निवेदन...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
18 Apr 2010 - 7:51 pm

नमस्कार मिपाकर मायबापहो,

गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते.

दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो.

यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे. मिसळपावच्या ध्येय धोरणांचे तसेच संपादनाचे, संपादनाच्या धोरणांचे सर्वाधिकार नीलकांतकडेच असतील असेही मी इथे जाहीर करत आहे. नवीन सभासदांचे सभासदत्व मंजूर करण्याचे अधिकारही त्याच्याकडेच दिले आहेत. आजपर्यंत त्याची जबाबदारी तंत्रज्ञ एवढीच होती, परंतु आजपासून म्हणजेच दिनांक १८ एप्रिल २०१० पासून वरील सर्व जबाबदारीही मी त्याच्यावरच सोपवत आहे. आणि तो ही सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडेल याची मला खात्री आहे.

पुढील काही काळाकरता, कधी वेळ मिळालाच तर माझा सहभाग फक्त मिपाच्या मुखपृष्ठापुरता, खादाडी सदराकरताच राहील..

आजपर्यंत मिपाकरता, मिपाच्या संवर्धनाकरता नीलकांतने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला हे निवेदन पूर्ण करता येणार नाही..!

मिपा आपलेच आहे, असाच लोभ राहू द्यावा ही विनंती.

आपलाच,
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

II विकास II's picture

18 Apr 2010 - 7:58 pm | II विकास II

अगदी उत्तम निर्णय.
नीलकांत पुर्ण सहकार्य मिळेल.

आणि नीलकांतचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
आज भरपुर आंनद झाला.
असो.

विसोबा खेचर's picture

18 Apr 2010 - 8:12 pm | विसोबा खेचर

त्याचप्रमाणे मिपाच्या सर्व संपादकांकरताही मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. ते आपली जिम्मेदारी यापुढेही उत्तमरित्या पार पाडतील अशी मला खात्री आहे..

आपलाच,
(कृतज्ञ)
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

shweta's picture

19 Apr 2010 - 12:35 am | shweta

हे सगळ वाचायला अगदि विचित्र आणि गुढ वाटतय.
नक्कि काय झाल?
मिपा वरुन दुर जायच काय कारण? हे काहि समजत नाहि.
आतल्या गोटातल्या लोकांना हे तुम्हि सांगितल असणार पण जालावरील तुमच्या लोकप्रियते मुळे अनेक तर्क वितर्क लावले जातील.
नीलकांत चे अभिनंदन .. पण त्याचा एखादा फोटो टाकला असता तर बर झाल असत.
फक्त गुढता वाढवण्या करता हे निवेदन आहे का? क्रमशः ?

अरुंधती's picture

18 Apr 2010 - 8:17 pm | अरुंधती

तात्या,
तुमच्या ज्या काही अडचणी तुम्हाला मिपापासून मर्यादित स्वरुपात दूर करत आहेत त्या लवकर लवकर निकालात लागू देत आणि तुम्हाला पुन्हा मिपासाठी वेळ देता येऊ देत ही शुभेच्छा!
नव्या व्यवस्थापक व संपादकांचे अभिनन्दन! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

18 Apr 2010 - 8:24 pm | मदनबाण

अरुंधती ताईंशी पूर्णपणे सहमत आहे मी...
निलाकांत तुझे मनःपूर्वक अभिनंदन...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

नितिन थत्ते's picture

18 Apr 2010 - 8:59 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

नितिन थत्ते

इन्द्र्राज पवार's picture

18 Apr 2010 - 8:29 pm | इन्द्र्राज पवार

श्री. तात्यासाहेब ~ नमस्कार. तसा मिपा वर मी नव्यानेच सदस्य झालो आहे (दोन आठवड्यापूर्वी - श्री मुक्त सुनीत यांनी आपल्या या संस्थळाची खूप तारीफ केली होती, म्हणूनही असेल कदाचित). पण येथे आल्यापासून अगदी घरी आल्याचा मला आनंद झाला आणि ज्याज्यावेळी तुमच्या नावाचा उल्लेख या ना त्या निमित्ताने अन्य सदस्यांकडून होत असे त्यावेळीही आपणाविषयी सर्वजण किती प्रेमाने, खेळकरपणे आणि आदराने लिहित असतात याचे प्रत्यंतर मला आले. असो. आपले निवेदन वाचले. बदल हा निसर्ग नियमही असतो, पण हा बदल या कारणासाठीही असतो कि तुमच्यासारख्या संस्थापकाला काहीशी विश्रांती मिळावी व तसेच घरगुती बाबीकडे या कारणास्तव जे काही किंचित दुर्लक्ष झाले असेल तेही सांभाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा.
आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपण जरी येथून जात असला तरी इथल्या घडामोडीकडे तुमचे अगत्यपूर्वक लक्ष राहील यात तिळमात्र संदेह नाही.

