(ऐक माझ्या मुला)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
30 Apr 2010 - 6:04 am

प्रेरणा, अर्थातच ही कविता.

ऐक माझ्या मुला, तू जरा, तू जरा
गोंधळी, या घरी, शांतता दे जरा

उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी
बोंबलूनी तु घेशी शिरी या घरा

पीरपीऱ्या म्हणू, की म्हणू कट्कट्या
त्रास देशी असा उठ्विशी मत्शिरा!!

तू हि शाई कशा भिंतिला लावली
बर्बटूनी निघे, रंग हा पांढरा

टाकुनी फेकुनी वस्तु सर्वाघरी
फोडशी आरसा मारुनी पत्थरा

कोडगा हासतो निर्लजा कारट्या
दांडगा, उंडगा.. तू कसा माजरा

झोप की क्षण्भरी श्वास घेतो जरा
ऐक माझ्या मुला, ऐक ना तू जरा

काय साहू पुता, अंत आला अता
दे दया तू मला, जोडतो मी करा

-राजेश
वाचवा वाचवा वाचवा वाचवा

कविताविडंबनविनोदराहणी

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

30 Apr 2010 - 7:18 am | निरन्जन वहालेकर

काय साहू पुता, अंत आला अता
दे दया तू मला, जोडतो मी करा

वा ! खुपच छान ! ! आवडले विडम्बन ! ! !

वेताळ's picture

30 Apr 2010 - 9:56 am | वेताळ

पोराचं काही खरे नाही. :D
वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही ही ही ...

(माझ्या एका सिनीयर कलीगचं असं ठाम मत आहे, पोरं आपले आवाज असे बरोब्बर ट्यून करून घेतात की आई-बापांना त्या आवाजाचा त्रास झालाच पाहिजे. बोलता येत नसलं तरी "कसे माझ्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही!" हे पोरांना अगदी सहजपणे सांगता येतं!)

अदिती

श्रावण मोडक's picture

30 Apr 2010 - 10:18 am | श्रावण मोडक

वाचवा वाचवा वाचवा वाचवा हे लय भारी. विडंबनाला साजेसे.

बेसनलाडू's picture

30 Apr 2010 - 10:28 am | बेसनलाडू

विडंबन फारच आवडले.
(बालक)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

30 Apr 2010 - 11:21 am | प्रमोद देव

चुकीच्या जागी प्रतिसाद पडला. :(

आंबोळी's picture

30 Apr 2010 - 10:37 am | आंबोळी

खुपच छान विडंबन...

आंबोळी

राघव's picture

30 Apr 2010 - 11:18 am | राघव

प्राजुतैची कविताही छान! अन् त्यावरचे तुमचे छान विडंबन! आवडलंन्!!

राघव

प्रमोद देव's picture

30 Apr 2010 - 11:20 am | प्रमोद देव

मस्तच. घासकडवीसाहेब...तुम्हीही काही कमी नाही. केसु,रंगाशेठ ह्यांची परंपरा तुम्ही उत्तमपणे चालवाल ह्याबद्दल अजिबात शंका नाही. पुलेशु.

टुकुल's picture

30 Apr 2010 - 11:28 am | टुकुल

मस्त..
आजकाल मि मुळ कवितेच्या आधी तिचे विडंबन वाचतो :-D

--टुकुल

चेतन's picture

30 Apr 2010 - 11:30 am | चेतन

मस्त

विडंबन छान झालय

साहू पुता मधला साहूचा अर्थ काय की हे आडनाव आहे

चेतन

प्रमोद देव's picture

30 Apr 2010 - 11:33 am | प्रमोद देव

म्हणजे साहणे,सहन करणे

दत्ता काळे's picture

30 Apr 2010 - 11:53 am | दत्ता काळे

वाचवा वाचवा वाचवा वाचवा . . . हे भारी

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2010 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते

राजेश, ही तर स्वतंत्र कविताच. मस्तच जमली आहे. पण आता या सगळ्यातून सुटल्यामुळे गंमत वाटते आहे... त्यावेळी मात्र नकोसे होते हो... :(

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2010 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>राजेश, ही तर स्वतंत्र कविताच.
असेच म्हणतो. कविता आवडली...!

-दिलीप बिरुटे

माउली's picture

30 Apr 2010 - 2:23 pm | माउली

खुपच छान

मीनल's picture

1 May 2010 - 12:03 am | मीनल

मजा आली वाचून.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

सन्जोप राव's picture

30 Apr 2010 - 4:27 pm | सन्जोप राव

विडंबन छान.
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

चतुरंग's picture

30 Apr 2010 - 4:51 pm | चतुरंग

वृत्ताने आणखीनच मजा आली! ;)

चतुरंग

प्राजु's picture

30 Apr 2010 - 7:43 pm | प्राजु

कहर आहे हे विडंबन. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अरुंधती's picture

30 Apr 2010 - 8:50 pm | अरुंधती

हा हा हा हा, मस्त जमलंय विडंबन.... अशी हुच्च कार्टी असली की त्यांना कसे आवरावे ह्या कल्पनेनेच मायबाप दीनवाणे झालेले असतात!

बायदवे, मध्यंतरी असे वाचले होते की घरात दंगा करणारी पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!! आता हे कसे काय, ते कळले नाही बुवा!! :? ;-)

[ मुलांच्या दंग्याने, किलबिलाटाने (?) घरात चैतन्य कायम राहाते म्हणतात, ते असेच व हेच की काय? >:) ~X( ]

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चतुरंग's picture

30 Apr 2010 - 8:56 pm | चतुरंग

ब्लडप्रेशर नियंत्रणात कसे राहील? त्या शास्त्रज्ञाला एकदा आमच्याकडे घेऊन या, कायमचे सोडून देईल संशोधन! ;)

मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय अरुंधती ताईं? :?

(थरथराट)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2010 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय ?

हा हा हा सहमत आहे. ! काट्टे शाळेत गेलेलेच परवडतात अशा निष्कर्षावर आम्ही तरी आलोय. :)

>>>पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!!

हाहाहा ! पोरे नसले की, घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणार राहतो असे त्यांना म्हणायचे असेल. :)

-दिलीप बिरुटे

sur_nair's picture

1 May 2010 - 5:57 am | sur_nair

मस्तच

स्पंदना's picture

3 May 2010 - 7:44 pm | स्पंदना

ह्रदयाला हात घातलात बघा.
"
"उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी"

अरे "टॉक सोफ्टली , सॉफ्टली" सान्गुन सान्गुन जीव जातो माझा.
खर सान्गु? मुल्(पोर?) झाल्यापासुन माझा आवाज पुरा बदललाय

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

रेवती's picture

4 May 2010 - 6:31 am | रेवती

मस्त जमलय विडंबन!
अगदी शेवटच्या ओळीपर्यंत 'सहमत' म्हणावेसे वाटते.
आता मला इतकी सवय झालीये कि दंगा नसला तर घरात कामं उरकत नाहीत. मुलावर ओरडणं बंद केलय्.......काही उपयोग नसतो हो राजेश साहेब! आताशा मी ओरडले कि (माझेच) कान दुखतात.;)

रेवती