अल्लाजान..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Jun 2010 - 9:21 pm

त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला.

तिथे हरकाम्या होता अल्लाजान..

आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता.

उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची! चेहऱ्यावर तसं निरागसच परंतु सततचं एक लाचार हास्य! खूप दयनीय दिसायचा अल्लाजान.. माझ्या पोटात नेहमी खूप तुटायचं त्याच्याकडे पाहून!

त्याचं अल्लाजान हे नाव खरं की पडलेलं? तो त्या वस्तीत केव्हापासून आला, कसा हरकाम्या झाला? मला माहीत नाही! या जगात एका दमडीचीही किंमत नसलेल्या अल्लाजानची माहिती कोण ठेवतो? आणि कशाकरता??

रौशनीच्या चाळीशेजारीच झमझम हा देशी दारूचा बार. मी तिथे कॅशियर कम मॅनेजर. एके दिवशी हा अल्लाजान डायरेक्ट बारमध्येच घुसला आणि एकदम माझ्या काउंटरपाशीच भिडला!.. अंगाला जाम वास मारत होता त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा! मला किळसच आली त्याची..

"दो बोईल अंडा पार्सल! "

लाचारीने हसत अल्लाजानने बोईल अंड्यांची पार्सल ऑर्डर दिली..

"आप तात्यासाब है ना? मन्सूरने बताया! " पुन्हा एकदा लाचारी.. बोलताना स्वत:ची लाळ गळते आहे याचीदेखील त्याला लाज नव्हती, शुद्ध नव्हती..!

"शी! कुठल्या घाणेरड्या वस्तीत आपण काम करतो आहोत? ते देखील पोटाकरता? " माझं सुसंस्कृत पांढरपेशी स्वगत!

हरकाम्या म्हणजे कामं तरी को़णकोणती करायचा हा अल्लाजान? पडतील ती कामं करायचा. वेश्यांना लागणाऱ्या पिना-पावडरी-कंगव्यांपासूनच्या साऱ्या वस्तू बाजारातून आणणे, चहापाणी, भुर्जी-आम्लेट पार्सल आणून देणे.. झाडूपोता करणे..

वेश्यांचे कपडे धुणे.. त्यात घाणेरडी, पिवळसर डाग पडलेली त्यांची अंतर्वस्त्रं देखील जमा! साऱ्या जगाची वासना जिथे सांडायची त्या वासनेचे वेश्यांच्या अंतर्वस्त्रांना पडलेले डाग अल्लाजान धुवायचा..!

अगदी पडेल ती कामं करायचा अल्लाजान!

त्या बदल्यात वेश्या त्याला ५-१० रुपयांची रोजी द्यायच्या.. त्या रोजीत अल्लाजान खूश असायचा. आता खूश असायचा असंच म्हटलं पाहिजे..

दुपारच्या फावल्या वेळात, म्हणजे जेव्हा वेश्यांना वासनेचे दणकट घाले सहन करण्यापासून थोडा निवांतपणा मिळायचा त्या वेळेस कधी व्हरांड्यात सगळ्या वेश्या एकत्र जमून अल्लाजानशी हसीमजाक करायच्या.. अल्लाजानही तेव्हा जमेल तसा नाचेपणा करून हसायचा, हसवायचा, खिदळायचा. त्या दुनियेतले हेच काय ते जरा करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम!

अल्लाजानशी थट्टामस्करी हीच त्या वेश्यांची करमणूक आणि त्या वेश्या, त्यांची कामं, आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चार दमड्या हीच अल्लाजानची दुनिया!

"तात्यासाब... पहला पानी पिओ... घबराव मत. पोलिस अब उस मादरचोदकी चमडी उधेडेगा! " असं म्हणून अल्लाजानने पाण्याचा ग्लास माझ्या पुढ्यात धरला होता..

