गुलमोहोर २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 May 2010 - 6:35 am

मागील दुवा http://misalpav.com/node/12222

गुलमोहोराच्या झाडाचा प्रॉडक्टव्हिटी नावाच्या गद्य प्रकाराशी काहीही संबन्ध नसतो. त्याची फुले कोणी देवाला वाहिल्याचे पहाण्यात काय ऐकण्यात सुद्धा नाही शुभेच्छाबुके सारखी खास जरबेरा ऑर्चीड्स गुलाबाचा नखरा असलेली राखीव जागा गुलमोहोराच्या नशीबात नसते. हे असले बंदिस्त होऊन खुलत बसणे गुलमोहोराला मानवतच नाही

म्हणूनच की काय गुलमोहोराला फुलायला ऐसपैस आभाळाभर जागा मिळते... निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकड्रॉप वर गुलमोहोर एखाद्या मुक्तहस्त चित्राप्रमाणे कलंदर पणे खुलतो.
 jhad
फांद्यांचा आटोपशीर पसारा डहाळीची नव्हाळी सदोदीत तुकतुकीत असते... पानांचा मंत्रचळ लावणारा रेखीव पिसारा.... आणि त्याच्या मोरपिसाच्या आकाराच्या पाकळ्या .... हे सगळे इतके आखीव रेखीव असते की एखाद्या आईने तिच्या सात आठ वर्षाच्या मुलाला न्हाऊ घालून नीट भांग वगैरे पाडून ठेवलाय्.आणि ते मूलदेखील अगदी पाटावर देवासारखे बसलय असेच वाटतय.
गुलमोहोराच्या झाडाचा हा रेखीवपणा सदैव जाणवत असतो....
हे झाड भारतीय नाहिय्ये.... मादागास्कर बेटावरून कधीतरी कोणीतरी हे झाड इथे आणले....... आणि वड पिंपळ बाभळ उंबर ही खडखडीत नाव कुठे गुलमोहोर हे नजाकतदार नाव. तशीच नजाकत पानांच्या रचनेत ही. एकदम आखीव रेखीव........ पिंपळासारखी वळणदार वेलबुट्टी नसेल पण फारशी आकर्षकक नसलेली पाने रेखीवपणे मांडली तर जे भौमितीक सौंदर्य जाणवते त्याला तोड नाही
pane
पण जाऊ दे ना.... एकदा असेच कोणीतरी म्हणाले की सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नव्हे..... वरवरची नव्हे ........ सौंदर्य हे अंतरंगात असते......... त्यावर दुसरा उत्तरला हो बरोबर आहे तुझे.. सुंदर स्त्रीचे र्‍हदय सुंदर असते. एवढेच काय तीचे यकृत ,प्लीहा लहान आतडे सुद्धा सुंदर असते.........
जाउ दे. इतकी चिरफाड कशाला करायला हवी.
गुलमोहोर जगात बहुतेक देशात आढळतो... उष्ण, समशीतोष्ण कटीबंधात तर हमखास...
असो.......
एखाद्या कौलारू घराशेजारच्या गुलमोरामुळे घराचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते. का कोणास ठाऊक ते घर एकदम आपलेसे वाटू लागते. गुलमोहोराच्या झाडाची सावली वड चिंच पिंपळासारखी डेरेदार नाही. पण पानापानांच्या नक्षीतून झिरपत जाणारा तो उन पावसाचा खेळ भर उन्हातही एक वेगळाच अनुभव देतात
शाळेत असताना आम्ही अजून एक खेळ खेळायचो....... गुलमोहोराच्या पाकळ्यां नखाला लावायच्या... बरोब्बर पाच पाकळ्याचे फूल आणि त्यातही गम्मत म्हणजे एकच पाकळी वेगळ्या रंगाची...... आणि मधोमध असलेला तो तुरा
tura
ती मधोमध असणारी पांढरी ठीपकेवाली पाकळी चवीला किंचीत आंबट लागते
pakli
हे सुद्धा गुलमोहोरच करू जाणे.... एकच पाकळी वेगळी.......
गुलमोहोराच्या झाडाचा आयूर्वेदात काय उपयोग आहे हे मला माहीत नाही.... बहुधा काही फारसा महत्वाचा नसेल.........
या झाडाला फारशी सावली नाही.... त्याची फळे फारशी उपयोगी नाहीत्....त्याची पाने फारशी उपयोगी नाहीत..... कचराच जास्त होतो... फांद्या /लाकूड फारसे उपयोगी नाही तरिही रॉयल पॉईन्शियाना म्हणजे गुलमोहोर जगातल्या पहिल्या पाच देखण्या झाडांत गणला जातो... तो जगभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. फ्लॅम्बॉयन्ट ट्री , मोराच्या फुलांचे झाड झाड , जंगलातली आग .......
आश्चर्य वाटते असे नक्की काय आहे की जे इतर झाडांत नाही आणि गुलमोहोरात आहे...... बहुधा लोकांच्या मनाशी सलगी करण्याची जादू..... ती तर नावापासूनच आहे... गुलमोहोर म्हणले की उगाचच ती उर्दू शायरी आठवते.... ताजमहालावर॑ची फार्सी वेलबुट्टी आठवते.
