इवलेसे रोप लावियले द्वारी...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
18 May 2010 - 1:38 pm

राम राम मायबाप मिपाकरहो,

'इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...' हे असं झालंय बघा मिसळपावचं. मला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी आणि नीलकांतने या संकेतस्थळाच्या उभारणीस प्रारंभ केला. तेव्हा आम्ही दोघे आणि आमचे काही हितचिंतक एवढेच लोक होतो. नीलकांत तेव्हा उमेदवारीच्या दिवसांत होता. स्वतःचा संगणकही नाही अशी त्याची अवस्था. त्या काळात या मुलाने अक्षरशः नेट कॅफेत बसून या संस्थळाच्या उभारणीचे काम केले. यशस्विरीत्या संस्थळ चालू झाले. 'लोग मिलते गये कांरवा बनता गया' अशी मिपाची वाढ उत्तरोत्तर होत गेली. या सर्व काळात तो माझ्याबरोबर होता, अक्षरशः रात्रीचा दिवस करून मिपा सतत चालू राहिल याची काळजी त्याने घेतली आहे.

आज मिसळपाव हा एक छोटासा मित्रांचा समूह न राहता एक विशाल परिवार झाला आहे. इथे आता असे अनेक समूह आहेत, जे गुण्यागोविंद्याने इथे नांदताहेत. इथे अनेक लेखक/लेखिका आहेत कवी/कवयत्री आहेत, इथे उत्तम विडंबक आहेत, उत्तम विश्लेषक आहेत, उत्तम प्रतिसादक आहेत. या सगळ्या लोकांनी निर्मिलेले अमूल्य असे साहित्य इथे आहे. ते वैविध्यपूर्ण आहे, ते अनुभवसंपन्न लोकांचे असल्याने ज्ञानदायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे खूप मोठा वाचकवर्ग आहे. तो समाजाच्या सगळ्या स्तरातून येणारा आहे. आज साधारण १०००० च्या वर सदस्यसंख्या आहे. सदस्यत्व न घेता वाचन करणारे अगणित आहेत. अशी घडी जमून येणे विरळाच. या सगळ्याचा आढावा घेतांना मला कोण आनंद होतोय हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत.

या सर्व गोष्टींमुळे आता यापुढे हे संस्थळ मी खासगी म्हणून चालवणे मला माझ्या वैयक्तिक प्राधान्यक्रमामुळे शक्य होत नाहीये. खरं तर मी मिसळपावला पुरेसा न्याय देऊ शकत नाहीये अशी माझी भावना होते आहे. मी नाही तर कोण? या प्रश्नाला अर्थातच 'नीलकांत' हे उत्तर आहे. किंबहुना हा त्याचा हक्कच आहे.

यापुढे माझा बराचसा वेळ माझ्यासमोर असलेल्या अनेक अडचणींना तोंड देण्यात जाणार आहे. उरलाच काही वेळ तर तो मी माझ्या ललित लेखनावर आणि सांगीतिक लेखनावर खर्च करणार आहे. या मोठ्या आनंदाला मी मुकलो आहे. आणि म्हणूनच यापुढे मिपा व्यवस्थापनाकरता यापुढे माझ्याकडे वेळ नाही..

मध्यंतरीच्या काही काळात मी अडचणीत असल्यामुळे , 'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला..परंतु त्याचा मोठेपणा हा, की मिपाशी निगडीत कोणतीही गोष्ट त्याने मला न विचारता, माझ्याशी चर्चा न करता कधीही केली नाही व हितशत्रूंपासून मिपाला आजतागायत सुखरूप ठेवले.. आणि म्हणूनच या छोटेखानी लेखाद्वारे मिसळपावचे यापुढचे सर्व हक्कं मी नीलकांतच्या हातात सोपवीत आहे. मिसळपाव सर्वाधिकाराने मी त्याला देत आहे. मिसळपावशी माझे नाते संस्थापक म्हणून अर्थातच कायम राहिल, आणि तितकेच मला पुरेसे आहे, आनंददायक आहे.

त्याच्याशी चर्चा करताना मिपाच्या ध्येयधोरणांविषयी, संपादन प्रक्रियेविषयी, भविष्यात मिपाचा ट्रस्ट स्थापन करण्याविषयी अनेकविध कल्पना त्याने मला बोलून दाखवल्या..या सर्व गोष्टी तो उत्तम रितीने पार पाडेल अशी मला खात्री आहे आणि त्याकरता त्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!