दारू पिऊन, विना पैसे देता बारमधून निघून जाणाऱ्या फोरासरोडवरील एका गुंडाशी माझी हातापायी झाली होती.. मी त्याला जाम मारला होता, त्यानेही मला धुतला होता.. लगेचच तिथे पोलिस आले.. आमचा हप्ता बांधलेला असल्यामुळे त्या गुंडाचा जबरदस्त बंदोबस्त होणार होता..

मी रस्त्यात धुळीत किंचित कोलमडलो होतो. थोडं खरचटलंही होतं. बावरलो होतो, घाबरलो होतो.. अश्या परिस्थितीत भर रस्त्यात माझ्या पुढ्यात पाण्याचा गिल्लास धरला होता तो अल्लाजानने!

तेव्हा कुठे गेली होती माझी किळस? लाज वाटली होती तिला.. तेव्हा मला त्याच्या अंगाचा दर्प आला नाही.. त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!

अजून काय लिहू? अल्लाजानबद्दल अधिक भरभरून लिहावं असं काही नाही माझ्याकडे.. आणि ज्याच्यावर पानंच्या पानं संपवावीत असं अल्लाजानचं व्यक्तिमत्त्वही नव्हतं..

"तात्यासाब, चिकनका प्लेट और दो रोटी कितनेको? "

मी रक्कम सांगितली.. हातातल्या पैशांची जुळवाजुळव करत अल्लाजान पुन्हा एकदा लाचार हसला होता आणि थोडा वेळ रेंगाळून निघून गेला होता. त्याला चिकन खायचं होतं पण त्याच्यापाशी पैसे होते ते पुरेसे नव्हते, जुळत नव्हते..

असेच काही दिवस गेले. चार दमड्या माझ्या खिशात होत्या. मला अचानक आठवण झाली ती अल्लाजानची.. तो रौशनीआपाच्या चाळीच्या बाहेरच रेंगाळत बसला होता..

"ए अल्लाजान... " मी हाक मारली..

"बोलो तात्यासाब" तो धावतच माझ्यापाशी आला..

"चल मेरे साथ.. "

टॅक्सी केली आणि जवळच असलेलं दिल्ली दरबार गाठलं..

मी आणि एक मळकट, गलिच्छ तृतीयपंथी असे दोघे दिल्ली दरबार मध्ये जेवत होतो..

चिकन मसाला, बिर्याणी, गरमागरम रोट्या, सोबत दहीकांद्याची कोशिंबीर..

हाटेलातले सारे लोक अत्यंत चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहात होते..

सुरवातीला लाजलेला, मुरकलेला अल्लाजान नंतर अगदी मनसोक्त जेवत होता..

धुळीत पडलेल्या तात्याला पाणी आणून देणारा अल्लाजान मनसोक्त जेवत होता..!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

टारझन's picture

12 Jun 2010 - 9:34 pm | टारझन

ए मण्सुर ... एक डब्बल भुर्जी तो बोल ... दो पाव एक्ष्ट्रा .... देख तो व्हाईटकॉलर तात्यासाब आयेला हय ... :)

जब्रा लिखाण बॉ तात्या

-(मटनबार म्यानेजर) टारझन

छोटा डॉन's picture

12 Jun 2010 - 9:38 pm | छोटा डॉन

काय लिहावे ?
टिपीकल "लै भारी" व्यक्तिचित्र असे म्हणतो.

तात्यादा जवाब नही साला इस मामलेमें !
लेख आवडला.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शुचि's picture

12 Jun 2010 - 9:43 pm | शुचि

कोण म्हणतं मराठी लेखकांचं अनुभवविश्व संकुचित आहे?
(नाही म्हणजे असं कोणी म्हणतच नव्हतं पण एनीवे)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन's picture

12 Jun 2010 - 11:22 pm | टारझन

एकतर एवढा भारी लेख वाचला , आता त्यावर इतकी विनोदी प्रतिक्रीया देऊन हसवुन मारणार आहात का शुचि ? =))

गवतचि भासे मला| भेंडी नसे हा मसाला||
काप कोंबडी फोडी कांदा| चापु न दे पोटाला||

पांथस्थ's picture

12 Jun 2010 - 9:48 pm | पांथस्थ

हा अनुभव वेश्यावस्तीतला जिथलं वातावरण दाहक, लाचार, माणसाच्या मुळ वृत्तीचं दर्शन घडवणारं त्यात व्यक्तिचित्र रेखाटण्यात तुमचा हात कुणी धरु शकत नाही. लेख छान झालाय.

