसुकच इकडच्या गोटात आहे हेही आलेच.
बात राहीली उम्मीदची, तर तुमच्या उम्मीदला धक्का लागणार नाही अशी आश्वासनात्मक हमी द्यायचीदेखील माझी तयारी आहे! :-)

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला नाही म्हणता म्हणता हा असुर पण तयार झाला कि मिपाच्या तालमीत ;)

असुर's picture

13 Oct 2010 - 7:04 pm | असुर

'लोखंडे' तालीम, 'चिंचेची' तालीम प्रमाणे 'मिपाची' तालीम पण आहे की काय पुणे-३० मध्ये? की ठाण्यात? :D

--असुर (पैलवान)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 7:21 pm | परिकथेतील राजकुमार

ठाण्यात एक वेड्यांची तालिम आहे येवढेच आपल्याला माहिती ;)

>>> ठाण्यात एक वेड्यांची तालिम आहे येवढेच आपल्याला माहिती <<<
ही तालीम ठाण्यात असण्यामागे सरकारचा काही स्पेसिफिक डाव आहे याबद्दल मला अजिबात शंका नाही! आपले मत जाणून घेण्यास उत्सुक! ;-)

--असुर

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 6:44 pm | प्रियाली

डोळ्यासमोर केक कापणारी काही ओसाड बोडकी उभी राहीली. ;)

सूड's picture

13 Oct 2010 - 6:59 pm | सूड

जमलंय बर्‍यापैकी !!

अदिती तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही.;)
डोळ्यासमोर समस्त वृद्ध मंडळी आली.......ज्यांना आपला वाढदिवस साजरा कण्याची हौस असते.;)
हैद्राबादला एकदा मला शेजारणीच्या ३१ व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले होते. मोठा विनोद होता माझ्यासाठी!;)
पंचविसेक माणसे बोलावली होती त्यांनी!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 8:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही.

हे आपलं उगाच! आधी नावाचं विडंबन जमतं का पाहिलं, मग पुढची फीलर्स!

हैद्राबादला एकदा मला शेजारणीच्या ३१ व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले होते. मोठा विनोद होता माझ्यासाठी!

अलिकडेच इथे होस्टेलमधे बरेच वाढदिवस झाले. नेहेमीच वाढदिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजता केक वगैरे कापण्याचे प्रकार होतात. त्यांत एकजण ३७ वर्षांचा झाला, डोक्यावरचं छप्पर बर्‍यापैकी उडलेलं, पोटाचा आकार गणपतीशी स्पर्धा करणारा ... तरीही तेवढ्याच उत्साहात केक, मेणबत्त्या, गाणी, फोटो सगळे प्रकार झाले! ३१व्या वाढदिवसाचं नकोय आश्चर्य वाटायला! :-)

प्रभो's picture

13 Oct 2010 - 7:21 pm | प्रभो

ह्म्म्म!!

पैसा's picture

13 Oct 2010 - 8:52 pm | पैसा

फक्त काही लोकाना ते करुणरसात असल्याचा भास होण्याची शक्यता आहे.
("मेघाचं" नाव घेतल्यामुळे तू आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारला नाहीस याची खात्री करून घे. नायतर पुढल्या विडंबनाला मदत मिळणार नाही, कोणाकडून ते वेगळं सांगायला नकोच!)

ऋषिकेश's picture

13 Oct 2010 - 11:12 pm | ऋषिकेश

छान विडंबन! :)

शहराजाद's picture

14 Oct 2010 - 2:04 pm | शहराजाद

मस्त विडंबन. बर्‍याच दिवसानी लिहीलंस. अजून येऊदे.
आमचं वाढदिवसाला केक कापणे वगैरे कधीच बंद झालं आहे.सध्या दुसर्‍याच्या वाढदिवसाचा केक खातानाही विचार करावा लागतो.:)

केशवसुमार's picture

14 Oct 2010 - 2:11 pm | केशवसुमार

चान..
अजून येउ दे..