माझा खाद्यप्रवास

दिनेश's picture
दिनेश in जनातलं, मनातलं
5 Aug 2010 - 12:56 am

राम राम (जुने आणि नविन) मिपाकरहो,
आम्ही बिल्ला नंबर १६. मिपा सुरू झाल्यापासून आम्ही तसे वाचनमात्रच, कधीतरी प्रतिसादांच्या एखाददोन पिंका टा़कणारे, अन्यथा झाडावर बसून पॉपकॉर्नची पोती आणि कोकची पिंपे रिचवण्यात, खरडवह्या चघळण्यात आणि कधीमधी व्यनिमनीच्या गोष्टी करण्यात आम्हाला रस! पण गेल्या काही दिवसातले धागे वाचताना मचाणच बांधून बसायची वेळ आली आणि त्यामुळेच आमची कैफियत आपणासमोर आणण्यास आम्ही उद्युक्त झालो.
(हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने चु भू द्या घ्या)

आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या. घरात आई,आजी,काकू (अर्थातच नॉन आयटी वाल्या) असल्याने खाण्यापिण्याची नुसती रेलचेल होती. सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हरतर्‍हेचे पदार्थ आग्रहाने खाऊ घालण्यात त्या तिघींची नुसती चढाओढ लागलेली असे. मग मी पामर तरी काय करणार? बापडा खायचो आपला.. ताटातला पदार्थ संपलेला दिसला रे दिसला की मला फारच आवडलेला दिसतो आहे असे स्वतःच मानून आणखी आग्रहाने वाढत असत,तो प्रेमळ आग्रह काही मोडता येत नसे. नवे आणि जुने पदार्थ आठवून,रेशिप्या मिळवून त्या करत असत.त्यांचा मी हक्काचा गिनीपिग होतो. तेव्हा काही मिपा नव्हते आणि संगणकाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे रुचिरावाल्या ओगलेआजी जिंदाबाद!

तेव्हा खाताना गोड वाटले परंतु काही वर्षांनी हळूहळू ते सगळं अंगावर दिसू लागले म्हणून व्यायाम सुरू केला. परिणाम काय? तर भूक वाढली! साहजिक आहार वाढला. अशा दुष्टचक्रात अजून काही वर्षे गेली. कॉलेजात इंजिनिअरींगला असताना मित्रमंडळीही आमच्या तोडीस तोड भेटली. कारण एकच WPTA & WPEA म्हणजे नुसते थिंकच अलाइक नाही तर इट अलाइक सुध्दा! हॉस्टेलवर मात्र जिभेचे चोचले पुरवणे कठिण होऊ लागले. त्यामुळे आमच्या कंपूने मेसच चालवायला घेतली. मेसमध्ये आधी आठवड्यातून एकदा गोड दिले जाई ते आमच्या जमान्यात आम्ही एक दिवसाआड केले. सामिष भोजनाचाही अंतर्भाव केला. आमच्या रुमवर काका हलवाई,चितळेबंधू इ.कडच्या मिठायांची सँपल्स असायची. कधीकधी त्यांची इतकी रेलचेल असे की मेसचे जेवण सोडून आम्ही फक्त मिठाईचेच जेवण करत असू. त्या वयात दूरगामी परिणाम कळले नाहीत.

