पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कोरो

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
22 Mar 2010 - 9:24 pm

Painting by Corot

Jean-Baptiste-Camille Corot
हा फ्रेन्च निसर्ग चित्रकार (१७९६ - १८७५)
http://en.wikipedia.org/wiki/Jean-Baptiste-Camille_Corot

खालील ठिकाणी याची उत्कॄष्ट चित्रे सापडतील :
http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=992

संस्कृतीकला

प्रतिक्रिया

टारझन's picture

22 Mar 2010 - 10:16 pm | टारझन

सुरेख चित्र आम्हाला नेहमीच भुरळ घालतात ! लै भारी चित्र !
एकदा एका चित्रकला प्रदर्शनाला गेलो .. एकेक चित्र १५-१५ मिनिटं न्याहाळुन पहात असल्याने सहकारी वैतागले होते :) ते कुठे कडेला जाऊन बसले होते .

-(चित्रकला प्रेमी) टारोबा पेंटर

मीनल's picture

23 Mar 2010 - 3:08 am | मीनल

त्या चित्रकला प्रदर्शनात झाड झुडपे, जंगल ,प्राणी यांची चित्रे असतील बहुधा.
ट्रान्स मधे गेला असेल टारझन.
सहकारी वैतागणार नाहीत तर काय?

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Mar 2010 - 10:29 pm | बिपिन कार्यकर्ते

सु रे ख ! ! !

बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२'s picture

22 Mar 2010 - 10:48 pm | शानबा५१२

पावसाळा आहे आणि बिचा-या कुठे चालल्यात....पॉर बी हाय.आरं आरं...संभालुन जा हा बाय............
.निसर्गचित्र? झाडं बघ काय झड्लीत!!

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

मदनबाण's picture

22 Mar 2010 - 10:55 pm | मदनबाण

अगदी त्या वेगळ्या काळात नेणारे चित्र...
पाण्यातले प्रतिबिंब तर अप्रतिमच आहे... :)

(एम.एफ. मदन) ;)
मदनबाण.....

अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ?
http://www.zeenews.com/news613308.html

चित्रा's picture

23 Mar 2010 - 3:17 am | चित्रा

नक्की वेळ कळत नाही - किंचित ढगाळ हवा.
उजवीकडची व्यक्ती पाण्याजवळ काय करते आहे कळले नाही.
पण एकंदरीत चित्रीकरण आवडले.
काळ जुना आहे हे माणसांच्या कपड्यांवरून केवळ कळते आहे.
बाकी माणसे बदलतात, निसर्ग तसाच राहतो थोडाबहुत.

चित्रगुप्त's picture

23 Mar 2010 - 10:30 am | चित्रगुप्त

कलाकॄतींचा आस्वाद घेताना त्यातील सर्व काही "कळावे" हा आग्रह बाजूला ठेवणे आवश्यक. शेवटी " कळणे" म्हणजे तरी काय?

बासरी किंवा संतूर ऐकताना आपल्याला काय "कळत" असते?
हां, आपल्याला सारेगमप वगैरे सारखी परिक्षक वा "मान्यवरां" ची भूमिका पार पाडायची असेल, तर गोष्ट वेगळी. एक रसिक म्हणून कोणत्याही कलाकॄतींचा आस्वाद घेताना ही न्यायाधिशाची भूमिका असू नये, हेचि बरे.

समजा, या चित्रातील "वेळ" सकाळी ९ वाजून सदतीस मिनिटे, एकोणीस सेकन्द अशी असून उजव्या बाजूच्य मुलिचे नाव ज्युडिथ असे आहे, तिचे वय सत्तावीस वर्षे, सात महिने असून ती चित्रात कपडे धूत आहे, तिचे वडील अमूक गावात पाद्री असून त्यांचे खापरपणजोबा हे ...........................वगैरे जरी "कळले" तरी त्याने काय फरक पडणार, उलट या गोष्टी कलास्वादाला मारकच ठरतील.....असो.

चित्रा's picture

24 Mar 2010 - 5:49 am | चित्रा

परिक्षक किंवा समिक्षक यापैकी मी कोणी एक नाही.
न्यायाधिशाची भूमिका घेतली असे का वाटले कळले नाही. पण चित्र एकदा पाहिल्यानंतर त्याच्याकडे बघून काय वाटते, ते नुसते जसे विचार आले तसे लिहीले.

मजा, या चित्रातील "वेळ" सकाळी ९ वाजून सदतीस मिनिटे, एकोणीस सेकन्द अशी असून उजव्या बाजूच्य मुलिचे नाव ज्युडिथ असे आहे, तिचे वय सत्तावीस वर्षे, सात महिने असून ती चित्रात कपडे धूत आहे, तिचे वडील अमूक गावात पाद्री असून त्यांचे खापरपणजोबा हे ...........................वगैरे जरी "कळले" तरी त्याने काय फरक पडणार, उलट या गोष्टी कलास्वादाला मारकच ठरतील.....असो.

:) खरे आहे. कलास्वादाला मारक आहे हे मात्र मान्य नाही.

म्हणजे असे की मोनालिसाच्या चित्रातल्या मोनालिसेला नक्की काय बघून ती गूढ स्मित करते आहे असा विचार येतोच ना? ही मोनालिसा नक्की कोणा असेल, चित्रकाराला तिचे"च" चित्र काढावेसे का वाटले असेल असे काहींना वाटेल तसे आहे.

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 5:40 pm | चित्रगुप्त

ही मोनालिसा नक्की कोण.....चित्रकाराला तिचे"च" चित्र काढावेसे का वाटले

हे चित्र आवडले असेल तर कोरो ची खालील लिंक वरील १३२ चित्रे जरूर बघा:

http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=992

झकासराव's picture

23 Mar 2010 - 10:08 am | झकासराव

मस्त आहे चित्र :)

वाहीदा's picture

23 Mar 2010 - 4:27 pm | वाहीदा

अर्श (आसमान) से लेकर फर्श (जमीन) तक सिर्फ एकही लफ्ज ..
बेमिसाल !!
~ वाहीदा