श्रीयुत नीलकांत यांना त्यांच्या येथील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पाषाणभेद's picture

18 Apr 2010 - 9:07 pm | पाषाणभेद

आरं बाबा एवढं नग मनाला लावून घ्येवू. मालक हाये त्ये. निलकांत मॅनेजर व्हता आता त्याला फकस्त गल्याव बशीवलं बग. काय तोडफोड करू नगं म्हंजे झालं. नाय तर हाटेलीतलं काम करावं लागलं बरं का.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

इन्द्र्राज पवार's picture

18 Apr 2010 - 11:51 pm | इन्द्र्राज पवार

..... नाय नाय आज्याबात मनाला बीनाला काय बी लाऊन घेणार न्हायी म्या ! झालं असं कि मी इथं याला आणि ह्यो तात्या जातो म्हणायला गाठ पडली तेव्हा अंमलशर असं बी वाटलं कि आपला पायगुण बायगुन म्हणतात तेच परिणाम तर नसाल ह्यो ? म्हणून जरशीक भ्यालो होतो, व त्यावर उतारा टाकावा म्हणून त्यो लांबलचक मेशेज लिवला ! बाकी निळूभौना शुभेच्छा तर द्याला पायाजेतच ना ? आणि तुमी सुशेगात राव्हा आमी काय बी झालं तरी हाटेलातल्या बशा फोडणारी माणसं नायती. शेवटी गल्ल्यावर बसणारा माणूस बी आपल्यातलाच हाया न्हवं ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

इंटरनेटस्नेही's picture

18 Apr 2010 - 9:18 pm | इंटरनेटस्नेही

अरुंधती ताई यांच्याशी सहमत .

इंटरनेटस्नेही's picture

18 Apr 2010 - 9:21 pm | इंटरनेटस्नेही

अरुंधती ताई यांच्याशी सहमत .

चित्रा's picture

18 Apr 2010 - 9:23 pm | चित्रा

या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही सध्या मिसळपावावर येऊ शकत नाही, त्यामुळे मिसळपावकरांना आनंद होत नाही हे नक्की. पण गूढतेमुळे निष्कारण गैरसमज होतात, ते या निवेदनाने तुम्ही दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत, याबद्दलही आभारी आहे. तुमचे अनेक प्रश्न लवकर सुटावेत यासाठी शुभेच्छा. इथे लिहीत राहा, आणि मिपाकरांच्या संपर्कात राहा ही आग्रहाची विनंती.
नीलकांत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

विकास's picture

18 Apr 2010 - 9:42 pm | विकास

सर्वप्रथम नीलकांतला हार्दीक शुभेच्छा!

तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील!

मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्‍या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2010 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांतला हार्दिक शुभेच्छा...!

तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील !

मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्‍या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा ! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.

-दिलीप बिरुटे
[तात्याचा एक लंबरचा फॅन ]

मेघवेडा's picture

18 Apr 2010 - 11:57 pm | मेघवेडा

>> तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.

सहमत!! तात्यांची मिपावरील उपस्थिती = सचिनची भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मधील उपस्थिती!! त्यांच्या त्या त्या जागच्या उपस्थितीनं एक वेगळंच वातावरण निर्माण होतं!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

रेवती's picture

18 Apr 2010 - 10:04 pm | रेवती

नीलकांतचे अभिनंदन!
तात्या, सर्व प्रश्न व्यवस्थितपणे सुटतील अशी आशा!
आपल्याला शुभेच्छा!

रेवती

प्रभो's picture

19 Apr 2010 - 6:03 am | प्रभो

सहमत

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2010 - 7:39 pm | अप्पा जोगळेकर

+१

टुकुल's picture

20 Apr 2010 - 11:51 am | टुकुल

+२,
तात्या, तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत.

--टुकुल

shweta's picture

22 Apr 2010 - 8:00 pm | shweta

हम्म.... :)

टारझन's picture

18 Apr 2010 - 10:10 pm | टारझन

तात्याच्या डोक्यावर मिर्‍या वाटणे मिस करतो आहे.
तात्या लवकरच सगळ्या अडचणींतुन मोकळा होवो .. सगळे पुर्ववत होवो आणि आम्हाला पुन्हा मिर्‍या वाटण्यास मिळो हिच शुभेच्छा .