सुजाण संपादकवर्ग हा आजवरची मिपाची अजून एक मोठी ताकद आहे. आपण नेहमीच मला मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबाबद मी आपला ऋणी आहे. आपण असेच सहकार्य यापुढे नीलकांतला करावे ही नम्र विनंती. मी सुध्दा कायमच नीलकांतच्या मागे उभा राहिलो आहे तसाच यापुढे सुध्दा कायम असेन यात शंकाच नाही.

मिपाच्या मालकीहक्काबाबतचे हे निवेदन शेवटचे. सदस्यांनी कृपया तारतम्याने या विषयावर चर्चा करावी. तात्या अभ्यंकर या व्यक्तीच्या व्यक्तिगत
बाबींमुळे मिसळपाव या विशाल परिवाराच्या अस्तित्वाबद्दल अकारण चर्चा केली जाऊ नयेत असे मनापासून वाटते.

हे निवेदन देतांना शब्दशः उर भरून येत आहे. मिसळपाव मोठे करत रहा त्याची काळजी घ्या, फार कष्टाने इथवर आले आहे हो !

'मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जगवा!' इतकेच सांगणे!

-
आपलाच विश्वासू

तात्या अभ्यंकर
संस्थापक मिसळपाव डॉट कॉम

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

18 May 2010 - 1:47 pm | Dhananjay Borgaonkar

तात्यानु मिपा सारखं सुरेख संस्थळ तुमच्यामुळे उदयास आलं यासाठी आपले शतशः आभार. तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत हीच मनापासुन ईच्छा.

नीलकांतास अनेक अनेक शुभेच्छा..

विसोबा खेचर's picture

18 May 2010 - 1:48 pm | विसोबा खेचर

मुखपृष्ठ आणि खादाडी सदर हेदेखील अजून एखाद दोन दिवसच चालवीन.. त्यानंतर त्याचीही काळजी नीलकांतने आणि त्याच्या संपादक मंडळाने घ्यावी..

मराठी संस्थळाच्या बाबतीत 'मुखपृष्ठ', 'खादाडी सदर', 'संपादकीय' या सारख्या काही नव्या कल्पनांना जन्म देऊन त्या मी काही काळ राबवू शकलो याचा मला आनंद आहे..

तात्या.

अहो तात्या, तेव्हढे ते रौशनी वरचे लेखन पूर्ण कराच ... ही नम्र विनन्ति. =;
सर्व अडचणींचं लवकरात लवकर निवरण होवो ही सदिच्छा ...

पर्नल नेने मराठे's picture

18 May 2010 - 1:51 pm | पर्नल नेने मराठे

झाले ते झाले.. तात्या काय त्या अडचणी निस्तरुन परत लवकर या.
आम्ही तुमची वाट पाहु. स्वामींचा जप करा. ते मार्ग दाखवतील.

निलकांतचे अभिनंदन व शुभेच्छा !!!

चुचु

श्रीयुत संतोष जोशी's picture

18 May 2010 - 1:57 pm | श्रीयुत संतोष जोशी

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्वीचा कथित खोडसाळपणा आता वर्तमानात जाहीररित्या येत आहे हे पाहून आनंद झाला!
जय हो नीलकांत!
आणि जय हो, बिपिन भविष्यवाले!!

अदिती

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 2:28 pm | ऋषिकेश

तात्यांना त्यांच्या वैयक्तीक त्रासातून सुटण्यासाठी तर नीलकांतला मिपाचे शिवधनुष्य सक्षमपणे (अधिकृतरित्या) पेलण्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 10:14 pm | शिल्पा ब

+ १
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

भोचक's picture

18 May 2010 - 2:44 pm | भोचक

तात्या, तुमच्या समस्या लवकर सुटोत ही सदिच्छा. आणि नीलकांतला मिपाच्या 'सर्वतोपरी' जबाबदारीसाठी शुभेच्छा. शिवाय सहकार्य आहेच.

(भोचक)
जाणे अज मी अजर

आनंदयात्री's picture

18 May 2010 - 3:40 pm | आनंदयात्री

ये धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..तत्तड धत्तड !!

-
(ढोलताश्यांचा आवाजात नाचणारा)
आनंदयात्री

>>'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला..

हॅ हॅ हॅ ...
असो .. सूतशेखराचा खप वाढला असे कळते !!

-
(प्रतिसादक आणी हितचिंतक)

आनंदयात्री

इनोबा म्हणे's picture

18 May 2010 - 3:50 pm | इनोबा म्हणे

ये धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..तत्तड धत्तड !!