पुढे नोकरीत आमच्या देहाकडे पाहून कँटिनच्या कुकपासून सायबाच्या सेक्रेटरीपर्यंत सगळ्यांचा आम्हालाच प्रेमळ आग्रह.. आम्ही हाणतोय मेदुवडे,डोसे, रसगुल्ले,गुलाबजाम आणि बास बास बास.... लग्न झाल्यावर तर काय विचारता? सुगरण कंपनीत दुपटीने वाढ झाली. आमची ही तर काय विचारता? तुम्हाला माहितच आहे तिची पाककला. वजनाची नव्वदी कधी पार झाली ते समजलेच नाही. कामानिमित्ताने इंदौरपासून पॅरिसपर्यंत फिरायला लागत असल्याने साहजिकच प्रत्येक प्रांतातल्या खासियतीकडे आमचे लक्ष जाऊ लागले. आग्र्याचा पेठा, इंदौरची रबडी,लखनवी बिर्याणी पासून वडोदर्‍यातल्या गुजराथी थाळीपर्यंत आणि इटालियन पिझ्झा,पास्ता,तिरामिसु पासून ते फ्रेंचांच्या सेवन कोर्स मेजवानीपर्यंत सर्व मंडळी आमच्या उदरात सुखेनैव नांदू लागली. आमची खाण्याची आवड एव्हाना छंदात बदललेली होती. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ! हा खाक्या कायम राहिला. ट्रॅव्हल प्लान मग तो कामानिमित्त असो वा सहलीसाठी खादाडी आधी प्लान होऊ लागली. हाटेलांमधल्या किचनमध्ये घुसून रेशिप्या विचारुन त्यांचे घरी प्रयोग होऊ लागले. आमचा हा खाद्यछंद आमच्या चाणाक्ष सहकार्‍यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मग काय विचारता? जगभरातील विविध पदार्थांचा वर्षाव हपिसातल्या आय टी,नॉन आयटी बाया,पुरुष सर्वांनीच सुरू केला. आमच्या कँटिनचे कुकही नवनव्या रेशिप्या रेकमेंड करू लागले. मग 'शतक' गाठायला वेळ लागणार थोडाच?

भरीत भर म्हणून आमची त्सेंटा आजी आणि तिचा कंपू म्हणजेच मार्कुसातै, मार्लिसकाकू, राकलेटवाल्या काळेबाई, केकवाली बिर्गिटतै ह्या सगळ्याजणींच्या तावडीत मी एकटा सापडलो. त्सेंटा आजीचा मी गिनीपिग होतोच ,तिच्याकडून ह्या बाकीच्या साळकाया,माळकायांना कळायला काय वेळ लागतो का? ह्या सगळ्या ताया,माया,काकवा पदार्थ बनवताना बघण्यापासून बोलवायच्या कारण आमच्या हिला ते शिकायचं असायचं. मग ह्या शिकवणीची उजळणी घरी व्हायचीच. पुन्हा तावडीत मीच एकटा! मग दुसरे काय होणार? जे व्हायचे तेच झाले! आम्ही सव्वाशेचा पल्ला गाठला. हे कसे आणि का घडले याचा विचार आम्ही करू लागलो.
(क्रमशः)

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

5 Aug 2010 - 1:01 am | पुष्करिणी

मजा आली भ्रमंतीची सुरूवात वाचून.
पुढील भागांची वाट पहातेय .

प्रभो's picture

5 Aug 2010 - 1:11 am | प्रभो

हाहाहा...
खुसखुशीत लेख.. :)

मस्त कलंदर's picture

5 Aug 2010 - 1:14 am | मस्त कलंदर

आज दिनेशदाही उतरले तर इथे.. येऊंद्यात आता तुमच्याही लेखणीतून लेख.
बाकी, वजन काय सगळ्यांचेच वाढते. असा प्रेमळ आग्रह होऊन जर ते वाढणार असेल, तर मीही राकलेट विजा कधी मिळतोय याची वाट पाहाते..
(स्वातीतै म्हणेल, हीच एकटी राहिली होती असे म्हणायची!!!)