प्रत्येक सर्‍हदय माणसाचे गुलमोहोराचे एक अनामिक नाते असते.... नसेना का गुलमोहोराचे झाड फारसे उपयोगी........ नसतो का आपला एखादा मित्र्...फारसा उपयोगी न पडणारा.... थोडासा फटकून रहाणारा ...स्वतःला शिष्ठ समजणारा. पण त्याच्याशी आपली मैत्री कायम रहाते....
एखाद्या हळव्या क्षणी या मित्राने आपल्याला हवा असलेला तो कसलासा खांदा देऊ केलेला असतो...........
गुलमोहोराचे तसेच काहीसे आहे......... माझे गुलमोहोराचे नाते काय आहे कोण जाणे पण आहे हे नक्की......
शाळेत असताना वाड्यात रहायचो........... तिथेही भरपूर झाडे होती..पण गुलमोहोर नव्हता जेंव्हा वडीलानी घर बांधले तेंव्हा झाडे कोणती लावायची हे विचारल्यावर प्रत्येकाने गुलमोहोराचेच नाव घेतले...... त्या नन्तर आंब्या फणसाचे
गुलमोहोराच्या झाडाची आणखी एक गम्मत लक्षात आली का......... पिंपळावर मुंजा ...ब्रम्हसम्नध असतो..... चिंचेवर खवीस असतो... वडाच्या झुलणार्‍या पारंब्यावर हडळ असते....... बाभळीसारख्या काटेरी झाडावर सुद्धा झुटिंग असतो....... पेरूच्या झाडावर चेटकीण असते... नारळाच्या झाडावर पिसे की कायसे असते................ ही सगळी झाडे आमची हक्काची खेळण्याची झाडे....... पण रात्रीची शिफ्ट ही या मंडळीनी वाटून घेतलेली असते....
चिंचेचे झाड तर रात्री भितीदाय्क वाटते......... दुपारी काहीतरी आर्या वगैरे सांगणारी पिंपळाची सळसळ रात्री काही वेगळीच भाषा बोलत असते....
आमच्या घराशेजारच्या गुलमोहराच्या फांद्या रात्री वार्‍यानी कर्र कर्र वाजायच्या.....पण ती कर्र कर्र कधीच भीतीदायक वाटायची नाही......... उलट "आहे रे मी सोबतीला ..."अशीच काहिशी असायची.
उंबराच्या झाडाखाली दत्ताचे जागृत देवस्थान असते.... पिंपळाखाली शनी मारुती.... चिंचेशेजारी गणपती अशी देवानीही झाडे वाटून घेतलेली असतात.
गुलमोहोराचे झाड मात्र या सगळ्यापासून अलीप्त असते.......... जणु ते सांगत असते तुम्ही कोणत्या का देवाला भजत असाल...... मी तुमचा खीसा हलका करणार नाही ....तुमच्याशी गूज गोष्टी करेन........ मनावरचा ताण मात्र निष्चीतच हलका करेन.
jhad
आमच्या सातार्‍याला एक रस्ता आहे फारसा रहदारीचा नाही... मात्र नव्या धाटणीची स्वतन्त्र घरे असलेला आहे... एक दोन हॉस्पीटल..एक शाळा.... दुकाने वगैरे जवळजव़ळ नाहीतच असा........ अगदी निनावी.... केंव्हा कोण जाणे कोणाच्या तरी लक्षात आले की त्या दोन अडीच किलोमीटर्च्या रस्त्यावर गुलमोहोराची १०० पेक्षा जास्त झाडे आहेत...... लोकानी स्वतः होऊनच त्या रस्त्याचे नामकरण केले "गुलमोहोर पथ"
ते नाव आपोआप लोकांच्या तोंडी रुळले...
मग तेथे संध्याकाळी पायी फिरायला जाणारी मंडळी वाढली.....
तेथे हमखास दरवर्षी गुलमोहोर दिन साजरा केला जातो......... त्या निमित्ताने लोक एकत्र येतात....चित्रांचे प्रदर्शन ..काव्य संध्या वगैरे साजरे होतात...... ... विषय अर्थातच गुलमोहोर हाच असतो.
चित्रे कविता बहुधा रोमॅन्टीकच असतात. जणु गुलमोहोराला दु:ख ,भूक, इतर विषयांचे वावडे असावे...
हे मी बोलूनही दाखवले....की गुलमोहोराला फक्त प्रेमकवितेतच स्थान का दिलय....
त्या गुलमोहोर डे ला एकजण काव्यवाचनात एक जण त्याची कविता वाचत होता...
"पहाटे तुझ्या कुशीतून .....गुलमोहोराला पहावं"
शेजारी बसलेले मधूसूदन पत्की हळूच पुटपुटले... "वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं"
कसे कोण जाणे पण हे पुटपुटणं सगळ्याना ऐकू गेलं..... गुलमोहराच्या दालनात विनोदाची भर टाकून गेलं
jhad3