च्यायला ह्ये लैच भारी :D

>>'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला..

हॅ हॅ हॅ ...
असो .. सूतशेखराचा खप वाढला असे कळते !!

ह्म्म, काही दिवसांपुर्वीच स्टॉक संपला होता बहूधा. त्यांना भविष्य कळतं म्हणे!

धमाल मुलगा's picture

18 May 2010 - 4:46 pm | धमाल मुलगा

:) आंद्याचा एक जुना धागा आठवला आणि तेच चित्र इथे पुन्हा टाकलं रे बाबा. :)

बाकी, इतर धाग्यांवर मालकीहक्काचा गदारोळ करणार्‍या मुखवट्यांच्या आयडींचे इथले मौन अंमळ 'untold tales' सांगुन जाताहेत असं का वाटतंय बरं मला?

असो!


हेल नीलकांत ;)

-एर्विन धोमेल. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 May 2010 - 4:48 pm | llपुण्याचे पेशवेll

धमुशी. सहमत आहे.
टिकलो तर आम्ही देखील मिपाच्या उत्कर्षास आधार होऊ.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

सुमीत भातखंडे's picture

18 May 2010 - 4:10 pm | सुमीत भातखंडे

नीलकांतला मनापासून शुभेच्छा.
मिपाची घोडदौड अशीच उत्तरोत्तर चालू राहो.

विकास's picture

18 May 2010 - 4:24 pm | विकास

सुयोग्य निर्णय आहे! तात्यांचे आणि नीलकांतचे अभिनंदन.

नीलकांतला हे संकेतस्थळ असेच भरभराटीस ठेवता यावे म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा!

तसेच तात्यांना देखील त्यांच्या जबाबदार्‍या पूर्ण करता याव्यात म्हणून शुभेच्छा!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मुक्तसुनीत's picture

18 May 2010 - 5:14 pm | मुक्तसुनीत

असेच.

चित्रा's picture

18 May 2010 - 6:24 pm | चित्रा

असेच म्हणते. निर्णयाचे स्वागत आणि नीलकांत यांना अनेक शुभेच्छा.

प्राजु's picture

18 May 2010 - 7:11 pm | प्राजु

हेच म्हणते.

फक्त एक सांगावेसे वाटते..
तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

विसोबा खेचर's picture

19 May 2010 - 10:51 am | विसोबा खेचर

तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते.

धन्यवाद प्राजू.. मी वेळ मिळेल तसा ती जबाबदारी घेईनही.. फक्त नीलकांताची त्यास परवानगी हवी..

आणि हो, जबाबदरी देणारच असेल तो तर नुसत्या मुखपृष्ठाची नको. खादाडी सदराचीही हवी.. ;)

(विविध छायाचित्र प्रेमी) तात्या :)

सुयोग्य निर्णय - अभिनंदन आणि धन्यवाद

निखिल देशपांडे's picture

18 May 2010 - 4:36 pm | निखिल देशपांडे

तात्यांना त्यांचा ईतर जवाबदार्‍या पुर्ण करता याव्या यासाठी शुभेच्छा!!!
बाकी नीलकांतचे अभिनंदन, मिपाची घोडदौड अशीच उत्तरोत्तर चालू राहो.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 4:40 pm | अरुण मनोहर

कवी असल्यामुळे तुमच्या मनाची भावुकता मला जरा अधिकच विवश करून गेली. :(
>>>हे निवेदन देतांना शब्दशः उर भरून येत आहे. मिसळपाव मोठे करत रहा त्याची काळजी घ्या, फार कष्टाने इथवर आले आहे हो !<<<

तात्यानुं काही काळजी करू नका. तुम्ही एक समर्थ स्थळ उभारले आहे. तुम्ही जमवलेली ही सगळी चमु म्हणजे "नवरत्न दरबार" आहे. मिपा उत्तरोत्तर यशाची मोठी पाउले चालेल ह्यात शंका नाही.

निलकांत सारखा अनमोल नीलमणी ह्या स्थळाचे वैभव वाढवणार आहे हे वाचून खूप आनंद झाला. निलकांत आणि संपादक मंडळींना एक विनंती-

मिपाची शक्ती त्याच्या वेगळेपणात आहे. ईथे मस्ती, दंगल, विचार मंथन, ललीत कला, पाक कला, फोटोग्राफी, आणि नुसताच टाईम पास असे सगळे पैलू आहेत. कधी लाथाळ्या ही होतात, पण चहाच्या पेल्यातील वादळासारखे ते असते. येणारे सवंगडी अतिशय विस्तृत क्षेत्रातून आले आहेत. सतत कडक ईस्त्री घालून वावरावे लागत नाही. हसी मजाक नुसती चालतच नाही तर दौडते.

