आजच्या स्त्रीची अशीही एक प्रतिमा " वंदना मॅडम " - भाग - १

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
11 Aug 2010 - 1:54 pm

पुर्वप्रकाशित.

डिसक्लेमर १ }सर्वांस नम्र विनंती की ज्यानी-त्यानी हा लेख स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा.
"" कोणालाही ऊत्तर देण्याचा प्रयत्न नाही, जे माझ्यासमोर आले ते लिहीण्याचा प्रामाणीक प्रयत्न .""

वंदनामॅडम हॉटेलला चेक-ईन झाली की माझी चंगळ असायची. मला तिच्यासाठी सर्व्हीस करण्याशिवाय दुसर काम दिलं गेलं तर खुद्द जी. एम. रूम मध्ये बोलावून, ज्यानी मला ईतर काम सांगितले, त्याची ती हजेरी घेत असे. अर्थात मी तक्रार केली तरच. पण मला मात्र आराम असे, केवळ रुमच्या, मग ती, वंदनामॅडमची रूम नं २०७ असो वा कॉन्फरन्स हॉल असो, जे मागविलं गेलं ते आणून समोर पटकण्याच काम, म्हणजेच आराम. कारण मी तिचा, त्यादिवशीचा 'पर्सनल स्टिव्हर्ट' असायचो. तसा मी, त्या हॉटेलात काम करताना, बर्‍याच जणांचा 'पर्सनल स्टिव्हर्ट ' असायचो. नाना पाटेकर, अन्नु कपूर, ऋषीकपूर, डिंपल, सनी, अमिताभ आणि बरेच जण...

पण वंदना मॅडमचा एक थाट असायचा. एखाद्या टिव्ही सिरीयलमधील नटी जशी दिसते तशी ती दिसायला होती. गोल चेहरा, हिरवे डोळे, चाफेकळी नाक, लालबुंद, चुटूकदार ओठ, आणि त्यावर डाव्या गालाला पडणारी खळी, त्यावर 'दुधात साखर' म्हणजे अंगकाठी एखाद्या वादळास साडीत बांधुन ठेवले की काय असे वाटावे. एकदम लांबलचक 'चवळीची शेंग' , भरदार ब्लाऊजच्या खाली सांडणार गंठण, गळ्यात, एखाद्या डायमंड नेकलेसला फाट्यावर मारेल असे काळ्या आणि सोन्याच्या मण्यांनी भरलेले मंगळसूत्र, साड्या केवळ पहात रहाव्या अशा. कधी स्क्वेयर-कट तर कधी बॅकलेस ब्लाऊज, पण तिचा पदर कधीच ढळत नसे, एखादी स्त्री तिशीत अशी दिसू शकते, यावर माझा विश्वास बसायचा नाही !!!

तिच वागणं आतिशय वक्तशीर असायचं. एकदा तिने ऑर्डर केलेलं 'लॉबस्टर कार्डीनल' उशिरा पोहोचलं. त्यामुळे तिने आमच्या मॅनेजरला धारेवर धरला होता. माझ्यासमोर माझ्या मॅनेजरची तासली जाते हे मला सहन झाले नाही (आम्ही होतो ना पाहिजे तेव्हढी तासायला). म्हणून मी मध्ये पडलो. "मॅम, द डिश वॉज बिन मेड ईन टाईम, बट माय शेफ फाईन्ड दॅट ईट वाजन्ट अप टु द मार्क . . सो वी मेड अनादर वन, ऍण्ड, देअरफोर ईट वाज डिलीव्हर्ड लेट." ती म्हणाली, "हाऊ डझ ही कॅन ऍनालाईज?” " फर्स्ट विथ द स्मेल ऍन्ड देन टेस्ट." ''ओके देन." "मॅम प्लीज टेस्ट ऍन्ड लेट मी नो.', ''ह्म्म, दिस वन ईज गुड.''

खरं तर ती एक साफ बंडल होती, मुळात त्यादिवशी लॉबस्टरच नव्हते, मग घोले रोडच्या एका हॉटेलमधून मागविण्यात आले, त्यामुळे सर्व्ह करायला उशीर झाला. अशा प्रकारची 'स्मार्ट आन्सर्स' हॉटेल मध्ये काम करताना जिभेच्या टोकावर बाळगावी लागतात. आणि त्याच ‘स्मार्ट आन्सर’मुळे मी तिचा 'पर्सनल स्टिव्हर्ड' झालो. तिची फ्लाईट दिल्लीवरुन आली की सकाळी एक बेलबॉय, हॉटेलची मर्सीडीज तिला पिक करायला जायची, आठ म्हणजे आठ वाजता रुममध्ये मी न्याहारी पोहोचवायचो. बिझनेस मिटींग सुरु झाल्यानंतर पहिला ब्रेक साडे-दहाला. कॉफी-शॉपमध्ये मी तिची कॉफी सर्व्ह करायचो. एक वाजता रेस्टारटंमध्ये जेवण, ओन्ली कॉन्टी फुड; कधी स्टेक, तर कधी फक्त 'अव्हाकाडो' सलॅड, एक्झॅक्ट चार वाजता पुन्हा कॉफी.