माणसाच्या लाचारीबद्दल वाचुन क्षणिक खिन्नता मात्र दाटुन आली.

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

आनंदयात्री's picture

12 Jun 2010 - 10:09 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो !!
लिखाण ताकतीचे पण खिन्न करणारे ..

प्राजु's picture

13 Jun 2010 - 6:41 am | प्राजु

१००% सहमत.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

पक्या's picture

12 Jun 2010 - 10:58 pm | पक्या

जबरदस्त लेखन. अशा लेखनात आपला हातखंडा आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 11:45 pm | शानबा५१२

आपले अनुभव आपण प्रत्येक वेळी फार प्रभावीपणे लिहता.........

आपल्यातल्या माणुसकीला सलाम!!

पण आपण ह्याहुनही चांगल,ह्रदयस्पर्शी अनुभव लिहु शकता अस वाटत....तेव्हा आपण लिहत रहा आम्हाला वाचायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jun 2010 - 1:39 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या ऑन होमपिच. जबरदस्त. थोडक्यात, जास्त फापटपसारा न करता जीवनाचा एक नकोसा कोपरा दाखवून दिला.

अवांतरः रोशनीचा पुढचा भाग कधी?

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

13 Jun 2010 - 11:17 am | स्वाती दिनेश

तात्या ऑन होमपिच. जबरदस्त. थोडक्यात, जास्त फापटपसारा न करता जीवनाचा एक नकोसा कोपरा दाखवून दिला.

अवांतरः रोशनीचा पुढचा भाग कधी?

(अवांतरासहित )अगदी हेच म्हणते,
स्वाती

स्वप्निल..'s picture

14 Jun 2010 - 7:40 pm | स्वप्निल..

आता तुम्ही लेखणी हातात घेतलीच आहे तर रोशनी लिहाच :)

विंजिनेर's picture

13 Jun 2010 - 6:37 am | विंजिनेर

स्साला... काय अस्सल लिखाण आहे. शब्द न् शब्द मोजून-मापून. बढिया.
अजून लिहा राव..

तिमा's picture

13 Jun 2010 - 9:53 am | तिमा

तात्या उत्तम अनुभव, मोजक्या शब्दांत मांडलेला. तुमचा अनुभवाचा खजिना असाच खुला करा आमच्यासाठी!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

jaypal's picture

13 Jun 2010 - 10:00 am | jaypal

मणसाला काय नको नको ते करायला लावतय बघा.
तात्या वास्तवदर्शी लिखाण आवडल. अजुन येउद्यात . =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

:S
वेताळ

ऋषिकेश's picture

13 Jun 2010 - 11:45 am | ऋषिकेश

लेखन आवडले.. मात्र वाचल्यावर खिन्नता आली या पांतस्थाच्या मताशी सहमत
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

आशिष सुर्वे's picture

13 Jun 2010 - 11:50 am | आशिष सुर्वे

जबरराट् लेख..
आपल्या मनाचा मोठेपणा भावला..

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

सहज's picture

13 Jun 2010 - 1:28 pm | सहज

तात्या स्पेशल! (लेख)

फोटो नाही वाट्टं काढलात :-)

टारझन's picture

14 Jun 2010 - 10:28 pm | टारझन

तेच णा !! रोषणी , रोषणीची ल्योक ... यांचा फोटू आला ... आमच्या लाडक्या मण्सुरचा फोटो का नाही ? किती हा सावत्रपणा ? :)

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Jun 2010 - 4:54 pm | लॉरी टांगटूंगकर

तात्या भाइ का जवाब नही

धनंजय's picture

13 Jun 2010 - 5:06 pm | धनंजय

तात्यांनी हे व्यक्तिचित्र वेगळ्या शैलीतही लिहिलेले आहे.

