वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in कलादालन
30 Dec 2009 - 12:23 pm

पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत. पुढल्या महिन्यात अजून काही येणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी विकीपीडियावरील ही लिंक पाहा.
.
.
.
.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

हे ठिकाणकलाभूगोलमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

टुकुल's picture

30 Dec 2009 - 12:48 pm | टुकुल

खतरा फोटोज,
तुम्ही, राजे आणी अजुन थोडी लोक जन्मजातच पायाला चाक बांधुन आली आहेत का काय?

--टुकुल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2010 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खतरा फोटोज,

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

30 Dec 2009 - 12:50 pm | मदनबाण

व्वा. मस्त फोटो आहेत... :)
पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत. पुढल्या महिन्यात अजून काही येणे अपेक्षित आहे.
मग अजुन फोटो सुद्धा अपेक्षित आहेत... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Dec 2009 - 1:01 pm | भटकंती अनलिमिटेड

टुकुल,पायाला नाही पण मनात चाकं बांधून घेतली आहेत :-)
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मदनबाण,येतील येतील. अजून येतील.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

इकडे कोल्हापुर व बेळगाव पट्ट्यात बर्‍याच तलावात मी ह्या महिन्यात बघितले आहेत.फोटो नेहमी प्रमाणे नाद खुळा.

वेताळ

घाटावरचे भट's picture

30 Dec 2009 - 1:48 pm | घाटावरचे भट

छानच फोटो. बाकी तुमच्या पायाच्या चाकांबद्दल माहित नाही पण डोळ्यांत एक व्ह्यूफाईंडर नक्की बसवलेला असावा. :)

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Dec 2009 - 3:04 pm | भटकंती अनलिमिटेड

वेताळ, कोल्हापूर-बेळगावला असतात ती ब्राम्हणी बदकं (Rudy Shelducks). उत्तरेकडून येणाऱ्या पाहुण्यांपैकीच एक. पण हे "BHG" एवढ्या दक्षिणेत क्वचितच जातात.

भटोबा, व्ह्यूफाईंडर सगळ्यांकडेच असतो. काही लोक जरा जास्त वापरतात इतकेच.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

sneharani's picture

30 Dec 2009 - 3:17 pm | sneharani

मस्त फोटो... सुंदर

चित्रा's picture

30 Dec 2009 - 5:40 pm | चित्रा

दुसरा विशेष आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2009 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

अरे एकदम मस्त छायाचीत्रे पंकजशेठ.

बाकी तुम्ही आमच्या रोहन चौधरींचे मित्र म्हणजे काय बोलायलाच नको. "भटकंतीसाठी जन्म आपुला" हे ब्रिदवाक्य करुन घ्याच तुम्ही लोक आता.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

30 Dec 2009 - 6:28 pm | अवलिया

शेवटच्या फोटोतील वेगळा उडणारा पक्षी पाहुन आमच्या एका मित्राची आठवण झाली, पद मिळाल्यावर आमच्यापासुन वेगळा झाला. जिथे असो सुखी असो.

--अवलिया

अशोक पतिल's picture

30 Dec 2009 - 7:23 pm | अशोक पतिल

खुप सुरेख फोटो आहेत . दुसरा फोटो विशेष आवडला. तुमच्या कलेला खरच दाद दयावीशी वाटते.
अशोक

विनायक रानडे's picture

30 Dec 2009 - 8:10 pm | विनायक रानडे

पंकज सुरेख पॅनिंग, कॅनन चे ऑटो पोकस छान काम करते आहे. का मॅन्युल मोड होतास, असल्यास खरच छान नियंत्रण आहे. सूर्य मागे असण्याचा फायदा झाला आहे.

चतुरंग's picture

30 Dec 2009 - 8:16 pm | चतुरंग

सगळेच छान आहेत पण दुसरा "सिंक्रोनाईज्ड फ्लाईंग" दाखवणारा प्रचंड आवडला!
नेमके कुठून कसे गेलात वगैरे जरा प्रवासाची माहिती द्या राव!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Dec 2009 - 8:24 pm | बिपिन कार्यकर्ते

अ आणि प्र आणि ति आणि म आणि ! आणि ! आणि ! ***

*** असे लिहायची ष्टाईल आमच्या भटोबांकडून साभार. :)

बिपिन कार्यकर्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Dec 2009 - 8:42 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री झरेकर, अप्रतिम चित्रे.

प्रभो's picture

30 Dec 2009 - 9:09 pm | प्रभो

मस्तच पंकज....फोटो आवडले

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

sujay's picture

31 Dec 2009 - 12:56 am | sujay

दूसरा फोटो आवडला.

फास्टरफेणे's picture

10 Jan 2010 - 1:30 am | फास्टरफेणे

आजच धरणावर चक्कर टाकली...८ "बार हेडेड गीज"दिसले...

आणखीही काही फोटो काढलेत...पंकजरावांच्या फोटोइतके चांगले नसले तरी अगदी काही वाईट नाहीत ! :)


स्वाती२'s picture

10 Jan 2010 - 4:41 pm | स्वाती२

पंकज आणि फाफे,
फोटो आवडले.