एक प्रसंग - पुण्य लादण्याचा

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जनातलं, मनातलं
12 May 2010 - 8:20 pm

"अहो .. उठा .. लवकर उठा" - बायको मला झोपेतून उठवण्यासाठी गदगदा हालवून जागं करत होती.
तिच्या आवाजाचा सूर आग लागली आहे किंवा भूकंप झाला आहे अश्या सूचनेसारखा वाटत होता.
मी दचकून उठत विचारलं " काय गं ? "
"अहो, बाहेर तर या ..गॅलरीत".
मी डोळे चोळंत, चष्मा घालून गॅलरीत आलो. " ते पहा अंगणात" ती म्हणाली.
अंगणात विशेष असं काहीही दिसलं नाही . फक्त एक कावळा एका बारक्या सरड्याला चोचीत धरून जमीनीवर आपटंत होता. तो सरडा जरा चोचीतून सुटला कि कुंपणाच्या दिशेने धावायचा प्रयत्न करायचा आणि हा त्याला परत धरून उचलून आपटायचा.

इथे कुठे काय आहे ? कावळाच तर दिसतोय .. मी
" कावळा ? ... अहो चष्मा घातलाय नां ? कावळा आणि भारद्वाज मधला फरक कळंत नाही ?

रात्री उशीरापर्यंत भारत विरुध्द श्रीलंका वर्ल्ड कपचा टी-२० चा, भारत हरलेला सामना मी उगाचच जागरण करून बघितला. माझे डोळे लाल झालेले . . त्यामुळे कदाचित मला फरक लक्षात आला नसावा. मी त्या पक्ष्याकडे निरखून बघितलं. तो भारद्वाजच होता. त्यानेही त्याच्या लाल डोळ्यानी माझ्याकडे बघितलं आणि परत सरडा चिवडायला सुरवात केली. आमच्या पक्षीमित्र किरण पुरंदरेनी त्याच्या रानभूली कार्यक्रमातून ह्या पक्ष्याची ओळख करून देताना सांगितलं होतं कि, ह्या पक्ष्याला ' नपिता' असेही म्हणतात. न पिता डोळे लाल.

मी म्हटलं " हं, भारद्वाजच आहे"... पण, तु हा दाखवायला माझी झोपमोड केलीस, ग्रेट .. ! "मि. काळे . . " ती वैतागून म्हटली.

ती अशी वैतागली असेल तेव्हा, मला प्रापंचिक उपदेश करायचा असेल तेव्हा आणि नंतर पाणउतारा करायचा असेल तेव्हा, -अहो - असं न म्हणता " मि. काळे" असे ऑफिशियल संबोधन वापरते.

"मि.काळे, सक्काळी-सकाळी भारद्वाज पक्ष्याचं दर्शन आपसूक होणं हे भाग्याचं लक्षण आहे असं मानतात"
बरं मग? . . . मी
बरं मग काय बरं मग . . तुम्हाला ते भाग्य मिळावं म्हणून, तो निघून जायचा आंत मी तुम्हाला उठवलं. समजलं ???
अगं, ते आपसूक होणंसुध्दा महत्वाचं नाही कां ? इथे तू मला गदगदा हालवून, झोपेतून जागं करून त्याचं दर्शन घ्यायला लावतेस. असलं कसलं आलंय भाग्यं . . त्यातून असल्या थोतांड गोष्टीवर माझा काडीमात्र विश्वास नाहीये. तुला कुणीही, काहीही सांगत आणि तू ऐकतेस. एकतर काल भारत हरलेला . . त्यातून हे . . माझ्या बोलण्यात बराच ताव आलेला.

"हॅलो .. हॅलो .. मि. काळे," माझ्या खांद्याला हात लावून ती म्हणाली "सध्या अधिकमास चालू आहे आणि अधिकमासात कुठलेही पुण्यकर्म, अगदी हात जोडून देवाला सदभावे केलेला नमस्कार सुध्दा, बरेच पुण्य देऊन जातो" .

