<सवयीने मंद >

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
10 Dec 2009 - 11:03 am

प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद)

होळीची याद देऊन जाणारे
विविध नावांचे विरविरीत धागे...
काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ
काही नेहमी व्यस्त
काही सुस्त
तेच वळण तेथेच नेणारे फक्त
कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ...
तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ...

पोळीची साद घालून जाणारे
विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे...
काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट
काही स्वस्त
काही फस्त
काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त
चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले
कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले , निष्कारण उष्टावलेले सामान्य भाज्यांचे कंद ...
तरीही एकूणएक धाबे फिरून पहाणारा भुकेजलेला भुक्त...

चुन्याची साद घालून जाणारे
विविध तंबाखूचे लटकते पुडे...
काही गायछापलेले, आणि काही पंढरपुरी वट्ट
काही गुटखाळलेले
काही नुसतेच मळलेले
काही मळण तेच ; तेच खाणारे फक्त
कधी थुंकलेले , निष्कारण चघळलेले सामान्य कचर्‍याचे छंद...
तरीही एकूणएक पुडे उचकटून मळलेला तंबखुळलेला खुळा मंद ...

दिवाळीची साद घालून जाणारे
विविध फराळांचे चवदार धागे...
काही तळलेले , आणि चटपटीत खट्ट
काही चटकदार
काही पोटभरणारे
काही कडबोळ्या त्याच ; तेच हादडणारे दात
कधी पाडलेले, निष्कारण तळलेले सामान्य पीठ जुने बंद ...
तरीही एकूणएक कडबोळी उचकटून खाणार रुंदावलेले हे दोंद ...

पाकक्रियामुक्तकइतिहासविडंबन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Dec 2009 - 11:05 am | अवलिया

टुकार !
विडंबनापेक्षा गझलावर लिहा ! दोन प्रतिसाद जास्त मिळतील.

--अवलिया

चतुरंग's picture

10 Dec 2009 - 5:57 pm | चतुरंग

तुमचा प्रांत नव्हे विजूभाऊ!
तुम्ही शायरी करा, आंबे आणि फळांवर लिहा.
आम्ही आनंदाने वाचू.

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Dec 2009 - 3:00 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विजुभाऊ, प्रेरणेलाही शरम वाटावी इतकी विडंबनाची अवहेलना. त्च त्च.

विजुभाऊ's picture

11 Dec 2009 - 9:46 am | विजुभाऊ

अक्षयजी माझा हेतू बर्रोब्बर ओळखला ...... ;)