बालकविता - मोठ्यांचे ऐका

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 12:21 am

एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१||

आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२||

मासोळी होती उचापती,भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३||

शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी
लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४||

सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||

मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी
कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६||

इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर
दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७||

राजा ठेवतसे संग्रही, चमचमणारी बाळ मासोळी
मासोळी मात्र लागे झुरणी,आईबाबा मित्र आठवुनी ||८||

मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे, आईचे नेहेमी ऐकावे
आई सांगे कळकळीने, बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९||

मोठे सांगती गोष्ट हीताची, ऐकावे त्यांचे ही रीत जगाची
म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,धोक्यापासून लांब रहा ||१०||

करुणशांतरसबालकथाकविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

25 Jun 2010 - 12:25 am | टारझन

हा हा जबर्‍या नादमय कविता गं !! बोधपुर्ण आहे एकदम ;)

-(क्रुर कोळी) टारझन टोळी

संदीप चित्रे's picture

25 Jun 2010 - 1:17 am | संदीप चित्रे

'फाईंडिंग निमो' ह्या नितांत सुरेख सिनेमाची आठवण आली.

धनंजय's picture

25 Jun 2010 - 1:39 am | धनंजय

फाइंडिंग नीमोची आठवण झाली +१

सहज's picture

25 Jun 2010 - 6:13 am | सहज

फाइंडिंग नीमोची आठवण झाली. शिवाय भा.पो.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 1:31 am | बिपिन कार्यकर्ते

छान!!!

बिपिन कार्यकर्ते

निरन्जन वहालेकर's picture

25 Jun 2010 - 9:27 am | निरन्जन वहालेकर

खुप छान जमलि कविता ! ! !