हा मिपाचा आत्मा कायम ठेवा.

तात्या, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, त्या दूर होतील ह्याची खात्री बाळगा. तुमच्या ह्रदयात संगीताचा झरा वाहत आहे. ह्या कठीण काळातून पार पडण्यासाठी ते संगीतच तुमची शक्ती बनेल.

पर्नल नेने मराठे's picture

18 May 2010 - 4:49 pm | पर्नल नेने मराठे

तुम्ही जमवलेली ही सगळी चमु म्हणजे "नवरत्न दरबार" आहे.
=)) =)) =))

चुचु रत्नपारखी

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 6:49 pm | अरुण मनोहर

:? चुचु :?

इन्द्र्राज पवार's picture

18 May 2010 - 4:41 pm | इन्द्र्राज पवार

१०,०००+ हा आकडाच श्री.तात्या अभ्यंकर आणि नीलकांत यांच्या कल्पकतेचे उदाहरण आणि "मिसळपाव" यशस्वी होण्याचे द्योतक आहे. श्री. अभ्यंकर यांच्या व्यक्तिगत जीवनात आलेले मळभ लवकर दूर होवो तसेच श्री.नीलकांत यांना हा जगन्नाथाचा रथ चालविण्याचे बळ लाभो याच शुभेच्छा !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

टारझन's picture

18 May 2010 - 4:43 pm | टारझन

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
मिपा भरभराटी साठी आमचा स्ट्राँग अ‍ॅक्स्टीव्ह सहभाग असेल

(बुरुंज) टारझन

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 4:56 pm | छोटा डॉन

अत्यंत महत्वाच्या क्षणी अचुक आणि स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल तात्या अभ्यंकर आणि नीलकांत ह्या दोघांचेही अभिनंदन !

खरे तर ह्याची वेळ आलीच होती, कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या निमित्ताने अनेक विघ्नसंतोषी व्यक्तींना आंतरजालावर धुडगुस घालण्यास फावले होते.
उत्तरे द्यायला कोणीच नसल्याने त्याचा मनोसोक्त दंगा चालु होता व त्यामुळे सामान्य वाचक अकारण वेठीस धरला जात होता.
तुर्तास तात्या अभ्यंकरांनी स्पष्टपणे सर्व जबाबदारी आणि संबंधित गोष्टी नीलकडे सोपवल्या असल्याने अनेक प्रश्नांची योग्य ती उत्तरे योग्य त्या चौकस लोकांना मिळाली असतील व आता त्यामुळे इथले वातावरण निवळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

देवाच्या कॄपेने तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !

नव्या कार्यभारासाठी नीलकांतचे अभिनंदन आणि सोबत त्याला खुप शुभेच्छांसकट 'संपुर्ण सहकार्य'.
इतर सर्व जणांनीही आता भुतकाळातील इतर बाबी विसरुन नीलकांतचय नेतॄत्वाखाली मिपाच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रामाणिक योगदान द्यावे ही सुज्ञ अपेक्षा.

नव्या जबाबदार्‍या व अधिकार व त्या सोबत येणार्‍या अपेक्षा ह्यांचे ओझे फार मोठ्ठे आहे, नील ते समर्थपणे पेलेल ही खात्री आहे आणि त्यासाठी आमची त्याला नेहमी साथ आहे ...

आजचे हे निवेदन पाहुन खुप आनंद झाला व 'मिसळपाव.कॉम' आता पुन्हा जोमाने वाटचाल करु लागेल असे वाटते आहे.
असो.

------
( शुभेच्छुक) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

लवंगी's picture

18 May 2010 - 5:42 pm | लवंगी

अतिशय समर्पक प्रतिसाद

गणपा's picture

18 May 2010 - 6:54 pm | गणपा

डॉण्रावांशी बाडिस.

विकास's picture

18 May 2010 - 7:29 pm | विकास

सहमत

डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्‍या मिळत राहोत ही शुभेच्छा! :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 8:09 pm | छोटा डॉन

>>डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्‍या मिळत राहोत ही शुभेच्छा!
आमेन !

