नाष्टा-ए-पाणीपुरी

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
5 Jun 2010 - 9:30 am

पुऱ्‍यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्‍या खाणं काय, दोन्ही एकाच आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्‍या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्‍या जिभेभोवती चळाचळा पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्‍यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल पुऱ्‍यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं बाई.. असा निराशावादी विचार मंथनास घेऊन महिलामंडळाच्या बैठकीसारखं त्या कोँडाळं करून बसल्या.
तर दुसरीकडे तव्यावरचे चटके सोसत फुगलेला एक एक छोला फोडलेल्या पुरीत सूर मारून रसातळाला जात होता. आपण पुरते गाळात जाणार आहोत हे त्यांच्या मनीध्यानीही येत नसावे अशा थाटात ते स्थानापन्न झाले होते. अचानक त्यांच्यावर आंबट, घट्ट चिँचपाण्याचा अभिषेक झाला अन् बिचारे बावरून गेले. आगीतून उठून चिखलात सापडलो अशी त्यांची अवस्था झाली. विचार करायला वेळ कुठला? मस्तकाभिषेक पूर्ण होईतोवर ते छोले पातळ तिखट रश्शात न्हाऊन निघाले. चिकट लिंपण धुवून निघाल्याने ते थयथय नाचू लागले. परंतु हा त्यांचा आनंदोत्सव फार काळ काही टिकला नाही कारण रश्श्यापाण्याचा इतका भडीमार होत होता की छोले गटांगळ्या तर खात होतेच शिवाय त्यांना सामावून घेणारी पुरीदेखील पुरेपूर ऊतू जात होती. 'आपलं डोकं फुटलं म्हणून काय झालं, नशीब तर नाही ना फुटलं! पहा आपलं उदर किती टंच भरलंय,' या भ्रमात त्या साऱ्‍या पुऱ्‍या एकमेकींना धक्के देत मोठ्या आनंदाने बशीत हिँदकळत होत्या, झिम्मा खेळत होत्या.आपलं पूर्ण भरलेलं उदर हीच एका मानवप्राण्याच्या जिव्हालौल्य नामक यज्ञातली आहुती आहे हे त्यांच्या गावी नसावं, इतक्या त्या एकमेकीँना कोपरखळ्या देण्यात मश्गुल होत्या.त्यांचं संभाषण मी ऐकतोय हेही त्यांना माहीत नव्हतं!
'काय छान फुगता येतं गं तुला!' एकीनं शेजारणीला द्विअर्थी कोपरखळी मारली. ऐकणारीसुद्धा काही कच्च्या तेलातली पुरी नसावी कारण तिनं दिलेल्या प्रत्युत्तरानं बशीत हास्यकल्लोळ उडाला. ती म्हणाली होती, 'अग्गोबाई, तू तर पोटुशा बाईएवढी फुगलीयेस की! हा शिष्टाचार म्हणावा की भ्रष्टाचार?' रागावून पहिलीनं दुसरीला जोराची ढुसणी दिली. त्यासरशी ती स्वतःच मधोमध तडकली आणि सगळ्या बशीत तिचं पोट मोकळं झालं...
तिथे आणखी काहूर माजण्याच्या आतच मोठ्या चवीनं मी एकेकीला माझ्या मुखात सामावून घेण्यास प्राधान्य दिलं! आणि त्या पंचमस्वादी पाण्याच्या पुऱ्‍या विनाविलंब गट्टम केल्या...

विनोदजीवनमानलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

5 Jun 2010 - 10:43 am | श्रावण मोडक

बाकी लेखन ठीकच. पण बशीत पाच पुऱ्या वगैरे वाचून वाटलं, छ्या... ती पाण्यानं भरलेली पुरी भैय्याच्या हातून आपल्या हाती येण्यात तिच्या त्या गिर्रेबाजपणाचं जे सुख जाणवतं ते या बशीतील पाचच काय पन्नास पुऱ्यातही नाही.

मस्त कलंदर's picture

5 Jun 2010 - 10:58 am | मस्त कलंदर

पाण्यानं भरलेली पुरी भैय्याच्या हातून आपल्या हाती येण्यात तिच्या त्या गिर्रेबाजपणाचं जे सुख जाणवतं ते या बशीतील पाचच काय पन्नास पुऱ्यातही नाही.

अगदी... अगदी...!!!