केशवसुमार's picture

5 Aug 2010 - 1:18 am | केशवसुमार

शेवटी मैदानात उतराला तर..
ज्या वेगाने तुम्ही तुमचे वजन वाढवले त्याच वेगाने लवकर लवकर पुढचे भाग टाका.. :D
(दिनेशच्या एकेकाळच्या वजनाच्या निम्म्या वजनाचा)केशवसुमार

दिनेशदा,
फार मस्त लेखन!
आज पहिल्यांदा क्रमश: पाहून आनंदाचं भरतं आलं.
आमच्या घरी गाईम्हशी नव्हत्या पण त्यावेळी फसवणूक लिमिटेड असायची.
आज्जीनं दम भरला कि गवळीबुवा चार आठ दिवस तरी बरे दुध घालत असत.
पुढचे लेखन येउ द्या हो पटापट् ! वाट पहात आहे.
स्वयंपाकाचे लेख कसे आनंद देणारे असावेत त्याचे उदाहरण (उदरभरण नव्हे हो!) म्हणजे आपले लेखन!;)
खरच स्वयंपाकाचा संबंध कुठल्याही क्षेत्राशी असावा का? नाहीतर पूर्वीच्या आज्ज्या, काकवा, आत्यांनी चविष्ट स्वयंपाक कसा बनवला असता? व्यायाम आणि वजनाचा संबंध भारी!

चतुरंग's picture

5 Aug 2010 - 1:31 am | चतुरंग

दिनेषषेठ* तुमचीही लेखणी स्वातीतै सारखीच फर्मास चालते ब्वॉ!
बघा बरं त्या सगळ्या आचरट धाग्यांनी तुम्हाला नुसते मचाणच बांधायला उद्युक्त केले असे नसून थेट लेखणीच हातात धरायला लावली! आभार माना बरं आधी त्या धागाकर्त्यांचे! ;)
आणि फुडले फटाफट येऊंदेत! वाट बघतोय.

(खुद के साथ बातां : रंगा, दुसरा गिनीपिग म्हणून जावं लागेल नै एकदा ?)

(गिनीपिग्)चतुरंग
* षेठ - शब्दनिर्मिती श्रेय मिभो! ;)

मस्त मेजवानी.
देव भल करो त्या सर्व धागा धारकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे ज्यानी दिनेशरावांना हे लिखाण करण्यास स्फुर्ती दिली. ;)

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

बेसनलाडू's picture

5 Aug 2010 - 1:40 am | बेसनलाडू

मस्त सुरुवात! पुढील मेजवानीसाठी उत्सुक!
(हावरट)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2010 - 1:52 am | पिवळा डांबिस

दिनेशराव लेखन आवडतंय, अजून येऊ द्या...
अगदी माझं स्वतःचं आत्मचरित्र वाचल्यागत वाटतंय!!!
:)
बाय द वे, सुगरण बायकांनी लाडावलेल्या नवर्‍यांचा एक एक्स्लुजिव्ह क्लब सुरु करायचा का?
मेंबरशिप बाय इन्व्हिटेशन ओन्ली!!!
:)

नॉन-आयटीवाल्या बायकोच्या ताटाखालचा,
पिवळा बोका
:)

piu's picture

5 Aug 2010 - 3:03 am | piu

हसुन मजा आली!!

भाग्यश्री's picture

5 Aug 2010 - 3:25 am | भाग्यश्री

जबरी !! मस्त लिहीलं आहे !!

प्रियाली's picture

5 Aug 2010 - 3:32 am | प्रियाली

आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या.

मुंबईत गाई-म्हशी? आरेकॉलनीत गेल्यासारखं वाटलं. :)

ह्या शिकवणीची उजळणी घरी व्हायचीच. पुन्हा तावडीत मीच एकटा!

हाहाहा! वाईट वाटून घेऊ नका. स्वातीताई़ंच्या रेशिप्यांचा आपापल्या गिनिपिगांवर वापर केल्याने तुम्हाला खूप सोबती आहेत.

पुढचा भाग टाका लवकर.

हा हा हा. अजुन येउद्या, लेख वाचुन जाम भुक लागली.

(अर्धशतकी ;-) )

धनंजय's picture

5 Aug 2010 - 4:48 am | धनंजय

खुसखुशीत आणि चविष्ट.

नंदन's picture

5 Aug 2010 - 4:53 am | नंदन

खुसखुशीत आणि चविष्ट.

--- असेच म्हणतो :)

मस्त लेख! WPEA ची कन्सेप्टपण एकदम पटण्याजोगी.