विकासराव, कशाला खेचताय गरिबाची ?
अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे आणि कसाबसा जगतो आहे ;)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

धमाल मुलगा's picture

18 May 2010 - 8:15 pm | धमाल मुलगा

'त्या पन्नास' जणांच्या यादीतले आपण एक वाटतं.
असो! विषयांतराबद्दल क्षमस्व. ;)

विकास's picture

18 May 2010 - 8:16 pm | विकास

अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे

पोलीसात ओळख दिसतीयं ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

श्रावण मोडक's picture

18 May 2010 - 8:32 pm | श्रावण मोडक

नाही. विकासराव, नाही. त्यासाठी 'बारामती'करांशी ओळखी लागतात. मग ते पोलिसांना सांगतात. मग पोलीस ऐकतात.
काय योग आहे पहा. सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात. पंढरीच्या विठोबाची कृपा ही...
काय डान्राव, बरोबर ना?

छोटा डॉन's picture

18 May 2010 - 8:43 pm | छोटा डॉन

>>पंढरीच्या विठोबाची कृपा ही...
+१, सहमत ...
बोला "पुंढरिक वरदा हाऽऽऽरी विठ्ठलऽऽऽ !'

बाकी बरेच संदर्भ राहिले हो मोडक ?
असे कसे काय घडले ?
ते अनुशेष, दबावगट, पक्षाचा चेहरा , महामंडळे, अनुदान वागैरे बर्‍याच बाबी आहेत ;)

>>सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात.
=))
इथे खुप अवांतर होत असल्यास वेगळा धागा काढावा ;)
त्या निमित्ताने आम्हालाही नव्या ४ बाबी शिकता येतील :)

------
( मोडकांचा मानस शिष्य ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

आनंदयात्री's picture

18 May 2010 - 8:45 pm | आनंदयात्री

>>ते अनुशेष, दबावगट, पक्षाचा चेहरा , महामंडळे, अनुदान वागैरे बर्‍याच बाबी आहेत

ख्या ख्या ख्या ... एकच नंबर रे डॉन्या !!

=)) =))
आणी मानसपुत्र का स्वयंघोषित मानसपुत्र ?

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2010 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. विषय निघाला आहे म्हणून विचारतो. काकांच्या प्रॉपर्टीचे काय झाले?
मानसपुतण्या कुठे गेल्या?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

श्रावण मोडक's picture

20 May 2010 - 9:07 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... मालमत्तेची चिंता नको. मानसपुतण्या आहेत, पुतण्याही आहेच. ते सोडवतील राव हा प्रश्न. आपण कुठं डोकं गुंतवा त्यात? ;)

विजुभाऊ's picture

19 May 2010 - 12:10 pm | विजुभाऊ

तात्यांची प्रांजळ निवेदन वाचून बरे वाटले. मिपाशी जुळलेली आमची नाळ कधीच तुटणार नव्हती.
बाकी माझ्या ही भावना डान्याप्रमाणेच
तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !


संदीप चित्रे's picture

19 May 2010 - 11:36 pm | संदीप चित्रे

>> तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !

उदय सप्रे's picture

18 May 2010 - 5:04 pm | उदय सप्रे

तात्या साहेब,
मिपा मुळे खूप चांगले वाचता आले, शिकता आले.आपला अत्यंत आभारी आहे.आपल्या समस्या देव लव्करच सोडवेल ही सदिच्छा !
आपला विनम्र,
उदय सप्रे

टुकुल's picture

18 May 2010 - 5:11 pm | टुकुल

तात्या, निलकांत आणी मिसळपावचे अभिनंदन १०,००० आकडा गाठल्याबद्दल.

--टुकुल

प्रमोद देव's picture

18 May 2010 - 5:48 pm | प्रमोद देव

(|:

इनोबा म्हणे's picture

18 May 2010 - 6:05 pm | इनोबा म्हणे

जाऊ द्या हो! सिद्धहस्त लेखक आहेत ते. घ्यायचं आपलं सांभाळून.

टारझन's picture

18 May 2010 - 6:36 pm | टारझन

=)) =)) =))
=)) =))
=))
सांडलो

-(सिद्धहस्त वाचक) टारझन

अमोल केळकर's picture

18 May 2010 - 7:04 pm | अमोल केळकर

मिसळपाव हे संकेतस्थळ मराठी संकेतस्थळांच्या महाजालात आपले वेगळेपण जपून ठेवेल यात शंका नाही
पुढील वाटचालीस शुभेच्छा !!