भाईकाकांच्या आशीर्वादाने शिष्याची आपली छाप लेखनावर पडू लागली आहे. पंख झटकून घरट्याबाहेर उडण्यापेक्षा मोठी श्रद्धांजली वडीलधार्‍यांना आपण काय देऊ शकणार?

विसोबा खेचर's picture

13 Jun 2010 - 8:48 pm | विसोबा खेचर

धन्यवाद धनंजय साहेब..

माझी नितांत श्रद्धा आहे भाईकाकांच्या व्यक्तिचित्रांवर..

उभ्या आयुष्यात त्यांच्यासारखं एक तरी व्यक्तिचित्र लिहिता यावं एवढीच मनोकामना..

आपला,
(गजा खोत प्रेमी) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

13 Jun 2010 - 9:34 pm | संजय अभ्यंकर

भाईकाका त्यांच्या जागी आहेत, आपण आपले लेखन करित रहावे!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

14 Jun 2010 - 8:16 pm | चतुरंग

तात्या, तुला स्वतःची शैली सापडायला लागली आहे!
वरचेवर लिहिता रहा म्हणजे व्यक्तिचित्रे फुलत जातील...

(व्यक्तिचित्रप्रेमी)चतुरंग

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2010 - 6:18 pm | अप्पा जोगळेकर

तात्या, सही लिहिलंय. एकदम चटका लावणारं लिखाण आहे. अशा ठिकाणी काम करणं कसलं तापदायक असेल?

मृगनयनी's picture

14 Jun 2010 - 10:01 am | मृगनयनी

त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!

रिअली ग्रेट्ट!! .....

तात्या...... तुमच्या मनाचंदेखील मोठेपण मनाला भिडलं! :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

टारझन's picture

14 Jun 2010 - 10:26 pm | टारझन

तात्या...... तुमच्या मनाचंदेखील मोठेपण मनाला भिडलं!

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
परवाच भोक्त्या म्हणत होता , तात्याचा स्वभावही खुप चांगला आहे म्हणुन =))

आंबोळी's picture

14 Jun 2010 - 10:36 am | आंबोळी

तात्याबाचा हातखंडा लिखाण वाचून मजा आली....
फोरासरोडवर गेलाच आहात तर तेवढ रोशनीच पण घ्या अता मनावर...

अवांतरः कॅप्टन्सी सोडल्यावर सचिनचा खेळ बहरल्याचे उगाचच आठवून गेले......

झमझम अंडी उकडणार| अल्लाजान ती पार्सल नेणार||
तात्या त्याला जेवायला घालणार| व्यक्तिचित्र बनणार निश्चित*||

(* सौजन्य : सहजराव)

( ™ )आंबोळी

समंजस's picture

14 Jun 2010 - 11:01 am | समंजस

छ्या!! काय हे!! सक्काळी सक्काळी असं काही वाचावं लागतंय!! 8| [पांढरपेशी मन :) ]

मस्त! व्यक्तीचित्रण नेहमीप्रमाणेच झक्कास झालंय!! :)

mamuvinod's picture

14 Jun 2010 - 11:39 am | mamuvinod

सकाळी सकाळी छान सुरुवात केली तात्यानो

गदगदलो, बाकि आपण स्पेशल आहात अशा ले़खणकलेत

धन्यवाद पण रोशणी पण येउ दया

मामु

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jun 2010 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

साला व्यक्तिचित्र कसे लिहायचे आणि रंगवायचे ते आमच्या तात्याला विचारा !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शशिधर केळकर's picture

14 Jun 2010 - 12:13 pm | शशिधर केळकर

लेखन नेहेमीचेच भावोत्कट.
अतिशय लहानशी प्रतिमा, एक लहानसाच प्रसंग, पण ते योग्य त्या दृष्टीस पडले, की त्याचे कला़कृतीमधे परिवर्तन कसे होते, याचे आणखी एक जिवंत उदाहरण.