सहज's picture

5 Aug 2010 - 6:15 am | सहज

सॉलीड एन्ट्री दिनेशदादा!

चित्रा's picture

5 Aug 2010 - 7:12 am | चित्रा

भरीत भर म्हणून आमची त्सेंटा आजी आणि तिचा कंपू म्हणजेच मार्कुसातै, मार्लिसकाकू, राकलेटवाल्या काळेबाई, केकवाली बिर्गिटतै ह्या सगळ्याजणींच्या तावडीत मी एकटा सापडलो. त्सेंटा आजीचा मी गिनीपिग होतोच ,तिच्याकडून ह्या बाकीच्या साळकाया,माळकायांना कळायला काय वेळ लागतो का?

बापरे, धन्य आहात.

लेख आवडला, हे सांगायला नकोच.

आमोद शिंदे's picture

5 Aug 2010 - 7:37 am | आमोद शिंदे

खुसखुशीत लेख! पुढच्या भागाच्या प्रतिकक्षेत.

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2010 - 9:20 am | नगरीनिरंजन

खाण्याने वजन वाढत नस्तं तर किती बरं झालं अस्तं नाही?
असो. लेटेस्ट म्हणजे तुम्ही झिझिकी चापलेली असणार..

अरे वा, ह्यांना तिरामिसु मिळालेला दिसत नाही. ;-)

(अल्पसंतुष्ट)

छोटा डॉन's picture

5 Aug 2010 - 9:33 am | छोटा डॉन

आब्बाब्बाब्बाब्बा ऽऽऽऽ
डीडींचे नाव बोर्डावर बघुन दचलोच एकदम ...

मिभोकाका, डीडी ह्यांना 'लिहते' करणार्‍या अनेक नव्या सदस्यांचे मी इथे जाहिर आभार मानतो ...

लेख कसा .... एकदम खणखणीत !
( आता डीडी वजन कमी करताहेत म्हणुन ठिक आहे, नाहीतर हे लिहुन झाल्यावर त्याचे परिणाम फार भयंकर झाले असते असे ठामपणाने सांगतो.)
अजुन लिहा पुढे, मायला तिकडे राहुन वजन कमी करणे म्हणजे गंमतच आहे.

असो, पुढचा भाग लवकर लिहा.
वाट बघतो आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2010 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दिनेशदादाचं नाव बोर्डावर पाहून मी दचकलेच. दोन-अडीच दिवसांत दिनेश दादाशी गप्पा मारताना जे हास्य फवारे उसळत होते त्यांची पुन्हा एकदा आठवण झाली. सुरूवात एकदम खणखणीत झाली आहेच; आता पुढच्या भागांची वाट पहाते आहे.

अदिती

सदर प्रतिसाद माझी नॉन आयटी मैत्रीण स्वातीताईला (बिल्ला नं १५) अर्पण.

गौरीदिल्ली's picture

5 Aug 2010 - 10:12 am | गौरीदिल्ली

हे सगळे कौतुकाचे बोल ऐककून स्वाती ताईने अजुन एवढे खायला घातले असेल !!! :):)

ऋषिकेश's picture

5 Aug 2010 - 10:17 am | ऋषिकेश

अहाहा! मस्तच लेख! भारी एंट्री
पुढचे लेख भुकेल्यापोटी न वाचण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेत आहे :)

शाल्मली's picture

5 Aug 2010 - 10:47 am | शाल्मली

डीडींनी एकदम जोरदारच सुरुवात केली आहे..
लवकर टाका आता पुढचे भाग..
हा लेख वाचून 'ह्या'लेखातल्या- विशेषतः शेवटच्या दोन ओळी आठवल्या. :)

निखिल देशपांडे's picture

5 Aug 2010 - 12:48 pm | निखिल देशपांडे

अरे वा दिनेश दादांची जोरदार एंट्री..
आता पुढचे भागही लवकर येउद्या