ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
14 Sep 2010 - 10:59 pm

नमस्कार,नमस्कार........

"गुडांग गरम है क्या?"
"नही आगे की दुकान पे मिलेगा"
पुढेही तेच उत्तर..त्या पुढे गेलो.आजुबाजुला परीस्थीती,ठीकाण 'बत्त से बत्तर '(?) होत चालल होत.पण सिगरेट पियायची म्हणजे पियायची.
सिगरेट मिळाली.बसुन पियु,कशाला चाला जेवल्यानंतर,रीक्षा पण आहेत.
बस्स..............मग हे गेल्या काही दीवसांपासुन चालु आहे,जेवा व चाला यात्रेवर.........लांब..........सिगरेट पियायला.
तिथल्या एका हॉटेलने वास्तवाच्या खुप जवळ आणल.ते हे सर्व आठवल की खाता खाता घास हातात राहायचा.कधी कधी बस करुन तसाच उठायचो,कधी नाश्ताचा पदार्थ जेवण म्हणुन खायचो.....असेच काहातरी करतो.................का?
कारण.............

'तिथे' माणसे येतात,कीमतीच्या फळ्याकडे बघुन जेवणाचा पदार्थ मागवतात.मग कधीतरी कमी कीमतीचा पदार्थ ऑर्डर दील्याच्यानंतर नजरेत येतो.मग २-४ रुपये वाचवण्यासाठी ऑर्डर कॅन्सल करायला भांडताना त्या माणसांचा चेहरा रडकुंडीला येतो.
'तिथे' माणसे येतात्,जी पहीले जेवतात.मग पैसे कमी आहेत,सांगुन कमी पैसे घेताना हाडतुड करणा-या मालकाला हात जोडतात."आज जाउ दे,उद्या नक्की देईन,आज पैसे नाहीत" अस काहीतरी म्हणतात."पैसे नाहीत मग जेवतोस कशाला?" हॉटेल मालक ओरडुन प्रश्न विचारतो.
'तिथे' माणसे येतात.मालक "बेशरम हो क्या?" अस बोलतो,ते सर्व जेवण झाल्यावर ऐकुन घेतात कारण महीन्याची उधारी बाकी असते.मग हॉटेलमधुन जाताना मान खाली घालुन जातात.
'तिथे' माणसे येतात.रोज फक्त आणि फक्त 'डाल राईस' खातात,त्यांना कीमतीच्या फळ्याकडे बघायच नसत.कारण 'डाल राईस'पेक्षा कमी काहीच नाही.हाफ ९ रुपये,फुल १४ रुपये.मालक हीशोबाला चुकल्याचा फायदा घेतात,रोज फुल्ल्ल खातात..........पोट भरुन............मन काय भरतच!
'तिथे' माणसे येतात.बाजुच्या माणसाला बघुनच बाकावर बसतात.कारण बाजुचा काम करुन घाणेरडे झालेले कपडे घातलेला असला तरच शिव्या पडणार नाहीत.हात फक्त जेवणानंतर धुतात.हातावर पाणी ओततात,हातावरचे अन्न जायला,दुसरे काळे,तांबडे डाग जाण्याची वाट बघत नाहीत.
'तिथे' माणसे येतात.वरच्या खिशात रुपया वाचेल तेवढेच जेवण मागवात,ऑर्डर दील्यावरही खिसा तपासतात,कारण जेवल्यानंतर धुम्रपाण हव असत.
'तिथे' माणसे येतात.दुस-या माणसाचा चमचमीत दीसणारा पदार्थ न्याहाळतात.मग हळुच वेटरला त्या पदार्थाची कींमत विचारतात.कींमत ऐकयानंतर जबरदस्तीने हसल्यासारखे करुन पुन्हा त्या माणसाकडे बघत नाहीत.
'तिथे माणसे येतात.बायकांना व पोरांना जेवायला द्यायला.बायको व नवरा दोन ताटाचे तीन करतात.पोरगा खातो,अजुन भुक लागेल म्हणुन त्याला पाणी पाजल जात.
'तिथे' माणस येतात.तहान लागली म्हणुन छोट्या पोरांना पाणी पाजायला.मोठा पोरगा लहान बहीणीला पाणी देतो.पोरगी घाईने घेतो.पण वेडी तोंड लावते.मालक " हे बाहर निकल!" म्हणुन जोरात कींचाळतो.बाप मालकाला "थांबा थांबा" असा हात दाखवतो.वेडी छोटी ग्लासा़कडे बघत असते,तहान भागली नाही म्हणुन.
'तिथे' माणसे येतात.ज्यांच्या बायका हॉटेलच्या काउंटरवर येउन एखाद्या पदार्थाची कींमत विचारतात.मग थोड्या बाजुला जातात,अंग झाकण्यासाठी घातलेल्या मळकट ब्लाउजात हात घालतात,पैसे मोजतात.मग परत येउन दुस-या पदार्थाची कींमत विचारतात.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
तिथेच बाजुला रोज चालुन घाम आला म्हणुन सारखा पांढ-या शुभ्र रुमालाने तोंड पुसणारा एक कोणीतरी उभा असतो.शुभ्र कपडे व चमकणारे बुट घातलेला कोण म्हणुन ती माणसे त्याला बघतात.तो ओळख असल्यासारखा आपुलकीने हसतो,हसरा चेहरा दीसेल ह्या प्रतिक्षेत..............पण त्या माणसांना 'आपली खिल्ली उडवुन हसतोय' असे वाटते व ते पडलेले तोंड खाली मान घालुन त्या हॉटेलात लपवतात.