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मिसळपाववर दोन एक वर्षांपुर्वी असाच फिरत फिरत आलो अन इथलाच झालो. खूप चांगले मित्र मिळाले मला इथं. अगदी व्यक्तीगत अडचणी आल्या तेव्हा रात्रभर दवाखान्यात माझ्याबरोबर रात्र काढणारे मित्र मिसळपाववर भेटले. मराठीत स्वतःला व्यक्त करण्याची संधी तर मिळालीच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सतत इतर सदस्यांकडुन, तात्यांकडुन, संपादकांकडुन प्रोत्साहन आणि सकारात्मक सूचना मिळाला. असं संकेतस्थळ उभारणं हे सोपं काम नव्हे. ते केल्याबद्दल तात्यांना धन्यवाद द्यावेत ते थोडेच.

नीलकांतची निवड सर्वोत्तम आहे याबाबत कुणालाच शंका असु नये. त्याला यशच मिळत राहील अशी मला खात्री आहे.

दशानन's picture

18 May 2010 - 8:52 pm | दशानन

+ १

जे झाले ते वाईटच झाले तसे पाहता पण परिवर्तन हा नियम आहे व ते होत राहतोच.

असो.

जे बदलत आहेत त्यांचे बदल योग्य आहेत.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

आनंदयात्री's picture

18 May 2010 - 9:07 pm | आनंदयात्री

असहमत.

-१

चुकिचे अशी पाचर सॉ सॉरी टाचण मारत आहे.

दशानन's picture

18 May 2010 - 9:18 pm | दशानन

तुम्ही चुकीच्या संकेतस्थळावर आहात मग ;) टाचणासाठी असो.

**

प्रतिसादावर येतो...

असहमतीचे कारण नाही सांगितले पण जे मला वाटले ते त्यानुसार लिहतो..
व्यक्तीगत जीवनामध्ये व्यक्ती कसा वागतो व का वागतो त्याची काही कारणे वेगळी असू शकतात म्हणून मी ते वाक्य लिहले होते... उगाच धत्तड धत्तड करुन नाचलो नाही कारण अवस्था / व्यवस्था व परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते वर एखाद्याच्या दुख:वर नाचावे एवढी वाईट अवस्था माझ्या मनस्थितीची नक्कीच झालेली नाही. काही चुकले असू शकते.. म्हणून नाचणे अयोग्यच.

ÿÿÿ

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

पक्या's picture

18 May 2010 - 9:25 pm | पक्या

+१
तात्या आता मालक नाहीत हे वाचून कसेसेच वाटले.
तात्यांनी अजूनही मुखपृष्ठ सदर चालवावे असे वाटते. त्याशिवाय मिपा हे मिपा वाटणार नाही.
तात्या त्यांच्या व्यक्तिगत अडचणीतून लवकर मोकळे व्हावेत ही सदिच्छा आणि नीलकांतास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !

आनंदयात्री's picture

18 May 2010 - 9:30 pm | आनंदयात्री

>>वर एखाद्याच्या दुख:वर नाचावे एवढी वाईट अवस्था माझ्या मनस्थितीची नक्कीच झालेली नाही. काही चुकले असू शकते.. म्हणून नाचणे अयोग्यच.

=)) =))
हा हा हा ..
ज्याची त्याची जाण .. ज्याची त्याची समज हे वाक्य आठवले.
ज्यांना सर्वसामान्य मराठीतले प्रतिसाद कळतात त्यांना नाचणे कश्यासाठी हे कळले आहे.
असो ..

दशानन's picture

18 May 2010 - 9:32 pm | दशानन

हो बरोबर आहे...

सर्वसामान्य मराठीवाले म्हणजे आपण असा एखाद्याचा ग्रह झाले म्हणजे दुर करणे अवघडच नाही का यात्री साहेब ?

असो.

धन्यवाद.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

आनंदयात्री's picture

18 May 2010 - 9:41 pm | आनंदयात्री

आता कारणः

>>जे झाले ते वाईटच झाले तसे पाहता पण परिवर्तन हा नियम आहे व ते होत राहतोच.

नीलकांतच्या हातात सर्वाधिकार आले हे वाईट झाले असे तुम्ही म्हणताय त्याला असहमत !!
हा धागा तात्यांच्या वैयक्तिक स्थितीबद्दल नसुन नविन बदलांबाबत आहे हे लक्षात घ्यावे.

असो आपले पुन्हा स्वागत आहे.

दशानन's picture

18 May 2010 - 9:45 pm | दशानन

जे लिहले आहे ते निलकांत साठी लिहले आहे हे समजण्याएवढे बाळबोळ तुम्ही नक्कीच नाही आहात, असो.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

धमाल मुलगा's picture

18 May 2010 - 10:53 pm | धमाल मुलगा

बाकी काही बोलत नाही, कारण बरीच स्थित्यंतरामागची खरी माहिती असलेल्या माणसाने चारचौघात उगा तोंड उघडु नये असं जुनेजाणते सांगतात.