- टारझन

अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 12:06 am | राजेश घासकडवी

असंच म्हणतो. नीलकांतना अभिनंदन. तात्या, तुमच्या अडचणी लवकर संपतील अशी सदिच्छा.

Nile's picture

20 Apr 2010 - 9:47 am | Nile

असंच म्हणतो. नीलकांतना अभिनंदन. तात्या, तुमच्या अडचणी लवकर संपतील अशी सदिच्छा.

असेच म्हणतो.

भानस's picture

19 Apr 2010 - 12:01 am | भानस

निलकांत यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
तात्या अडचणीतून लवकर सुटका होऊ देत व लगेच तुम्ही पुन्हा मिपावर पूर्वीसारखेच याल अशी आशा आहे, अनेक शुभेच्छा!

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Apr 2010 - 12:17 am | अक्षय पुर्णपात्रे

भानसतैंप्रमाणेच म्हणतो. श्री नीलकांत यांना शुभेच्छा. तात्यांना अनेक सदिच्छा.

_______________
We weren't lovers like that and
Besides it would still be alright
-लेनर्ड कोहेन

प्रियाली's picture

19 Apr 2010 - 3:26 am | प्रियाली

असेच म्हणते. :)

आपल्या गैरहजेरीतही मिपा व्यवस्थित सुरु राहिल अशी आशा आहेच.

मी-सौरभ's picture

19 Apr 2010 - 12:30 am | मी-सौरभ

वि.खे. साहेबः तुमच्या अड्चणी लवकर दूर होवोत अशी सदिच्छा...

नीलकांता: तुम्हाला शुभेच्छा :)
आता तुम्हाला चाबूक घेउन फिराव लागणार आहे........

-----
सौरभ :)

शुचि's picture

19 Apr 2010 - 1:33 am | शुचि

अरुंधतीशी सहमत. लवकर परत या तात्या. आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

भारद्वाज's picture

19 Apr 2010 - 1:48 am | भारद्वाज

नीलकांतचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा !
तात्या, सर्व प्रश्न व्यवस्थितपणे सुटतील अशी आशा !

sur_nair's picture

19 Apr 2010 - 5:51 am | sur_nair

सर्वांच्या मताशी आगद सहमत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर होवोत हीच इच्छा.

जयंत कुलकर्णी's picture

19 Apr 2010 - 9:41 am | जयंत कुलकर्णी

तात्या,
अभी ना जाओ छोडकर की
मिसळ अजून संपली नाही.
मागितलेला कट आणि
शेवेची प्लेट आली नाही.

अभी अभी तो आये है,
ऑर्डर आत्ताच दिली आहे,
पेपर हातात घेतला आहे,
पाणी जरा पिऊ तर दे,
चा ची तल्लफ येऊ तर दे..........

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

आनंदयात्री's picture

19 Apr 2010 - 9:55 am | आनंदयात्री

नीलकांतचे अभिनंदन आणी अनेकोत्तम शुभेच्छा !!

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 10:07 am | इनोबा म्हणे

असेच म्हणतो.

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 10:40 am | धमाल मुलगा

असेच म्हणतो!

नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा! ही जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडालच ही खात्री आहेच.

मिपाची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत जावो.
...आमेऽऽन!!!!!

ऋषिकेश's picture

19 Apr 2010 - 1:39 pm | ऋषिकेश

नीलकांतला नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2010 - 2:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नीलकांतला मनापासून शुभेच्छा आणि सहकार्य!

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Apr 2010 - 9:26 pm | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो.
पुण्याचे पेशवे
Phoenix

मस्त कलंदर's picture

19 Apr 2010 - 9:33 pm | मस्त कलंदर

नीलकांतला मनापासून शुभेच्छा!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

तात्या हजर असला कि इथे मस्त बहार येतो.
निलकांत ना शुभेच्छा

वेताळ

इन्द्र्राज पवार's picture

19 Apr 2010 - 10:26 am | इन्द्र्राज पवार

तुमच्या सर्वांच्या तुलनेत मी तसा इथे नवा आहे, तेंव्हा कृपया भद्रपुरुष श्री. नीलकांत यांच्या विषयी कुणी चार शब्द लिहील का? (नाव तर छानच आहे !)

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

रामदास's picture

19 Apr 2010 - 10:50 am | रामदास

नीलकांतचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !!

