लिएंडर पेसचे १२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
6 Jul 2010 - 6:18 pm

वर्ल्डकप फुटबॉलच्या रणधुमाळीत आपल्या (सुद्धा) नजरेतून एक महत्त्वाची बातमी सुटली म्हणायची!

आपला लिएंडर पेस आणि झिम्बाब्वेची कॅरा ब्लॅक ह्या द्वितीय मानांकित जोडीने दक्षिण आफ्रिकेचा वेस्ली मूडी आणि अमेरिकेची लीसा रेमंड ह्यांचा ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्स मध्ये पराभव करून २०१० चे विम्बल्डन मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. पेसचे हे सहावे मिश्र दुहेरी तर एकुणात १२ वे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद आहे.

तब्बल वीस वर्षांपूर्वी जिथे ज्युनियर गटाचे एकेरीचे विजेतेपद मिळवून पेसने आपल्या कारकीर्दीतल्या यशाची मुहूर्तमेढ रोवली होती तिथेच आपल्या विजेतेपदाचा करंडक उंचावताना ३७ वर्षीय पेस म्हणाला "It has been 20 years since I first won the junior singles at Wimbledon and even after all these years, it is really sweet to stand out there with a trophy in your hand when you are almost doubly 19."

अर्थातच पेसला प्रोत्साहन द्यायला त्याचे चाहते भारतीय राष्ट्रध्वज घेऊन हजर होते. त्यांच्याबद्दल पेस म्हणाला "Call it patriotism or whatever - it is you that keep me going and I hope during the Asian Games, Commonwealth Games and US open, they will keep motivating me to raise the bar."

लीचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा!!

क्रीडाबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

6 Jul 2010 - 6:21 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

गणपा's picture

6 Jul 2010 - 6:24 pm | गणपा

हॅट्स ऑफ २ ली.
लीची नी महेशची जोडी फुटायला नाय पायजे होती.

निखिल देशपांडे's picture

7 Jul 2010 - 3:11 am | निखिल देशपांडे

मॅच पाहिली...
मस्तच

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दीपक साकुरे's picture

7 Jul 2010 - 7:38 am | दीपक साकुरे

मॅच पाहिली... पेस आणि ब्लॅक मस्तच खेळले