खरी गंमत सुरु व्हायची ती साडेपाचच्या सुमारास,मी 'क्लियरन्स' करण्याकरिता 'कॉन्फरन्स हॉलमध्ये शिरायचो. ती मला इशारा करायची तो इशारा म्हणजे पहिला पेग! एक लार्ज रम, त्यात थम्स-अप, आईस आणि थोडंसं मीठ. हा पहिला डोस आणि बिझनेस मिटिंगचा, शेवटचा प्रश्नोत्तराचा तास संपला की, सरळ रुममध्ये जायची, तासाभाराची झोप घ्यायची आणि कपडे बदलून पुन्हा 'कॉकटेल डिनर' साठी खाली यायची. स्विमींग पुलच्या शेजारी. मंद-मंद प्रकाशात, लाईट-लाईट वाजणार्‍या संगीतात, शंभर-एक जणांच्या पार्टीत, ती अगदी खुलून दिसत असे. आठ-नऊ वाजता 'पार्टी' रंगात आली की पुन्हा एक लार्ज मागवायची अगदी तसाच, आणि तोच एक ग्लास पार अकरा वाजेपर्यंत तिच्या हातात असायचा. तो ग्लास रिकामा झाला की ती पुन्हा रुममध्ये जायची. ११.४५ ला तिची 'फायनल ऑर्डर' असायची. पुन्हा एक लार्ज आणि जेवण. मी ट्रॉली आत घेऊन जायचो तेव्हा ती 'स्लिप-ईन'मध्ये असायची. जेवण आणि पेग संपेपर्यत दिवसभराचे बिल्स घेउन 'क्लियरन्स' करायचो, ती 'पाचशे'ची नोट फोल्डरमध्ये टाकायची आणि सकाळचा 'वेक-अप कॉलचा' टायमिंग मी रिसेप्शनला पास करायचो. माझा आणि तिचा दिवस मावळायचा.

त्या दिवशी मात्र सगळंच बिनसलं होतं. वक्तशीरपणा कुठल्या कुठे गेला होता. तिचा चेहरा 'एक्झॉस्टेड' दिसत होता. चार वाजताच्या कॉफीला ती आलीच नाही. मलाही जरा गोंधळल्यासारख झाल. पण मिटींग संपता-संपता तिने मला 'पोडियम'पाशी येण्याचा इशारा केला. मी गेलो. तिने माझ्या हातात 'पेपर नॅपकीन' दिला. त्यावर लिहिले होते, ''गेट अ ग्लास, हाफ ग्लास रम ऍन्ड हाफ ग्लास थम्स-अप, नो सॉल्ट.'' मी चमकलो. जेवढे मद्य ती दिवसभरात घेत असे तेवढे एकाच वेळेस घेणार होती, आज माझी पाचशेची नोट 'फुस्स' होते की काय असे मला वाटायला लागले. जरा नाराजीनेच मी तो ग्लास, तिने सांगितल्या पध्दतीने भरुन तिच्या पुढ्यात ठेवला. सवयीनुसार चार घुटक्यांमध्ये तो संपवून ती निघाली. रुममध्ये गेली.त्यानंतर संध्याकाळ्च्या "कॉकटेल डिनर"ला ती हजर नव्हती.मला वाटल तिला आज जास्त झाली असावी.

रुम सर्व्हीसच्या केबीनपाशी ताटकळत उभं राहण्याच्या कंटाळा आल्याने मी पार्टीत सर्व्हीस चालु केली.११च्या दरम्यान मला 'मॅनेजर' चा निरोप मिळाला की वंदना मॅडमची फायनल ऑर्डर आली आहे.डॉट १२.३० ला सर्व्ह करायची आहे. माझ्या हातात के.ओ.टी./बी.ओ.टी पडली.केओटी वाचताना मी चमकलो.जेवणाची आणी रमच्या खंब्याची ऑर्डर होती पण त्याच बरोबर *३ लिहीलेले होते,म्हणजे तीन प्लेट्स ? एक वंदना मॅडम,जिच्या रुमपर्यंत ईतक्या रात्री पार्टीतुन कोणीही पोहोचणे शक्यच नव्हते आणी तिने नवरा,घर,संसार असा उल्लेख कधीही केला नव्हता,त्यात तिच्याशी कधी लगट करतानाही मी कोणाला पाहिले नव्हते मग ईतक्या रात्री तिच्या रुम मध्ये दोन व्यक्ती? त्या पुरुष आहेत की स्त्रिया आहेत. की दोघेही आहेत,ह्यात विचारात मी ट्रॉली सजवायला सुरुवात केली.

क्रमश ....

स्टिव्हर्ट = पंचतारांकित हॉटेला वेटरला वेटर म्हणुन अपमानीत न करण्यासाठी सर्रास वापरण्यात येणारा शब्द..
बेलबॉय = हॉटेलातल्या कस्टमर्सचे लगेज/बॅगेज ऊचलणारा...
क्लियरन्स = रुममधल्या/टेबलावरच्या रिकामे झालेले ग्लास/प्लेट्स/चमचे वगैरै ऊचलुन घेणे.
के.ओ.टी. =किचन ऑर्डर टिकीट.
बी.ओ.टी = बार ऑर्डर टिकीट.
*३ = रूम सर्व्हीस करताना रुममध्ये किती माणसे आहेत असे विचारुन वेटरच्या हातात केओटी देताना गुणीले माणसे असे लिहीण्याची पध्दत आहे,म्हणजे तेव्हा तरी होती..आता काय पध्दत आहे .नो आयडिया..

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Aug 2010 - 4:28 pm | घाशीराम कोतवाल १.२

वाचतो आहे पुढला भाग कधी ?
पुढच्या भागात रह्स्य उलगडणार कि आम्हाला ती सारखे लटकत ठेवणार

सुहास भाड्या ती भाग ३ कधी टंकणार