बाकी मुद्दे काय असतील नसतील ते असो, परंतु एखाद्याबद्दल "मनाची वाईट परिस्थिती" वगैरे उल्लेख आक्षेपार्हच.
खरे खोटे काय आहे अन काय नाही ते सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. घडत असलेल्या घटनांच्या मालिकेमध्ये बरेच हौशे, गवसे, नवसे आपापले हात धुवुन घेण्यासाठी धावाधाव करताना पाहतो आहे.

आता राहिला मुद्दा "असहमतीचे कारण नाही सांगितले पण जे मला वाटले ते त्यानुसार लिहतो.." ह्याचा, तर
वर लेखामध्ये आणि आनंदयात्रीच्या प्रतिसादामध्येही कारण स्पष्ट वाचता येते!
हवे असल्यास इथे पुन्हा दाखवतो,

"मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला.."
ह्यातुन कळते ते हे की, नीलकांतच्या करियरच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यामध्ये जेव्हा त्याला सगळे लक्ष केंद्रित कामावर करायचे तेव्हा असे मानसिक त्रास सहन करावे लागले..ह्यातुन आता त्याची सुटका झाली!

अश्या परिस्थितीमध्ये एक खरा मित्र म्हणुन अग्गद्दी नाचण्याइतका आनंद होणं अत्यंत सहाजिकच आहे, नाही का?

असो!
पुलाखालुन बरेच पाणी गेले आहे, जाते आहे..सद्यस्थितीमध्ये आम्ही अंमळ मौन पाळणेच सर्वाहिताचे राहील.

शुभं भवतु|

दशानन's picture

18 May 2010 - 11:13 pm | दशानन

अरे वाह.. तुम्ही मौनामध्ये देखील खुप काही बोलता ;)

**

बाकी काही बोलणे हा देखील कोणा ना कोणाचा अपमान ठरु शकेल..
असो.

धमाल मुलगा's picture

19 May 2010 - 2:22 am | धमाल मुलगा

मोडक मास्तरांची शिकवणी आहे म्हटलं!

मौन सोडलं तर तथाकथीत बुरखे पांघरलेल्यांच्या साव लोकांच्या लंगोट्या वेशीवर टांगल्या जातील हे ठाऊक असेलच की, क्काय? :)

आमचं मौनच उत्तम! अन्यथा मुखवट्याआडचे खरे चेहरे बाहेर यायचे. :)

>>बाकी काही बोलणे हा देखील कोणा ना कोणाचा अपमान ठरु शकेल..
आणि खर्‍या बाबी समोर आल्या तर आणखीच प्रलय व्हायचा...कसें?

- (आतील माहितीचा ठेवा) ध.

मिसळभोक्ता's picture

18 May 2010 - 9:31 pm | मिसळभोक्ता

ह्या निर्णयाची वाटच पहात होतो.

संकेतस्थळ असो, किंवा स्टार्ट-अप कंपनी.

संस्थापकाने शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे हे संस्थेच्या भल्यासाठी आवश्यक असते.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

18 May 2010 - 9:33 pm | दशानन

कधी कधीच तुमचे विरजण आवडले असे म्हणावे असे वाटतं ;)

+ १

१००% सहमत.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 May 2010 - 9:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

नीलकांत (मालक-व्यवस्थापक) व तात्या (संस्थापक-मेंटॉर) दोघांनाही त्यांच्या भुमिकांमध्ये यश मिळो. तात्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर होण्यासाठी सदिच्छा.

हैयो हैयैयो's picture

19 May 2010 - 7:24 am | हैयो हैयैयो

६८३

दशसहस्त्र सदस्यसंख्येतील ६८३वा सदस्य ह्या नात्याने श्री. तात्या ह्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. तात्या, मुंबई प्रांतात आपणांस काहीही विधीविषयक सहाय्य हवे असल्यास अवश्य कळवावे. आपल्या समस्या लौकरात लौकर सुटाव्यात ही सदिच्छा!

हैयो हैयैयो!