हात् तिच्या . . इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता. त्याच्याकडे हात दाखवून मी तिला म्हणालो ' तो बघ, तुझा पक्षीदेव, सरड्याला कुंपणापर्यंतसुध्दा न जावू देता( खरं म्हणजे - न धावू देता) , स्वतःसाठी बळी चढवून घेतोय". छोट्या सुरीसृप हत्येच पाप करणारा तो लाल डोळेवाला नपिता माझ्या नजरेतूनच उतरला होता. "मि. काळे, राहू द्या. चला, आत चला " असे प्रगटपणे आणि नंतर . . हा माणूस प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवतो ..असे पुटपुटंत ती घरात निघून गेली. मीही आत आलो, म्हणालो " चहा . . .? " माझ्याकडे कठोरकर्तव्य नजरेतून पहात शांतपणे म्हणाली " नमस्कार केलांत ? "
" अरे . . दररोज कुठे नमस्कार करतो मी . चहा मिळण्याकरता " - मी
"मला नाही. त्याला."
"त्या. . त्या ..सरडातोड्या भारद्वाजाला ?" काय, वेडीयेस कां तू ?" अंधश्रध्दा ही श्रध्देपेक्षा पावरबाज असते हेच खरं
"हे बघ, मला चहा दिला नाहीस तरी चालेल . . . काहीतरी काय खुळेपणा"
" अहो . . .( आली नॉर्मलला), मी फक्त अधिकमास चालू आहे म्हणून म्हणाले" एरवी मी तुम्हाला देवधर्माची जबरदस्ती करते कां ?"
" ती कर एकवेळा, पण हे काय, ह्याला नमस्कार कर, त्याला नमस्कार कर . . . चल चहा दे लवकर . . !

धर्मविनोदविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 May 2010 - 8:34 pm | शुचि

=))
फार मस्त जमलाय हा लेख : )
अहो भारद्वाजाचं दर्शन खरच फार शुभ असतं. : )

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

योगी९००'s picture

12 May 2010 - 8:36 pm | योगी९००

न पिता डोळे लाल.
आणि..
हात् तिच्या . . इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.
हे मस्त...!!! हॅ हॅ हॅ

लेख आवडला...!!!

बाकी चहा मिळाला का तुम्हाला नंतर?

खादाडमाऊ

चिन्मना's picture

13 May 2010 - 1:40 am | चिन्मना

मि. काळे चे अहो... झाले म्हणजे नक्कीच चहा मिळाला असणार ;-)

बाकी लेख लई भारी
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

स्वाती२'s picture

12 May 2010 - 8:47 pm | स्वाती२

=)) =)) =))

अनिल हटेला's picture

12 May 2010 - 8:59 pm | अनिल हटेला

=))

=)) =))

=))

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

टुकुल's picture

12 May 2010 - 9:07 pm | टुकुल

मस्त मस्त !!
वाचता वाचता मधेच लेख संपला, पुढे पण काही लिहायचे राहुन गेले असे वाटत आहे.

--टुकुल

प्राजु's picture

12 May 2010 - 9:17 pm | प्राजु

एकदम हलका फुलका...! मस्तच!!

इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.

हे एकदम भारी!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

गणपा's picture

12 May 2010 - 9:27 pm | गणपा

ए१

इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.


=)) =)) =)) =)) =)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2010 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्येष्ट!

आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.

=)) =)) =)) =)) =))

डोंबलाचा अधिक मास ... उन्हाळ्यात अधिक मासाचं कसलं मेलं कौतुक? अधिक श्रावण वगैरे असता तर गोष्ट वेगळी!
श्री. काळे, तुम्ही तुमच्या कंप्यूटरच्या डेस्कटॉपवरच तो भारद्वाज चिकटवून टाका, म्हणजे काही लफडंच नाही, कसं!

अदिती

अरुंधती's picture

12 May 2010 - 9:44 pm | अरुंधती

=))

मि. भारद्वाजांना मात्र शुभशकुनच झाला हो...... त्यांची फीस्ट यशस्वी झाली तुमच्या दर्शनामुळे! ;-)

बाकी लेख आवडला.
<< न पिता डोळे लाल.>>
जबरी कोटी!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

12 May 2010 - 11:00 pm | शुचि

अरु चा प्रतिसाद जबरी.
>>त्यांची फीस्ट यशस्वी झाली तुमच्या दर्शनामुळे>>> =))
न पिता डोळे लाल ही लेखाकांची कोटीही भारी आहे खरी =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

योगी९००'s picture

12 May 2010 - 10:55 pm | योगी९००

काळे साहेब..

तुम्हाला ही शुभशकुनच म्हणायचा...भारद्वाज पक्षाला पाहिल्याचा..

कारण सगळे चांगला प्रतिसाद देत आहे या लेखाला..!!!!

खादाडमाऊ

प्रमोद देव's picture

12 May 2010 - 11:33 pm | प्रमोद देव

म्हणजे...तुमचे डोळे जागरणामुळे लाल आणि त्याचे नैसर्गिक लाल...छान ..दोघेही अगदी नपिता. :D
खूप छान लिहिलंत काळेसाहेब.