"माफ कर दो साब" अस म्हणतात जेव्हा त्यांच्या कपड्यांचा स्पर्ष झाल्याने त्या सिगरेट पिणा-याच्या शर्टाला डाग पडतात.तो हसतो,हसुन "चलेगा सर" अस म्हणतो.पुन्हा त्या माणसांचा चेहरा पडतो,ह्याने खिल्ली उडवली म्हणुन.
.
.
.

म्हणुन आता 'तो' लांबच बसतो.कधीतरी सिगरेट पितो व चहा पियायला त्याच्यात जाउन उभा राहतो.त्यांच्या गप्पाचा आनंद घेत.ती माणसे तेव्हा जपुन बोलतात्,हा खिली उडवेल म्हणुन.
.
.
.
.
.
..

त्यांना काय माहीती हा एवढा लांब फक्त सिगरेटसाठी नाही येत,'काहीतरी नवीन' शिकायला येतो.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

चिगो's picture

14 Sep 2010 - 11:10 pm | चिगो

जास्त बोजड शब्दात बोलत नाही, पण नेहमीच दिसणार्‍या दृश्याला नवीन अँगलनी दाखवल्याबद्दल धन्यवाद... बाकी आहेच, वास्तववादी दर्शन वगैरे.. छान..

विलासराव's picture

14 Sep 2010 - 11:25 pm | विलासराव

मस्तच लिहिलय हो शानबा.

राजेश घासकडवी's picture

15 Sep 2010 - 1:52 am | राजेश घासकडवी

काहीसं भावूक झालंय, पण मी तो दोष म्हणून सांगत नाही. असंच लिहीत राहा.

तिथल्या काही माणसांना आणखीन ठसठशीत चेहेरे दिले तर नुसत्याच पार्श्वभूमीवर पांढऱ्या शर्टातला माणूस उठून दिसण्याऐवजी अधिक पोत निर्माण होईल.

लाचारी, दु:ख, भूक, व्यसन, अजीजी - गरीबीचे अनेक चेहेरे समर्पक रीतीने दाखवले आहेत एवढ्याशा लेखातून. असं वाटलं आरसा खळकन फुटला आणि विद्रूप प्रतिबिंब प्रत्येक काचेत दिसू लागलं.
गरीबीसारखा शाप नाही.

पाषाणभेद's picture

15 Sep 2010 - 2:39 am | पाषाणभेद

मस्त अनुभव वर्णन केला शानबा

मेघवेडा's picture

15 Sep 2010 - 3:04 am | मेघवेडा

छान रे शानबा. आणखी सविस्तर लिही.

अथांग's picture

15 Sep 2010 - 6:17 am | अथांग

उत्तम मांडणी !

गोगोल's picture

15 Sep 2010 - 6:50 am | गोगोल

खुपच छान.

मदनबाण's picture

15 Sep 2010 - 7:24 am | मदनबाण

छान लिहले आहेस रे...

सहज's picture

15 Sep 2010 - 8:21 am | सहज

छान लिहले आहे.

मी ऋचा's picture

15 Sep 2010 - 10:20 am | मी ऋचा

मस्तंच!!!

प्रदीप's picture

15 Sep 2010 - 10:52 am | प्रदीप

पण थोडे जास्त भावूक. अजून थोडे अलिप्त (व म्हणून) जास्त परिणामकारक व्हावे. लिहीत रहा, आवडते आहे.

ऋषिकेश's picture

15 Sep 2010 - 4:55 pm | ऋषिकेश

आवडले.. थेट मनातून कागदावर उतरलेल्याची मजा काही औरच असते
असे काहि लिहित रहा.. वाचतो आहोतच

गणेशा's picture

15 Sep 2010 - 7:59 pm | गणेशा

भेदक

ज्ञानेश...'s picture

15 Sep 2010 - 8:08 pm | ज्ञानेश...

लेख आवडला. भावना समजल्या.

