मिपाचे धोरण..

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
22 Mar 2008 - 5:41 pm

राम राम,

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :)

आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे.

येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..

  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.
  2. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.
  3. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा...
  4. जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....
  5. मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...

सरपंच ,
मिसळपाव. कॉम

हे ठिकाणधोरणवावरमाहिती

प्रतिक्रिया

ईन्टरफेल's picture

21 Mar 2010 - 7:53 pm | ईन्टरफेल

राम राम मिपाकर सद्स्य आनि आदर्निय तात्या आम्हि पन नविनच आहोत दोन चार दिस झाल मिपाचा सभासद होउन म्हटल चला इथ बि डोकुन बघु तसि आम्हाला डोकायचि सवयच? व लिहायचि सवय नाहिच मुळि पन मराठि मानसासाठि चागल सकेत स्थळ वाटल खुप गमतिदार खुप मजेदार आनि खुपच गम्भिर विशय आसतात इथ आनन्द तर आम्हाला आहेच घ्या साभाळुन आपला (जगाला-ताप)नव्हे जगताप

नितिनभालेराव's picture

23 Apr 2010 - 5:10 pm | नितिनभालेराव

तात्या,

तुमचे रोशनी बद्दलचे लेख वाचले.

खुप आवडले. मला तुमच्या लेखनात व्.पु. काळेची मनाची पकड घेणारी सहजता आढळ्ली.

धन्यवाद.

नितिन.

आंबोळी's picture

23 Apr 2010 - 5:15 pm | आंबोळी

आयला...
तात्याची नवी खरडवही.....

--आंबोळी

VarKari's picture

12 Jun 2010 - 12:47 pm | VarKari

वाऱकरी म्हणज अन्यायावर वार करणारा, 'war' म्हण्जे युध्द अन्याया विरुध्द युध्द पुकारणारा.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस..! असे नसुनन 'नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळ्स..! असे आहे. कारण वारकरि धर्माची स्थापना सन्त नामदेवाने केलेली आहे. ज्ञानेश्वराचे कर्मठ ब्राम्हणापासुन संरक्षन केले आहे.

स्मिता चावरे's picture

24 Jun 2010 - 3:52 pm | स्मिता चावरे

खरडवहीमधे खरड लिहुन सुपूर्त केल्यावर ती कुठे जाते? खरड्फळ्यावर लिहिण्याची
परवानगी किती दिवसांनी मिळते?

गावरान's picture

7 Jun 2015 - 7:46 pm | गावरान

मी एक दोन लेख लिहिले आहेत. हे मिसळपाववर कसे प्रसिद्ध करावे ह्याचा कृपया खुलासा करावा ही विनन्ती.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी

आवागमन या उजवीकडच्या विभागात लेखन करा हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास जे पान उघडेल त्यावर तपशीलवार सूचना आहेत.

मिपावरच्या प्रथम प्रकाशनासाठी शुभेच्छा.

खूप दिवसापासून मराठीतुन वेगवेगळ्या विषयावर व वेगवेगळ्या शैलीतील आवडणारे साहित्य मोबाईल वर सहजरित्या वाचायला मिळालंय,
आधाश्या सारखा वाचत सुटलोय,
मिपास अनेक धन्यवाद,,

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2018 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर स्वागत आहे !