शुचि's picture

12 May 2010 - 11:59 pm | शुचि

पण बायका भारी पुण्य वगैरे गोष्टी नवर्‍यावर "लादायला" जातात हे बाकी खरं. :)
मी अपवाद नाही. संधी मिळेल तेव्हा मला देवळात जायचं असतं आणि नवर्‍याला देवळात अजीबात यायचा कंटाळा. यावरनं विसंवाद होतात :( ....... तरी तो कधीकधी माझी इच्छा पूर्ण करतो आणि मग मला कुटुंबाच्या राशीला सामूहीक पुण्य बांधल्याचं अतीव समाधान मिळतं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अरुंधती's picture

13 May 2010 - 1:56 am | अरुंधती

शुचि, घाऊकमध्ये खरेदीसारखं घाऊकमध्ये पुण्य! :-)

अवांतर :

ह्या लेखात कसे भारद्वाजाला नमस्कार आणि मगच चहा हे जे वर्णन केलंय ना, तसेच माझे काही मित्र देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले की मगच प्रसाद मिळतो म्हणून देवळात जायचे!
तुझा नवरोबा कुरकुरत का होईना, येतो ना तुझ्याबरोबर देवळात, मग झालं तर! त्याला म्हणायचं अरे, प्रसाद खादडायला तर चल! (मला देवळातला प्रसाद भारी आवडतो.... त्याला तो कापूर, उदबत्ती, चंदन वगैरेंचा जो अस्फुट स्वाद/ चव लागते ना ती फार सह्ही असते!!! माझे काही मित्र केवळ प्रसाद हादडायला मिळावा म्हणून देवळात दिवसातून दोन-दोनदा जाताना पाहिलेत मी!)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Nile's picture

13 May 2010 - 12:03 am | Nile

=)) =))

-Nile

Pain's picture

13 May 2010 - 3:42 am | Pain

ती अशी वैतागली असेल तेव्हा, मला प्रापंचिक उपदेश करायचा असेल तेव्हा आणि नंतर पाणउतारा करायचा असेल तेव्हा, -अहो - असं न म्हणता " मि. काळे" असे ऑफिशियल संबोधन वापरते.

:)) :))

बेसनलाडू's picture

13 May 2010 - 5:02 am | बेसनलाडू

(मनोरंजनप्रेमी)बेसनलाडू

सहज's picture

13 May 2010 - 10:57 am | सहज

मस्त!

स्पंदना's picture

13 May 2010 - 7:17 am | स्पंदना

चहा प्याल्याबरोबर आलेल्या तरतरी न लगेच लेख लिहिलेला दिसतो?

बाकी लेख तर सुन्दर आहेच पण प्रतिसाद त्याला जास्त खुसखुशीत बनवतात नाही?

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

प्रकाश घाटपांडे's picture

13 May 2010 - 8:19 am | प्रकाश घाटपांडे

" अंधश्रध्दा ही श्रध्देपेक्षा पावरबाज असते हेच खरं

श्रद्धा बी अश्रद्धेपेक्षा अधिक पॉवरबाज असतीया!

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

समंजस's picture

13 May 2010 - 10:52 am | समंजस

छान!मस्त!!झक्कास!!!

jaypal's picture

13 May 2010 - 11:28 am | jaypal

(भारत हारला तरी) आपली चौफेर फटकेबाजी खुप आवडली .
अवांतर= त्या नपित्याचा दिवस कसा गेला असेल बर ?
************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

जे.पी.मॉर्गन's picture

13 May 2010 - 12:22 pm | जे.पी.मॉर्गन

अगदी शीर्षकापासून ते शेवटापर्यंत. एक्दम ब्येस !

नाना बेरके's picture

13 May 2010 - 12:31 pm | नाना बेरके

जागरणानीच लाल झालेले होते ना नक्की ? कां, आदल्यादिवशी रात्री "खंड्या" झोकला होता ?

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2013 - 4:48 am | टवाळ कार्टा

"जुना साधु" पण असु शकतो ;)

आंबोळी's picture

13 May 2010 - 12:48 pm | आंबोळी

एकदम फर्मास लिहिलय....
लहानपणी घराभोवतीच्या बागेतल्या झाडावर आलेला भारद्वाज (शुभ असतो वगैरे कल्पनेमुळे )बघायला लै भारी वाटायचे.... पण एकदा त्याला बुलबुल पक्ष्याच्या घरट्यातली नवजात पिल्ले खाताना पाहिले आणि असल्या कल्पना डोक्यातून पार धुवून गेल्या....

बाकी भारद्वाज दिसायला फारच रुबाबदार आणि ऐटबाज पक्षी आहे.

नपिताची कोटी एकदम छप्परफाड....

( ™ )आंबोळी

इंटरनेटस्नेही's picture

13 May 2010 - 12:56 pm | इंटरनेटस्नेही

=)) =)) मस्त! =)) =))

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

राघव's picture

13 May 2010 - 5:12 pm | राघव

मस्त किस्सा!
एक नंबर :) लई आवडला बगा!

(गावाकडचा अंधश्रद्धाळू) राघव

हा मजेदार किस्सा वर आणते आहे.

बॅटमॅन's picture

12 Feb 2013 - 2:19 pm | बॅटमॅन

नपिता =)) =))

लैच भारी किस्सा, वर आणल्याबद्दल धन्यवाद शुचि!!