लावणी: मोबाईल चार्ज करा तुमचा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Apr 2010 - 6:09 am

मोबाईल चार्ज करा तुमचा

मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा
काय काम करायचं तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा

कालच्याच दिशी आली वाड्यावर
इस्कोट झाला तुमी असल्यावर
पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||

गुलूगुलू बोलायच आसंल
फोटू बिटू काढायाचा आसलं
तर लांबून हात काय हालवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||२||

आत्ता ग बाई काय करू तरी काही
गोड गुलाबी पत्र न देता
नुसता ऐशेमेस काय पाठवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||३||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ खास्दार उगा मिशीवर मारू नगा
ओ टोपीवाले उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा

-पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/०४/२०१०

हास्यकविताविनोदतंत्रमौजमजा

प्रतिक्रिया

Manoj Katwe's picture

14 Apr 2010 - 7:54 am | Manoj Katwe

वाचुन माझा डोक डिसचार्ज झाल.

बेभान's picture

14 Apr 2010 - 12:24 pm | बेभान

यावेळी भिडली/भेदली नाही. [( I)