मला एक कुसुमाग्रजांची कविता आठवते - 'निशिगंध' नावाची.
भयाण तळघरात रात्री, अंधाराचेच जिथे साम्राज्य आहे, जिथे विकास नाही अशा ठिकाणी निशिगंधाचे फूल फुलते, आणि ते त्याना दिसते - सर्व कविता आत्ता मला तोंडपाठ नाही - पण या आशयाची.

त्या अनुभवाच्या जवळपास जाणारा हा लेख, तात्यांचा विशिष्ट ठसा उमटलेला दिसतो त्याच्यावर.

पण तात्या, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, ललित लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. कसे?

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 12:26 pm | मिसळभोक्ता

पण तात्या, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, ललित लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. कसे?

असेच म्हणतो.

तात्याने कधीतरी काहीतरी तंत्रज्ञानाविषयी, किंवा शुद्धलेखनाविषयी, किंवा भयकथा वगैरे लिहाव्यात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शैलेन्द्र's picture

14 Jun 2010 - 4:56 pm | शैलेन्द्र

"तात्याने कधीतरी काहीतरी तंत्रज्ञानाविषयी, किंवा शुद्धलेखनाविषयी, किंवा भयकथा वगैरे लिहाव्यात."

हे सगळं तात्याने लिहीलं तरं मिपाची राष्ट्रवादी काँग्रेस होइल.

संदीप चित्रे's picture

14 Jun 2010 - 6:30 pm | संदीप चित्रे

तात्या पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे पाहून आनंद झाला.
लेख नेहमीसारखाच मनापासून लिहिल्यामुळे छान झाला आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अरुंधती's picture

14 Jun 2010 - 7:11 pm | अरुंधती

तात्या,
पार चटका लावून जातं हो असं लिखाण! आपल्या मनातला माणूस जागवून जातं.... झापडं लावून जगणार्‍या आणि नशीबाला कोसणार्‍या प्रत्येकाने वाचायला पाहिजे जगात इतर लोक कोणत्या परिस्थितीला सामोरे जात असतात ते.... किळस, दारिद्र्य, लाचारी, असहायतेच्या बुळबुळीत बाजारात माणुसकीचे हे छोटे छोटे कवडसेच वाटा दाखवत जातात....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

15 Jun 2010 - 9:54 am | विसोबा खेचर

प्रतिसाद दिलेल्या सर्व वाचकांचा मी ऋणी आहे..

तात्या.

II विकास II's picture

15 Jun 2010 - 4:29 pm | II विकास II

>>प्रतिसाद दिलेल्या सर्व वाचकांचा मी ऋणी आहे..

धन्यवाद

दिपक's picture

15 Jun 2010 - 2:07 pm | दिपक

तात्याश्टाईल लिखाण.. व्यक्तीचित्र आवडले.

II विकास II's picture

15 Jun 2010 - 4:28 pm | II विकास II

राखीव कुरणातील लेखण एवढेच म्हणतो.

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2010 - 5:58 pm | इंटरनेटस्नेही

मनाला चटका लावणारा लेख.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

Pain's picture

16 Jun 2010 - 11:55 pm | Pain

कपडे धुणे यावरून समजते. इतक्या किळसवाण्या उल्लेखांची गरज नव्हती. काहीतरी नवीन वाचायला मिळेल असे वाटले होते.
शोले हिट झाला म्हणुन आणखी भव्यदिव्य शान काढला आणि तो सपशेल आपटल्याचे कुठेसे वाचले होते. एखादा प्रकार यशस्वी झाला की त्याच्याच आवृत्त्या यशस्वी होतीलच असे नाही. असो. जोपर्यंत लोकांचा आवडतय तोपर्यंत चालु द्या.