गणपा's picture

15 Sep 2010 - 8:18 pm | गणपा

छान लिहिलयस रे शानबा.

अनिल हटेला's picture

15 Sep 2010 - 8:24 pm | अनिल हटेला

वरील सर्वांशी सहमत .........

वास्तवदर्शी लेख आवडला....

:-)

प्राजु's picture

15 Sep 2010 - 8:27 pm | प्राजु

छान लिहिले आहे.

शानबा५१२'s picture

15 Sep 2010 - 9:28 pm | शानबा५१२

सर्वांचे मनापासुन आभार.

मला लिहताना वाईट वाटल,तुम्हाला वाचताना वाटल असेल,बस्स संपल का?

नाही,कोणीतरी काहीतरी कराव अगदी अल्प प्रमाणात,दुसा-याची पोटाची आग शमवुन,मदतीचा हात देउन जे समाधान मिळत,त्याच वर्णन नाही करता येणार.
पण आजची भुक भागली तरी परत पोट बोंबा मारणारच्,म्हणुन मी ह्यांना रोजगार द्यावा हा विचार करतो पण तेवढी आपली ऐपत नाही.असो

मला हा लेख वाचताना स्वःतालाच वाईट वाटत,सर्व पाहीलेल तसच्या तस डोळ्यासमोर येत.

हां तर मानवतावादी बना,सेवा करा,तुम्ही खुप समाधानी व्हाल.

जय हींद!

चतुरंग's picture

15 Sep 2010 - 9:57 pm | चतुरंग

चांगलं लिहितो आहेस.

इंटरनेटस्नेही's picture

15 Sep 2010 - 11:06 pm | इंटरनेटस्नेही

चांगला लेख. असेच लिहित राहा...

सविता's picture

16 Sep 2010 - 1:23 pm | सविता

असेच म्हणते...

सुश्या !!

मस्त सेंटी मारलाय रे !!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2010 - 1:39 pm | बिपिन कार्यकर्ते

सेंटी वगैरे जाऊ दे, ते बाजूला ठेवूनही एकच वाटले... असा शानबा५१२ नेहमी का नाही मिळत बघायला?

बाकी वास्तव भेदक वगैरे आहेच. आपल्याला शक्य तेवढं करत जावं... अगदी लहान असताना भर दुपारी आईने काहीतरी आणायला सांगितले म्हणून दुकानात चाललो होतो. मे महिना. ऊन चांगलंच तापलेलं. एका झाडाखाली एक अगदी म्हातारे जोडपे बसले होते. हातात काही तरी खायचे होते, माझ्या कडे बघून त्या आजींनी अगदी वाकून नमस्कार करून पाणी मागितले प्यायला. तो क्षण अजूनही विसरलेलो नाही. परत घरी आलो, थोडं अन्न बांधून घेतलं. माठातलं गार पाणी घेतलं आणि त्यांना नेऊन दिलं.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 10:43 pm | नितिन थत्ते

>>असा शानबा५१२ नेहमी का नाही मिळत बघायला?
असेच म्हणतो.

वर्णन एकदम प्रत्ययकारी. तेही कमीतकमी शब्दात. चॅप्लिन आठवला

समीरसूर's picture

17 Sep 2010 - 10:19 am | समीरसूर

मस्त लिहिलं आहे. अगदी डोळ्यासमोर आलं हॉटेल!

कधी काळी कॉलेजला असतांना रविवारी संध्याकाळी मेस बंद असायची म्हणून बाहेर खायला लागायचं. मग कुठल्यातरी स्वस्त हॉटेलात राईस प्लेट खायचो...तेव्हा पासून राईस प्लेट या संकल्पनेबद्दल राग आहे. तरूण वय, लागणारी भूक जास्त आणि जेवण लिमिटेड! या 'राईस प्लेट' प्रकाराचा खूप संताप यायचा.....

--समीर

विशाल कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 10:34 am | विशाल कुलकर्णी

भावना पोचल्या, समजल्यादेखील ! लेख आवडला हे सांगणे नलगे :)

पैसा's picture

17 Sep 2010 - 10:41 am | पैसा

चित्रदर्शी वर्णन!

शानबा५१२'s picture

5 Dec 2010 - 8:53 pm | शानबा५१२

पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.

जय हींद!

शिल्पा ब's picture

18 Sep 2010 - 12:53 am | शिल्पा ब

हा लेख आवडला.