पाणीपुरीप्रेमी-मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

नितिन थत्ते's picture

5 Jun 2010 - 12:53 pm | नितिन थत्ते

पुण्यात संभाजी पार्कात पाणीपुरी मागितली की अशीच बशीत एकदम ५ पुर्‍या ठेवून मिळते. ती आपल्याला देऊन तो पाणीपुरीवाला शेजारच्या पाणीपुरीवाल्याशी गप्पा मारण्याच्या महत्त्वाच्या कामाला निघून जातो.

एकेक पाणीपुरी सारसबागेत मिळते बहुतेक....

मुंबई-ठाण्याला सगळीकडे एक एक पुरी भैया भरून देतो.
भैयाच्या घामामुळे पाणीपुरीला खास चव येते असे म्हणतात. :)

नितिन थत्ते

भय्या's picture

5 Jun 2010 - 8:29 pm | भय्या

पुण्यात टिळक रोड वरून पेशवे पार्क कडे जाताना उजवी कडे गिरीजा भेळ च्या मागे एक मावशी उत्तम पापु बनवतात ( अलिकड्ची परिस्थिती माहित नाही)
त्या प्रथम तुमची तिखट खायच्या क्षमतेची परिक्षा घेतात. आणि मग एक एक अशी
पापु देत राहतात.खुप मजा येते.
दोन्ही हाताच्या बाह्या मागे सारून पाण्याने भरलेली पुरी जीभ आणि टाळ्याच्या मधे धकलावी आणि मग रसोत्सव सुरू होतो. टकलातून कारंजा.

वेदश्री's picture

5 Jun 2010 - 11:02 am | वेदश्री

अगदी हेच! त्यात आणखीन नुसत्या छोल्यांपेक्षा त्यासोबत आलूका मसालाही टाकला गेला पापु*त तर क्या कहने! आंबटगोड पाण्याने पुरीतली जागा वाया घालवण्यापेक्षा अख्खी जागा तिख्खट रश्श्याने घेऊन, अशी पापु खाल्ल्यावर ठसका लागला तर कलिजा खल्लास!! नाकाडोळ्यातून पाणी आले नाही तर पुन्हा त्या पापुवाल्याकडे जाणे नाही! भैय्याने पापु देण्यात आणि आपल्या त्या खाण्यात योग्य तो ताळमेळ बसला तर खरी मजा नाहीतर जराशीच असली तरी मऊ झालेली पापु खायची बैदा.. पापु देण्याअगोदर भैयाने बारीक चिरलेला कांदा/कैरी यांचे मिश्रण माझ्या हातातल्या ताटलीत देणे, पापु मनसोक्त खाऊन झाल्यावर २ वेळेस नुसता तिखट रस्सा आणि मग सुकी (पण मालमसाला लावलेली) पुरी (अर्थातच प्रत्येक प्लेटसाठी एक!) देणे अगदी मष्ट!

* पापु = पाणीपुरी

अनिल हटेला's picture

6 Jun 2010 - 6:11 pm | अनिल हटेला

पाणीपूरी विषयावर इतकं सविस्तर वर्णन करणारा लेखक आणी मसालेदार प्रतीसाद देणारे ठसकेबाज प्रतीसादी ह्यांचा कडक शब्दात निषेध!! X(

तुमचा लेख होतो आणी.........

असो !!

आपला पाणीपूरी प्रेमी!!
:(

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

अस्मी's picture

5 Jun 2010 - 10:49 am | अस्मी

ह्म्म्म...

पण मी तर एक एक पुरी घेऊन खाते पाणी-पुरी :) सगळ्या एकदम बशीत घेऊन खायला नाही आवडत मला...

यावरून एक जोक आठवला...

एक अशी जागा सांगा की जिथे श्रीमंत माणूससुद्धा कटोरी ( :/ ) घेऊन उभा असतो...
.

.

.

.

सोप्पय...पाणीपुरीवाल्याचा ठेला... :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

शानबा५१२'s picture

5 Jun 2010 - 10:57 am | शानबा५१२

अप्रतिम जॉक :D :D :D
हसुन हसुन तोंड दुखयला लागल!!
मला वाटल फक्त नवा़काळ मधेच PJ येतत की काय!

अशी एक जागा सांगा की जिथे श्रीमंत माणुस सुद्धा ­बादली ( :? ) घेऊन बसलेला असतो ...

.

.
.
.
.
.
सोप्पय .... सुलभा सौचालय... =))

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- सुष्मितारझन :)

राजेश घासकडवी's picture

5 Jun 2010 - 1:28 pm | राजेश घासकडवी

वेगळा चुरचुरीत लेख. पाणीपुरीसारखा हलकाफुलका.