वावरविचार

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 6:42 am | शिल्पा ब

आमच्या गावी सिद्धेश्वराच्या वाटेवर गुलमोहोर आहेत...लहानपणी तो पांढरा राजा खायची शर्यत लागायची...इतर पाकळ्यासुद्धा छान लागतात खायला =P~ ...बाकी पानाचा फोटो छानच जमलाय... =D>

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

14 May 2010 - 7:30 pm | पर्नल नेने मराठे

लहानपणी तो पांढरा राजा खायची शर्यत लागायची...इतर पाकळ्यासुद्धा छान लागतात खायला

=)) हो ग हो

चुचु

लहानपणी तो पांढरा राजा खायची शर्यत लागायची

डिट्टो!

अन वाटलं तर मोहोरावं नैतर गुल व्हावं हेही खासच. मस्त विजुभौ ष्टैल लेख!

समंजस's picture

14 May 2010 - 10:32 am | समंजस

वा!!सुंदर!!

गुलमोहर माझाही आवडता वृक्ष. गुलमोहर म्हटले की काही आठवणी चाळवतात.

लहाणपणी गुलमोहर झाडाखाली खेळणे, फुले(पाकळ्या) खाणे, त्या मोठया शेगांना तलवार समजून तलवारबाजी करणे :)

तसेच या व्यतिरीक्त आता गुलमोहर हा शब्द ऐकला/वाचला की एक गाणे हमखास आठवते ते म्हणजे, गुलमोहर गर तुम्हारा नाम होता...छान गाणं आहे :)

मदनबाण's picture

14 May 2010 - 1:19 pm | मदनबाण

वा... :)

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

शुचि's picture

14 May 2010 - 7:32 pm | शुचि

अभ्यासपूर्ण, रसिक लेख.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

jaypal's picture

14 May 2010 - 7:37 pm | jaypal

गुलमोहर छान मोहरला आहे.
"वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं" =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/