नील_गंधार's picture

19 May 2010 - 2:19 pm | नील_गंधार

चांगला निर्णय.
तात्या व नीलकांत दोघांचेहि अभिनंदन व शुभेच्छा.
लाँग लीव्ह मिसळपाव.
:)

नील.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

19 May 2010 - 3:25 pm | डॉ.श्रीराम दिवटे

तात्यांची उणीव आम्हांसारख्या पुतण्यांना नक्कीच भासणार आहे.
परंतु नवीन सर्वेसर्वा म्हणून उल्लेखित श्रीयुत निलकांत यांचा याठिकाणी एकही प्रतिसाद नाही, याचे फार फार आश्चर्य वाटते आहे...

नीलकांत's picture

19 May 2010 - 8:49 pm | नीलकांत

मिसळपाव माझ्या हाती देताना तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी अतिशय आभारी आहे.

खरं तर हा लेख वाचतांना मला सुध्दा ते सुरूवातीचे दिवस आठवले. आज मिसळपाव येथे येताना प्रवास कसा झाला तो सुध्दा समोर उभा झाला.

यापुढे मिसळपाव उत्तरोत्तर प्रगती करत राहीन यासाठी मी प्रयत्न करेन. अधिकाधिक सोईसुविधा मिसळपाववर देण्याचा प्रयत्न करेन.

यावेळेस मात्र तात्या तुम्ही शक्य होईल तसे का होईना मात्र मुखपृष्ठ आणि खादाडी लिहीत रहावे ही विनंती करतो.

बाकी समस्त मिपाकरांच्या अभिनंदाबद्दल धन्यवाद. मी तुमच्यातीलच एक आहे. यापुढे सुध्दा माझे मुख्य कार्यक्षेत्र मिसळपावची तांत्रीक बाजू हेच असेल. रोजच्या संपादनाबद्दल संपादक मंडळ काम पाहील.

येथे एक आवाहन सर्व मिपाकरांना करावंसं वाटतं की यापुढे मिसळपावच्या कामात सहभागी होण्याची इच्छा असणार्‍यांना मिसळपावसाठी काही करता यावं अशी योजना आहे. आपलं मिसळपाव अधिक चांगलं करण्यासाठी तुमचे मत नक्की द्या.

-आपला,
नीलकांत

लंबूटांग's picture

20 May 2010 - 8:14 pm | लंबूटांग

मधे काही मदत हवी असल्यास जरूर सांग.

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 May 2010 - 9:38 pm | डॉ.प्रसाद दाढे

नीलकांतचे अभिनंदन आणि तात्यांवरचे संकट लवकर
दूर व्हावे अशी प्रार्थना.

अभिज्ञ's picture

19 May 2010 - 11:49 pm | अभिज्ञ

आईशप्पथ,
मिपावर असे काहि वाचायले मिळेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.
मी स्वतः मिपावर जास्तकरून वाचनमात्र असलो तरी इथे ब-यापैकी रुळलेलो आहे. तात्याने येथून जाणे मनाला फारच क्लेशदायक आहे.
पारावर गप्पांचा अड्डा जमवणारा मुख्यच जर येईनासा झाला तर तेथल्या गप्पांनाही काही अर्थ राहणार नाही.तसे काहीसे झाल्यासारखे वाटतेय.
असो,
नीलकांत व तात्या ह्या दोघांनाही पुढील वाटचाली करीता शुभेच्छा.
व तात्यांवरील संकट व बालंट लवकरात लवकर दुर होवो हिच सदिच्छा.

(व्यथित)अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

पंगा's picture

20 May 2010 - 12:07 am | पंगा

पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

...कमीत कमी या प्रतिसादाखाली तरी अशी स्वाक्षरी टाकायला नको होती!

नीलकांत व तात्या ह्या दोघांनाही पुढील वाटचाली करीता शुभेच्छा.

असेच म्हणतो.

- पंडित गागाभट्ट

पक्या's picture

20 May 2010 - 2:09 pm | पक्या

>>पारावर गप्पांचा अड्डा जमवणारा मुख्यच जर येईनासा झाला तर तेथल्या गप्पांनाही काही अर्थ राहणार नाही.तसे काहीसे झाल्यासारखे वाटतेय
+१
एक सूचवावेसे वाटले - तात्यांनी संपादक मंडळात यावे.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

विसोबा खेचर's picture

20 May 2010 - 2:17 pm | विसोबा खेचर

एक सूचवावेसे वाटले - तात्यांनी संपादक मंडळात यावे.

अनेक धन्यवाद.. परंतु जमणार नाही असे नम्रपणे सांगू इच्छितो..एकदा एखाद्या गोष्टीवर पाणी सोडलं की सोडलं!

तात्या.

तात्या आज काय लिहावे कळत नाही.....