समिधा's picture

5 Jun 2010 - 1:32 pm | समिधा

पाणीपुरी सगळ्यात आवडता पदार्थ.
खुप ठिकाणी खाल्ली आहे पापु ..:)
पण सोलापुर सारखी पाणीपुरी नाही मिळाली कुठेचे खुपच छान असते. जेव्हा सोलापुरला जाण होत तेव्हा तेव्हा मनसोक्त खाउन घेतो आम्ही सगळे जण.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्रभो's picture

5 Jun 2010 - 10:41 pm | प्रभो

सोलापुरच्या पाणीपुरीत छोले-रगडा, गोड पाणी असला प्रकार काही नसतो....फक्त तिखट पाणी.....मी आणी माझे सोलापुरातले मित्र यांचा पाणिपुरी हा वीकपॉइंट आहे.....

भोचक's picture

5 Jun 2010 - 4:35 pm | भोचक

खुसखुशीत लेख. अंमळ भूतकाळात डोकावलो.

(भोचक)
जाणे अज मी अजर

शुचि's picture

5 Jun 2010 - 4:56 pm | शुचि

साधा विषय - किती रंगवलाय .

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इंटरनेटस्नेही's picture

5 Jun 2010 - 5:23 pm | इंटरनेटस्नेही

लेख छानच! तुम्ही शान - ए - मिसळपाव आहात एवढे बाकी खरे!

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

स्पंदना's picture

5 Jun 2010 - 7:14 pm | स्पंदना

घाट कोपर ला वेस्ट साइड ला पुलाजवळ एक मराठी पाणिपुरी वाला उभा रहायचा. आम्हा दोघांना ही त्याची चटक लागली होती.
एकदा एका मित्राच्या घरुन निघालो ते थेट पाणिपुरीच्या ठेल्यावर्..खाउन झाल्यावर धनी खिसा चापचतोय तर पाकिट गायब..
पठ्ठ्या मला त्या पाणिपुरी वाल्या कडे उभी करुन परत मित्राच्या घरी पळाला....मला जन्मभराची सोय झाली...मला पाणिपुरी वाल्याकडे गहाण ठेवुन पाणिपुरी खाल्ली म्हणायला.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

भय्या's picture

5 Jun 2010 - 8:54 pm | भय्या

पु. लं देशपांडे "कोणत्या ही पदार्थाच्या चवीची प्रत स्वच्छतेच्या व्यस्त प्रमाणात असते."

-- आपल्याला काहीच सुचत नसेल तर पुलं चे स्मरण करावे. काहीतरी योग्य ते आठवतेच---

दिपाली पाटिल's picture

5 Jun 2010 - 10:23 pm | दिपाली पाटिल

हा आणि आधीचेही लेख बर्‍याचदा समजून घ्यायचा प्रयत्न केला पण मलाच समजत नाहीयेत कां फक्त ??? 8} :/

दिपाली :)

शिल्पा ब's picture

6 Jun 2010 - 7:03 am | शिल्पा ब

नुसतं लेखाचं नाव वाचूनच तोंडाला पाणी सुटलं.. =P~

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

डॉ.श्रीराम दिवटे's picture

6 Jun 2010 - 6:06 pm | डॉ.श्रीराम दिवटे

हा आणि इतर लेख मनोरंजनात्मक, विरंगुळा म्हणून लिहिले आहेत. शाब्दिक कोट्या, कल्पनाविलास यांची झूल पांघरून वाक्ये सादर केली आहेत. त्यांचा फक्त आस्वाद घ्यायचा. जास्त विचार कराल तर काहीच कळणार नाही.

खडूस's picture

7 Jun 2010 - 11:02 am | खडूस

मला पुण्याची पापु विशेष (अजिबात असे वाचणे) आवडत नाही. कारण basicमध्येच झोल आहे.
पुण्यात पापुत रगडा असतो आणि अस्सल नागपुरी पिंड माझा मला पापुत बटाट्याचेच सारण आवडते. पण इच्छा तिथे मार्ग ह्या न्यायाने मी पुण्यातही माझा पापुवाला शोधून काढला. :)
आणि तेसुद्धा एक नाहीतर चक्क दोन (backup हो)
१. लक्ष्मी रोडला हिंद साडी सेंटरहून हस्तकलाच्या गल्लीत आहे 'रसराज' म्हणून (चू.भू.दे.घे.)
२. संतनगर (पुणे-सातारा रोड) येथे (treasure park) समोर

शोध is still going on हे.सां. न.ल.गे.

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत