तो, हा आणि मी

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
2 Dec 2009 - 3:14 pm

आज काल मला त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे...... गेल्या काही दिवसात तर तो दिसलाच नाही...

कुठे गेला असेल तो??? आज काल का मला भेटत नाही???

आधी नेहमी माझ्या बाजूला उभा असायचा.... कधीही साथ न सोडणारा तो असा अचानक कुठे गेलाय????

दंगा घालतानाही त्याची साथ असायची, ऑफिसात काम करताना पण त्याची साथ असायची....

सर्व मित्रांसोबत असतानाही त्याचीच साथ असायची.... तो असताना कधीच कुठले काम करणे जिवावर आले नाही.

सुखातही तो माझ्या सोबतीला व दुखा:तही तो माझा साथी!!!! काय झाले असेल त्याची माझी साथ सुटण्यासारखे...????

कदाचित हा दुसरा जो सध्या माझ्या साथीला असतो त्यामुळे असेल का??

कोण 'हा'??? ह्याची माझी ओळख कधी झाली???

केव्हापासुन हा माझ्या आयुष्याचा भाग झाला???

पण एक मात्र आहे... हा आल्याच्या दिवसापासूनच मला आवडू लागला होता..

ह्याची साथ देण्यासाठी मी ऑफिसातली कामे इतरांवर ढकलू लागलो...

ह्याचा साठी मी माझ्या मित्रांपासून दुरावलो...मित्रांना भेटण्यापेक्षा मी ह्यालाच धरुन राहिला लागतो..

हे सगळे चालू असताना कधे मधे तो मला भेटायचा... माझ्या सहवासात असायचा तो....

तो चा सहवास खरे तर हवाहवा असायचा..

पण हा... ह्याने माझ्या वर एक धुंदी चढवलेली आहे.

कोणती ही धुंदी??? का मी ह्याला झटकून टाकू शकत नाही????

का मी ह्याचा मधे गुरफटत चाललो आहे???

आज मला तो ची नितांत गरज जाणवते आहे...

येईल का तो परत माझ्या कडे???

मला हा व तो दोन्हींना सोबत घेउन जगता येईल का???

(ह्या लेखात समाज प्रबोधन व विचारप्रवर्तक असे काहीच लिहिलेले नाहिए.)

काय मंडळी विचारात पडला ना??? एक पुरुष आपल्या आयुष्यातील दोन पुरुषांबद्दल बोलत आहे का?? खरे तर नाही!!!!! पण असे समजायचेच असेल तर समजू शकता.. असो पण काहीही ठरवण्यापुर्वी ह्या दोघांचे नाव तर ऐका...

तो:- उत्साह

हा:- कंटाळा/आळस

कधी कधी आपण कंटाळा आला असे म्हणत दिवस ढकलतो.. हेच रडगाणे गात गात आपल्यामधला उत्साहच हरवत जातो.. अशाच एका कंटाळवाण्या दिवशी लिहिलेले कंटाळवाणे विचार....

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

2 Dec 2009 - 3:17 pm | मस्त कलंदर

मी आजच 'हा' झटकून टाकलाय.... नि तो तर सोबत आहेच!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राधा१'s picture

2 Dec 2009 - 3:22 pm | राधा१

आमच्याकडे सगळ्यांचाच हा गायब आहे...!!!
सुंदर प्रकटन..एगळ्याच इस्टाइलने..

दशानन's picture

2 Dec 2009 - 3:52 pm | दशानन

सुंदर प्रकटन.

टार्याची मदत घ्या.
तो तुम्हाला योग्य सल्ले देऊ शकेल.
कसे नडावे कसे भांडावे.
मग कंटाळा पळून जातो.
उत्साह आपल्या जवळ राहतो.

प्रतिसाद बाहेरून टंकला आहे त्यामुळे अधीक जाग घेतली ह्या बद्दल समक्ष्व.

टारुजे

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

गणपा's picture

2 Dec 2009 - 4:10 pm | गणपा

हा हा आणि हा मस्त छोटेखानी प्रकटन रे निखिल..

-माझी खादाडी.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2009 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

हम्म्म्म्म्म
विचारजंती लेख वाचला, तितकासा आवडला नाही.

असो...

हा लेख मला आवडला नाही हे आपले माझे मत आहे, तुम्ही स्वांत सुखाय लिहित असाल तर प्रश्नच मिटला.

अवांतर :- मस्त लिहिले आहेस रे. असेच जरा आळस झटकुन अध्ये मध्ये लिहित जा. आजकाल धम्या, डॉन्या सारख्या 'बाल बुद्धी' लेखकांनी लिहिणे बंद केल्यापासुन 'छानसे वाचायला' मिळतच नाही बघ.

माझी बायडी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

2 Dec 2009 - 4:54 pm | विजुभाऊ

आजकाल धम्या, ..........
धम्याचे लिखाण किती दिवसात पाहिले आहेस रे? त्याला आज काल ऐवजी गेल्या वर्षीपासून असे म्हणायला हवे.
असो...
राजकुमार महोदय आपला हा प्रतिसाद स्वान्त सूखाय असेल तर वेगळी गोष्ट. पण एके काळी पराकोटीच्या खरडवह्या लिहिणार्‍या अभ्यासू लेखकाने हे लिहावे म्हणजे आश्चर्यच आहे.
पोरीकथेतून ऑ सॉरी परीकथेतून बाहेर डोकवा जरा .....
.....परीकथेतून बाहेर पडलेला कोणे एकेकाळचा राजकुमार्....विजुभाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2009 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार

आजकाल धम्या, ..........
धम्याचे लिखाण किती दिवसात पाहिले आहेस रे? त्याला आज काल ऐवजी गेल्या वर्षीपासून असे म्हणायला हवे.
असो...
राजकुमार महोदय आपला हा प्रतिसाद स्वान्त सूखाय असेल तर वेगळी गोष्ट. पण एके काळी पराकोटीच्या खरडवह्या लिहिणार्‍या अभ्यासू लेखकाने हे लिहावे म्हणजे आश्चर्यच आहे.
पोरीकथेतून ऑ सॉरी परीकथेतून बाहेर डोकवा जरा .....
.....परीकथेतून बाहेर पडलेला कोणे एकेकाळचा राजकुमार्....विजुभाऊ

मला लिखाणविषयातला फारसा गंध नाही.. तरीही त्याबाबत माझी अशी काही ठाम मतं आहेत तीच मी मांडली.. त्यांना कितपत महत्व द्यायचं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे..
शेवटी काय, कुणाच्या तरी आरवण्यानं उजाडल्याशी कारण म्हणतात ना, तद्वत छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून ऑनलाईन पद्धतीनं लेख लिहुन का होईना, उद्या कुणी छान लिहु लागल्याशी कारण!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll

हा घालवायचे आणि तो परत बोलवायचे उपाय इथे मिळतील.

अवांतरः निख्या लेख छान आहे रे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा निखिलभावजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या समस्यांवर इतके विचारगहन लिहू लागलात ... अत्यानंद झाला!

अदिती

कुंदन's picture

2 Dec 2009 - 4:52 pm | कुंदन

विकांताला "ह्या"ला जवळ करत जा.
बाकीच्या दिवशी "त्या" ला.

स्वाती२'s picture

2 Dec 2009 - 5:16 pm | स्वाती२

आवडले.

अवलिया's picture

2 Dec 2009 - 6:04 pm | अवलिया

छान !

--अवलिया

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 6:19 pm | श्रावण मोडक

आळस आणि उत्साहाविषयीही या स्टाईलमध्ये लिहावेसे वाटले यात बरेच काही आले! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 8:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे "एन्थुझियाझम"ला "एन्थु" म्हणणारे लोकही आहेत हो!

अदिती

प्रभो's picture

2 Dec 2009 - 8:15 pm | प्रभो

हाहा....चालू द्या..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रीयुत संतोष जोशी's picture

3 Dec 2009 - 8:32 am | श्रीयुत संतोष जोशी

मस्त लिहिलय . आवडलं.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

हर्षद आनंदी's picture

3 Dec 2009 - 12:29 pm | हर्षद आनंदी

आता 'ह्या' च्यामुळे 'तो' गेला त्याला काय करावे?

अवांतर : सेहवागच्या बॅटमधुन 'ह्या'ने पलायन केले आहे असे वाटते.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 11:41 pm | विसोबा खेचर

येथील काही अवांतर प्रतिसाद उडवले आहेत..

तात्या.