अवलिया's picture

19 Apr 2010 - 12:23 pm | अवलिया

अपेक्षित बदल काहीसा उशीरा. असो.

--अवलिया

भोचक's picture

19 Apr 2010 - 1:32 pm | भोचक

तात्या, तुमच्या समोरील अडचणी लवकरात लवकर दूर होऊन मिपावर पुन्हा दिसाल या अपेक्षेसह नीलकांतचे अभिनंदन.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

दिपक's picture

19 Apr 2010 - 1:41 pm | दिपक

नीलकांतला शुभेच्छा आणि सहकार्य करुच. तात्या अडीअडचणीतुन लवकर बाहेर निघावेत ह्यासाठी लालबागच्या राज्याचरणी प्रार्थना.

स्वाती२'s picture

19 Apr 2010 - 7:49 pm | स्वाती२

तात्या, तुमच्या अडचणी लवकरच दूर होवोत.
निलकांत, अभिनंदन आणि शुभेच्छा!

चिन्मना's picture

19 Apr 2010 - 7:56 pm | चिन्मना

तात्या,
तुमच्या वैयक्तिक अडचणी लवकरात लवकर दूर होवोत. मिपावर अधूनमधून चक्कर मारालच हे वाचून बरे वाटले.

निलकांत, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या मिपाला सांभाळत होताच, आता ही नवीन आणि मोठी जबाबादारीसुद्धा व्यवस्थित पेलाल याबाबत शंका नाही. शुभेच्छा!
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

तात्या सर्व कटकटींतून सुखरुप मोकळे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना व नीलकांत यांना नव्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी ईश्वर पाठबळ देवो या शुभेच्छा! पार्टीच्या अपेक्षेसह...! ;)

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

चतुरंग's picture

19 Apr 2010 - 8:57 pm | चतुरंग

वाढत्या जबाबदारीला तोंड द्यायला तो सक्षम आहेच त्यासाठी शुभेच्छा!
तात्या त्यांचे प्रश्न सुटल्यावर पूर्ववत येणे सुरु ठेवतील अशी आशा आहे.
त्यांनाही प्रश्न सुटण्यासाठी शुभेच्छा!

चतुरंग

प्राजु's picture

19 Apr 2010 - 9:22 pm | प्राजु

तात्या, लवकर मोकळे व्हा अडचणीतून आणि पुन्हा पूर्ववत मिपावर बहारदार लेखन सुरू करा.
नीलकांतला खूप शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

दिपाली पाटिल's picture

20 Apr 2010 - 1:06 am | दिपाली पाटिल

निलकांत यांचे अभिनंदन...

दिपाली :)

आणि तू पुन्हा एकदा पूर्णपणे मिपावर येशील अशी आशा आहे.
ऑल दि बेस्ट !

अभिनंदन नीलकांत !
तुला पूर्ण सहकार्य करूच.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2010 - 9:34 am | प्रकाश घाटपांडे

तात्याच्या अडचणी काळ सोडवेलच! नीलकांतला सदिच्छा! मिपाकरांनी स्वयंशिस्त बाळगली तर त्या कृतीशील सदिच्छाच ठरतील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

श्रीराजे's picture

20 Apr 2010 - 10:35 am | श्रीराजे

निलकांत तुझे अभिनंदन...!

सुप्रिया's picture

20 Apr 2010 - 11:27 am | सुप्रिया

निलकांतचे अभिनंदन !! तात्या लवकर परत या.

झकासराव's picture

20 Apr 2010 - 11:51 am | झकासराव

नीलकांत अभिनंदन रे!! :)

तात्याला त्याचे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी शुभेच्छा!!

लवकरच सर्व सुरळीत होइल..

shweta's picture

22 Apr 2010 - 11:31 am | shweta

हम्म..

विजुभाऊ's picture

10 May 2010 - 3:56 pm | विजुभाऊ

नीलकान्त समर्थपणे सर्व जबाबदार्‍या सांभाळेल हा विश्वास आहे.
तात्याच्या अडचणींचे लवकरात कवकर निवारण होवो ही सदीच्छा...

दत्ता काळे's picture

10 May 2010 - 4:11 pm | दत्ता काळे

तात्या
तुमच्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात आणि तुमचे अजूनाजून उत्तम लेखन आम्हाला वाचायला मिळावे अशी इच्छा व्यक्त करतो.

निलकांत ह्यांना शुभेच्छा !

shweta's picture

10 May 2010 - 8:36 pm | shweta

ह्म्म्म

कोणावर विश्वास ठेवावा ?